Addiction - 19 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 19

बंगलोरवरून फोन आला होता पण त्यांनी श्रेयसीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं ..त्यामुळे मनात भीती होती ...आजची रात्र मला काही झोप लागणार नव्हती त्यामुळे मागे घडलेल्या दोन वर्षांच्या आठवणीत रमू लागलो ..जेव्हा निशा आयुष्यातून निघून गेली तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की मलाही पुन्हा एकदा प्रेम होईल ..पण ते झालं आणि श्रेयसी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली ..आपल्याला समजून घेणारी एखादी व्यक्ती पुन्हा आयुष्यात आली की नक्कीच व्यक्ती नव्याने प्रेमात पडू शकतो हे मात्र पटलं ..आणि समाजाच्या मर्यादा ओलांडून प्रेमाला जपायला शिकलो ..प्रेम असतच अस ..

कुछ होश नही रहता
कुछ ध्यान नही रहता
इनसान मोहब्बत मे
इनसान नही रहता

सकाळच्या सुमारास कशीतरी झोप लागली ..सकाळी 9 वाजताची फ्लाइट असल्याने मी लवकरच उठलो ..तयार होऊन बाहेर आलो ..आईने चहा - नाश्ता तयार करून ठेवला होता ..चहा - नाश्ता केला आणि जाण्यासाठी निघालो ..आमची मुलगी आता 1 वर्षाची झाली होती ..ती रांगु लागली ..बाजूलाच वडिलांच्या हातात असताना मी तिला अलगद हातात घेतल आणि म्हणालो , " स्नेहा मी तुझ्या आईला आणायला जातोय बर का !! आई लवकरच येईल तुझी काळजी घ्यायला मग आपण मस्त मज्जा करू ..तुला आवडेल न ममीसोबत राहायला " आमच्या पिल्लुने गोड स्माईल दिली आणि थोडा कॉन्फिडन्स मलाही मिळाला ..पिल्लुला आई - बाबांकडे सोपवल आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन बंगलोरसाठी निघालो ..आज तिकडे जाताना माझ्या डोक्यात बरेच प्रश्न होते ..भीती की विश्वास ह्या प्रश्नाने माझा पिच्छा काही सोडला नव्हता तरीही तिथे जान भागच होत ..काहीच वेळात बंगलोरला पोहोचलो ..हॉस्पिटल ऐरपोर्टवरवरून फार दूर नव्हतं शिवाय हॉस्पिटलमध्ये भेटायची वेळ 12 ची ठरवून दिली असल्याने थोडा फार वेळ बाकी होता म्हणून पायीच जाण पसंद केलं ..हळूहळू पाऊले टाकत समोर चालू लागलो आणि संपूर्ण शरीर भीतीने कापू लागलं ..आज आजूबाजूला पाहण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती ..मला चालायचं होत फक्त एकाच दिशेने जोपर्यन्त माझं आयुष्य मला मिळत नाही..सुमारे अर्धा तास मी चालत गेलों आणि शेवटी हॉस्पिटल गाठलं ..हॉस्पिटल आता कुठे उघडलं होत त्यामुळे फार गर्दी नव्हती ..डॉक्टरदेखील आले नव्हते ..बाजूलाच असणाऱ्या व्हॉटबॉयला श्रेयसी कोणत्या रूममध्ये आहे ते विचारलं आणि त्याने रजिस्टरमध्ये पाहून रूम नंबर 20 चा रस्ता दाखवला ..मी हळूहळू एक - एक रूम सर करू लागलो ..अस करता - करता रूम नंबर एकोणविस जवळ पोहोचलो आणि हृदयाची धडधड आणखीच वाढू लागली ..आता फक्त एकच रूम बाकी होती ...रूम नंबर विसच्या समोर उभा होतो ..दरवाजा थोडा फार उघडा होता ..एक दीर्घ श्वास घेत आतमध्ये शिरलो ...आणि पाहतो तर श्रेयसी पाठमोरी होऊन आरशात केस सावरत बसली होती ..तिला आरशात माझी प्रतिमा दिसावी आणि अगदी त्याच क्षणी ती माझ्याकडे वळाली ..आज कितीतरी दिवसांनी तो सुंदर चेहरा मला पाहायला मिळाला होता ..मी तिच्याशी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हतो ..तिला पाहण्यातच समाधान मानू लागलो ..तिच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ती म्हणाली ....

भेट ही अशी होती की
भेटणे झालेच नाही
बोललो एवढेच दोघे की
बोलणे झालेच नाही ...

स्वप्न प्याला हाती होता
ओठही व्याकुळ होते
ओंजळी केल्या रित्या
पण ते पिणे झालेच नाही
भेट ही अशी होती की ...

घ्यायचे होते डोळे
डोळ्यात भरून पूर्ण
पण डोळेही भरले असे की
त्यात पाहणे झालेच नाही
भेट ही अशी होती की ...

मोरपंखी भेट आपुली
वाटते व्हावी पुन्हा
पण भेटणे कुठे अन कधी
सांगणे झालेच नाही

भेट ही अशी होती की
भेटणे झालेच नाही
बोललो एवढेच दोघे की
बोलणे झालेच नाही ..
की बोलणे झालेच नाही ..

" कित्येक दिवस वाट पाहिली प्रेम तुमची आणि बघ तुझ्या आठवणीत या ओळी देखील रचल्या गेल्या ..आता तरी दे घट्ट मिठी आणि मिटव हा दुरावा " , श्रेयसी म्हणाली ...मी आताही तिच्याकडे पाहण्याच काम करीत होतो आणि तिने स्वताच येऊन मला घट्ट मिठी मारली ..आज दोन जीव पुन्हा एकत्र झाले होते ..मी तिच्या केसांवरून हात फिरवू लागलो आणि ती माझ्या मिठीत अश्रू ढाळू लागली ..कितीतरी वेळ आम्ही तसेच एकत्र होतो आणि नंतर तीच म्हणाली , " प्रेम चल घेऊन मला इथून ..आता नकोय मला हे आयुष्य ..बस तू आणि आपलं छोटंसं कुटुंब हवंय .." ती माझ्यापासून दूर हटली आणि आधीच भरून ठेवलेली बॅग ती सोबत घेऊन माझ्या समोर उभी झाली ..हातात हात टाकून आम्ही दोघेही तिथुन निघालो ..डॉक्टर तोपर्यंत हॉस्पिटलला आले होते ..काही फॉर्मलिटीज पूर्ण करीत आम्ही पुन्हा एकदा स्वप्नांच्या नगरिकडे निघालो ..मागे डॉक्टरांचे आशीर्वाद होते ज्यांनी माझ्या श्रेयसीला मला भेटवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती ..लवकरात लवकर जी फ्लाइट मिळाली ती पकडून आम्ही दोघेही मुंबईला परतलो ..

आज कितीतरी दिवसानी तिने मुंबईची वाट धरली होती ..मी ऐरपोर्टला गाडी पार्क केली होती त्यामुळे पार्किंगमधून गाडी काढली .दोघेही पुन्हा एक छोट्याशा प्रवासास निघालो ..आज आपल्या मुलीला भेटता येईल म्हणून ती देखील खुश होती आणि बोलून गेली , " माझं पिल्लू कस आहे ? आणि काय नाव ठेवलं आहे तीच ? एका दिवसाची होती तेव्हा पाहिलं होत तिला ..आता मस्त झाली असेल ना ? ..ए प्रेम पण ती ओळखेल ना रे मला ? "

मला आता काहीच सुचत नव्हतं त्यामुळे म्हणालो , " हो हो सांगतोय सर्व ..आपल्या मुलीच नाव स्नेहा ..अगदी गोड आहे तुझ्यासारखी आणि नक्कीच ओळखेल तुला.. शेवटी तुझीच मुलगी आहे ना ती ..मग का नाही ओळखणार .."

तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच ग्लो मला जाणवू लागला होता ..प्रत्यक्षात मी फोटोजद्वारे , आम्ही काढलेल्या व्हिडिओद्वारे तिच्या आईला स्नेहासमोर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण एवढं छोटंसं बाळ तिला ओळखेल की नाही याबद्दल मलाही शंका होतीच ..मी गाडी चालवताना तिच्याकडे पाहत होतो आणि ती आपल्या वेगळ्याच जगात वावरत होती ..सर्व काही ठीक व्हावं अशी देवाला प्रार्थना केली आणि रस्ता सर करू लागलो ..सुमारे दीड तासाचा रस्ता सर करून घरी पोहोचलो ..मी गाडी पार्क करायला जावं आणि ती गाडीचा गेट खोलून वेगाने स्नेहाकडे धावू लागली ..मीही गाडी पार्क करून तिच्या मागे घरात पोहोचलो ..श्रेयसी दारावर होती आणि स्नेहा खाली फरशीवर रांगत - रांगत खेळत बसली होती ..आई - बाबा तिच्या बाजूलाच होते आणि स्नेहाच श्रेयसीकडे लक्ष गेलं ..श्रेयसी एकटक तिच्याकडे पाहत होती आणि स्नेहाही तिच्याकडे पाहू लागली ..श्रेयसीला बघताच स्नेहाच्या तोंडून पहिला शब्द निघाला , " ममा " ...तिच्या तोंडून ममा ऐकताच श्रेयसिने धावतच जाऊन तिला हातात उचललं ..आणि आकाशाकडे अलगद उचलल्याने स्नेहादेखील जोराने हसू लागली होती ..श्रेयसी तिची पप्पी घेऊ लागली होती आणि आमच्या डोळ्यात अश्रू होते ..ती कितीतरी वेळ स्नेहासोबत खेळत होती आणि आम्ही मनभरून तो आई - मुलीच्या मिलनाचा क्षण पाहत होतो ..आज श्रेयसी खूप दिवसाने तिच्याशी भेटली असल्याने स्नेहाला सोडायला तयार नव्हती शेवटी मी स्नेहाला आईच्या हातात सोपवल आणि श्रेयसी फ्रेश होण्यासाठी जाऊ लागली ..आईने आधीच स्वयंपाक बनविला होता त्यामुळे तिने मनभरून जेवण केलं...नंतर मी तिला झोपायला सांगितलं ..आज खूप दिवसाने स्वतःच्या घरी झोपल्याने तिला पडताच निवांत झोप लागली होती ..आणि आम्ही प्रत्येक झन आज खुश होतो ..कारण आज जवळपास प्रत्येकाच स्वप्न पूर्ण झालं होतं ..

दुपारच्या वेळेला झोपणारी श्रेयसी सरळ रात्रीला उठली ..तेव्हा पुन्हा एकदा जेवण करण्याची वेळ झाली होती ..आई- बाबांनी जेवण करून घेतलं होतं तर मी श्रेयसीसोबत जेवण घेणार होतो..काहीच वेळात आम्ही दोघाणीही जेवण केलं...आईने स्नेहाला स्वतःकडेच झोपवलं आणि आम्ही आमच्या बेडरूमला पोहोचलो ..ती माझ्या कुशीत झोपून होती आणि मी म्हणालो , " काय मॅडम पूर्णपणे ठीक आहात ना ? आता नाही सोडून जाणार ना कधीच ? " , आणि ती म्हणाली , " खर सांगू या एका वर्षात तुम्हाला खूप मिस केलंय ..वाटायचं की आता कधीच परत येणार नाही पण तुझा आणि स्नेहाचा सतत विचार यायचा आणि मग तुमच्यासाठी पुन्हा प्रामाणिक प्रयत्न करू लागायचे ...आयुष्यभर तुझ्यासोबत राहण्यासाठी काही क्षणाचा दुरावा समजून दिवस काढत गेले आणि बघ अगदी ठणठणीत तुझ्यासमोर आले आहे आणि प्रेम माझं तर व्यसन सुटलं आता तुझं काय ? "

आणि मी हसून म्हणालो , " माझं काय ..जिच्यामुळे व्यसनाची सवय लागली होती तिनेच ती सोडायला लावली .."

" म्हणजे निशा ..फार छान काम केलं तिने आणि प्रेम एक पुन्हा विचारू ? " , श्रेयसी म्हणाली ...आणि मी उत्तरलो , " हो विचार की "

ती थोडी चिंतीत होत म्हणाली , " तू माझ्याबद्दल सर्व सांगितलं आईबाबांना ? " आणि मी शांत होत उत्तर देऊ लागलो , " तुझ्या भूतकाळाबद्दल सांगायला ही योग्य वेळ नाही त्यामुळे फक्त ते लपवून ठेवल आहे ..बाकी तू भेटल्यानंतरच सर्व सांगितलं ( वैश्या होतीस हे सोडून ) "

आता तिचा चेहरा थोडा खुलला होता ..आज कितीतरी दिवसांनी ती माझ्या कुशीत होती त्यामुळे तिला सोडण्याची काही इच्छा नव्हती ..मी तसाच तिला घट्ट पकडून झोपी गेलो ...

दुसऱ्या दिवशी मी लवकरच उठलो आणि स्नेहाशी खेळत बसलो होतो ..तेवढ्यात आई जवळ येत म्हणाली , " प्रेम बाळा आता श्रेयसीदेखील आली आहे ..तुझ्या मुलीसाठी आम्ही इथे थांबून होतो नाही तर या शहरात आमचं मन लागत नाही तेव्हा आम्हाला जाऊ दे ..तुम्हाला वाटलं तर तुम्ही येत जा गावाकडे पण आता इथे थांबन आम्हाला शक्य होणार नाही .." मी बाबांकडे पाहिलं तर त्यांच्याही चेहऱ्यावर तेच भाव होते त्यामुळे तिला म्हणालो , " ठीक आहे आई तुम्ही जा पण कमीत कमी दोन दिवस तरी थांबा मग मीच तुला सोडून देईल आणि याबाबतीत मी कुणाच काहीच ऐकणार नाही .." आईने देखील माझ्या निर्णयाला सहमती दर्शवली ...
श्रेयसी सकाळी उठली आणि काम करण्यास किचन रूममध्ये जाऊ लागली आणि आईने तिला काम करण्यास नकार दिला ..बाबाही बाहेर फिरायला गेले ..त्यामुळे स्नेहाला घेऊन ती माझ्याकडे आली ..आई मला काम करू देत नाहीये त्याची तक्रार करायला ती आली होती आणि मी लगेच म्हणालो , " दोन दिवसात ती जाणारच आहे नंतर करून घे तुला हवं तितक काम .." आईच्या जाण्याच्या निर्णयाने ती नाराज झाली होती ..हे पाहताच मी तिला पुन्हा एकदा म्हणालो , " श्रेयसी मला पण आता इथे करमणार नाही तेव्हा आपण पण जाउयात का नेहमीसाठी गावालाच ?..तिथे स्नेहाला आजी - आजोबांचं प्रेम मिळेल शिवाय इथल्या सर्व कटुआठवणी विसरता येईल ..आणि मी घरी नसताना आई- बाबा तुझी काळजी घेऊन शकतील .." आणि ती हसून म्हणाली , " अगदी माझ्या मनातलं बोलला आहेस ..आपण जाउया सर्वांसोबतच ..नेहमीसाठी... नकोय मला माझा भूतकाळ आणि इथल्या आठवणी ..आपण नव्याने आपल्या आठवणी बनवूया .."
आम्ही आईला त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय ऐकवला आणि ती देखील खुश झाली होती ..पण मुंबई कायमच सोडून जायचं म्हटलं तर इथल्या सर्वाना सांगणं गरजेचं होतं ..त्यामुळे त्याची तयारी करू लागलो ..इथे सर्वांची पॅकिंग सुरू झाली होती ..

