एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 12 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 12

रियाने फोन रिसिव्ह केला आणि मृणालची झोपच उडाली ..एवढ्या रात्री ती अजिंक्यच्या रूममध्ये कशी आणि तिचा बोललेला प्रत्येक शब्द खरा होता का ..की ती माझ्याशी खोट बोलली असे बरेच प्रश्न तिला सतावू लागले ..अजिंक्यवरचा विश्वास तिळमात्रही कमी झाला नव्हता पण रियावर अजूनही तिचा पूर्ण विश्वास बसला नव्हता ..त्यामुळे ती साशंक होती ..गेले वर्षभर तिने आपला भूतकाळ घरच्यांपासून लपवून ठेवला होता आणि त्याच ओझं तिला आतूनच तीळतीळ तोडत होत ..अजिंक्यच्या साथीने तिने स्वताला कसतरी सावरलं होत पण आता आपल्यापासून अजिंक्यच दूर जाईल अस तिला वाटू लागलं आणि गेल्या वर्षभरात लपवून ठेवलेल्या सत्याने पुन्हा एकदा मनात उडी घेतली ..अजिंक्य माझ्यापासून दुरावला जाईल याची भीती नसानसात भिनल्या गेली ..हात पाय देखील थंडगार पडले होते ..रात्रभर विचार करून करून डोकं दुखू लागल आणि अंगभर ताप चढला ..डोळ्यांना अंधुक अंधुक दिसू लागलं आणि हृदयाची गती अधिकच वाढू लागली ..पुन्हा एकदा जुन्या गोष्टींनी तिच्या मनावर ताबा मिळविला आणि पुन्हा ते वैशेपणाचे दिवस आठवू लागले ..डोक्यांनी एकदा झेप घेतली की त्याला चूक - बरोबर कशाचच भान राहत नाही हे मृणालकडे पाहून पटू लागल..आजची रात्र तिला काढणं असह्य होऊ लागलं ..डोकं ही फारच जड झालं ..सतत तेच विचार येत असल्याने ती एका जागी निवांत बसू शकत नव्हती ..डोकं इतकं जड झालं होतं की की तिचा तिच्यावरच ताबा उरला नाही ..भर गर्मीत तिला थंडी जाणवू लागली ..अगदी त्याही स्थितीत ती टेरिसवर पोहोचली ..हात - पाय थरथर कापत असताना ती पहाटे 3 च्या सुमारास वर एकटीच इकडून तिकडे फेऱ्या मारू लागली..डोक्यात विचार तसेच सुरू होते पण वातावरणातील शुद्ध हवा शरीरात जावी आणि ती स्वताला रिलॅक्स फील करू लागली ..विचार आताही सुरूच होते पण डोक्यात निर्माण झालेल स्ट्रेस थोडं फार कमी झालं आणि बेचैनी नाहीशी होऊ लागली ..अर्धा तास ती बाहेरच होती ..शेवटी पापण्या उघडझाप करू लागल्या आणि ती बेडरूममध्ये पोहोचली ..अंगावर घेत नाही तोच तिला झोप लागली ..

