Julale premache naate - 58 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५८

निशांतच्या अचानक बोलल्याने आम्हचे हसरे चेहरे अगदी गंभीर झाले. बाबांनी ते पत्र आणायला लावले. मी तर नाखुशीने ते पत्र घेऊन आले..

बाबांनी ते पत्र हातात घेतलं. आणि वाचायला सुरुवात केली...

प्रिय जानु...,

"कशी आहेस. छानच असशील म्हणा.. मी बघतो ना तुला रोज.. कसा.., कधी..! नको हा विचारुस..!!. आणि आता तर तु एकवीस वर्षाची झालीस.. तुझा वाढदिवस झाला. बघ ना मला काही यायला जमल नाही म्हणुन तुझ्यासाठी गिफ्ट्स पाठवले. आवडले ना ग तुला..???"

आणि हो तु मला विसरली असशील पण मी नाही तुला विसरलो. ते क्षण कधीच नाही विसरू शकत. येतोय मी लवकरच तुला भेटायला.. तुला माझी बनवायला. तुला कायमच स्वतःचं बनवायला... मी येतोय. भेटु लवकरच."

तुझा प्रिय....,
!??!.

बाबांनी कस तरी ते पत्र वाचलं. आपल्या मुलीला अस काही पत्र यावं आणि ते तिच्याच बापाने वाचावं.. अस दुसर दुर्दैव नाही. बाबांनी पत्र वाचून संपवलं आणि आम्ही सगळे अजूनच बुचकळ्यात पडलो. कोण बर ती व्यक्ती असेल. आणि मला ओळखणारी.. त्याचे ते बोलण ऐकून तर माझा सगळा मुडच ऑफ झालेला. रडूच कोसळले..
मी आई ला बिलगुन रडूच लागले.

"आई ग.., बघ ना कोण असेल हा मुलगा.. म्हणजे माझ्याच बाबतीत का व्हावं अस. मी तर कोणाला कधी दुखावलं ही नाही. मग माझ्याच बाबतीत का व्हावं."
मी रडून रडून आई ला विचारत होते.


"प्राजु बाळा तु का त्रास करून घेतेस. मला तर वाटत तुझ्या कोणत्या तरी दुरच्या फ्रेंडपैकी केलेलं आहे. तु रडणं थांबव बघु.." आई माझे डोळे पुसत बोलली.


"बरोबर बोलतेय आहे आई.. मला ही तेच वाटत की कोणी तरी मुद्दाम तुला त्रास देत आहे. मस्कारी करत आहे. बघ बाळा जास्त काही झालंच तर आपण पोलिसांना सांगूया. तु टेंशन नको घेऊस. आणि काही झालाच तर निशांत आहेच. सोबत मी आणि आई देखील आहोत ना..." बाबा मला समजुदारीच्या भावात बोलले. तशी मी शांत झाली..


काही वेळ तसाच गेला शांततेत. पण निशांतच्या बोलल्याने ती शांतता भंग पावली.
"आई-बाबा चला मी निघतो. काही वाटलंच तर मी आहेच मला कॉल करा." एवढं बोलून तो निघाला. पायात चप्पल घालत निघु लागला. हे देखील मला कळलं नाही. मी त्या विचारात असताना निशांतने मला जोरात ओरडून बाय केल तेव्हा मी धावत जाऊन त्याच्या जवळ गेले. खरतर मला त्याला मिठी मारायची होती.., पण आई-बाबा समोर असल्याने ते करणं मी टाळलं.

"आई मी याला खालीपर्यन्त सोडून आले हा." एवढं बोलून मी पायात चपला सरकवल्या आणि आम्ही लिफ्टमध्ये घुसलो. आत जाताच मी निशांतला घट्ट मिठी मारली...

"अग वेडाबाई...!! काय झालं..??" मी त्याला मिठी मारणार याची कल्पना कदाचित निशांतला होती. म्हणुन त्याने मायेने माझ्या डोक्यावर हात फिरावला.


"निशु मला खुप भीती वाटते आहे रे...! कोण असेल ती व्यक्ती.. मला नाही तुम्हाला सोडून जायचं.." आणि मी त्याला अजून घट्ट मिठी मारली.

"तु आधी शांत हो बघू. मला जरा विचार करू दे. मी ते पत्र घेतलं आहे सोबत. घरी जाऊन मी ते पुन्हा वाचतो आणि बघतो की काही माहिती मिळते का...??!" मला शांत करत त्याने मला सांगितलं. तेव्हा कुठे मला बर वाटल.


मग थोडं बोलुन मी त्याने माझा निरोप घेतला आणि मी वर आले...
वर येताना ही माझ्या डोक्यात तोच विचार की कोण
असेल...

पण घरात येताना सगळं काही खालीच ठेवून मी आता आले आणि स्वतःच्या रूनमध्ये निघून गेले..
मोबाईल वर टीपी करत बसले.. थोड्या वेळाने निशांतचा ही पोहोचल्याचा मॅसेज आला.

या सर्व गोष्टींमध्ये मी राज ला पूर्णतः विसरून गेले होते. म्हणून त्याला कॉल केला तर त्याचा कॉल आउट ऑफ सर्व्हिस येत होता.. शेवटी जास्त विचार न करता मी झोपायचा प्लॅन केला आणि निद्रेच्या हवाली झाले..

■■◆●

सकाळी सकाळी आलेल्या कॉलने माझी झोप चांगलीच उडाली होती.. आधीच झोप होत नाही आणि त्यात हे सकाळचे कॉल...., त्रास नुसता.!!
दोन वेळा कॉल बंद करून मी झोपले होते की तिसऱ्यांदा कॉल वाजला आणि नामर्जीनेच मला तो घ्यावा लागला...

"हॅलो...!!"

"हॅलो जानु...!"
समोरच्या व्यक्तीचा आवाज नक्कीच ओळखीचा नव्हता... म्हणून रोन्ग नंबर सांगून मी ठेवणारच होते की..., समोरून कोणीतरी बोलल....

"उठ आता किती वेळ झोपणार आहेस..??? आणि तुला माहीत आहे तु झोपेतून उठल्यावर किती गोड दिसतेस..??"

समोरचा आवाज ऐकून मी दचकुन उठले.. झोप आता कुठच्या कुठे पळुन गेली होती..


"कोण..?? कोण बोलतय..??" मी घाबरतच विचाराल..
समोरून फक्त हसल्याचा आवाज आला आणि मी जोरात ओरडले.. तसे आई-बाबा धावतच माझ्या रूममधे आले.

"काय... काय झालं प्राजु...?? तु ओरडली का.???"
आईने बाजूला बसत विचारले.. पण मी काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते.. हे बघून आई ने माझ्या हातातला मोबाईल कानाला लावला आणि ती बोलु लागली.. पण तिकडून कॉल कधीच बंद झाला होता..

मी रडत होते. आईने मला विचारल. पण मला काही बोलत नाही येत हे बघून बाबांनी खुणेनेच शांत राहायला सांगितलं.

काही वेळ तसाच गेला आणि मी घडलेलं आई-बाबांना सांगितलं. आता मात्र सगळेच घाबरले होते.. कोणी तरी मुद्दाम करत होत.. पण हा व्यक्ती मित्र नक्कीच वाटत नव्हता.

काही वेळाने मी कसे तरी फ्रेश झाले आणि निशांतला कॉल करून सकाळी घडलेला प्रसंग त्याच्या कानावर घातला. त्याला ही हे अपेक्षीत असावं.. त्याने लगेच बाहेरच भेटायचा प्लॅन केला आणि मला तय्यार रहायला सांगितले. मी, तो जवळ येताच खाली पोहोचले आणि आम्ही एका सिसिडी मध्ये जाऊन बसलो..


"हबी-बी.. बघ मी तुला घाबरवत नाहीये. पण मला जे वाटत आहे ते बोलतो आहे. मला अस वाटतंय की हे कोणीतरी जाणून बुजून करत आहे. म्हणजे हा एकतर तुझा जुना मित्र असावा किव्हा तुझ्यावर प्रेम करणारा. मी त्या पत्राचा मजकूर ही वाचला त्यावर होत की "ते क्षण" म्हणजे नक्कीच तुम्ही एकमेकांना ओळखत होतात. म्हणून त्याने त्या क्षणांबद्दल सांगितलं आहे. तुला अस काही आठवतंय का..??""कोणी जुना फ्रेंड.?? किव्हा तुझ्याकर प्रेम करणारा.?? आणि एक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती नक्कीच डावकुरी असणार.. त्याच्या लिखाणा वरून तरी मला असा संवशय आहे.." तो ते सगळं विचार करून सांगत होता. मला ही त्याचे म्हणणे पटत होते..

"डाव्या हाताने लिहिणारा तर राज ही आहे...." माझ्या अचनाकपने नाव घेतल्याने निशांतने चमकुन माझ्याकडे पाहिल...

"तु शोअर आहेस का.???"

"तस आता नक्की तर आठवत नाहीये. पण मला हलकं आठवतंय की मी त्याला डाव्या हाताने लिहिताना पाहिलं होत.."

"पण राज का करेल अस..??." माझ्या या प्रश्नावर निशांतकडे उत्तर मात्र काहीच नव्हतं. आणि तो एकाएकीं शांत झाला.

पण खरच तो राज असेन का..?? पण जर तो असेन तर तो का बरं अस वागत असेल.. असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते.. शेवटी त्या गरम कॉफीने ते प्रश्न आणि मला शांत केलं..

पण प्रश्न मात्र अजूनही सुटला नव्हता.. कोण करत असेल..?? तो खरच राज असेल का.??? असे प्रश्न मला कॉफी पिताना ही डोक्यातुन जात नव्हते... "


to be continued...


(कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED