जुळले प्रेमाचे नाते - भाग-३९ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३९

आज सकाळपासुन मी निशांतची वाट बघत होती. कारण तो घरी गेलेला फ्रेश होण्यासाठी. एकतर बिचारा रात्री माझ्यासाठी थांबत होता. बाबांना त्रास नको म्हणुन.. किती समजुदार आहे हा खडूस. माझ्यावर एवढं प्रेम करतो., माझी काळजी घेतो. माझ्या घरच्यांना, स्वतःच्या घरच्यांना किती सांभाळून घेतो. खडूसवर आता तर प्रेम अजूनच वाढत जात आहे.


"पण राहिला कुठे हा मुलगा.." स्वतःशीच बडबड करत असताना आई आली. ती सकाळीच येऊन बसली होती. पण डॉक्टरने बोलावल असल्याने गेलेली बाहेर. तीच आली मला तर वाटलं निशांत असेल.


"काय ग आई., काय बोलले डॉक्टर साहेब. अजुन किती दिवस मला ठेवुन घेणार आहेत." मी एक डोळा मारून हसुन विचारल. "अजून काही दिवस तरी थांबावं लागेल अस डॉक्टर बोलले. तुझ्या काही टेस्ट बाकी आहेत. त्या करून घेणार आणि मग सांगतील कधी डिस्चार्ज मिळेल ते." आईने सांगितलं पण तिचा चेहरा मात्र वेगळच काही बोलवत होता.



"आई.., काय ग काय झालंय नक्की..?? मला तू टेंशनमध्ये का वाटत आहे..??!" मी जरा अस्वस्थ होत विचारले.
"काही नाही ग प्राजु असच.. तुझं हे अस ऍकसिडेंट, त्यात कोणीतरी तुला मारण्याचा प्रयत्न केला. खुप भीती वाटते ग मला. आम्ही कोणाचं काय वाकडं केलं की, कोणी तुला मारण्याचा प्रयत्न करावा." आई हुंदके देत बोलली असता मी तर लगेच तिला मिठी मारली..


"आई ग, काही नाही होत मला.. बघ मस्त आहे मी एकदम सॉलिड....ते काय आहे ना डॉक्टर काका आहेत ना त्यांना ही माझी बडबड आवडली असेल म्हणून ठेवून घेत आहेत. बाकी टेस्ट वैगेरे तर बहाणा आहे ग.." मी जरा गम्मत केली. निदान त्या निमित्ताने तरी ती हसेल. "काही असत हा तुझं प्राजु.." आई स्वतःचे डोळे पुसत हसत बोलली.


"कोणाला कोण आवडल...???" दरवाजामधुन एंटर करत निशांत बोलला असता माझी कळी खुलली. आज काल निशांतला बघूनच वेगळं अस फिल होत होतं. पोटात असंख्य फुलपाखरे उडवीत असदी तसच काहीस... त्याच्या येण्याने माझ्या गालावर गुलाबी लाली चढलेली निशांतने नाही, पण आईने मात्र अचुक टिपली.. "ये ये निशांत बाळा.. हीच बडबड करते म्हणुन डॉक्टर हिला ठेवुन घेणार आहेत. अस प्राजुला वाटतं.." आईने माझ्याकडे बघत सगळं काही निशांतला सांगितलं. यावर मी निशांतकडे बघून स्वतःचे बत्तीस दात काढून दाखवले...


हे बघून निशांत गोड हसला. "मग काय हिला राहूदे इथेच आई. आपण मज्जा करू आपल्या घरी." निशांत ही काही कमी नव्हता. त्याच्या हा वाक्यावर आईने ही संमती देऊन टाकली.. तसा माझ्या नाकावर फुगा फुगला... मी हातांची घडी घालून फुगून बसले.. हे बघून दोघे ही खो खो हसत होते. नंतर मी देखील त्यांच्यात मिक्स झाले.


"चला मॅडम आज आपल्याला चालायला जायचं आहे. उठा बघु." निशांत माझ्या जवळ आला तसा आई बाजूला झाली. कारण डॉक्टरने सांगितलं होतं चालणं गरजेचे आहे. मग आम्ही दोघे बाहेर जाण्यासाठी निघालो. मी माझे पाय बेडवरून खाली ठेवले. पण माझ्याने चालणं काही जमत नव्हतं. मग निशांतनेच आधार दिला आणि कसं तरी आम्ही दरवाजा पर्यंत पोहोचलो. कॉरिडॉर मध्ये चालत असताना अचानक माझा तोल गेला आणि मी पडणारच होते की, निशांतने मला झेलले...