दुसऱ्या दिवशी मी सकाळी - सकाळीच निशाच्या घरी पोहोचलो ..योगेश आणि निशा दोघेही घरी होते शिवाय त्यांचा मुलगाही सोबतच होता ..मी दिसलो आणि तिचा मूलगा धावतच माझ्याकडे आला ..मी त्याच्यासाठी आधीच चॉकलेट घेतले होते .त्याला आधी उचलून घेतलं आणि त्याला चॉकलेट भरविल ..योगेश नाश्ता करण्यासाठी खाली आला होता आणि निशाही बाजूला येऊन उभी राहिली ..माझी इच्छा नसतानाही त्यांनी मला नाश्ता करायला लावला आणि त्यांना मी नेहमीसाठीच मुंबई सोडत असल्याच सांगितलं ..निशा आणि योगेशने मला समजून घेतलं आणि जाण्याची परवानगी दिली ..पण आज शेवटचाच दिवस असल्याने तिने मला जेवण केल्याशिवाय जाऊ दिलंच नाही ..जेवण करून मी ऑफिसला पोहोचलो ..सरांकडे राजीनामा सोपविला ..निशाणे घडलेल्या परिस्थितीबद्दल सरांना आधीच सांगितलं असल्यामुळे त्यांनी कुठलीच हरकत घेतली नाही ..पण माझा लाडका मुलगा जातोय म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू नक्कीच होते ..त्यांना हग करत मी केबिन सोडलं ..सरानी सर्व कलीग्सना मी ऑफिस सोडण्याच सांगितलं आणि सर्वच मला शुभेच्छा देऊ लागले ..सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून मी ऑफिस कायमच सोडलं ..त्यानंतर आश्रमात जाऊन कुमुद काकुशी भेटलो आणि त्यांचाही निरोप घेतला ..त्याही फार भावूक झाल्या होत्या पण माझ्या आनंदासाठी त्यांनी आमचा निर्णय स्वीकारला होता ..शेवटी निशाच्या आईला भेटून मी घरी पोहोचलो ..घरी पोहोचलो तेव्हा श्रेयसी तयार होऊन बसली होती ..मी घरी जाताच तिने पुन्हा एकदा मला गाडी काढायला लावली आणि आम्ही सरळ डॉक्टरांकडे गेलो ..सर थोडे कामात होते ...त्यांना मी आल्याचं कळाल आणि त्यांनी स्वताच आम्हाला बोलवून घेतलं ..श्रेयसीला सुदृढ बघून त्यांना फारच आनंद झाला होता ..काही वेळ त्यांच्याशी बोललो आणि आशीर्वाद घेऊन आम्ही हॉस्पिटल सोडलं ..मी अशा वळणावर उभा होतो जिथे आजची रात्र संपणार होती आणि उद्याची पहाट आमच्या आयुष्यात नवीन रंग घेऊन येणार होती ..त्याच सुंदर स्वप्नाच्या ओढीने आम्ही निवांत झोपी गेलो ..

दुसऱ्या दिवशी दुपारी साडे बाराला फ्लाइट असल्याने सकाळपासूनच सर्वांची तयारी सुरू होती ..सर्वांच्या बॅगा भरून झाल्या होत्या आणि आम्ही निघालो ..बाहेर पडताना मी एकदा घराला स्पर्श केला ..6 वर्षे या घरात मी काढले होते त्यामुळे बऱ्याच आठवणी या घराशी जुळून होत्या ..त्या सर्व आठवणींना शेवटच एकदाच आठवलं आणि दाराला कुलूप लावून एका सुंदर प्रवासास निघालो ..काहीच क्षणात ऐरपोर्टवर पोहोचलो ..निशा आणि योगेश तिथे आधीच पोहोचले होते ..मला पाहून पुन्हा तिचा मुलगा जवळ आला आणि त्याने आमच्या पिल्लुला गोड पापी दिली ..मी देखील त्याला उचलून घेतलं ..आज पहिल्यांदाच निशा आणि श्रेयसी एकमेकाना भेटत होत्या ..शरीराने जरी पहिल्यांदा भेटत असल्या तरीही त्या एकमेकांबद्दल बरच काही जाणून होत्या ..योगेशचीही मी सर्वांशी ओळखी करून दिली ..श्रेयसिने निशाच्या मुलाला हातात धरलं आणि त्याची गोड पापी घेतली ..ती त्याला हातातून सोडणार तेव्हाच तिने आपल्या गळ्यात असणारी चैन त्याच्या गळ्यात टाकली ..निशा नकोच म्हणत होती तरी आम्ही आज तीच काहींच ऐकणार नव्हतो ..आमच्या बऱ्याच गप्पा चालल्या होत्या आणि फ्लाइट निघणार असल्याची घोषणा झाली ..निशाणे नकळत मला मिठी मारली आणि म्हणाली , " भारी आहे रे तुझी बायको माझ्यापेक्षाही खुप सुंदर !!.थोडं जळायला होतंय मला .." आणि मीसुद्धा गमतीत म्हणालो , " आता ईर्षा तर योगेश आणि श्रेयसी करत असेल ..तेव्हा घरी गेल्यावर तुझं आणि माझं काही खर नाही ..योगेश सोडणार नाही तुला .." ..ती हळूच हसू लागली ..बहुदा श्रेयसीला देखील आवाज गेल्याने ती देखील गालातल्या गालात हसू लागली .. दोघाणीही एकमेकांना शेवटची आठवण म्हणून घट्ट मिठी दिली ..मी समोर जाऊ लागलो आणि निशाणे माझ्या हातात एक लेटर दिलं ..त्यात काय आहे याबद्दल मी तिला विचारलं पण तिने उत्तर काही दिलं नाही ..काहीच क्षणात आम्ही एकमकेना बाय करून मुंबई सोडलं ते कायमचच ..काहीच क्षणात फ्लाइटने उडान घेतली आणि मागे एक एक इमारत सुटू लागली ..त्यासोबतच श्रेयसीसोबत जुळून असलेला सर्व भूतकाळदेखील मागेच ठेवून आम्ही चाललो होतो ..आताही हातात निशाणे दिलेलं लेटर होत ..ते उघडून पाहिलं आणि वाचल्यावर समजलं की तिने आमच्याच शहरात सरांच्या ओळखीच्या मित्रांकडे मला जॉब लावून दिली होती .. लेटरकडे पाहून हलकेच हसलो आणि निशाबद्दल आदर आणखीच वाढला ..अशाप्रकारे मुंबईही कायमची मागे सुटली ..काही सुरेल तर काही कटू अनुभव देऊन तिने माझ्या हातात एक अनमोल गोष्ट दिली ती म्हणजे श्रेयसी ..ज्यासाठी मी मुंबईला विसरन कदापि शक्य नव्हतं ...

गावाला येऊन एक महिना झाला आहे ..सर्व अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या आहेत आणि आम्ही आमच्या नवीन संसारात फार खुश आहोत ..कधी - कधी जुन्या आठवणीत गुंततो तेव्हा एक प्रश्न पडतो जीवन म्हणजे नक्की काय ? आणि मला काही ओळी आठवतात ..

होशवालो को खबर क्या
बेखुदी क्या चीज है
ईश्क किजिये फिर समझिये
जिंदगी क्या चीज है

होशवालो को खबर क्या
जिंदगी क्या चीज है ..


खरच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्की प्रेम करावं ..एखादी व्यक्ती मिळावी ही अपेक्षा न करता ते क्षण जगता येत आहेत यातच फार समाधान असत आणि ज्यांना हे कळत त्यांनाच जीवनाचा खरा अर्थही कळतो ..आणि शेवटच संपूर्ण जग म्हणत की व्यसन हे वाईट असत पण मी म्हणेन एकदा प्रेमाचं व्यसन लावून बघाच ..हे एकमेव अस व्यसन आहे ज्यात थोडा फार त्रास होईलही पण सरतेशेवटी आनंदही तेवढाच मिळतो ...आम्ही केलंय प्रेम ..समाजाच्या मर्यादा ओलांडून आणि सदैव करत राहू ..मग समाज सोबत असो वा नसो कारण प्रेम तेच खर असत जे वय , रंग , जात , समाज , व्यक्तीचा दर्जा काहीच मानत नाही ..स्वीकारत ते व्यक्तीला सर्व गुणदोषासहित ..मी केलंय त्यावरून सांगतो ..खरच प्रेम असच असत ...

जरुरी नही के
खतम हो 'तेरी कहाणी
और तालियो का शोर हो

जरुरी ये है की

ना हो मुझ जैसी
कोई और कहाणी
ना मुझ जैसा
कोई और हो

ना मुझ जैसा कोई और होसमाप्त

.........….......................

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED