Toch chandrama - 17 books and stories free download online pdf in Marathi

तोच चंद्रमा.. - 17

१७

जुळले सूर..

रस्ता आता सरळसोट दिसत होता. मी आणि ब्रुनी .. तिला ही मान्य आहे.. माझा तर प्रश्नच नाही .. घरून माझ्या तरी काहीच प्राॅब्लेम नाही. तिच्याकडे? देवास ठाऊक, पण कॅन बी मॅनेज्ड. आता फक्त तिला गिटारीवर तिच्यासाठी म्हणून खास गाणी वाजवून दाखवणे.. आणि हिंदीत म्हणतात ना तसे चुपकेसे तिच्या दिलमें उतरणे! म्हणजे आधीच उतरलोय पण अजून ठाण मांडून बसणे! म्हणजे मुक्काम ठोकणे!

माझे काय.. ती आधीपासूनच बसलीय माझ्या दिलमें.

शनिवार संध्याकाळ ही अजून एक आठवणीत राहिल अशी मंतरलेली संध्याकाळ असणार .. मी ती आणि माझ्या गिटारीचे सूर. त्यातून सारी प्रेमगीते ऐकवणार मी तिला..

मी गेलो तर ब्रुनी वाटच पाहिल्यासारखी बसलेली लाल रंगाच्या गाऊन मध्ये. अाधीच सुंदर ती.. त्या लाल रंगात अजूनच छान दिसत होती. ब्रुनीचे घर म्हणजे एक विस्तीर्ण तंबू होता. आत प्रशस्त खोल्या.. समोर एक झोपाळा. आजूबाजूला छोटी छोटी झाडे. काही फुलांची. एकाला तर चक्क लाल गुलाब लागलेले टपोरे.

"हॅवन, हा अंबर.. माय स्पेशल फ्रेंड.."

हॅवन पुढे आली नि तिच्या थंडगार हाताने हस्तांदोलन करून उभी राहिली.

"अंबर, ही हॅवन. माय कँपॅनियन.. फ्रेंड. ही आमच्या टायटनवरची खास ह्युमनाॅईड आहे.

"ओह!"

"किती स्पेशल असावी? तुला गंमत सांगते, मी इकडे आले ना तर तिच्यात माझ्या मम्मीने आईचा स्पेशल प्रोग्राम टाकून घेतलाय. इफ आय वाँट माय मदर अराऊंड एनी टाइम .. तो प्रोग्राम रन केला ना की अगदी ममासारखी वागते ती.."

"ओह!"

"आणि आज मी तो प्रोग्राम मुद्दाम बंद करून ठेवलाय डियर!" ती थोड्या खोडकरपणे म्हणाली .. मला कळलेच ते. मी तरी कुठे आईला सांगून आलोय इथे?

"ओह.." पुढे थ्यांक गाॅड म्हणणार होतो मी!

"ही माझी खास मैत्रीण आहे लाइक युवर फ्रेंड राॅबिन. हॅवन, काॅफी आणशील?"

"यस मॅडम. मी आणते."

"हिला पण सगळ्या भाषा येतात?"

"अरे नाही रे. तू भेटलास ना.. त्यानंतर मी मराठी फीड केली तिच्या प्रोग्राम मध्ये. वुई टायटॅनियन्स स्पीक डिफरंट लँग्वेज देअर. मी इथे आले ना तेव्हा शिकले इंडियन भाषा. त्याशिवाय इतरही जगातील भाषा शिकले मी."

"हो ना भाषा उपयोगी पडतात .."

"खरंय.. डियर. तू भेटलास नि आय अॅम कन्विन्सड.. भाषा उपयोगी पडतात.. बरे झाले शिकले मी मराठी .. तुला सांगू, आम्ही लोकांनी पृथ्वीचा अभ्यास केला. मग भाषा शिकलो. लंग्वेज कनेक्टस इन्स्टंटली.."

"खरेय तुझे ब्रुनी .."

हॅवन काॅफी घेऊन आली. समोर मग ठेवत म्हणाली, "ब्रुनी डियर, काॅल मी व्हेन नीडेड. मी आत आहे."

पाहिलंस किती समजूतदार आहे ही.. मला वाटले असे काही म्हणेल ब्रुनी ..

"नाइस हाऊस यार.."

"हुं. थ्यांक्स.. आणि ही झाडे खरीखुरी आहेत.. आमच्या टायटनवर हे टेक्निक आहे. माय फादर इन्व्हेंटेड इट.. बाकी तुला झाडे नाहीत दिसणार इकडे चंद्रावर."