"हनी-बी.., तु ठीक आहेस ना..??" त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मला बाजूच्या चेअरवर बसवुन त्याने धावत जाऊन पाणी आणलं आणि मला दिलं. पाणी पिऊन मला हुशारी आली. पण परत काही मला चालता येत नाही हे बघून निशांतने कसला ही विचार न करता मला उचलून घेतलं.



"अरे काय करतो आहेस निशांत...!! मला सोड खाली. हे अस लहानमुलांसारख वागणं बंद कर हा. लोकं काय बोलतील सोड मला खाली..." मी स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवत बोलली. तरीही तो काही ही न ऐकल्यासारखं चालत होता. शेवटी आमच्या रूममधे घेऊन त्याने मला बेडवर झोपवलं. हे समोरच्या सोफ्यावर बसलेली आई न्युज पेपरमधून डोकं वर काढुन बघत होती आणि गालातल्या गालात हसत होती.


"मॅडम तुम्हाला चालता येत नव्हतं म्हणून केलं, बाकी काही नाही. आणि जरा वजन कमी कर किती जड आहेस." स्वतःच्या डोक्यावरचा घाम पुसण्याची ऍक्टिग करत निशांत बोलला असता मी तर त्याच्या पोटात ठोसा मारला. "आई ग..., लागलं ना." हे सुद्धा नाटक. "नाटकी आहेस खूप तु निशांत." यावर सोफ्यावर बसलेली आई उठुन आली.


"काय मस्ती चालु आहे तुमची.." आई जरा ओरडलीच.. "आई ग, हा बघ निशांत, कसा छळतो आहे मला." मी स्वतःच तोंड वाकड करत आई ला बोलले. "असुदे ग निशांतच्या मस्तीमुळेच तुझ्या या चेहऱ्यावर गोड हसु येत. कळलं का...!" आईने माझ्याकडे बघत वाक्य पूर्ण केलं. "निशांत आता तु आहेस ना.. म्हणजे तस मला घरी जायला." आईने स्वतःची बॅग घेत विचारले असता त्याने मानेनेच होकार दिला आणि आई माझा निरोप घेऊन घरी निघुन गेली.


"हर्षु च काही कळलं का.???" मी सहज विचारल असता निशांतच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.. एसी मधेही निशांतला घाम फुटला होता.. "काय झालं निशांत घाबरला का आहेस.. आणि एवढं टेंशन कसलं तुला.???" मी त्याला पाण्याचा ग्लास पुढे करत विचारलं. तो घेऊन त्याने ते पाणी सगळं एका घोटात संपवलं.. "काय रे काय झालं एवढं... कोती घाबरला आहेस.. ठीक आहेस ना.??!" मी विचारलं असता त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं आणि रूमबाहेर गेला.

"आता याला काय झालं..???" मी स्वतःशी बोलत बेडवर झोपले.



संध्याकाळी राज आलेला. पण ज तो रोजच्या सारखा खुश नव्हता.. शांत वाटलं म्हणून मी विचारलं ही... पण जास्त अस काही बोलला नाही. थोडं बोलुन निघून गेला. "या राज ला काय झालं आता..? सगळे असे का वागत आहेत. सकाळी निशांत विचित्र वागला. आणि आता हा राज." मनाशी बोलत मी बेडवर पडून होते. पण कंटाळा आला म्हणून उठुन चालण्याचा प्रयत्न केला. कस तरी चालत मी सोफ्यापर्यंत पोहोचले आणि त्यावर ठेवलेला पेपर वाचत बसले..



पण सारख आजच निशांतच आणि राज च वागणं आठवत होत.. विचार करता करताच मी सोफ्यावर कधी झोपले हे देखील कळलं नाही...

डोळे घट्ट मिठुन असताना कोणाचा तरी स्पर्श जाणवला.. प्रयत्न करून ही डोळे काही केल्या उघडत नव्हते.. पण तो स्पर्श मात्र नकोसा वाटत होता.. त्या स्पर्शात अनोखेपणा होता... त्या व्यक्तीचा हात वर आता माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता आणि मी जोरात ओरडले.. दचकुन उठले तर ते खरच एक वाईट स्वप्न होत.. घामाने भिजलेली मी. बाजुच्या टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास घेण्यासाठी उठले पण काही कळायच्या आत खाली कोसळुन पडले.



