Addiction - 18 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 18

जे काम मी करू शकलो नव्हतो तेच काम करण्यास नशिबाने साथ दिली आणि ती माझ्या घरी आलीच ..ती आल्यानंतर लगेच कोर्टात अर्ज दिला आणि एका महिन्याने दोघांनी लग्न देखील केलं ..तिने निर्णय जरी घेतला असला तरी ते निभावणं तिला इतकं सोपं कधीच जाणार नव्हतं ..तिला घरी आणलं आणि हक्काचं स्थान दिल ..आमच्या नात्याबद्दल फक्त आम्हा दोघांनाच माहिती होत ..काही दिवसात घरच्यांना सांगणं भाग होत पण त्याआधी श्रेयसीला सांभाळणं फार गरजेच होत ..मला जमेल तशी तिची काळजी घेऊ लागलो पण तिला ड्रग्सची सवय झाली असल्याने तिला राहणं अशक्य होऊ लागलं होतं ..मी रात्री तिच्या सोबत असायचो पण दिवसभर ती एकटीच असायची ..मी फोन करून तिची स्थिती विचारत राहत होतो तरीही मनाला एक अनामिक भीती लागलेली असायची ..असाच एक दिवस सायंकाळी घरी परतलो तेव्हा संपूर्ण रूममध्ये पसारा पडला होता ..बहुतेक श्रेयसिने रूममध्ये ड्रग्स शोधण्याचा प्रयत्न केला होता ..प्रत्यक्षात मी घरी सिगारेटसुद्धा ठेवली नसल्याने तिची बेचैनी वाढली होती ..मी तिला इकडे - तिकडे शोधू लागलो आणि एका जागी ती सापडली ..मी तिच्याकडे जावं आणि तिने काहीतरी फेकून मारलं ..डोक्याला रक्त लागलं तेव्हा कुठे ती भानावर आली ..आपण चुकीचे वागलो आहे हे तिच्या लक्षात आलं आणि तीच डोक्याला पट्टी करू लागली ..आज संपूर्ण रात्र ती मला घट्ट मिठी मारून झोपी गेली होती ..मी तिच्यावर अजिबात रागावलो नव्हतो कारण एका क्षणात ते सर्व सोडणं कुणालाच शक्य होणार नव्हतं पण या क्षणाने माझ्या मनात भीती आणखीच वाढली ...

विचार करता - करता एक पर्याय समोर आला ..आश्रमात जाऊन कुमुद काकुशी सर्व काही बोललो ..त्या सर्व एकूण शॉक झाल्या होत्या ..मला वाटलं होतं मी त्यांना काहीच न सांगितल्याने रागावतील पण त्यांनी माझी बाजू समजून घेतली होती ..आणि श्रेयसीची दिवसभराची काळजी देखील मिटली ..रोज ऑफिसला जाताना मी श्रेयसीला त्यांच्याकडे सोपवायचो ..त्याही तिच्यावर मायेप्रमाणे जीव लावायच्या..आजूबाजूला लहान - लहान मूल असल्याने तिला स्ट्रेस सहन करावा लागत नव्हता ..तर आपल्यालाही काही दिवसात एक छोटंसं बाळ होईल म्हणून ती देखील त्याची येण्याची आतुरतेने वाट पाहू लागली ..दिवस आश्रमात गेला की संपूर्ण रात्र ती माझ्याच मिठीत असायची ..आजूबाजूला मी लहान - लहान मुलांचे पोस्टर लावले होते त्यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते ..तिला त्रास होऊ नये म्हणून जुन्या गोष्टी आठवण करू लागायचो ..ती त्यात रमली की मग मात्र विचित्र वागत नसे ..हळूहळू सर्व नॉर्मल होऊ लागलं होतं ..घरातील सर्व कामची जबाबदारी मीच उचलली होती ..तिची ट्रिटमेंट असो किंवा मग जेवन याकडे मी कटाक्षाने लक्ष द्यायचो ..एवढं सर्व करूनही तिला कधी राहवलं जायचं नाही आणि ती वेड्यासारखी वागायची ..मी मात्र तिला सांभाळून घ्यायचो ..तिला अस पाहताना डोळ्यात अश्रू यायचे पण तेही मनमोकळेपणे मी बाहेर काढू शकत नव्हतो ..कारण मी कमजोर पडलो असतो तर तीच काय झालं असत ..? ..तरीही ती बाळासाठी होईल ते करायची ...

9 महिने झाले होते ..तिने आपल्या बाळासाठी दिलेलं वचन पूर्ण केलं आणि ड्रग्स तर सोडाच पण साधी सिगारेटदेखील तिने शिवली नव्हती ..श्रेयसीच्या पोटात दुखायला लागलं म्हणून तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो ..कुमुद काकूंनाही फोन करून बोलावून घेतलं होतं ..ऑपरेशन थेटरला तिची सर्जरी सुरू होती ..मी खूप टेंशन मध्ये आलो होतो आणि काकू मला समजावत होत्या ..काहीच वेळात डॉक्टर बाहेर आला आणि मुलगी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या ..माझ्या आनंदला तर आता पारावर उरला नव्हता ..काकूनेही मला शुभेच्छा दिल्या ..मुलगी होताच मी संपूर्ण हॉस्पिटलला लाडू भरविले ..इतका आनंद मला त्याक्षणी झाला होता ..सर्वच लोकांनी माझं मनभरून स्वागत केलं होतं ..काहीच वेळात तिला जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आलं आणि आम्ही भेटायला गेलो ..चिमुकली श्रेयसीच बोट धरून पाळण्यात झोपून होती तर श्रेयसी तिच्याकडे एकटक पाहत होती ..काकूंनी तिला उचललं आणि रडायला सुरुवात केली ..किती मस्त प्रसंग होता न तो ..काकूने तिला माझ्या हातात दिलं ..अगदी श्रेयसिसारखीच गोरी पान होत आमची मुलगी ..हातात घेतल्यावर तिच्या कपाळावर चुंबन केलं आणि योगेश - निशाच्या मुलाचा प्रसंग आठवला ...आई - वडील होणं किती भाग्याच असत हे मला त्याक्षणी जाणवू लागल ..आई- मुलगा दोघेही आम्ही तिला धरून होतो ..मी तसच तिला श्रेयसिकडे घेऊन गेलो आणि सदैव आठवणीत राहणारा एक प्रसंग कॅमेरात टिपला ..श्रेयसीला आणि आमच्या बाळाला आराम करायचा असल्याने काकू - मी बाहेर बसलो होतो ..आमच्या दोघांच्या आनंदाला आता सीमा नव्हती ..काकुला आराम करायला घरी पाठवून देऊन मी तिथेच थांबलो .काकुही रात्रीपासून जाग्याचं असल्याने त्यांना आरामाची गरज होती तर मी तिची काळजी घ्यायला थांबलो होतो ..शिवाय कुणीतरी स्वयंपाक बनवून आणण गरजेचं होतं त्यामुळे काकू घरी गेली होती ..तर मी तिथेच थांबलो ..श्रेयसी जरी झोपली असली तरीही मी माझ्या बाळाला मनभरून पाहू लागलो ..तिच्याही नकळत तिची परछायी मला जास्त आवडू लागली होती ..श्रेयसीला घरी शिफ्ट केल्यावर आईबाबांना सर्व सांगणं गरजेचं होतं त्यामुळे डोक्यात बरेच विचार सुरू होते ..
काकू थोडं आराम करून परत हॉस्पिटलला आल्या होत्या ..नंतर मी फ्रेश व्हायला घरी परतलो .. माझ्या डोळ्यासमोर आताही त्या दोघींचा प्रसन्न चेहरा होता ..मला घरीही आता करमत नव्हतं ..काकूने दोन्ही टाइमच जेवण सोबत आनल्याने मला स्वयंपाक बनविण्याची तसदी घ्यावी लागणार नव्हती ..मला माझा संपूर्ण वेळ आता माझ्या मुलीला आणि श्रेयसीला द्यावयाचा होता त्यामुळे लगेच अंघोळ करून परतलो ..हॉस्पिटलला पोहोचलो तर काकू आमच्या मुलीला घेऊन बाहेर बसल्या होत्या आणि आतमध्ये बरीच गर्दी होती ..मी लगेच आत पोहोचलो आणि बघितलं तर डॉक्टर श्रेयसीच्या हाताला पट्टी बांधून देत होते तर बाकी कर्मचारीच आजूबाजूला होते ..तिच्या हाताला पट्टी बांधून झाली आणि डॉक्टर बाहेर येऊ लागले ..मी त्यांना विचारल काय , " काय झालं सर ? " , आणि ते जोराने ओरडतच म्हणाले , " मी तुला मागे म्हणालो होतो न की हिला ड्रग्स पासून दूर ठेव ..बघ मुलगी होईपर्यंत तर ती बरी राहिली पण ड्रग्स न मिळाल्याने तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ..आता पाणी डोक्याच्या वर झालंय त्यामुळे मला पोलिसांना कळवाव लागेल .."

सर समोर - समोर जाऊ लागले .बाजूला बरीच गर्दी जमली होती ..सर इतक्या जोराने ओरडले होते की जवळपास सर्वानाच एकू गेलं ..पण मला त्या गर्दीच भान नव्हतं ..सर बाहेर जाणारच तेवढ्यात मी त्यांच्या पायावर पडलो आणि माफ करण्याविषयी गयावया करू लागलो ..सर मला पाय सोडण्यास सांगत होते पण मी माझ्या मुलीसाठी काहीही करण्यास तयार होतो ..सरांनाही माझ्या भावना कळल्या आणि त्यांनी मला आपल्या पायावरून उठवल व सरळ त्यांच्या केबिनला बोलवून घेतलं ..मी परवानगी मागत त्यांच्या ऑफिसला पोहोचलो आणि त्यांनी मला बसण्याचा इशारा केला ..ते समोर बोलू लागले .., " बघ प्रेम आता तुला छोटीशी मुलगी आहे म्हणून तुझं म्हणणं ऐकतोय पण तुला सांगू शकतो की श्रेयसी पुन्हा एकदा असा प्रयत्न नक्की करणार कदाचित तेव्हा आपण कुणीच सोबत नसू ..शिवाय ती अशीच वागत राहिली तर तुझ्या मुलीलाही धोका आहे तेव्हा तुला एक गोष्ट सांगू शकतो ..माझे मित्र आहेत बंगलोरला जे लोकांना व्यसनातून काढायचं काम करतात ..जर पेशंटने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर तिथे तो बरा होतो नाहीतर कायमचा गमावून बसशील तिला पण मला वाटत तू तिला तिथे पाठवाव ..बघ आता निर्णय तुझाच आहे ..घरी राहून अस वागण्यापेक्षा तिथे जाऊन एक चान्स घेणं जास्त परवडेल .."

सर बाहेर जाणार तेवढ्यातच मी म्हणालो , " सर मी तयार आहे ..आपण उद्याच जाऊ तिथे ..तुम्ही कळवा डॉक्टरांना " आणि ते परत म्हणाले , " आर यु शोअर ? ..म्हणजे एका दिवसाच्या मुलीला सोडून जायला ती तयार होईल का ? "

" मी मनवतो सर तिला तुम्ही काळजी करू नका " , मी म्हणालो ...

मी सरांना सांगितलं तर होत पण श्रेयसी माझं ऐकणार का हाच खूप मोठा प्रश्न होता ..मी सरळ तिच्या रूममध्ये दाखल झालो ..ती काहीच बोलायला तयार नव्हती ..ती आपल्या मुलीकडे सतत पाहत होती ..आणि त्याचक्षणी तिला म्हणालो , " का अस वेड्यासारखं वागतेस तू ? ..तुला काही झालं असत तर आम्ही दोघांनी काय केलं असत ? " ती मान खाली घालत म्हणाली , " काय करू नाही झालं सावरन मला आणि बसले वेड्यासारखं वागून .."

आणि मी रागातच उत्तरलो , " हो म्हणूनच मी निर्णय घेतला आहे तुला बंगलोरला पाठवायचा ..एकदा व्यसनमुक्ती केंद्रातून तू परत आलीस की सर्व चांगलं होईल .." आणि ती आपल्या मुलीकडे जात म्हणाली , " मी नाही जाणार माझ्या मुलीला सोडून .." मी तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होतो पण ती माझं काहीच ऐकायला तयार नव्हती ..माझा राग आणखीच वाढू लागला होता आणि न राहवता म्हणालो , " मग तुझ्या व्यसनामुळे तुझा मुलीचा जीव गेलेला आवडेल तुला .." हे शब्द ऐकताच ती माझ्यापासून दूर झाली ..मी रागातच घराकडे निघालो ..घरी गेलो ..शॉवर घेतला आणि आता थोडं डोकं शांत झालं ..मी श्रेयसीला अस बोलायला नको होतं असं वाटलं आणि लगेचच कपडे घेऊन हॉस्पिटलला पोहोचलो ..श्रेयसी खिडकीतून बाहेर बघू लागली होती ..तिच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवत म्हणालो , " सॉरी जरा जास्तच बोललो ..तुला अस वाटत का माझ्यासाठी हे इतक सोपं आहे ..मलाही माझ्या मुलीला उज्ज्वल भविष्य द्यायचं आहे ..तू जर आम्हाला सोडून गेलीस तर दुसरी श्रेयसी जन्माला यायला वेळ लागणार नाही ..माहिती आहे की हे काही दिवस खूप महत्त्वाचे असतील पण मला माझी श्रेयसी नेहमीसाठीच हवी आहे ..जी माझ्या आयुष्यातून कधीच जाणार नाही ..एवढं नाही करू शकत तू आम्हा दोघांसाठी ? "

