जुळले प्रेमाचे नाते - भाग-५१ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५१

"सॉरी ना... माफ कर. परत असा गैरसमज करून नाही घेणार. पक्कावाला प्रॉमिस.." मी स्वतःचे कान धरून माफी मागितली तेव्हा कुठे त्याने स्वतःचा राग सोडला..

मग थोडं बोलून आम्ही बाहेर आलो... चहा-नाश्ता करून निशांतला एअरपोर्ट वर जायचं होतं तिला घ्यायला.. खरतर सोबत मी ही जाणार होते.. पण निशांतच्या घरी जायचं होतं पण आजोबांचं नको बोलले आणि रियाला इकडे घेऊन यायच त्यांनीच ठरवल. त्यामुळे निशांत तिला घ्यायला गेलेला..


मी आणि बाबा ज्वेलरीच्या दुकानात गेलो.. कारण आजी-आजोबांनी माझ्यासाठी सोन्याच ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिल होत मग आम्ही ही निशांतला सेम ब्रेसलेट घेणार होतो.. मी आणि बाबांनी मिळून छान अस सिम्पल पण त्याला आवडेल अस ब्रेसलेट घेतलं आणि आम्ही घरी आलो... ते दोघे अजून ही आले नव्हते.. रात्रीच्या जेवणाची घाई नव्हतीच कारण आम्ही आज सगळे बाहेर जेवायला जाणार होतो..


म्हणून सगळे तय्यार बसलो होतोच की दारावरची बेल वाजली आणि निशांत आणि रिया आत आले...

तिला बघून माझ्या तोंडातुन फक्त "वाह....!!" हाच काय तो शब्द निघाला.. का निघु नये. इतकी सुंदर मुलगी.. म्हणजे एक मुलगी असून मला ती बघता क्षणी आवडली मग तर इतर मुलांबद्दल काय बोलावं...

ती आत येत आजी आजोबांना भेटली... माझ्या आई-बाबांना ही भेटली...

"हाय.., मी रिया. निशांतच्या मामाची मुलगी.." तीने हात पुढे करत स्वतःची ओळख सांगितली.. मी अजून ही तिलाच बघत होते...


"लांब सडक काळेभोर केस.. पूर्ण स्ट्रेट होते.. केलेले की आधीपासून हे तिलाच तीच माहीत.. क्रॉप टॉप आणि ब्लु टाईट जिन्स मध्ये तिची फिगर अजूनच खुलून दिसत होती..
कोरलेल्या भुवया तिच्या सौंदर्यात भर पाडत होत्या... आणि तिचे ते तपकिरी डोळे.. वाह..!!" मी भारल्यासारखी तिच्याकडे बघत होते की निशांतने मला आवाज दिला..

"अग प्राजल बोल तिच्याशी..." त्याने अस म्हणताच मी अडखळत कस तरी बोलले... बोलताना ही माझं लक्ष तिच्याचकडे होत...

थोडं फ्रेश होऊन आम्ही सगळे बाहेर जेवायला जायला निघालो... गाडीमध्ये सगळे नाही घेऊ शकणार म्हणुन आज निशांत आणि रिया एकत्र मागून ऑटोने येणार होते आणि मी सर्वांनसोबत निघाले.. पण माझं मन काही लागत नव्हतं..


शेवटी आम्ही त्या हॉटेलमध्ये पोहोचलो.. तिथेही रिया निशांतला चिटकून बसली होती.. आता तर माझं डोकचं फिरायला लागलं होतं.. "का बसावं तिने एवढं चिटकून...!" अस कोणी त्याच्या जवळ गेलेलं मला काही बघवत नव्हतं. "आणि हा तरी किती शहाणा.. तो ही तिला काही बोलत नव्हता." स्वतःवरच रागवत मी प्लेट मधलं जेवण जेवत होते.. की संपवत होते..


नाही नाही म्हणत असताना ही रिया ने निशांतला आईसक्रीम भरवली... माझ्या तर तळपायाची आग मस्तकात गेली.. पण मी काही न बोलता उठुन तडक वॉशरूम मध्ये गेले आणि रडु लागले.. परत आले तेव्हा सगळं काही नॉर्मल असल्यासारखं वागण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न चालू होता. पण हे निशांतने मात्र चोख ओळखल होत..


शेवटी आम्ही घरी परतलो.. थकल्यामुळे आज लवकर झोपायचं ठरलं... आज निशांत हॉलमध्ये झोपणार होता.. आजी आणि आई एकत्र.. तर बाबा आणि आजोबा एकत्र असे झोपणार होते.. आणि मेन म्हणजे मी आणि रिया एकाच रूममधे एकत्र झोपणार होतो.. तीच वागणं आधीच मला आवडल नव्हतं आणि आता तर ती माझ्या समोर होती..

"काय ग प्रांजल.. निशांतची कोणी गर्लफ्रेंड आहे का..??" तिने हाताने कसली तरी क्रिम चेहऱ्याला लावत विचारल...

"तुला नाही का सांगितलं तुझ्या भावाने... तूच का नाही विचारात त्याला..??" मी एक कटाक्ष टाकत बोलले..

"तस नाही ग.. म्हणजे तु त्याची बेस्ट फ्रेंड आहेस ना.. आणि मी काही त्याची बहीण नाहीये हा... वी आर फ्रेंड्स ओन्ली.."
स्वतःच तोंड वाकड करत तिने सांगितलं खर.. पण आता नवीन काही तरी प्रॉब्लेम नको हाच भाव माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता...

मी जास्त नाही ही न बोलता झोपायचा प्रयत्न करत होते कारण मला अजून काही जास्त आणि वेगळं ऐकायचं नव्हतं.. निशांत भले तिला बहीण मानत होता.. पण तिच्यातर मनात काही वेगळच होत...


हा पाडवा नक्कीच वेगळा जाणार होता.. नक्की काय वाढून ठेवलंय त्या परमेश्वरालाच माहीत.. देवापूढे हात जोडून मी माझे डोळे बंद केले आणि निद्रेच्या स्वाधीन झाले....



to be continued.....


(कथेचा हा पार्ट कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज..