नवा अध्याय - 1 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवा अध्याय - 1

आज मीना लवकरच उठली होती .आंघोळ करून ती देव घरात गेली . तिने देवाला मनोभावे नमस्कार केला .आज देवाकडे स्वतःसाठी न मागता .गालातल्या गालात हसत , माज्या पतीदेवाना सुखात ठेव .अशीतिने प्राथाना केली . आणि ती स्वयंपाक घरात निघून गेली . घरातील ओट्याला नमस्कार करून या घरातील मला अन्नपूर्णा बनव असा तिने आशीर्वाद मागितला .
मीनाचा लग्नानंतरचा स्वयंपाक घरातील पहिलाच दिवस , म्हणून तिने गोड करायचे ठरवले . तिने शिरा बनवायचे ठरवले . परंतु तिने , ह्या आधी कधीच स्वयंपाक घरात पाउल ठेवले नव्हते .तिला ह्याची खंत वाटू लागली . पण पुढ्च्याच क्षणाला काहीतरी
आठवल्या सारख करून तिने मोबाइल हातात घेतला . आजच्या युगातील हे शास्त्र आज मीनाला मात्र फार मोलाची मदत करणार होत . तिच्या ह्या आयुष्यातील नवा अध्यायची गोड सुरवात करणार होत . तिने लगेच मोबाइल वरून शिरा कसा बनवायचा ह्या रेसिपी मिळवली .आणि लगेच कामाला सुरवात केली . एक एक गोष्ट ती नीट बारकायीणे करत होती .
ईकडे घरातल्याची उठण्याची लगबग चालू जाली . सुंदराबाई , मीनाच्या सासूबाई स्वयंपाक घरातील गडबड ऐकून स्वयंपाक घराकडे वळल्या , पाहतात तर काय त्यांची नवीन सून काही तरी मोबाईल मधे बघून तशी क्रुती करताना दिसली .ईकडे तिकडे भांडी पडली होती .सुंदराबाई च स्वच्छ अस स्वयंपाक घर असत व्यस्त पडल होत. एरवी जरा ईकडे तिकडे पसारा पडला तरी रागावनाऱ्या सुंदराबाई नवीन सुनेचा कारभार पाहून मनोमन सुखावल्या .
एवढ्या वेळात घरातील सर्व माणसे आपल आटपून नाश्ता करण्या साठी जमली . मीनाच्या घरात एकूण 8 माणसे . मीना मीनाचा नवरा अतुल , मीनाच्या सासूबाई , सासरे , तिची मोठी जाऊ निशा , तिचा नवरा अजय , तिची दोन मूल नील आणि नूतन . नील 3वर्षाचा आणि नूतन 1 वर्षाची . निशा ही नेहमी नोकरी निमित्ताने बाहेरच असायची .त्यामुळे घरातील सर्व सुंदराबाईच पहायचे .नील आणि नूतनला पण त्याच सांभाळत असत .एरवी निशा जरी घरी असली तरी ती तिच्या पार्ट्या मधे बिज़ी असायची . आणि निशा नवरा डॉक्टर असल्या मुळे तो ही कामात बिज़ी . मीनाचे सासरे बँकेत कामाला वरच्या हुद्यावर होते .त्यामुळे ते ही कामानिमित्त बाहेर असत .मीनाचा नवरा ही कंपनी मधे वरच्या हुद्यावर .एकंदरीत सगळे शिकलेले आणि कामानिमित्त बाहेरच .सुंदराबाई मात्र घरीच असत .ते घर त्यांच विश्वावच होत .लग्न होऊन त्या ह्या घरात आल्या होत्या . आणि तेव्हा पासून घरात कोणाला काय पाहिजे .कोणाला काय नको . हे पाहत त्याना 50वर्षे जाली होती . किचन वर त्याच अधिराज्य च होत . त्यांच्या व्त्याईक्त्त आज पर्यंत स्वयंपाक घरात कोणी सुधा पाउल ठेवल नव्हत . पण आज मीनाने स्वयंपाक घरात पाउल ठेवून सुंदराबाईना सुखावला होत .
दोनच दिवसा पूर्वी मीना आणि अतुल ह्याच लग्न जाल होत . मीना ही अत्यंत सध्या घरातील , आई ग्रुहीणी आणि वडील तुटपुंज्या पगारात एका कंपनीत कामाला होते .घरात दोन लहान भावंडे ते ही शाळेत जाणारे .मीना ही लहान पणपसुणच हुशार होती .अभ्यासात नेहमी तिचा प्रथम क्रमांक येत .तसेच खेळ , व ईतर गोष्टीत ही ती हुशार होती . पण स्वयंपाक घराशी तीच वाकड होत .ती कधी ही स्वयंपाक घरात जात नसत .परंतु तिची आई तिला नेहमी म्हणत लग्न जाल्यावर तुला स्वयंपाक घरात जावेच लागेल .' तूच तीतली लक्ष्मी आणि तूच तिथली अन्नपूर्णा ' .ह्या पुढील कथा ' नवा अध्याय ' भाग 2मधे आहे .