जुळले प्रेमाचे नाते - भाग-६१ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६१

दुपारी निशांतसोबत घडलेला प्रसंग आठवुन मी अजून ही विचार करत होते... नक्की कोण करत असेल. "जर तो राज असेल तर..? पण राज का करत असेल.. त्याला हे करून काय मिळणार आहे.. निशांतला झालेली दुखापत मोठी नव्हती.. पण ती आज.. काय माहीत उद्या काय वाढून ठेवलंय.. "

स्वतःशी विचार करत मी बेडवर पडले होते.. संध्याकाळी निशांतला भेटायला जाईल अस ठरवत होते, खर पण उगाच ओरडेल म्हणुन तो विचार डोक्यातून काढुन टाकला.

स्वतःच्या विचारात असताना बाजूचा फोन वाजला आणि माझ्या हृदयाचे ठोके ही... घाबरतच स्क्रीनवर पाहिलं.. निशांतच नाव स्क्रीनवर बघून कुठे बर वाटल..

"हॅलो..., काय मॅडम.. किती वेळ लागतो एक कॉल घ्यायला. मला वाटलं झोपली असशील..." निशांतची चांगलीच बडबड चालू होती..

"नाही तस नाही.. म्हणजे झोपले नव्हते." मी जरा घाबरतच उत्तर देऊ केले.

"अग काय ग काय झालं..?? एवढी घाबरली का आहेस.??"

"कुठे काय.. काही ही असत तुझं निशु.."

"हनी-बी.. तुला माहीत आहे का..? तु जेव्हा कधी मला "निशु" बोलतेस ना मला आईची आठवण येते.. सो थँक्स. तु नेहेमीच माझ्या सोबत असल्याने.. आणि आई सारखी काळजी घेतेस यासाठी.." निशांत भावुक झाला होता.

"बस बस अब रुलायेगा क्या पगले..??!!" माझ्या या डायलॉग मुळे निशांत चांगलाच हसला.

"अरे तु डॉक्टरकडे जाऊन आलास का??" माझ्या या वाक्यावर त्याने खूप मोठा होकार देऊ केला. जस काय त्याला आधीच माहित होत मी विचारणार आहे.


"बर आय लव्ह यु.. आता तू बोल .." निशांत आज बराच लाडात येत होता..
शेवटी हो ना करून "आय लव्ह यु टू" बोलायला लावलच त्याने.

त्यांनतर इकडच्या तिकडच्या गोष्टी करून कॉलेजमध्ये भेटायचं ठरवुन आम्ही कॉल ठेवला...

मी बेडवरून उतरून फ्रेश होण्यासाठी निघाले. तसा फोन परत वाजला... स्क्रीनवर निशांतच नाव बघून मी घेतला..

"आता कट राहील..??"

"मिस यु माय हनी-बी.." निशांत अक्षरशः ओरडला.

"मिस यु टू.. आता ठेव कॉल आणि आराम कर." हसत मी कॉल ठेवला आणि बाथरूमकडे जायला निघाले असता,
परत कॉल वाजला. पण तो न बघताच कॉल मी घेतला कारण मला माहित होतं की निशांतच असेल. नक्कीच अजून काही राहील असेल...

"ए खडून ठेव ना कॉल.. आता भेटुन बोलते हा... आणि एक कॉल वरच किस पाठवली...."मुsssहा....."

"थँक्स डार्लिंग पण मी निशांत नाहीये. तरीही ही किस माझ्यासाठी नसेल तरीही चालेल...." तो जड आणि वेगळा आवाज पुरेसा होता माझ्या चेहऱ्यावरील आनंद पुसायला...

"कोण बोलतय... आणि काय हवंय तुला...?? कोण आहेस तू..? का असा मला त्रास देतो आहेस. हिम्मत असेल ना तर समोर ये...." मी रागात बोलून टाकलं.

"हो ग स्वीटी मी घेणारच आहे तुला भेटायला... लवकरच तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.." एवढ बोलून कॉल कट झाला.

मी नाही म्हटले तरीही घाबरले होते.. लगेच निशांतला कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगितलं.

"हनी-बी एक काम कर.. तो नंबर मला पाठव मी बघतो माझा एक फ्रेंड पोलीसमध्ये आहे. बघु काही मदत मिळते का.. आणि तु टेंशन घेऊ नकोस. हा जो कोणी आहे ना त्याचा आपण लवकरच शोध घेऊ." एवढं बोलून निशांतने कॉल ठेवला.

मग मी ही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही असं ठरवून फ्रेश होण्यासाठी गेले..
◆◆



"सर उस रात को ये वॉचमेन था। अब बोलेगा क्या.. साब को सब सच बात बता.., उस रात को किसे देखा.?? "

"साब मुझे कुछ नही पता... मैने कुछ नही किया। उस रात को मेरी ड्युटी थी। श्याम को मै बैठा था। एक लडकी आई बडी गाडी मै, और अंदर गई। जब बाहर आई तस बोहोत घबराई हुई लग रही ठी।"

"मैने उनको पानी भी पुछा, पर वो गाडी की और भागी। बाद मे फिरसे दिखी बोहोत घबराई हुई थी। जैसे पिछे कोई लगा हुआ हो, तभी एक लडके को उसके पिचे जाते हुये देखा। मै भी गया उनके पिछे, पर उसके पेहले ही दोनो गायब थे। फिर मै अपने जगह आके बैठ गया।"

"तुम ने तु लडके का चेहरा देखा था.???"

"नही साहब.. मैने तो उस लडके को पिछे से देखा था। उसने निले रंग की शर्ट पेहनी थी।" एवढं बोलून तो माणुस शांत झाला.

"क्या ये ही रंग का शर्ट था..??" समोर एक फोफो होता निळा रंगाच्या शर्टातला.


समोर खुर्चीत बसलेला व्यक्ती आता चांगलाच तापला होता... "का केलस तु अस निशांत.. मी नाही सोडणार तुला..
तु केलेल्या कृत्याचा हिशोब मी घेणार. एवढ्या सहजासहजी मी तुला सोडणार नाहीये.. "


"माझ्या लाडक्या बहिणीचा तु जीव घेतला आहेस आणि मी तुला जीवंत सोडणार नाहीये...." एवढं बोलून त्याने बाजुच्या खुर्चीवर आपला हात जोरात मारला.


to be continued....


(कथेचा हा पार्ट कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग..