रात्री आकाश कधी आला कळलं नाही. सई सकाळी जागी झाली तेव्हा नहमीपेक्षा जास्त काळोख होता. घड्याळात पाहिलं तिने. सकाळचे ८ वाजत होते. आकाश अजूनही tent मधेच होता. " आकाश !! आकाश !! " सईने त्याला बाहेरूनच आवाज दिला. सईचा ग्रुप बाहेर आलेला होता. आकाश आवाज ऐकून बाहेर आला. केस कापून , दाढी केलेला आकाश... वेगळाच भासत होता. "wow !! " त्यातली एक मुलगी पट्कन बोलली. सईसुद्धा बघत राहिली त्याच्याकडे. आकाश आला तिच्यासमोर... आणि टिचकी वाजवली. तेव्हा सई भानावर आली. " मी असाच दिसतो नॉर्मल.. " आकाश हसला. पण त्याचं ते हसू जास्त काळ टिकलं नाही. कारण पावसाचे मोठे मोठे ढग चालून येतं होते. " वादळ ?? " सईने आकाशकडे बघत म्हटले. " हो ... लवकर निघावे लागेल... आज सुप्रीला भेटणारच... " आकाश सामानाची आवरा-आवर करू लागला.
सईने लगेच अमोलला कॉल लावला. " अमोल ... वादळ येते आहे... कळते आहे ना... " ,
" हो हो ..मग काय करायचे... आम्ही confused झालो आहे.. निघायचे कि नाही... " ,
" आम्ही निघालो आहे... पाऊस यायच्या आधी निघा... आकाश बोलला, पुढे एक लाकडी पूल आहे.. तो ओलांडून येतो आम्ही. भेटू त्याचं ठिकाणी ... " सईचा कॉल कट्ट झाला. अचानक मोबाईलची range गेली.
पावसाने सुरुवात केली नव्हती. तरी वारा एवढा प्रचंड वेगाने वाहत होता कि धड नीट चालता हि येत नव्हतं. आकाश तरी पुढे होता या सर्वांच्या. पुढे वाटेवर काही मोठे दगड पडलेले दिसले त्याला. थांबला तो. " पुढे जाणे सुरक्षित नाही.. आपल्याला दुसरी वाट शोधावी लागेल. " आकाश आजूबाजूला बघू लागला. दूरवर त्याला लाकडी पूल दिसला. तिथे जाण्याचा एकच रस्ता .. तोही दगडांनी बंद केलेला.... दुसरी वाट म्हणजे ... समोर असलेलं जंगल...
" जंगलातून जावे लागेल... सुप्रीला सांगा.. मी येतो आहे तिथे... ते कुठे आहेत आता... " सईने कॉल केला अमोलला.
" पोहोचलात का तुम्ही... " ,
" आवाज तुटतो आहे... तुमचा... आम्ही चालतो आहे अजूनही... पण वारा खूप आहे.. " कॉल पुन्हा कट्ट झाला.... अमोलही थांबला चालता चालता... सारेच थांबले होते. समोर प्रचंड झाडे-झुडूप.... या पुढेच तो लाकडी पूल असावा, कोमलचा अंदाज... कारण एकाने सांगितलं होते असाच रस्ता. सुप्री आणखी tension मध्ये... आणखी एक अडचण... का कोणाला भेटायला देयाचे नाही मला ... आकाशशी. आणि वातावरण आणखी खराब झालं... अडचणीत भर पडली... पूर्ण ताकदीनिशी पाऊस कोसळत होता. तरी आज भेट होणारच , या उद्देशाने निघाली सुप्री.
प्रचंड पाऊस, त्यात झाडे-झुडुपे... त्यात खाली जमिनींचा भरवसा नाही. पायाखाली खड्डा कि झाडाची फांदी... काहीच कळत नव्हतं. काटेरी झाडे.. टोचत होती... जखमा करत होती. तरी चालत होते. मोबाईलची range गेलेली. सुप्री किती पुढे होती सर्वांच्या... आकाशला आज भेटणारच... सगळेच भिजलेले. चालून चालून दमले, तरी जंगल काही संपत नव्हतं... कधी संपणार हे जंगल... पाऊससुद्धा एवढा होता कि समोरचं काही दिसतं नव्हत... डोळे उघडले तर पाणी नुसतं टोचत होते डोळ्यात... काय दिसणार समोरचे .... कोण कुठे चालते आहे .. तेही कळतं नव्हतं.
============================== ================================
"अमोलला फोन लागत नाही " सईचा प्रयन्त सुरूच होता. त्यात पावसाने नुसता धुमाकूळ घातला होता. थांबायला तयारच नाही. आकाश अजूनही पुढेच चालत होता. त्याला ना पावसाची चिंता ना त्या रानाची, फक्त सुप्रीला आजच भेटायचं ... या ओढीने भरभर चालत होता.
" अमोल !! ... अरे बघ ना ... सईचा कॉल लागतो का ते... " संजनाने पुन्हा अमोलला सांगितलं.
" अगं ... try करतोच आहे... रेंजच नाही... मी तरी काय करणार.. " अमोल.
" तरी... तो ब्रिज आसपास असेल ना.. पावसाने तर काही दिसत नाही आहे... आकाशला तरी कळेल ना तिथे यायला... " कोमल जरा काळजीने बोलली. पुन्हा वादळ नको आहे.. आतातरी..... सुप्री पुढे होती या सर्वांच्या... आज तरी भेट होऊ दे रे... गणू, खूप झाली परीक्षा आता.. सुप्री मनातल्या मनात देवाचा धावा करत होती. वाराही सुसाट वाहत होता. वर विजांचा आवाज होताच सोबतीला. संजना, बरोबर सुप्रीच्या मागे होती. , तिला सांभाळण्यासाठी.
पुढे १० मिनिटं ते असेच त्या जंगलातून वाट काढत चालत होते. सगळेच भिजलेले , दमलेले ... पोटात काही नाही. तरी चालत होते. वेगळीच शक्ती आलेली सर्वामध्ये. जुना मित्र भेटणार होता ना आज. काही झालं तरी आज त्याला भेटायचेच.. या आशेने सर्व चालत होते. पुढे मोकळी जागा दिसू लागली.
" आता लागेल कॉल ... " अमोल मोबाईलकडे बघतच त्या जंगलातून बाहेर आला. " आता मोबाईल ची गरज नाही... " कोमलने अमोलचा हात पकडून थांबवलं. अमोल सुद्धा थांबला. कारण सगळेच थांबले होते. समोर बघत होते. पलीकडल्या तीरावर, काही माणसे दिसली त्याला. अरे !! सईचा ग्रुप.. लगेच ओळखलं त्याने. सईसुद्धा होतीच. पण आकाश कुठे आहे यात. अमोल बघू लागला. त्या ग्रुप पासून थोडं पुढे ... आकाश उभा होता. तो याच दिशेने बघत होता. कारण बरोबर समोर .. सुप्री उभी होती. दोघे एकमेकासमोर... मध्ये फक्त एक मोठी नदी... ओसंडून वाहणारी.... सुप्रियाला भरून आलेलं... स्तब्ध झालेली ती... त्याला बघून. पावसाचा जोर वाढत चालला होता. आकाश सुद्धा सुप्रीलाच बघत होता कधीचा. अचानक त्याची नजर , तिथून काही अंतरावर असलेल्या एका लाकडी पुलावर गेली. सुप्रीला हि समजलं .. आकाश कुठे बघतो आहे ते.
