नवा अध्याय - 12 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवा अध्याय - 12

अतुल पुढे बोलू लागला आई , बरोबर बोलते . वाहिनी आणि मीना दोघी ऑफीस मधले काम करून किती दमून जातात .जर दादा आणि मी त्याना मदत केली , तर त्यांचे ही काम हलके होईल . आणि त्याना ही थोडासा आराम मिळेल .
ह्यावर सुंदराबाई म्हणाल्या , बरोबर आहे तुज..... त्या दोघी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात . तुमचा संसार चालवायला मदत करतात . मग तुम्ही त्याना थोडीशी कामात मदत केलीच पाहिजे . आणि आज काल सोयी सुविधा पण निघल्यात . त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे . मुले लहान आहेत त्यांची काळजी कोण घेणार .ही कारणे सांगून बायकोला बसवन्या पेक्षा तिला मदत करून दोघांनी नोकरी केली पाहिजे .
सुंदराबाई च़ हे म्हण सगळ्यांनाच पटल .आणि सगळ्यांनी तस वागायचं पण ठरवल . निशाला ही ते म्हण पटल . तिने ही तस वागायचं ठरवल .
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली .सगळे सुंदराबाईनी सांगितल्याप्रमाणे वागायला लागले . स्वयंपाक घरात मदत करू लागले .अजय अतुल ही आता त्यांच्या प्रमाणे स्वयंपाक घरात मदत करू लागले . सगळ कस ..सुरळीत चालू होत . पण म्हणतात . दुधात मिठाचा दाणा पडावा तास झाल . सुंदराबाई चे पतीना , आपण आपल्या पत्नीशी खूप वाईट वागलो . तिला तिच्या अडाणीपणा बद्दल बोलो .तिने नेहमीच ह्या घराला आपल्याला सांभाळून घेतल आणि आपल्याला तिच्या अडाणी पानाची लाज वाटत होती . आज ती स्व्ताहा एक कंपनी चालवते .तिचे कितीतरी उद्योग आहेत ते चालवते . आपण तिला एवढ्या वर्षात एक संधी द्यायला हवी होती . जे काम आपण करायला हव होत , ते मीनानि केल . तिने तिच्यावर विश्वास ठेवला . हे सगळे विचार सुंदराबाई च्या पतीच्या मनाला खात होते .आपण आपल्या पत्नीला काहीच देऊ शकलो नाही . सतत ह्या भावनेत राहून , त्यानी स्वतःच नुकसान करून घेतल होत .
आजकाल त्यांच कामात ही लक्ष नव्हत . कामात ही त्याच्या चूक्या होऊ लागल्या होत्या . ऑफीसमधील लोकाना वाटल त्यांच वय झालय , म्हणून हे सगळ होतय . म्हणून ऑफीस मधील लोकानी त्याना राजीनामा घेऊन घरी आराम करायला सांगितला . आता घरी बसून ते आणखीनच जास्त विचार करू लागले होते . त्याचा त्यांच्या तबेतीवर परिणाम होऊ लागला होता .ते आता वेळेवर गोळ्या सुध्दा घेत नव्हते .ह्याचा परिणाम म्हणून त्याना हॉस्पिटल मधे दाखल करावे लागले .
घरातील सगळ्यांनाच वाटत होते .की हे सगळ त्यांच वय झाल्यामुळे होतय . पण फक्त सुंदराबाईनाच माहीत होते की हे सगळ का होतय ? ज्याची त्याना भीती वाटत होती तेच सगळ होत होत . आपल्या पतीला शार रिक बाधा झाली नसून मानसिक बाधा झाली आहे .आणि ह्या सगळ्यातून त्याना बाहेर कढ्लेच पाहिजे .पण कसे ते काही त्याना कळेना .
त्या हॉस्पिटल मधे आपल्या पतीचा हात हातात घेऊन बसल्या होत्या . एक तास झाले , दोन तास झाले , तीन तास झाले . तरी त्या काही जागच्या हलेनात .त्यांच्या पतीच्या ही परस्तीतीथ काही सुधारणा येयीणा . शेवटी मीना सुंदराबाईच्या जवळ गेली . त्याना म्हणाली , आई तुम्ही थोडा वेळ आराम करा , मी बाबानं जवळ बसते . पण काहीशा निर्धाराने त्या म्हणाल्या , नाही ग ही लढाई माजी आहे .आणि मला ती लढाईची आहे आणि जिंकायची आहे . तुम्ही सगळे घरी जा ..... तू घराकडे नीट लक्ष दे , आणि कंपनी कडे सुद्धा ...मी एथे पाहून घेयील .जा तू ....