हळूहळू सूर्य वर येऊ लागला होता ..चिमण्यांची चिवचिव सुरू झाली होती ..तर सकाळी - सकाळी लोक ताजी हवा घेऊन घरी पोहोचले होते पण मृणाल काही उठली नव्हती ..एव्हाना सूर्य उगविण्यापूर्वी उठणारी मृणाल आताही झोपून आहे यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता ..मृणाल कामामुळे थकली असल्याने उठली नसेल म्हणून आईनी काम करायला सुरुवात केली ..सकाळचा चहा , नाश्ता सर्व झालं होतं ..स्वयंपाक देखील बनवून झाला होता पण मृणाल अजूनही उठली नव्हती ..आई प्रज्ञाला घेऊन बाहेर फिरून आली तरीही तिचा दरवाजा काही खुलला नव्हता ..आईला आता भीती वाटू लागली आणि ती सरळ मृणालच्या बेडरूममध्ये पोहोचली ..आई तिच्याजवळ पोहोचली तर मृणाल थंडीने थरथर कापत होती ..तिच्या मुखातून फक्त अजिंक्य अजिंक्य नाव बाहेर येत होतं ..आईला काहीच कळत नव्हतं तिने लगेच मृणालच्या कपाळावर हात धरला ..मृणालच संपूर्ण शरीर तापून निघालं होत ..आई थोडी घाबरतच म्हणाली , " मृणाल बेटा किती ताप भरलाय तुला !! चल उठ बेटा आपण हॉस्पिटलला जाऊ " ..तिच्या आवाजाने मृणाल भानावर आली ..आई तिला उठविण्याचा प्रयत्न करीत होती पण तिच्यात उठण्याची देखील हिम्मत नव्हती ..आईने तिला कसतरी सावरत उशाला बसवलं ..तिच्या अंगातला ताप बघून आई घाबरून गेली होती .घरीही तिच्याव्यतिरिक्त कुणीच नव्हतं ..मृणालला तशीच बसवून ती सरळ रिक्षा घेऊन घरी परतली..मृणालच्या अंगात ताप भरून होता तरीही मृणालची हॉस्पिटलमध्ये जायची इच्छा नव्हती पण आईने तीच काहीच एकूण घेतलं नव्हत ..काहीच क्षणात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले ..डॉक्टराणी तिचे चेकअप केले आणि काही औषध घेऊन ते पुन्हा परत आले ..मृणालला तिच्या रूममध्ये झोपवून आई तिच्यासाठी खायला आणायला गेल्या ..डॉक्टरांनी चेकअप केल्यावर तिचा ताप थोडा कमी झाला आणि त्यामुळे आई बेफिकीर झाल्या ..मृणाललाही औषधाच्या नशेत पटकन झोप लागली आणि थोडी का होऊन आईची काळजी मिटली ..

सायंकाळी मृणाल उठली तेव्हा आई तिच्यासाठी चहा घेऊन आली ..यावेळी स्वतःहून ती चहा घेऊ लागल्याने आईलाही बर वाटल ...तिला बर वाटावं म्हणून आई तिच्याजवळच बसली होती ..थोडया वेळ गप्पा मारल्यावर मृणाल प्रज्ञाला पाहण्यात व्यस्त झाली ..तर आई रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली ..स्वयंपाक तयार झाला आणि आईने तिची इच्छा नसतानाही तिला जेवण भरविल ..औषध घेऊन मृणाल पुन्हा बेडवर पडली ..मृणालला बर नसल्याने आई देखील आज तिच्याजवळच झोपल्या होत्या ..मृणालची तब्येत बरी वाटत असताना रात्री पुन्हा तापाचा जोर वाढला ..मृणालच्या मुखातून फक्त अजिंक्यच नाव बाहेर येऊ लागलं ..तिची अशी अवस्था बघून आई देखिल फार घाबरल्या ..तापही कमी होत नव्हता त्यामुळे आई रात्रभर तिच्या शरीरावर पाण्याच्या थंडया पट्ट्या ठेवू लागल्या..मृणालचा ताप काही क्षणांसाठी जायचा आणि पुन्हा तशीच स्थिती व्हायची ..रात्री बऱ्याच प्रयत्नानंतर मृणाल आईच्या कुशीत झोपी गेली ..सकाळी उठल्यावर आई अजिंक्यला मृणालच्या तब्येतीबद्दल सांगण्यासाठी फोन करू लागली पण अजिंक्य कामात असताना त्याला उगाच त्रास देऊ नका म्हणून मृणालने त्याला फोन लावू दिला नव्हता ..