"वाॅव ग्रेट यार.. तेही रेड रोज!"

"यस, रोजेस, फ्रुट्स अँड अाॅल.. ही इज अ ग्रेट सायंटिस्ट."

"ते नाही आले कधी इकडे?"

"येऊन गेले.. ही वाॅज अ पार्ट आॅफ टायटॅनियन डिप्लोमॅटिक मिशन. काॅफी इज गुड?"

"होय.. एक्स्ट्रा शुगर.."

"मला ठाऊक आहे ते.."

"कसे काय?"

"तुझ्या घरी अालेले मी.. तेव्हा ऐकले मी.. म्हणजे राॅबिन म्हणाला ना.."

"बरेच बारकाईने लक्ष होते म्हणायचे.."

"हुं.. माझे दुसरीकडे कुठे लक्षच नव्हते ना.. तुला सांगू त्यादिवशी न बोलता आपण जे बोललो ना.. आय रियलाइज्ड .. अंबर.. दॅट यू आर द वन.. अाय रियली फील लकी टू हॅव मेट यू.."

"सो यू टायटॅनियन्स बिलिव्ह इन लक?"

"साॅर्ट आॅफ.. बोलण्याची पद्धत असते एक.. पण बघ ना, थेट पृथ्वीवरून तू इथे आलास काय नि आपण भेटलो काय.. हे सारे तसे घडणे कठीण वाटत नाही तुला?"

"खरंय तुझे..आणि आयॅम आॅन क्लाऊड नाईन ..नाऊ."

"मी टू.. थ्यांक्स टू यू अंबर.."

"तुला गंमत सांगू .. आमच्याकडे ना हे सगळे मुलांना करायला लागते.."

"हे सगळे म्हणजे?"

"म्हणजे हे सगळे सांगणे नि मग ही हॅज टू प्रपोज टू द गर्ल.. बेन्डिंग अाॅन द नीज.. तुमच्याकडे बरेय ब्रुनी .. गर्ल्स टेक द इनिशिएटिव्ह.."

"नो नो.. अंबरबाबू.. चुकताय तुम्ही. आम्ही काहीच वेगळे नाही बरे या बाबतीत तरी .. बाॅइज स्टिल हॅव टू प्रपोज, पण काही वेळा रूल्स हॅव एक्सेप्शन्स .. रादर करावे लागतात अपवाद परिस्थितीनुसार.."

"म्हणजे .."

"म्हणजे वाघाचे पंजे! आय हॅव बीन वाॅर्नड.."

"कशाबद्दल?"

"तू आणि तुझा शायनेस.. बाय हर हायनेस.. "

"कोण?"

"दॅट यू गेस.. मी नाही सांगणार ते.. पण मग मी ठरवले मला असेच म्हातारी होईपर्यंत थांबायचे नसेल तर मलाच हलवायला हवेत हातपाय .. म्हणून.. पण माझी अजून अपेक्षा आहेच.. मला एक राजकुमार येऊन मागणी घालेल गुलाबाचे फूल देत.. मी लाजत त्याला हो म्हणेन नि घोड्यावर बसून मी जाईन त्याच्याबरोबर.."

"हे ब्रुनी .. तू काय अमर चित्रकथा वाचायचीस की काय? पण तुला सांगू .. इट्स इझी टू प्रपोज व्हेन वन नोज द आन्सर.. म्हणजे पेपर फुटतो ना परीक्षेत तसा.. त्यामुळे मी करीन तुला प्रपोज.."

"डियर अंबर, तू अॅझुम करतोयस माझे उत्तर .. "

ती खट्याळपणे हसत म्हणाली.

"बघ तुझ्या राॅबिनने गिटार आणून ठेवलीय.."

"राॅबिन ना.. दीड शहाणा आहे तो.. शुड आय प्ले नाऊ..?"

"व्हाॅट्स द टाईम? ओह.. थांब. ये तुला काहीतरी दाखवते.. "

तिच्या मागे मी आत गेलो. तंबूत एका पारदर्शक खिडकीजवळ टेलिस्कोप होता मोठा.. त्याच्यातून तिने पाहिले .. आणि म्हणाली, "बघ."

मी वाकलो पहायला ..

पाठून तिची काॅमेंट्री सुरू झाली..