शुद्ध आली तेव्हा समोर आई-बाबा, निशांत आणि डॉक्टर उभे होते... "काय झालं प्रांजल.. तु ठीक आहेस ना...??" मी शुद्धीत येताच डॉक्टरचा पहिला प्रश्न.. "हो डॉक्टर., मी ठीक आहे." आणि काय घडलं हे सांगून टाकलं. "अग तुझ्यावर सध्या ट्रीटमेंट चालु आहे ना... आणि त्यात वेगवेगळ्या मेडिसिन घेतेस म्हणून ही अशी स्वप्न पडतात.." डॉक्टरांनी समजावलं.



मग आई-बाबांशी काही बोलायच होत म्हणून ते तिघे निघून गेले. मी आणि निशांत बसलो होतो.. तो माझ्यासाठी अँपल कापुन देत होता.. "घे हनी-बी.., खाऊन घे. नाही तर अशक्तपणा येईल." हातातली एक भेस पुढे करत निशांत बोलला.


"निशांत, माझं डोकं दुखतंय.. म्हणजे मला कळत नाहीये की काय होतंय. तो स्पर्श खरचं जाणवला होता मला. एवढं कस स्वप्न खर वाटेल ना...!" मी जरा डोक्यावर भार देऊन आठवण्याचा प्रयत्न करत होते. "अग डॉक्टर बोलले ना.., मेडिसिनमुळे झालय तु नको जास्त विचार करूस.. हे घे खा." एवढं बोलून त्याने सफरचंदाची डिश पुढे केली.


आणि त्यादिवशी डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिला.. आई-बाबा आणि मी घरी पोहोचलो. माझ्या पायाला प्लॅस्टर होते. लंगडत होते.. घरात पाय ठेवताच लाईट्स लागल्या आणि समोर निशांत होता मागे आजी-आजोबा, राज होता. कॉजेलमधले काही फ्रेंड्स होते. माझ्यासाठी सगळे आले होते..

मी जाताच त्यांनी मला चेअरवर बसवलं समोर एक केक होता.. कापताच सर्वानी कल्ला ही केला...ही आयडिया होती ती निशांतची.. खुप दिवसांनी परत घरी आल्यावर एवढं छान सरप्राईज मला मिळालं होतं फक्त निशांतमुळे... पण या सर्वांत मिसिंग होती ती हर्षु.. कशीही असली तरीही माझी बेस्ट फ्रेंड्स होती. आणि त्या दिवशी नेमकी अभि माझ्या घरी आलेली.. म्हणून तिला माहीत होतं.


हे बोलताच दोघींनी अभिकडे पाहिलं.. "अभि एकदा तरी बोलायचं होतस ना आम्ही देखील आलो असतो भेटायला..." प्रिया जरा नाराजीने बोलली असता. वृंदाने ही हा मध्ये हा मिसळला. त्यावर मीच दोघींना समजावले..

"गर्ल्स आता रागावून काही होणार नाहीये.. त्या क्षणी नाही आठवल त्यासाठी मी माफी मागते..." एवढं बोलुन मी लगेच माफी मागितली. तेव्हा कुठे त्या शांत झाल्या.


"अग त्या हर्षल च काय झालं.???" मधेच वृंदा बोलली असता मी तिच्याकडे पाहिला.



त्या दिवशी सगळे होते पण ती नव्हती म्हणुन मी राज ला विचारलं.. "अरे राज हर्षल ठीक आहे ना..?? घेऊन यायच होतंस तिला.." यावर तो काहीच बोलला नाही.. नकळत त्याचे डोळे पाण्याने भरले आणि त्याने घडलेलं प्रकार सांगितला... हर्षलच ऍकसिडेंट झालं यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता... कशी ही असली तरी माझी बेस्ट फ्रेंड्स होती.. त्यामुळे मला अश्रू अनावर झाले आणि त्यातच मी भोवळ येऊन खाली पडले.....



कस असत नाही आयुष्य...!! आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो पण खरतर तो आपल्यासाठी आपण खणलेला असतो... कारण कर्म कधीच कोणाचं उधार ठेवत नाही तो सगळा हिशोब बरोबर चुकता करतो......



to be continued.....


(कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.