जोराने वीज कडाडली. काही कळेना काय झालं. सुप्री धावत सुटली त्या पुलाच्या दिशेने. ते बघून आकाश सुद्धा धावला. फक्त दोघांना भेटायचं होते आता. बस्स... कोणतीही ताकद त्यांना अडवू शकत नव्हती. या दोघांना धावताना पाहून सगळेच त्यांच्या मागोमाग धावू लागले. आधीच दमलेले , तरी धावत होते. कमाल आहे ना... यालाच म्हणतात खरं प्रेम... कसली ओढ होती ना दोघांना. पावसाचा जोर आणखी वाढला. त्यालाही आनंदाचे उधाण आलेलं. पण अचानक , धावता धावता सुप्रीचा पाय निसरडला. आणि खाली पडली. हाताला लागलं .... परंतु डावा पाय मुरगळला. " सुप्री !! " आकाश पलीकडून ओरडला. तो हि थांबला. संजना तोपर्यत सुप्री जवळ पोहोचली होती. तिला तिने उभं केलं. हातातून रक्त येतं होते. पायाने चालता येतं नव्हतं तरी कशीबशी उभी राहिली. संजनाचा हात सोडला तिने. तशीच लंगडत लंगडत पळू लागली पुन्हा.... आता नाही थांबयाचे... त्याला आज भेटायचंच... आकाश सुद्धा धावू लागला. शेवटी दोघेही त्या पुलाजवळ पोहोचले. दमलेले.. आकाश धापा टाकत थांबला एका टोकाला. सुप्रीनेही दुसऱ्या टोकाचा आधार घेतला क्षणभरासाठी.
पाऊस तर कोसळतच होता. दोघे पुन्हा समोरासमोर उभे. पण या वेळेस परिस्तिथी भिन्न. सुप्रीने पुन्हा जोर लावला. लंगडत लंगडत धावली. आकाश सुद्धा पुढे आला. एका क्षणाला सुप्री धावता धावता खाली , गुडघ्यावर बसली. आकाश जवळ आलेला ना. अंगात ताकद होती चालायची , पण भावना एवढ्या ओसंडून बाहेर येते होत्या ... नाही चालवलं तिला पुढे. आकाश पोहोचला तिच्याजवळ. तोही गुडघ्यावर बसला. गालावरून हात फिरवला तिच्या. आणि गच्च मिठी मारली तिला. त्याच क्षणाला आभाळात केव्हढ्याने वीज चमकली.... जणू , त्या निसर्गालाही आनंद झाला असावा.
कितीवेळ ते तसेच बसून होते दोघे. सईचा ग्रुप , संजनाचे मित्र-मैत्रिणी... सर्वच हे पाहत होते. साऱ्यांचे डोळे अश्रूंनी वाहत होते. ते पुसण्याचे काम पाऊस चोख बजावत होता. काही वेळाने सुप्रीने मिठी सोडवली.
" next time ... माझ्यसोबतच भटकंती करायची. कितीही बावळट असली तरी.. माझा हात सोडायचा नाही आता... समजलं ना... नाहीतर आईला नाव सांगेन... " सुप्री आकाशला सांगत होती. " नक्की !! गणू शप्पत ... " आकाश बोलला. आणि पुन्हा मिठी मारली सुप्रीने. त्याचबरोबर, संजना... तिचा ग्रुप ... सर्वच धावत आले.. सर्वानी या दोघांना मिठीत घेतलं. काय सोहळा होता तो.. छान झालं ना..
यथावकाश , आकाशचे आगमन शहरात झाले. सई तिच्या घरी तर अमोल दिल्लीला निघून गेला. आईवडील आनंदात.. त्याच्या ऑफिस मधले खुश.. सुप्री - संजना सहित आकाशचा सगळा मित्रपरिवार खुश.. सगळेच खुश . तरी सुप्रीचा पाय चांगलाच मुरगळला होता धावताना. त्यामुळे तिला निदान २ आठवडे तरी घरीच थांबायला सांगितले होते डॉक्टरने. आकाश ठीक होता तरी जवळपास एक वर्षाहून जास्त काळ त्याने गावात , जंगलात घालवला होता. शिवाय खूप अशक्त सुद्धा झालेला होता. काही दिवस हॉस्पिटल मध्ये काढावे लागणार होते त्याला. सुप्री घरी तर आकाश हॉस्पिटलमध्ये. पुन्हा दुरावा. असो , पण रोज फोन असायचे. हो... आकाशला खास मोबाईल गिफ्ट केलेला या सर्वानी. त्यावरच गप्पा होतं असत. अगदी डॉक्टर सांगतो तसं.. सकाळ ... दुपार ... संद्याकाळ ... रात्र.. कधी कधी विडिओ कॉल असायचे. अश्यातच, २ आठवडे भुर्रकन निघून गेले. आकाश घरी परतला हॉस्पिटलमधून. सुप्रीचा पाय ठीक होतं होता.