आमच्या दोघांचेही डोळे पाणावले होते ..श्रेयसी माझ्या बाजूने वळाली आणि तिने लगेच घट्ट मिठी मारली ..माझ्या निर्णयावर तिने होकार दर्शविला ..उद्याचा दिवस हा तिच्यासोबत कदाचित शेवटचा दिवस अस तिला वाटत होतं म्हणून ती आपल्या मुलीसोबत मनभरून जगत होती ..ती त्या रात्री झोपलीच नव्हती आणि फक्त तिच्याकडे पाहू लागली होती ..

मी रात्रीच आईबाबांना सकाळी निघून येण्यास सांगितलं होतं फक्त त्यांना काय झालंय ते सांगितलं नव्हतं ..फ्लाइटचे तिकीट बुक केले होते त्यामुळे काही टेंशन नव्हतं ..पण त्यांच्या जीवाला घोर लागला होता हे मात्र नक्की ..

सकाळ झाली आणि तिने आपल्या मुलीला एकदा हृदयाशी कवटाळून घेतलं ..तिला सोडून जाण्याची तिची इच्छा नव्हती पण दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही सकाळीच फ्लाइटने निघालो ..काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही बंगलोरला पोहोचलो ..तिची योग्य ती व्यवस्था करून मी मुंबईसाठी निघालो ..तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि ती म्हणाली , " मी जर परत आले नाही तर दोघंचही प्रेम आपल्या लेकीला दे " ..बहुतेक तिने स्वीकारलं होत की आपण परत येणार नाही आणि काहीच न बोलता माझ्यापासून दूर झाली ..मी काही तासांचा प्रवास करून पुन्हा मुंबईला परतलो ..रात्रीचे 10 वाजले होते आणि सरळ हॉस्पिटलवर पोहोचलो ..समोर आई - बाबा आले होते ..त्यांना बघून मी लपवून ठेवलेले सर्व अश्रू बाहेर आले ..त्यांच्याशी खूप काही बोलायच होत पण त्यापूर्वी काकूंना घरी सोडणं गरजेचं होत ..काकू दोन दिवसापासून माझ्याच सोबत होत्या त्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे होते म्हणून त्यांना आश्रमात सोडून पुन्हा परत आलो ..आमची चिमुकली आताही आईच्या हातात होती ..ती रडून - रडून झोपी गेली आणि मी आईला घडलेल सर्व सांगितलं ( फक्त श्रेयसीचा भूतकाळ सोडून ) ..मला वाटलं आई - बाबा खुप रागावतील पण त्यांनीही मला चुकीच ठरवलं ..त्यांनी माझ्या मुलीला स्वीकारून माझं टेंशन कमी केलं होतं ..आईने आता तिची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आणि मी टेंशन फ्री झालो..

