जुळले प्रेमाचे नाते - भाग-६० Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६०

"पण नक्कीच ओळखीतला असावा. कारण त्याला कॉलेजमध्ये येण्याची परवानगी मिळाली होती. पण नक्की कोण..?" विचार करत असतानाच मागून निशांतने खांद्यावर हात ठेवला आणि मी दचकले.

माझ्या दचकलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं. मी फक्त एक नजर त्या पत्रावर टाकली आणि नजरेनेच निशांतला ते पत्र दखावले.

"अरे परत पत्र??? कोणी दिलं.??"

"माझ्या क्लासमधल्या एका मुलीने आणुन दिल. मी काही विचारण्या आधीच ती निघून गेली."

"ठीक आहे. दे मी वाचतो." एवढं बोलून त्याने ते पत्र घेतलं आणि समोर बसुन वाचायला लागला. हे सगळं काही होत असताना मी निशांतच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होते.

"हं..!! ठीक आहे. हा जो कोणी आहे ना तो नक्कीच आपल्या कॉलेजमधला आहे. कारण कॉलेजमध्ये त्याला एन्ट्री सहजपणे मिळाली आहे." पत्र बंद करत निशांत बोलला.

"हो ना.. तेच तर मला कळत नाहीये."

"या पत्रा आधी तु कोणाला भेटलीस का.???"

"हो. म्हणजे मी आले तेव्हा इथे राज बसला होता. त्याला एक कॉल आला तसा तो निघुन गेला. आणि त्यानंतर हे पत्र त्या मुलीने मला आणून दिल." मी आठवुन निशांतला सगळं सांगत होते.


"ओके.. मी आलोच तु इथेच बस " एवढं बोलुन निशांत घाई घाईत कुठे तरी निघुन गेला.



तो गेला म्हणुन मी एकटे बसले होते त्याची वाट बघत. माझा मोबाईल वाजला स्क्रीनवर एका वेगळा नंबर झळकत होता. तो कॉल मी घेतला....


पण त्यानंतर मात्र माझा हसरा चेहऱ्या चांगलाच गंभीर झाला होता. पलीकडून बोलणारी व्यक्ती बोलत होती आणि मी ते फक्त ऐकत होते.. त्या व्यक्तीच्या प्रत्येक वाक्यावर माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. तिकडून कॉल चालूच असताना मी धावत कॅन्टीनबाहेर आले. एका फ्रेंडने मागच्या गार्डनमध्ये घडलेला प्रकार सांगितला. तशी मी धावत गेले.. समोर मुलांनी गर्दी केली होती. त्या गर्दीतून मार्ग काढत मी गेले आणि पाहिलं तर समोर निशांत डोक्याला हात लावून बसला होता.

मी धावत त्याच्या जावळ गेले...
"काय झालं निशांत..??? असा का बसला आहेस..??" हे विचारत असताना ही माझे ओठ थरथरत होते. बाजुला असलेल्या एका मित्राने पाण्याची बॉटल निशांत समोर धरली. निशांतने ती एका घोटात खाली केली होती.. आजूबाजूला कुजबुज ऐकू येत होती, पण आता ही वेळ नव्हती काही जाणुन घेण्याची.

मी आणि एका मित्राने निशांतला कॅन्टीनमध्ये आणल. निशांत अजून ही डोकं धरून बसला होता.

"निशांत, मी आले तुझ्यासाठी चहा घेऊन. ती पिऊन तुला बर वाटेल." एवढं बोलुन मी चहा घ्यायला काऊंटर वर गेले. तिथुन ही माझं लक्ष निशांतवरच होत. तो अजून ही डोक्याला हात लावून बसला होता.. चहाची ऑर्डर मिळताच मी घाईतच त्याच्या जवळ आले..

"हा घे कडक चहा तुझं डोकेदुखी थांबेल." एवढं बोलुन मी चहाचा कप त्याच्या समोर सरकवला.. त्याने ही तो एखाद्या शहाण्या मुलासारखा घेतला तेव्हा कुठे त्याला बर वाटल..

"निशांत आता सांगशील नक्की काय झालं आहे ते..??!" मी जरा घाबरतच विचारले.
एक दीर्घ श्वास घेत त्याने माझ्याकडे पाहिलं.

"हनी-बी..., मला ही कळलं नाही. म्हणजे तुझ्याशी बोलून मी बाहेर गेलो. समोर एक मुलगा संशयास्पद वाटला. मी त्याच्या मागे धावत गेलो.. तर तो मुलगा कॉलेजच्या मागच्या गार्डनमध्ये तिथे कोणीच नव्हतं तिथे पळत गेला.. जेव्हा मी तिथे पोहोचलो तर तिथे तो मुलगा नव्हताच. मी त्याला शोधत उभा होतो, तेव्हा अचानक मागुन कोणीतरी माझ्या डोक्यावर काहीतरी मारल. आणि मी खाली कोसळलो.. पण काही वेळाने पाहिलं तेव्हा समोर राज होता. त्यानेच माझ्या तोंडावर पाणी मारल आणि मला शेजारच्या बाकावर बसवलं. का..., कोण जाणे तो कुठून आला.. पण आज तो नसता तर.....!!"
एवढं बोलून निशांत शांत झाला.

"पण तुला कस कळलं की अस काही झालं असेल..?? तुला कोणी कॉल करून सांगितलं का.?? आपल्या कॉलेजच्या फ्रेंड्स पैकी..??" निशांतच्या या प्रश्नावर मी त्यावर मघाशी घडलेला प्रसंग सांगायला सुरुवात केली.


"तु गेलास आणि मला एक निनावी कॉल आला. पडलीकडची व्यक्तीने तुला इजा पोहोचवनार सांगितल्यावर मी धावत बाहेर आले. तेव्हा एका फ्रेंड्सने मागच्या गार्डनमध्ये घडलेला प्रकार सांगितला आणि मी धावत तिथे पोहोचले. समोर गर्दी आणि त्या पुढे तु होतास.. माझा तर जीवच वर आला होता निशांत..." हे बोलताना नकळत माझ्या डोळ्यातुन अश्रु गालांवर जमा झाले...


"अग वेडी आहेस का तु.??? मला काही ही झालं नाहीये. हा, जर डोकं दुखतंय पण बघ जाताना डॉक्टरकडे जातो उद्यापर्यंत मस्त ठणठणीत असेन." एक गोड स्माईल देत निशांतने माझ्याकडे पाहिलं..

"राज ने तुला वाचवल तर मग राज कुठे आहे..??" मी हे वाक्य बोलताच आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो....!!

पण अजून ही काही प्रश्न सुटायचे बाकी होते... जसे की तो मुलगा कोण जो पत्र लिहितो..?? तो संशयास्पद मुलगा..?? तो निनावी कॉल कोणी केला असावा आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे राज. त्याला कस कसल की तू कॉलेजच्या मागच्या गार्डन मध्ये बेशुद्ध अवस्थेत आहेस.???

असेल ऐक ना अनेक प्रश्न सोडवायचे बाकी होते..

to be continued......


(कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.