"तो दिसतोय ना तो टायटन.. माय होम.. इकडे आले मी, पण रोज माझ्या घरची आठवण येते.. मी रोज संध्याकाळी पाहते यातून .. तिकडे आता दिवस उगवत असतो ना.. हा टेलिस्कोप आम्हीच डेव्हलप केलाय. अाहे मोठ्या रिझोल्यूशनचा. त्यामुळे तुला तिकडची घरे, रस्ते वगैरे दिसत असतील. इतक्या अंतरावरून सुद्धा."

"खरेय गं. दिसताहेत सगळे.."

"अरे थोड्या अजून मॅग्निफिकेशनची बनवली ना दुर्बिण तर माणसं पण दिसू शकतील. माय फादर इज वर्किंग आॅन इट!"

"ओह! ग्रेट."

"यातून दिसतेय ना तेच माझे गाव. अॅज सच टायटन इज वन कंट्री. पृथ्वीसारखे देश नाहीत तिकडे. ही जागा अशी शोधलीय ना टेलिस्कोपची की तिकडून आमचे गाव दिसेल."

"वा! असे काही असेल तर इकडून पृथ्वीवरचे पण दिसायला हवे!"

"यस्स .. आणि ते अंतर तर टायटनहून खूपच कमी आहे.. पण जस्ट अ वाॅर्निंग.. तसा प्रयत्न करू नकोस कधी. पृथ्वीवरच्यांना ते आवडत नाही .. रादर दे फील अनसेफ.."

"व्हाय?"

"ते जाऊ देत.. पाहिलंस ना गाव माझे .. तो मध्ये रस्ता दिसतोय ना त्याच्या एका कडेला घर आमचे.. अजून चांगली दुर्बिण मिळाली ना तर आईला पाहू शकेन मी. रोजच!"

"आणि युवर फादर?"

"हुं.. इफ ही इज आऊट आॅफ हिज लॅब एव्हर!"

"पण तू त्यांच्याकडेच शिकलीएस ना?"

"यस्स. जेनेटिक इंजिनियरींग, अॅस्ट्रोबायोलाॅजी.. वगैरे."

"छानच दिसते तुझे गाव."

"आहे ते तसे. अख्खा टायटन तसा सुंदर आहे. बघशील तू एकदा.."

"हुं.. असा सुंदर असेल टायटन तर टायटॅनियन पण तशीच असणार ना?"

"सो क्यूट आॅफ यू अंबर.. थांब. मला एकदा पाहू देत.. मग आपण जाऊयात."

ती दुर्बिणीतून पाहात होती शनिच्या चंद्राकडे आणि मी पाहात होतो जवळून या चंद्रमुखीला!

आम्ही आलो परत नि ती झोपाळ्यावर बसली..

"चल सुरू कर तुझी गिटार .. आज मन भरेपर्यंत ऐकणार मी.."

"यस्स डियर.. मी थोडे प्रेझेंटेशन तयार केलेय.. इट विल हॅव सम टाॅक इन बिटवीन.. आणि मूळ गाणे ऐकवीन तुला.. "

"यस.. मी ऐकतेय .."

मी खरेतर काहीच ठरवू शकलो नव्हतो. ब्रुनी दुर्बिणीत बघताना मलाच ती चंद्रमुखी वाटलेली. त्यावर मी माझे उत्स्फूर्त प्रेझेंटेशन सुरू केले..

"डियर ब्रुनी, आमच्या येथे म्हणजे पृथ्वीवर चंद्र हा सौंदर्याचे मोजमाप आहे. पृथ्वीच्या वरून दिसणारा चंद्र.. शीतल.. कलेकलेने वाढणारा नि घटणारा.. कुठल्याही प्रियकराला त्याची प्रिया प्रथम चंद्रासारखीच वाटते.. आता तू मला वाटलीस तशी.. चंद्रमुखी! किंवा कोणाला प्रियतमा हवी असेल तर त्याच्या तोंडून ही हेच शब्द येतात .. चांद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था.. "

त्यानंतर ते गाणे मी माझ्या मोबाईलवर चार ओळी ऐकवून गिटारवर सुरू केले..

गाणे संपले तसे तिने टाळ्या वाजवल्या.. उठून माझ्या बाजूला उभी राहिली ती..

"वाॅव, ग्रेट यू आर!"

"थ्यांक्यू.. तर तूही तशीच आहेस .. तुला पाहून चांद आहे भरेगा.. फूल दिल थाम लेंगे.. आज ही मस्त हवा आहे.. मी तुझ्या शोधात पोहोचलो इथवर ..

म्हणत.. मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू.. आई रूत मस्तानी कब आएगी तू.."

या गाण्यानंतर ब्रुनी खूश झाली फार..

मी पुढे सुरू ठेवली गाणी.. सगळी जुनीपुराणी गाणी म्हणजे भूले बिसरे गीत.. थोडी काॅमेंटरी.. थोडे गाणे नि मग गिटार वर धून.. त्यात मग 'जाने मन जाने मन तेरे दो नयन' झाले, 'तुमसे ओ हसीना जो मोहब्बत तो न मैंने करनी थी' झाले.. 'तोच चंद्रमा नभात.. तीच चैत्र यामिनी' झाले.. अजूनही काही गाणी वाजवली मी. ती माझ्याकडे कौतुकाने पाहताना मी तिलाच पाहात होतो.. वेळ कसा चालला होता ते कळत नव्हते.

"आता थांबू?"

"नो.. नाॅट विदाऊट चुरा लिया.. "

"ओह! दॅट डेज' साँग.. तुला सांगू ब्रुनी, ते गाणे मी तुलाच पाहात तुझ्यासाठीच वाजवलेले.."

"आय नो!"

"हाऊ डू यू नो?"

"तुला आम्ही मुली इतक्या ढ वाटतो की काय? पण आज त्याला वन्स मोअर.. फ्राॅम मी.."

"आॅफकोर्स डियर .."

मी गिटारच्या तारांवर हात फिरवला.. 'चुरा लिया है तुमने जो दिलको.. नजर नहीं चुराना सनम.. बदलके मेरी तुम जिंदगानी.. कहीं बदल ना जाना सनम..'

"वाॅव! यू आर सिंपली ग्रेट .."

"आणि नाऊ इफ इट्स ओके टू प्लक दॅट रोज .. प्लीज .."

"व्हाय..?"

ती हो म्हणण्याची वाट न पाहता मी पुढे होत ते लाल गुलाबाचे फूल तोडले नि गुडघ्यावर वाकून तिला ते देत म्हणालो, "डियर ब्रुनी, माझी होशील का?"

ती लाजली ..

आणि ..

काही बोलणार तोच तिच्या दरवाजावरची बेल वाजली ..

"हु'ज इट अॅट धिस टाइम?"

तिने दरवाजा उघडला तर दरवाजात एक कुणी केक घेऊन उभा..

"हा केक? कुणी पाठवलाय?"

"आय डोन्ट नो मॅडम. धिस इज द डिलिव्हरी अॅड्रेस .."

तिने तो केक हाती घेतला..

"इट मस्ट बी राॅबिन .. आय टेल यू.. राॅबिन.." मी म्हणालो .. "राॅबिनच असणार तो.. "

मी मोठ्याने म्हणालो तसा "यस सर" म्हणत राॅबिन आत आला..

"राॅबिन तू?"

पाठोपाठ कोण यावे? मिस्टर आणि मिसेस कांदळगावकर!

"टू अवर व्हेरी फर्स्ट मून कपल.. विथ बेस्ट विशेस.."

वर्षाने पुढे येत म्हटले नि रघुवीर माझ्याशी शेकहँड करायला पुढे आला.

"आणि तू .. तू प्राॅमिस दिलेलेस.. गिटार फाॅर आॅल.. यू ब्रोक द प्राॅमिस अंबर.."

"काय हे वर्षा .. तुला कशाला बनायचे होते हराभरा कबाब में कढीपत्ता?"

"खरंय.. पण अरे, ऐतिहासिक क्षण आहे हा.. चंद्रावरची पहिली जोडी.. आणि पृथ्वी आणि टायटनवरचीही पहिलीच.. सेलिब्रेट तर करायलाच पाहिजे की नाही? आता गिटार वगैरे नंतर कधीतरी.."

समोर हार्ट शेपचा केक होता.. एका बाजूला मी आणि ब्रुनी .. समोर राॅबिन नि वर्षा नि रघुवीर ..

"हॅवन.. ये बाहेर.. तुझ्या मॅडमचा केक खायला.."

राॅबिनने जोरात हाक मारली तशी ती ही येऊन उभी राहिली ..

"सी हॅवन.. नाइस कपल नो? मी म्हटले होते तुला.. मुलगा चांगला आहे.. "

राॅबिनने हॅवनला ही सांगितलेले.. नि वर्षा नि रघुवीरला ही! फक्त माझ्या घरी सांगितलेले की काय ते ठाऊक नव्हते!