आयुष्याने एक वेगळी वाट पकडली ..आई माझ्या चिमुकलीच आनंदाने करू लागली ..आईसोबत असताना ती फार खुश असायची तर बाकी संपूर्ण वेळ मी तिला माझ्या जवळ ठेवायचो ..श्रेयसीला दिलेल्या वचनाप्रमाणे मी दोघांचही प्रेम तिला देऊ लागलो ..तिकडे बंगलोरला श्रेयसी एकटीच होती ..फोन कुणाला वापरू दिल्या जात नव्हता ..लँडलाइन होती पण काही अर्जेन्ट असेल तरच तिच्याशी बोलायला मिळायचं त्यामुळे तिच्याशी बोलणं शक्यच नव्हतं ..दोन - तीन महिन्यातून एकदा तिला भेटण्याची संधी दिली जात होती त्यामुळे मी तिला भेटायला पोहोचलो ..दूरवरून मी एक दृश्य पाहू लागलो ..चार - पाच लोक एका स्त्रीला आवरु पाहत होते पण ती कुणालाच आवरत नव्हती म्हणून डॉक्टरांनी तिला जबरीने बेहोशीच इंजेक्शन दिलं ..मला चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तिला बेहोष केल्यावर मात्र तिचा चेहरा स्पष्ट दिसू लागला ..तिचे कपडे फाटलेले , केस विखुरलेले आणि स्वतःलाच स्वतःवर भान नाही अशी ती स्त्री होती ..जेव्हा जवळून तिला पाहायला गेलो तेव्हा जाणवलं की ती श्रेयसीच होती ..मी हे सर्व पाहून शॉकच झालो ..तिला बेहोष करण्यात आल्याने तिला भेटता पण येणार नव्हतं ..पण तिला अस पाहून मी असह्य झालो होतो ..लगेच पुन्हा फ्लाइट घेऊन निशाकडे पोहोचलो ..डोळ्यात अश्रू होते ..त्यामुळे निशा काय झालंय अस विचारत होती पण मी काहीच बोलायला तयार नव्हतो ..तिच्या घरी कुणीच नव्हतं ..बाळ रडत होत त्यामुळे सर्वात आधी तिने त्याला झोपवलं आणि माझ्याकडे आली ..मी सिगारेट काढून ओठांना लावली ..ती माझ्याकडे पाहत होती तरीही काहीच बोलली नाही ..सिगारेट संपल्यावर ती म्हणाली , " क्या हुआ प्रेम ? ..मैने पहले तुम्हे ऐसें कभी नही देखा ..बताना यार क्या हुआ तुझे ? " मी डोळ्यात साठवून ठेवलेले अश्रू बाहेर काढले ..तिच्या कुशीत बऱ्याच वेळ पडून होतो ..मागील काही दिवसात जे घडलं ते सर्व तिलाही सांगितलं आणि तिने मला समजून घेतलं ..तिला सर्व काही सांगितल्याने मला थोडं हलकं वाटत होतं ..पूढे तीच म्हणाली , " प्रेम मै तेरे साथ हमेशा हु और आज से 'तेरी जिम्मेदारी मतलब मेरी जिम्मेदारी ..तू खुदको अकेले मत समझ ..मै हु साथ तेरे ..अब आसू पोछ ले ..और एक बात बता ये सिगारेट किया आदत कबसे लग गयी तुझे "

आणि मी मान खाली टाकत म्हणालो , " जीस दिन तुम योगेश की हो गयी तबसे .." ती थोडी गालातल्या गालात हसली आणि म्हणाली , " जो हो गया वो हो गया पर तुझे लगता है न की श्रेयसी ठीक हो जाये तो तुझे भी ये आदत छोडणी होगी वरणा वो तुझे देखकर और वैसी ही हो जायेगी ..तू यही चाहता है ? " , तिच्या गोष्टीत दम तर होता त्यामुळे त्या क्षणापासून मी सिगारेट सोडण्याच तिला वचन दिलं ..तिच्यासमोर मनमोकळं करून माझं मन हलकं झालं होतं आणि मी निघू लागलो तेवढ्यात निशाणे मला बोलावलं आणि जवळ येत ती कपाळावर किस करत म्हणाली , " एक दिन कहा था की तुझे किस मिलेेगा आज तुझे इसकी जरूरत है ...और सून कुछ भी हो जाये ये मत भुलना की मै अभि जिंदा हु .." तिला हग करून मी घराकडे निघालो ..

मागे बरेच दिवस गेले ..श्रेयसीची चांगली होण्याची बातमी काही आली नव्हती ..तरीही दोन - तीन महिन्यांनी मी तिला पाहून येत होतो ..या काही दिवसात माझ्या मुलीला सर्वांकडूनच प्रेम मिळत गेल ..आई असो की काकू की मग निशा सर्वच आमच्या घरी येऊन माझ्या मुलीची काळजी घेऊ लागले ..या सर्वात कमी होती ती श्रेयसीची ..अशाच एका दिवशी बंगलोरवरून फोन आला आणि उदया सकाळी बंगलोरला येण्यासाठी सांगितलं ..त्यांनी श्रेयसीबद्दल काहीच न सांगितल्याने फार भीती वाटत होती आणि ही रात्रच सांगणार होती की कोण जिंकणार ..

विश्वास की भीती

प्रेम की नियती .?

उद्याचा दिवस हा माझ्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही ठरवणार होता


क्रमशः ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED