जुळले प्रेमाचे नाते - भाग-४८ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४८

सुगंधित उठण लावुन मी बाहेर आले.. ते मानेवर विखुळलेले माझे केस... मी चेहऱ्याला क्रीम लावून घेतली...

आईने साडीवर जाईल असा तिचा ब्लाऊज काढून तो माझ्या मापाचा करून ठेवला होता.

"आई....!! लवकर ये मला साडी नेसवून दे." मी तर रूमधूनच ओरडले. तशी आई धावपळत आली.

"काय ग..., काय झालं..??"
"आई मला साडी नसव ना...!" मी हातात साडी घेऊन उभी होती.

"काय ग.. काय झालं प्राजु अशी का ओरडली..??" मागून आजी ही आल्या.

"काही नाही झालं आई.. हिला साडी नेसवायची होती म्हणून बोलावून घेतलं." आई आता येत माझ्या हातातली साडी घेत बोलली.

"काय ग प्राजु तुला साडी नाही नेसता येत..??" आजी हसत आत येत बोलल्या.

"काय आजी आम्ही कुठे रोज नेसतो साड्या. जीन्स घातली की झालं." मी एक डोळा मारत आजी ला बोलले. माझ्या या वाक्यावर दोघी ही हसल्या.

"दे ग साडी.. मी नेसवते प्राजुला आणि शिकवते ही.." आजी ने आईच्या हातातुन साडी घेतली आणि माझ्या जवळ आल्या.

"हे बघ आता नीट लक्ष दे. आधी साडीचं टोक चांगलं लावून घ्यायचं. आणि नीट साडी कमरे भोवती फिरवुन घ्यायची. नंतर पदर आपल्याला हवा तेवढा काढुन तो ब्लाऊजला लावून घ्यायचा. त्यानंतर पदर घट्ट खेचुन असा समोरच्या बाजूला खेचुन सेफ्टी पिनने लावून घ्यायचा. मग राहिलेल्या साडीच्या निऱ्या काढून घ्यायच्या. आणि सगळं नीट करून घ्यायच.. हे बघ अस. आणि झाली तुझी साडी नेसून."

"वाह आजी... किती छान आणि साध्या पध्दतीने शिकवली तुम्ही साडी नेसायला." मी आजींना मिठी मारली.

"खूप गोड दिसतो आहे हा रंग." अस बोलुन आजीने माझी दृष्ट काढली.

त्यानंतर मी आरशा समोर बसले. स्वतःचे ओले केस टॉवेल ने सुकवले. डोळ्यांवर आयलाईनर लावलं. डार्क रेड आणि मरून अशी मिक्स लिपस्टिक लावली.


गळ्यात मोत्यांची ठुशी आणि त्यासोबतच झुमके. माझ्या रुपाला अजुमच खुलवत होते. तर नाकातली नथ माझ्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती. आणि शेवटी "चंद्रकोर."
निशांतच्या स्वभावासारखीच ती "चंद्रकोर" ही शांतपणे स्वतःच वेगळं अस्तित्व कपाळावर दाखवत होती. हातात आईच्या मोत्यांच्या बांगड्या घातल्या..

मानेवर आणि संपूर्ण अंगावर आवडता परफ्यूम मारून मी तय्यार झाले. सोबत आजी आणि आई ही तय्यार झाल्या. आम्ही एकत्र दरवाजा उघडला आणि तिघी ही एकत्र बाहेर आलो....


आधी आईने एन्ट्री मारली... मग आजी आणि शेवटी मी..
आईच्या गुलाबी रंगाच्या साडीने तर बाबा चांगलेच घायाळ झाले होते.. तर पेपर वाचत बसलेले आजोबांची नजर आजींच्या लाल रंगाचा साडीवरून काही हटत नव्हती. मी देखील त्या दोघींच्या मागून गेले पण निशांत काही मला दिसला नाही...

"बाबा हा निशांत कुठे गेला ओ..??" मी स्वतःचं तोंड वाकड करत विचारले.
"अरेच्चा..!! इथेच तर बसला होता.. काय माहीत कुठे गेला. अरे हो तो मिठाई आणायला गेला आहे." हे बोलताना ही त्यांची नजर आईकडेच होती. मी जाऊन आजोबांच्या पाया पडले.


"आजोबा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..." माझ्या गोड चेहऱ्याकडे बघून आजोबांनी मला जवळ घेतलं..

"तुला ही दिवाळीच्या खुप शुभेच्छा प्राजु बाळा. हे घे तुझ्यासाठी माझ्याकडून छोटंसं गिफ्ट." अस बोलून त्यांनी एक गिफ्टचा बॉक्स माझ्या हातात दिला..

"काय ओ एकट्यानेच दिलात का..." बाजूला बसलेल्या आजींनी आपला आवाज मोठा केला तसा आजोबांनी जीभ बाहेर काढली..


"म्हणजे आम्हा दोघांकडून हो तुला छोटंसं गिफ्ट.." स्वतःच वाक्य परत नीट करून आजोबा बोलले. या वाक्यावर आम्ही सगळेच खळखळून हसलो.. मी गिफ्ट घेतलं आणि तसच टेबलावर ठेवलं. पण माझी नजर मात्र निशांतला शोधत होती.. आणि तो दरवाजातून आत आला.

"बाबा ही वाली मिठाई मिळाली.. कारण एकच मिठाईच दुकान उघड होत. बाबांच्या हातात मिठाईचा बॉक्स देत निशांत बोलला. आणि त्याची सहज माझ्यावर नजर गेली...

त्याचे ते भलेमोठे झालेले डोळे बघुन तर मी हसु की लाजू हेच कळत नव्हतं.. तो क्षण सगळे काही ब्लर व्हावं.. कोणी नसावं आजूबाजूला.. फक्त तो आणि मी. असच वाटत होतं.


"अरे वाह...!! तुम्ही दोघांनी तर एकच रंग घातले.." बाबांच्या या वाक्यावर निशांत झोपेतून उठावा तसा उठला..

"बाबा अस काही नाही... म्हणजे ते.. मी काही नाही केलं.. तीच.. म्हणजे माझं... मी..."

"अरे हो हो निशांत काय झालं..??? तुला मी काहीच नाही विचारलं. मी फक्त बोललो की तुम्हा दोघांचा रंग मस्त जुळला.. ते बोलतात ना.. प्रेमाचे नाते जुळावे अगदी तसचं.." बाबा बोलत होते आणि आम्ही सगळे छान ऐकत होतो.


"चला आता नाश्ता करूया..." आई डायनिंग टेबलावर डिश ठेवत बोलली.

"पण त्या आधी फोटो..." बाबा बोलले मी सर्वांत आधी पोज देऊन उभी.. सर्वांचे फोटोसेशन चालू झाल... मग ग्रुप फोटो झाला... छान आले आहेत फोटो.

"आई मला नाही प्राजला नको नाश्ता.. आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. कॉलेज च्या इथे दिवाळी पहाट आहे. सगळे फ्रेंड्स येणार आहेत. आम्ही ही जाऊन लगेच येतो. चालेल ना आई..??" त्याच्या अशा बोलण्याने माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते.

"ही दिवाळी पहाट कॉजेलमध्ये कधीपासून व्हायला लागली." मी बोलत असताना आईने कधी होकार दिला हे ही मला कळलं नाही. काही न बोलता आम्ही जायला निघालो. बाबांची गाडी घेऊन जायचं ठरल होत.

"अरे मी माझा मोबाईल विसरले.." मी मागे वळून जाणार तोच त्याने माझा हात धरला...

"आहे माझ्याकडे चल जाऊया.." एवढंच बोलत त्याने माझा हात खेचतच लिफ्ट मध्ये नेलं.

"बाय द वे आपल्याकॉलेज जवळ कधीपासून दिवाळी पहाट सुरू केली..."

"हनी-बी... चल ना ग गप्पपणे.. आपल्याला जरा बाहेर जायचं आहे. आणि आता हे सांगितलं असत तर घरचे ओरडले असते म्हणून खोटं बोललो.."

"बर ठीक आहे.. पण जायचं कुठे आहे निशांत...??" माझ्या प्रश्नावर मला फक्त एक मोठी स्माईल मिळाली..

खाली येऊन आम्ही बाबांच्या गाडीने निघालो.. दूरवर. सकाळची थंड हवा. सोनेरी किरणांचा अधिपती सुर्यराज चहुकडे स्वतःच साम्राज्य पसरवत होता... पानांवर पडलेले दवबिंदूवर त्याचा हलका प्रकाश पडे आणि ते मोतीच वाटत होते.. हे सगळं त्या गाडीतून भरभर मागे जरी जात असेल तरी डोळ्यांना आणि मनाला आनंद देणार होत..


गाडी फक्त दूर वर जाऊन एका ठिकाणी थांबली. मी खाली उतरून आले तर समोर एक फलक होता.. "बचपन."
हो आम्ही त्याच आश्रमात आलेलो.. माझ्या बर्थडेच्या वेळी आलेलो त्याच आश्रमात. तिकडच्या आसावरी मॅडम समोर होत्याच सोबत माझे सगळे छोटे मित्र-मैत्रिणी माझी वाट बघत उभे होते.. मी जाताच त्या सर्वांना भरभरून भेटले...
काहींचे डोळे पाणावले होते... त्या मॅडमचे ही डोळे भरले होते..


"काय झालं सगळे असे रडत का आहात.. मी काय छडी घेऊन मारायला नाही आले आहे..." माझ्या हा विनोदावर मात्र सगळेच खुश होऊन हसत होते..
"छान वाटतत् नाही आपले जवळच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू आलेलं.."


to be continued