"काय हे राॅबिन, तू सगळ्या जगाला सांगत सुटलास.."

"यस डियर ब्रदर, माझ्या प्रोग्राम मध्येच आहे हे.. डिस्ट्रीब्युट द हॅपीनेस.. हो की नाही हॅवन.."

"वा! उंदराला मांजर साक्ष .."

"म्हणजे काय..?

राॅबिन त्याच्या मशीनीत त्याचा अर्थ शोधायला लागला..

मग साग्रंसगीत केक कापणे झाले.. वर्षा नि रघुवीर ने आॅफिशियली अभिनंदन केले.. ते जायला निघाले तसा राॅबिन म्हणाला, "मी थांबू की जाऊ ब्रो?" आणि हसत तो निघून गेला ..

"व्हाॅट अॅन इव्हिनिंग ब्रुनी .. अँड आय डीड प्रपोज. "

"हो.. बट आय हॅव नाॅट यट आन्सर्ड.. इफ यू रिमेंबर सिक्वेन्स आॅफ इव्हेंट्स राईट.."

"ओह! सो?"

"आय वोंन्ट टेल यू.." ब्रुनी हसत म्हणाली.

"आता झोप उडवशील तू माझी ब्रुनी .."

घरी आलो. राॅबिन वाट पाहात होता. आई बाबा झोपून गेलेले. मला आश्चर्य वाटले. असे होत नाही कधी .. आईतरी जागी असतेच.. अगदी खूपच उशीर होणार नसेल तर.

"राॅबिन, आई कधी झोपली?"

"अरे, मीच सांगितले तिला.."

"काय?"

"जे झाले ते.. "

"म्हणजे?"

"म्हणजे जे झाले तेच.. "

"नीट सांग.. तू सांगितलेस नि ती झोपली?"

"अरे ब्रदर, राॅबिन नेव्हर लाइज, मी सांगितले खरे.. तुला इमर्जन्सी मिटिंग असल्याचे.. म्हटले मॅडम तो हिशेब मांडतोय तिकडे. उशीर होईल. आता नक्की कसला हिशेब हे मॅडमनी नाही विचारले मग मी कशाला सांगणार? ते त्या दिवशी म्हटले ना तसे.. काय ते.. नरो वा कुंजरोवा उत्तर दिले मी.."

"राॅब, यू आर अ डार्लिंग .. पण मग ते सारे रघुवीरला का सांगितलेस.."

"अरे ब्रो.. ब्रुनीबद्दल रघुवीरला मी नाही सांगितले .. ते सांगितले वर्षा मॅडमनी.. त्यांना आधीच अंदाज आला.. ते काय म्हणतात ना.. मांजर डोळे मिटून दूध पिते.. तिला वाटते कुणी बघत नाहीये.. पण दिसत सगळ्यांनाच असते ते.."

"बरं बरं.. खूपच शिकलायस भाषा.. पण आजची आमची भेट आणि केक..?"

"देअर आयॅम गिल्टी.. म्हणजे फक्त टाईम आणि व्हेन्यू सांगण्यापुरता.. केक मॅडमनी पाठवला .. खरेतर मॅडम नि सरांना म्हणजे तुझ्या आईबाबांना पण बोलावणार होतो आम्ही.."

"राॅबिन .. चावटपणा नकोय.. "

"नको तर राहिला.. झोप आता. येईल ना झोप की स्वप्ने पाहणार उघड्या डोळ्यांनी?"

"तू जा.. आणि पहा क्युरीची स्वप्ने .. गुड नाइट .."

मी झोपलो खरा पण विचित्र स्वप्न पडले.. कुठलेसे फंक्शन होते.. सारे जमलेले .. कुणीतरी भाषण करतेय.. वेलकम टू द मून कपल.. एक पृथ्वीचा चंद्र नि एक शनिचा चंद्र.. त्यात चंद्राहून सुंदर ही ब्रुनी .. ब्रुनी लाजतेय.. मी कौतुकाने पाहतोय.. समोर मोठाला केक आहे.. मग कुठून काय होतेय ते कळण्याच्या आत सायरन वाजतोय .. चार पोलिस येतात नि तो केक उचलून घेऊन निघून जातात .. मी झोपेतून जागा झालो घाम सुटून.. लक्षात आले.. हे स्वप्नच तर आहे.. सुटकेचा निश्वास टाकला नि परत झोपी गेलो..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED