नवा अध्याय - 2 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवा अध्याय - 2

मीना आणि अतुल ह्याची ओळख कॉलेज मधे जाली . सुंदर , हुशार अशा मीनावर अतुल भाळला . आणि मीनाला ही अतुल मनापासून आवडला . दोघे कॉलेज बाहेर ही भेटू लागले . दोघांचे शिक्षण पूर्ण झलयावर त्यानी नोकरी शोधायची ठरवली .दोघे ही हुशार असल्यामुळे दोघाना एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली .दोघांनी ही आपापल्या घरी सांगायचे ठरवले .
मीनानि घरी आई बाबा दोघाना अतुल विषयी सांगितले . अतुल विषयी ऐकल्यावर , दोघांनाही अतुल च स्थळ मीनासाठी आवडल .परंतु आपण असे गरीब , आणि ती लोक एवढी श्रीमंत आपली त्यांची बरोबरी कशी होणार .ही खंत मीनाच्या बाबानी मीनाला बोलून
दाखवली .
ही गोष्ट मीनाला ही पटली .तिने ह्याविषयी अतुलशी बोलायचे ठरवले . ती लगेच अतुल ला भेटायला निघाली .
ती नेहमीच्या ठिकाणावर आली , पण अतुल तिला कोठेच दिसेना .नेहमी तिच्या आधी येऊन पोहचणारा अतुल आज मात्र तिला कोठेच दिसेना .अतुल ला नेहमीच्या जागेवर न पहिल्यामुळे मीनाच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या .त्याच्या घरच्यांनी तर त्याला विरोध केला नसेल ना ? त्यानी त्याला आपल्याला भेटूच दिल नाही तर ......बाबांनी सांगितली शंका जर खरीच ठरली तर .......आपण गरीब म्हणून अतुलच्या घरच्यांनी आपल्याला स्वीकारले नाही तर , पण नाही .... अतुल असा नाही .तो आपली साथ नेहमी देयिल .मीनाला अतुल विषयी खात्री होती . तिने अतुलला फोन करायचे ठरवले .पण काही केल्या त्याचा फोन ही लागेना .आता मात्र मीना फार घाबरली .' ' तिने अतूलच्या घरी जायचे ठरवले .' मनात कोणतीही शंका नआणता तिने समोरच्या रिक्क्षाला हात केला .आणि ती रिक्क्षात बसली .अनेक वेळा तिने अतूल्च्या तोंडून त्याचा पत्ता ऐकला होता .तो नीट आठवून तिने रिक्क्षावाल्याला सांगितला .आणि रिक्क्षा निघाली .
रिक्क्षातून जाताना तिच्या तिचे मन अनेक शंकाने ग्रासले होते .' ' अतूल्च्या घरी जाऊन आपण काय बोलणार ? ते लोक आपल बोलण ऐकून घेतील का ? तस अतुलच्या तोंडून तिने घरच्यांनबदल खूप ऐकल होत .सगळी सुशिक्षित माणसे होती .शिवाय त्याच्या दादाच सुधा प्रेमविवाह होता .म्हणजे नकार सुधा कोणी देणार नाही अस तिला वाटल .ती जराशी सुखवली .पण तिने जर अतूल्च्या तोंडून कोणाच ऐकल नसेल तर ते त्याच्या आई च नाव .तो नेहमी त्याच्या आई विषयी बोलण टाळायाचा .का ते तिला ही माहीत नव्हते .
अचानक रिक्क्षा थांबली .मीनाने बाहेर डोकावले ते समोर अतूलच घर होत .तिने रिक्क्षावाल्याला पैसे दिले . रिक्क्षावाला निघून गेला . तिने समोर पाहिले एक सुंदर अस गेट होत .त्याच्या शेजारी नावाची पाटी ' ' श्रीराम पाटील ' ' .अतूल्च्या बाबांचे नाव .मीनाने हळूच गेटच दार ढकलत तिने आत प्रवेश केला .आत सुंदर अश्या फुलांचा सुगंध दरवळला होता .पुढच्या अंगणात अनेक फुलझडे लावली होती .त्याबरोबर अनेक औषधी झाडे ही होती .त्या झाडण्चि वेळोवेळी घेतलेली काळजी कळून येत होती .
त्या फुलाच्या सुगंधाने तीच मन प्रसन्न झाल . ती पुढे चालत घराच्या दरवाज्यापर्यंत पोहचली .तिने घराचे दार वाजवणार ईत्क्यात तिला आतून दरवाजा उघडाच दिसला . तिने घरात प्रवेश केला .आतमधे भव्यदिव्य अस सुंदर , नीटनेटके , स्वच्छ अशी सुंदर वास्तू दिसली .हो ....घर कसाल ती सुंदर अशी वास्तूच होती . ती पुढे निघाली , पुढे तिला देवघर दिसलं .ते ही अतिशय पवित्र , सुंदर . देवघराच्या बाहेर लहान मुलांची किलबिल चालली होती . त्याच खेळ बगत मीना तिथेच रेंगाळली .ईत्क्यात सुंदराबाई बाहेर आल्या . मीनाच्या जवळ जाऊन ' ' मुली कोण ग तू ? ' ' . सुंदराबाईना पाहून आणि अचानक त्यांचा आवाज ऐकून ती दचकली ....
पुढील कथा नवा अध्याय भाग -3मधे वाचा .