जुळले प्रेमाचे नाते - भाग-५२ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५२

अलार्म वाजत होता आणि मी तो बंद करून करून झोपत होते.. शेवटी तो मोबाईल ही कंटाळला आणि बंद झाला... मग मी ही जास्त वेळ न लोळता उठुन बसले.. आणि मला आठवल की काल रात्री तर रिया बाजुला होती.. पण आता ती नव्हतीच तिथे. पण बाहेरून हसण्याचे आवाज मात्र येत होते..


मग मी उठुन फ्रेश झाले आणि बाहेर आले. समोर सोफ्यावर निशांत, आजोबा, रिया आणि बाबा बसले होते आणि त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. मी माझ्या रूमधुन सरळ तिथे गेले...

"काय कसल्या एवढया गप्पा चालू आहेत." मी सोफ्याजवळ जात विचारल.

"काही नाही ग आमच्या अशाच गप्पा चालू होत्या.." रिया निशांतला टाळी देत बोलली.

"अच्छा." मी एवढंच बोलून किचनमध्ये गेले. तर समोरून आईने रागात माझ्याकडे चहाचा कप दिला.

"आता हिला काय झालं.???" मी जरा गोंधळतच डायनिंगवर यरुन बसले होते की मागून आईने पोह्यांची डिश माझ्या समोर ठेवली.. ठेवली काय आदळलीच..

"अग काय ग... काय झालं आहे..???" मी ही जरा वैतागले. कारण उठल्यापासून माझेच घरचे माझ्याशी वेगळे वागत होते.. जस काय मीच बाहेरून आलीये.. आणि तिया त्यांची मुलगी आहे.

समोरचा नाश्ता संपवतच मी किचनमध्ये गेले तर रिया आईला मदत करत होती...

"आई ग मी काय मदत करू..??" माझ्या या प्रश्नावर आईने माझ्याकडे एकदा पाहिलं आणि हातातलं काम करत बसली...

मी हातातला कप आणि पोह्यांची डिश ठेवली आणि बाहेर आली. आज पाडवा म्हणुन जरा घरच वातावरण वेगळं होत..

"काय करतो आहेस निशांत..??" मी निशांतच्या रूममधे गेले तर तो इस्त्री करत होता..

"अरे वाह...!! मस्त आहे कुर्ता. कधी घेतलास..??" मी तो हातात घेत पाहू लागले.

"अग रियाने घेतला माझ्यासाठी.. म्हटली की आज पाडवा आहे ना सो घाल.. म्हणून इस्त्री करत होतो." एवढं बोलून त्याने माझ्या हातातला कुर्ता घेतला आणि इस्त्री करू लागला.

"निशांत... एक विचारू का..??" माझा प्रश्नार्थक
चेहरा न बघताच निशांतने मानेनेच होकार दिला..

"रिया तुला भाऊ नाही मानत.. म्हणजे काल विचारात होती तुझ्या गर्लफ्रेंड बद्दल.." मी बेडवर बसत बोलले तसा निशांतने माझ्याकडे बघितल.

"अग हो.. म्हणजे आम्ही लहानपणापासून कधीच एकमेकांना भाऊ-बहीण मानलं नाही.. आम्ही नेहमी एकमेकांचे फ्रेंड्स बनुन रहायचो. त्यामुळे आमच्याकडे कधीच रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी झालीच नाही.. पण यावर्षी होईल वाटत." हे वाक्य बोलताना त्याने मला एक डोळा मारला. माझ्यातर पोटातच गोळा आलेला..

"पण निशांत तिच्या मनात काही नाहीये तस.. म्हणजे बहीण-भावाच नात. तु तिला आपल्या बद्दल सांगणार आहेस का.??"

"अग आधी नव्हतं. पण आता तर करू शकतो ना.. आणि जर तिला नसेल करायचं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये.. आणि हो मी आपल्या बद्दल ही सांगणार आहे. पण तसा वेळच नाही मिळत आहे.."

"मला काल तिच्या बोलण्यातून वाटत नाहीये की ती तुला कधी भाऊ मानेल.. निशांत माझं मन खूप घाबरतंय रे.. अस वाटतंय काही तरी वाईट होणार आहे." मी निशांतच्या जवळ जाऊन बसले.

"काही नाही होणार ग मी आहे ना.. ये जवळ बघू.." एवढं बोलून त्याने मला मिठीत सामावून घेतल.

पण हे कोणी तरी दारातून बघत होत आणि रागात निघून गेल.

"चला मॅडम मला काम करू द्या. परत ओरडा पडेल." एवढं बोलून त्याने मिठी सोडवली आणि कुर्ता इस्त्री करायला घेतला.

"अरे तु कशाला मी करून देते.." एवढं बोलून मी निशांतच्या हातातुन कुर्ता घेतला आणि इस्त्री करू लागली. हे करताना त्याला कोणाचा तरी कॉल आला आणि तो बाहेर निघुन गेला. माझं ही काम झालं म्हणुन मी ही गेले..

आजी-आजोबा खाली राउंड मारायला गेलेले तर बाबा बाहेर.. मी किचनमध्ये जाऊन आईला मदत हवी का विचारल...

"हा.. जरा ही कोशिंबीर बनव.." हे ही ती रागात बोलत होती.

मी काही ही न बोलता लागणार सामुग्री घेऊन डायनिंग टेबलवर येउन काम करत बसले.. तोच निशांतच्या ओरडण्याचा आवाज आला.. म्हणुन मी धावत रूममधे गेले.. समोर मी आताच इस्त्री करून ठेवलेला कुर्ता कोणी तरी मुद्दाम जाळला होता...

To be Continued