दोन दिवस झाले होते तरीही मृणालच्या तब्येतीत कुठलाच फरक पडत नव्हता ..त्यामुळे आई तिला पुन्हा एकदा हॉस्पिटलला घेऊन गेली आणि तिची अवस्था बघून डॉक्टरांनी तिला ऍडमिट करून घेतलं ..मृणाल नको - नको म्हणत असताना आईने लपून अजिंक्यला कॉल करायचं ठरविलं ..अजिंक्य त्यावेळी आपल्या प्रेझेन्टेशनची तयारी करीत होता ..15 मिनिटाने त्याची मिटिंग होती ..तो कामात असतानाच त्याच्या मोंबाईलवर आईचा फोन आला ..अजिंक्य कॉल रिसिव्ह करत म्हणाला , " ए आई माझी मिटिंग सुरू होतेय मी तुला करतो कॉल थोड्या वेळात .." आणि आई त्याच बोलणं थांबवत म्हणाली , " आधी मला काय म्हणायचं ते एक मग फोन ठेव ..तू गेल्यापासून मृणालची तब्येत फार बिघडली आहे आम्ही तिला आजच ऍडमिट केलंय ..सो काम झाल्यावर लगेच ये .." हे ऐकून अजिंक्यला शॉकच बसला ..तो चाचपडत म्हणाला , " काय ? जास्त सिरीयस आहे का ग ती ? ..अचानक काय झालं तिला ? एक काम करतो मी लगेच निघतो .." भीतीने त्याच्या तोंडून काही अर्धवट शब्द बाहेर पडत होते . आईने त्याची ती स्थिती ओळखली आणि म्हणाली , " काही सिरीयस नाही रे फक्त तुला माहिती असावं म्हणून संगते आहे ..आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला ..तू आधी आपलं काम कर मग ये .. " आईने जरी फोन ठेवला तरीही त्याच मन मानायला तयार नव्हत ..आजच प्रेझेन्टेशन त्यानं कसतरी पार पाडलं ..त्याला मृणालबद्दलची काळजी अधिकच सतावू लाजली आणि हेद्राबादला आणखी दोन दिवस काम बाकी असतानाही तो इतर कामे मित्रांवर सोडून परत निघाला ..
तर इकडे हॉस्पिटलमध्ये मृणालला सायंकाळी सलाईन लावल्याने ती बेडवर निवांत पडली आणि लगेच डोळा लागला...तिला जाग आली तेव्हा रात्र झाली होती ..तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला आजूबाजूला आईबाबा दिसले नाही फक्त बाजूला होता तो अजिंक्य ..आणि मृणाल आपल्या डोक्यावर हात मारत म्हणाली , " किती वेडी झाले आहे न अजिंक्य मी तुझ्या प्रेमात की समोर तूच तू दिसत आहेस पण तू इथे कसा असणार ? तू तर हेद्राबादला आहेस आपल्या गर्लफ्रेंड सोबत म्हणजे नौकरिसोबत " ती आपलं बोलणं पूर्ण करणारच तेवढयातच अजिंक्य म्हणाला , " शहाणे मी खरच आलोय ..तुला कुठला भास होत नाहीये .." तो बोलू लागला आणि तिला जाणवलं की अजिंक्य खरच समोर उभा होता ..ती त्याला पाहून उठू लागली ..पण तिला उठायला त्रास होत असल्याने अजिंक्यने तिला हात देऊन उठविले ..ती त्याच्याकडे पाहत म्हणाली , " अजिंक्य कशाला आलास काम सोडून ? मला फार काही झालं नाही ..मी आहे रे ठीक पण तुझं अस सोडून येन मला अजिबात आवडल नाही .." अजिंक्य तिचा हात हातात घेत म्हणाला , " नौकरी खूप मिळतील पण बायको एकच आहे सो आधी तिची काळजी आणि शहाणे मी रागावलो तर इतकं टेंशन घेतलंस की स्वताची तब्येत खराब करून बसलीस..कामात होत कधीकधी पण याचा अर्थ असा नाही ना की माझं तुझ्यावर प्रेम नाही ..टेंशनमध्ये होतो खूप म्हणून बोलून गेलो ..बर असू दे चूक माझीच होती ..पुन्हा एकदा सॉरी पण अस स्वतःला त्रास करून नको घेऊ ..त्याचा त्रास मलाही होतो .." मृणाल त्याच्या डोळ्यात अश्रू बघून म्हणाली , " सॉरी अजिंक्य मला तुझ्यावर राग नाही पण काही गोष्टी अशा घडत गेल्या की स्वताला सावरण शक्य झालं नाही आणि मग हे अस होऊन बसल ..मीही सॉरी .."

त्यांच्या बोलण्यातून सर्व काही छान झालं होतं ..त्याच वेळी बाबा जेवणाचा डबा घेऊन आत आले ..मृणालला औषध द्यायच असल्याने तिला जेवण करणं गरजेचं होतं ..हल्ली जेवणाला नकार देणारी मृणाल अजिंक्य भरवु लागल्याने प्रेमाने खाऊ लागली .. अजिंक्यच्या चेहऱ्यावर काळजी पाहून तिला स्वतःबद्दलच वाईट वाटू लागलं .अजिंक्य आपल्यावर किती प्रेम करतो नि आपण नको नको ते विचार करत बसलो म्हणून स्वतःवरच नाराज होऊ लागली ..म्हणूनच की काय अजिंक्यच्या हातून घेतलेल कळू औषध देखील तिला गोड वाटत होतं ..ती पुन्हा त्याच्या त्या निरागस चेहऱ्यात हरवू लागली ..आज पुन्हा एकदा अजिंक्यने तिला आपल्या प्रेमात पाडल होत ..त्याचा विचार करत करतच ती आज समाधानाने झोपी गेली ..

अजिंक्य कामाणे फार थकला होता त्यामुळे तोही तिच्या उषाजवळच झोपी गेला ...अजिंक्यच्या येण्याने तिचा चेहरा पुन्हा खुलू लागला ..तीच अजिंक्यच औषध असल्याने अजिंक्य सोबत असताना तिच्यात लवकर सुधारणा होऊ लागली ..सकाळी आई आल्यावर अजिंक्य मृणालला भेटून घरी जाऊ लागला ..त्याने आपला मोबाइल चेक केला त्यावर सरांचे वीसपेक्षा जास्त कॉल्स येऊन गेले होते ..त्याने जाणूनच कॉल रिसिव्ह केले नव्हते ..पण आता सरांना टाळन शक्य नव्हतं म्हणून हॉस्पिटलमधूनच तो सरळ ऑफिसला पोहोचला ..सर ऑफिसला आलेच होते ..केबिनच्या दारावर पोहोचत अजिंक्यने आत जाण्यासाठी सरांना परवानगी मागितली ..सर त्याला आत घेत ओरडतच म्हणाले , " मी खूप नाराज आहे तुझ्यावर ..तू इतका बेजबाबदार असशील अस कधीच वाटलं नव्हतं ..तुला या कामासाठी नेमून चुकच केली मी ..कुणी काम सोडून अस परत येत का ?..रासकल , इडीअट ..आणि फोन रिसिव्ह करायला काय झालं होतं तुला ..मी न जास्त चढवून ठेवलं आहे तुला म्हणून अस घडतंय ..नकोच ठेवायला इतकं चढवून ..आता माझं तोंड का पाहतोय ..गेट आऊट .." अजिंक्य एकही शब्द न बोलता केबिनच्या बाहेर निघाला ..आपल्या केबिनला जाऊन त्याने लॅपटॉपवर एक लेटर टाइप केलं आणि पंधरा मिनिटात पुन्हा सरांच्या केबिनला परत आला ..हातात असलेलं लेटर त्यांच्या टेबलवर ठेवलं ..लेटरला पाहून सर म्हणाले , " हे काय आता ? " अजिंक्य काहीच बोलला नाही ।. सरानी लेटर वाचलं ..अजिंक्यने नौकरी सोडण्याच रेजिग्नेशन लेटर सरांना दिलं होतं ..सर त्याच्याकडे पाहत होते आणि अजिंक्य म्हणाला , " सॉरी सर मी चुकलो पण एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला ..आपण कमावतो कुणासाठी ? ..जर कमावलेलं खर्च करायला कुणीच जिवंत नसेल तर अशा कमावण्याला काय फायदा ? ..बायको ऍडमिट असताना मी फक्त नौकरिकडे बघणं मला आवडलं नाही ...आज भक्कम कामवेल पण उद्या साथ देणारी बायकोच नसेल तर या पैशाच काय करू म्हणून सोडून आलो पण तेही करत असताना मी मी माझ्या कामाकडे दुर्लक्ष केलं नाही ..मी सर्व महत्त्वाचे काम पूर्ण केले आणि तेव्हाच इकडे निघालो ...एक चूक नक्कीच केली की तुमचे फोन रिसिव्ह केले नाही ..पण त्यावेळी बायकोची जबाबदारी जास्त महत्त्वाची वाटली ..एनी वे ।.तुम्हाला आता मला सहन कराव लागणार नाही ..मीच जातोय ही जॉब सोडून .." सर काही बोलणार त्या पूर्वीच अजिंक्यने केबिन सोडलं ..अजिंक्य रागातच घरी पोहोचलो ..सरांच्या बोलण्याचा त्याला फार राग आला होता पण त्याहीपेक्षा मृणाल महत्त्वाची असल्याने त्याने त्यांचा विचार बाजूला ठेवला ..राग शांत करता यावा म्हणून घरी जाऊन शॉवर घेत स्वतःला मूड ठीक केला..आणि पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये पोहोचला ..अजिंक्य तिच्यासोबत दिवसभर गप्पा मारत होता पण सकाळी ऑफिसला घडलेली गोष्ट तिला जाणवू दिली नव्हती ..सकाळपासून तर सायंकाळपर्यंत तो तिची काळजी घेऊ लागला आणि अजिंक्यच्या साथीने ती लवकरच बरी झाली व दोनच दिवसात तिला सुट्टी मिळाली ..

त्याच रात्री मृणाल आणि अजिंक्य सोबत बसले होते होते .मृणाल त्याच्या कुशीत लेटून होती तर अजिंक्य तिच्या कपळावरून हात फिरवत होता आणि अचानक मृणाल म्हणाली , " सॉरी अजिंक्य माझ्यामुळे तुला फार त्रास झाला ना ? ..इतक्या छोट्या गोष्टीला मी मोठं करून घेतलं आणि तब्येत बिघडवली ..तुही आमच्यासाठी रात्रंदिवस झटतो हे लक्षातच आलं नाही ..स्वार्थी झाले रे मी काही क्षणांसाठी आणि त्यासमोर तुझं प्रेमही दिसलं नाही ..सॉरी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ..पण तुझ्याविना मी स्वताची कल्पना करू शकत नाही आणि रियाने तुझा फोन उचलला तेव्हा शंकांनी डोक्यात तांडव मांडल आणि मी त्यात वाहवत गेले ..स्वताला सावरन झालंच नाही .." आणि अजिंक्य तिला आणखीच जवळ करीत म्हणाला , " तू आत्मा मी शरीर मग एकमेकांना कुणी वेगळं करू शकेल ..? तस पण थोडे फार वाद व्हावेच कारण त्यातूनच प्रेम आणखी घट्ट होत जातं पण मृणाल यानंतर स्वताला त्रास करून नको घेऊ ..मलाही फार त्रास होतो या सर्वांचा ...तू काय आहेस माझ्यासाठी हे तुलाच नाही माहिती .." आणि मृणाल त्याच्याकडे पाहत म्हणाली ," काय आहे मी तुमच्यासाठी ? "

आणि अजिंक्य म्हणाला

सांसे अब तो तुम बिन
लगती है अधुरी
क्या बिना सांस के भी
जिंदगी होती है पुरी ..
मै दुनिया से कहता हु
तुम धडकन हो मेरी
जीस दिन थम जायेगी
रेह जायेगी हमारी कहाणी अधुरी
फिर क्यो सोचती हो की
तुम दूर हो जाओगे हमसे
भला हुयी है कभी
दिया - बाती बिनभी रोशनी ..
ना सोच ऊन लमहो को
जो तुझको मुझसे जुदा करते है
बन जा मेरा साया हरपलं
और केह दे अब तुझं बिन तो मै कुछ भी नही ..
कुछ भी नही ..

ओळी तर संपल्या होत्या पण तीच लक्ष आताही त्याच्या नजरेवरून हटल नव्हतं ..काय प्रेम होतं दोघांच ..ती वात होती तर तो दिवा ..दोघेही एकमेकांविना अपुरेच ..प्रकाशात जरी ते वेगळे होत तरी अंधारात मात्र त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नसत ..

मृणालने अजिंक्यला सर्व काही सांगितलं होत पण अजिंक्य काळजी करेल म्हणून तिच्या मनात असलेली घालमेल ती त्याला सांगू शकत नव्हती ..आपल्या भूतकाळाच लपवून ठेवलेलं ओझं तिच्या मनावर दडपण आणू लागलंय हे तिला कुणालाच सांगता आलं नाही ..तो सिक्रेट बॉक्स जो मृणालने वर्षभर स्वतःकडे लपवून ठेवला होता ..जो फक्त तिच्या मनात होता ..तो या क्षणांच्या माध्यमातुन बाहेर आला आणि त्याच दार बंद करन मृणाल विसरूनच गेली .किंबिहुना ते बंद करण आता तिला शक्य होणार नव्हतं ..अजिंक्यला त्रास होईल म्हणून काहीच न बोलणारी ती एकांतात मात्र तुटू लागली आणि त्याचा परिणाम तिच्या मनावर होऊ लागला ..ज्याबद्दल अजिंक्यला काहीच माहिती नव्हत ..तिच्या मनात सतत घोळत असलेली ही घालमेलच पुढे नात्याची परीक्षा घेणार होती ..

चल रही है कश्मकश
कुछ इस तरह जजबातो की
के बताना सब को है
फिर भी अल्फाज को धुंड रहे है ..


क्रमशः