जुळले प्रेमाचे नाते - भाग-४० Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४०

डोळे उघडले तर समोर सगळे काळजीमध्ये बसले होते. शेजारी आई होती. बाबा आणि आजोबा काहीतरी बोलत होते.. मी डोळे उघडले तेव्हा मी बेडवर होते...
"आई.., मी इथे कशी आली ग.??" माझ्या वाक्यावर सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं... "बाळा तु मघाशी चक्कर येऊन खाली पडलीस तेव्हा बाबांनी तुला उचलुन बेडवर झोपवलं." आईने ही घडलेलं सांगून टाकल.


"पण आई अस कस झालं ग... कशी ही असली तरीही ती माझी बेस्ट फ्रेंड होती. हर्षुच ऍकसिडेंट झालं यावर तर विश्वासच बसत नाहीये माझा." माझे डोळे परत भरून आले आणि मी आईला घट्ट मिठी मारून रडु लागले. "बाळा, तिच्या नशिबात होत ते झालं ग.. आता आपण तरी काय करू शकतो ना.." आई मला समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण माझं रडणं काही थांबत नव्हतं. ते बघून राजचे ही डोळे भरले आणि तो काही ही न बोलता निघून गेला..


मला शुध्द आली हे बघुन.. आई बाहेर गेली. कारण तिला सगळं जेवण बनवायचं होत. माझे आलेले काही फ्रेंड तर कधीच घरी गेले होते. सगळं झाल्यावर निशांत माझ्याजवळ आला. बाजूला बसला आणि बोलु लागला....



"हनी-बी.., सावर स्वतःला... मला माहित आहे की, ती तुझी बेस्ट फ्रेंड होती. पण तुला माहीत आहे का.. जेव्हा तु हॉस्पिटलमध्ये होतीस तेव्हा तुझ्या फेसवरचा मास्क काढणारी ही हर्षलच होती." त्याच्या या वाक्यवर तर मी उडालीच...
"काय.., खरच निशांत... पण कस शक्य आहे. म्हणजे ती एवढ टोकाचं वागेल अस वाटलं नव्हतं मला..."


"हो.., मला ही नव्हतं वाटलं. पण जेव्हा पोलीस आलेले तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही मध्ये पाहिलं तुझ्या रूममधून शेवटची तीच बाहेर पडली होती. हे बघूनच पोलीस तिला अटक करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते. पण रात्रीच तीच ऍकसिडेंट झालं अस त्यांनीच मला कळवलं." एवढं बोलून निशांत शांत झाला.


मला तर सुचत नव्हतं नक्की काय करू.. मी निशांतला बिलगले आणि रडले. माझं ही मन शांत झाल. नंतर आम्ही बाहेर आलो आणि सगळे एकत्र जेवलो. राज तर कधीच निघून गेला होता. त्यालाही सध्या गरज होती आपल्या माणसांची... पण त्याच्या जवळच तर दूर गेलं होतं.



जेवुन निशांत आणि आजी-आजोबा ही निघाले. निशांतला बाय करून मी लंगडतच बेडरूमध्ये आले आणि राजला कॉल केला... रिंग वाजत होती पण तो घेत नव्हता. शेवटी कॉल बंद झाला पण त्याने काही घेतला नाही. मग मी देखिल जास्त कॉल करत बसले नाही आणि गोळ्या घेऊन झोपले..



दुसऱ्या दिवशी काही कॉलेज नव्हतं कारण घडलेलं प्रकार कॉलेजमध्ये कळला होता.. काही गोष्टी या फक्त प्रिन्सिपला माहीत होत्या.. त्यामुळे मी घरीच बसुन अभ्यास करणार होते.. जोपर्यंत पाय ठीक होत नाही तोपर्यंत तरी.. बाकी या दिवसांत निशांत मला भेटायला रोज येत होता.. कॉलेजे संपलं की मला भेटायला येणं हे त्याचं नित्याच झालेलं. मला शिकवायचा ही..


असाच एके दिवशी तो आलेला आणि नेमकं आईला बाजारात जायचं होतं. मग काय आम्ही दोघेच होतो घरी.. आधी खुप गप्पा मारल्या आम्ही..बोलता बोलता निशांतने काही नोट्स ही काढून दिल्या मला अभ्यासासाठी... किती तो हुशार.. म्हणजे वाटलं नव्हतं पण खडूस खरच खुप हुशार होता. ते करता करता अचानक मला त्याच्या हातची कॉफी पिण्याची तलफ आली....


"निशांत ऐक ना..!!" मी हातातल बुक बाजुला ठेवत बोलले. "हा बोल ना..." निशांत स्वतःच्या तोंडातल पेन काढत बोलला..
"मला ना झोप येतेय.., पण स्टडी पण करायची आहे. तु कॉफी करशील का आपल्यासाठी..??? खूप दिवस झाले तुझ्या हातची कॉफी पिऊन. मिस करतेय." मी स्वतःचे डोळे बंद करून ओठांवर जीभ फिरवली. तस निशांतने माझ्या डोक्यावर टपली मारली आणि, "येतो घेऊन." एवढं बोलून किचनमध्ये गेला. काही वेळाने हातात ट्रे घेऊन रूममधे आला.



वाफसलेल्या कॉफीचा सुगंध रुमभर दळवळला. "घ्या मॅडम.. गरमागरम कॉफी." निशांत एक कप माझ्या हातात देत बोलला. मी कॉफीचा एक घोट घेतला... "वाह..!! निशांत तु सॉलिड आहेस. तुझ्या हातच्या कॉफीच्या एका घोटाने एकदम फ्रेश वाटलं बघ.." मी गोड स्माईल देत बोलले. यावर त्याने फक्त बघितलं आणि कॉफीचा कप स्वतःच्या ओठांना लावला. कॉफी पिऊन आम्ही परत अभ्यास असत होती की निशांत मधेच बोलला. "बाय द वे मी एवढी छान कॉफी बनवली त्याबद्दल मला काय मिळणार ते सांगा मॅडम."



"काय पाहिजे सर तुम्हाला. किती पैसे झाले तुमच्या कॉफीचे.??" मी डोळा मारत विचारलं. "मला काही पैसे नको आहेत... दुसर काही तरी द्या मॅडम." तो पण काही कमी नव्हता. "म्हणजे नक्की काय पाहिजे तुला.??" मी पण कळून न कळल्या सारखे विचारले..
"तेच हवं आहे जे आनंद देत ना..." "काय बर आनंद देत.. म्हणजे मला चॉकलेट दिलं तरी आनंद मिळतो. तुला हवं आहे का चॉकलेट..??" मी मुद्दाम विचारत होते.



"चॉकलेट नाही ग, मी काय लहान आहे का तुझ्यासारखा चॉकलेट खायला.." मिस्कील हसुन त्याने उत्तर दिलं. हे बघून तर मी रागावलेच... "काय हवंय तुला नक्की.. नीट सांग ना की घाबरतोस मला." मी हे बोलताच तो पट्कन माझ्या इतका जवळ आला की त्याच्या श्वासांचा ही आवाज मला जाणवत होता... इतक्या जवळ आल्याने माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. "घाबरलीस का..?? अजून हात ही लावला नाहीये मी." एवढ बोलून निशांत जोरजोरात हसला. याचा मला आला राग आणि मी त्याच्या कॉलरला पकडुन त्याला जवळ खेचलं आणि....



आणि माझे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले... माझ्या अचानक अशा करण्याने तो ही दचकला. एकक्षण त्याला ही कळलं नाही... पण नंतर मात्र आम्ही एकमेकांच्या ओठांमध्ये गुंतलो होतो... किस करताना त्याच्या केसांमध्ये जाणारे माझे हात.. तेच त्याचे माझ्या मानेवर तर कानामागून डोक्याजवळ जाणारे त्याचे हात... तो क्षण आम्ही आजूबाजूचं सगळं काही विसरलो... बस तो क्षण आणि आम्ही.


त्या प्रत्येक किस मध्ये होत ते आमचं प्रेम.. तो क्षण संपवुन नये असा वाटत होता... की कोणी तरी दरवाजा उघडण्याचा आवाज आला. ती आई होती. अचानक आल्याने आम्ही दचकलो आणि बाजुला झालो.


ती मेन डोर उघडुन माझ्या रूमध्ये आली तेव्हा आम्ही अभ्यास करत होतो.. पण आमचे विस्कटलेले केस बघून तिला जे कळायचं होत ते तिला कळलं. आली तशीच निघून गेली काही ही न बोलता. तेव्हा कुठे आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि एकमेकांकडे पाहिलं.. बस गोड हलसो पाहुन.



लेट झाल्याने निशांत ही जाण्याची तय्यारी करू लागला. सगळं आवरून आम्ही बाहेर आलो. आईने बाहेरून सामोसे आणि वडे आणले होते. ते खालून निशांत घरी निघून गेला. जाताना त्याला बघुन माझ्या चेहऱ्यावर चांगलीच कळी उमलली होती. हे सगळं आई अचुक टिपत होती..


निशांत जाताच मी माझ्या रूममधे आले. तो क्षण पुन्हा पुन्हा आठवुन गालातल्या गालात हसत होते. अचानक मागून आई आली.., "काय ग काय झालं हसायला.??" आईने अचानक विचारल्याने मी दचकले.. "काही नाही ग असच..." एवढं बोलून मी स्वतःचा मोबाईल घेतला आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसले..


निशांतला मॅसेज केला पण तो अजून पोहोचला नव्हता.. म्हणून असाच टाईमपास करत होते की, निशांतचा रिप्लाय आला.. "पोहोचलो घरी, जस्ट." त्याचा मॅसेज बघुन ही चेहऱ्यावर स्माईल आली. बाबा आले तसे आम्ही जेवुन घेतलं.


हळुहळू हर्षल बद्दल ही आम्ही विसरत होतो.. माझा पाय देखील बरा होत होता. आता तर बाबा मला रोज सोडायला येत होते कॉलेजमध्ये आणि निशांत घरी सोडायचा. फक्त कॉलेजमध्ये गेल्यावर हर्षलची आठवण यायची....
ते देखील वेळेनुसार सगळे विसरत होते... आता मी, निशांत आणि राज असे तिघे भेटायचो. पण राज आजकाल आमच्यापासून दूर राहू लागला होता.. कदाचित त्याला हर्षु ची आठवण येत असावी..



To be continued