पुढच्या २ दिवसांनी, आकाशने सगळ्यांना भेटायला बोलावलं. त्यांच्या आवडत्या ठिकाणी... समुद्र किनारी. सगळेच सोबत निघाले. आकाश दूर एका कठड्यावर बसून होता. सगळेच जलद चालत होते. सुप्री तेवढी लंगडत लंगडत मागे राहिली. आकाश समुद्राकडे तोंड करून बसला होता. " काय आहेत रिपोर्ट ? " संजनाने आकाशला लगेचच विचारलं. आकाशने शांत चेहऱ्याने एक कागद संजनाकडे दिला. तिने उघडून बघितल.. गंभीर झाली ती. तिने कागद पुढे दिला. ... सगळेच तो कागद बघत होते आणि काळजीत पडत होते. सुप्रीने दुरुनच बघितलं , हे सगळे tension मध्ये आहेत ते.
" काय झालं.. " लंगडत लंगडत आली सुप्री... आकाश पुन्हा समुद्राकडे बघत होता. संजनाने तोच कागद पुन्हा घडी केला आणि सुप्री समोर धरला. " बोल ना ... काय आहेत रिपोर्ट ? " सुप्री तरीही विचारत होती. सगळेच tension मध्ये.... तिने घाबरतच कागद उघडला. कागदावर एक नकाशा (map ) होता.
" अरे !! हे काय ... रिपोर्ट कुठे आहेत... " सुप्रीला कळेना.
" मी बरा आहे ग... ठणठणीत बरा... रिपोर्ट काय देऊ ... औषध आहे माझं ते... " आकाश आता बोलू लागला.
" म्हणजे हे सगळे acting करत होते का... " सुप्री रागावली.
" त्या एका वर्षात... तुझी smile तेव्हडी आठवायची... तुझं रागावणं बघायचं होते मला... म्हणून या सर्वांना आधीच सांगून ठेवलं होते. ... ",
" नाटक ... acting हा... राग बघायचा आहे ना ... थांब दाखवते तुला... " म्हणत लंगडतच सुप्री त्याच्या मागे पळाली. आकाश हसत पुढे पळाला. सगळेच हसत होते.
शेवटी छान होते ना सगळे. आई-वडिलांना .. त्यांचा हरवलेला मुलगा भेटला. सईला नवीन मित्र , शिक्षक भेटला. अमोलला त्याचा आयडॉल मिळाला. संजनाला तिचा जुना मित्र नव्याने भेटला. आणि सुप्रीला ... तिचा जोडीदार ... नव्या रूपात भेटला. प्रवास तर होतंच राहतात.. पण हा प्रवास कोणीच कधी विसणार नाही हे नक्की... !!
काहींचा , श्वास घुसमटतो शहरात... त्यांना निसर्गातच प्राणवायू मिळतो. त्या जमातीतलाच आकाश एक... एवढं होऊन सुद्धा पुढच्या प्रवासाचा प्लॅन बनवलाच त्याने. अर्थात सुप्री होतीच सोबतीला. एकवेळ आकाश स्वतःला थांबवू शकतो... पण मनाला... ते तर कधीच पुढे गेलेलं एका नवीन प्रवासाला... आकाशही तयार झाला मग. पावसासारख्या " मित्राचा " हात पकडून आणि मनात उधाणलेला वारा घेऊन... एका नवीन प्रवासाला.... नवीन प्रवास... नवीन ठिकाण... नवा दिवस आणि नवीन भटकंती .... भटकंती पुन्हा एकदा ... !!
================================== The एन्ड ================================