Addiction - 2 - 15 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 15

अजिंक्य मृणालच्या नात्याला आणखी पाच वर्षे होऊन गेली ..या पाच वर्षात बरच काही बदललं होत ..तिच्या आयुष्यात असे काही किस्से होत गेले की नकळत तिला समाजाचे विचार त्रास देऊ लागले ..अजिंक्यला काहीच न सांगितल्याने तिचे विचार तिच्या मनातच राहून गेले आणि त्यांचा तिच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला ..तीन वर्षं मृणालला काहीच जाणवलं नव्हतं पण मागील दोन वर्षांपासून तिला या सर्व गोष्टींचा त्रास होऊ लागला होता ..अजिंक्य ती मनातलं कधीतरी सांगेलच या आशेवर जगत होता पण संपूर्ण वेळ तिच्यावर लक्ष ठेवण त्यालाही शक्य होत नव्हत..प्रज्ञा मोठी होऊ लागली होती आणि तिच्या भविष्यासाठी अजिंक्य जीवापाड मेहनत करू लागला ..सरानी कंपनीची एक वेगळी ब्रँच काढली आणि त्याचा संपूर्ण चार्जे अजिंक्यला देण्यात आला त्यामुळे तो त्यातच व्यस्त राहू लागला ..तर मुलीला उच्च शिक्षण द्यायचं , तीच सुंदर आयुष्य घडवाव म्हणून जास्तीत जास्त पैसे कमावण्यावर त्याच लक्ष लागलं ..प्रज्ञा देखील शाळेत जाऊ लागली होती आणि आजूबाजूच्या वातावरनाशी तिचा जवळचा संबंध येऊ लागला ..सर्व काही क्षणात बदललं होत फक्त मृणाल आजही त्याच जागी उभी होती..

मृणालने मनात दाबून ठेवलेल्या गोष्टींनी आता डोकं वर काढायला सुरुवात केली ..दिवसेंदिवस तीच स्ट्रेस वाढू लागल ..झोपेत बडबड करणं नेहमीच झालेलं होत तर कधी स्वप्नातून घाबरून उठायची ..तर कधी तिला भास व्हायचे ..सुरुवातीला अजिंक्यने त्या सर्वांकडे फार लक्ष दिलं नव्हतं पण ती समस्या इतकी वाढली की मृणाल कधीकधी वेड्यासारखं वागून जायची ..अजिंक्य कधी कधी रात्री उठला की ती त्याला टेरिसवर भेटायची आणि विचारलं की झोप लागत नसल्याचं कारण सांगायची ..इतके दिवस अजिंक्यने या सर्वांकडे दुर्लक्ष केलं होतं पण आता त्यालाही तिची फार काळजी वाटू लागली आणि मृणालची इच्छा नसतानाही तो तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेला आणि भीती होती तेच झाल ..डॉक्टर आणि मृणाल बोलत असताना अजिंक्य त्यावर जवळून लक्ष ठेवून होता ..डॉक्टर बरच काही बोलण्याचा प्रयत्न करित होते पण ती मात्र शांतच होती ..शेवटी डॉक्टरांनी त्याला बोलावून सांगितलं की मृणालच्या मनात तिचा भूतकाळ घर करुन बसलाय ..तिला कशाची तरी भीती आहे म्हणून ती कुणाला काहीच सांगू शकत नाहीये ..त्या सर्व गोष्टी तिच्या मनात लपून आहेत व सतत तेच विचार तिच्या डोक्यात फिरत असतात म्हणून ती अशी वागू लागली आहे .भीतीने इतकं घर केलंय की तिला काहीच सुचत नाही ..अजिंक्यला तिच्या वागण्यामागच कारण सापडलं होत पण तिला या अवस्थेत तो काहीच बोलू शकला नाही ..तिला खुश ठेवण्याचा एक मार्ग होता तो म्हणजे संवाद ..ती एकटी असू नये हाच पर्याय होता आणि अजिंक्य कुणाला काहीच न सांगता तिची काळजी घेऊ लागला ..मागील दोन वर्षांपासून ती फक्त औषधांवर जगू लागली होती ..कधीतरी औषध घेतलं नाही की ती वेड्यासारखं वागायची म्हणून अजिंक्य तिला एकटाच बाहेर घेऊन जायचा ..त्याच्यासोबत असली की तिला काही त्रास आहे असं वाटायचच नाही ..औषध चालू असल्याने ती आता सुधारु लागली होती पण तिच्यासमोर काही व्यक्ती किंवा किस्से आले की अचानक घाबरून उठायची आणि लगेच तिच्या डोक्यावर परिणाम व्हायचा ..मृणालला अस बघून अजिंक्यला फार त्रास व्हायचा पण तिच्यासाठी त्याने ते कळू दिलं नव्हतं .कधीकधी ती इतकी घाबरली असायची त्याच्या कुशीतच संपूर्ण दिवस काढायची ..आणि आपोआपच प्रज्ञाकडे दुर्लक्ष व्हायचं .या सर्व काळात अजिंक्यच प्रज्ञाची काळजी घेत होता ..आणि त्याच्यावर कामाच ओझं येउन पडलं पण त्याने त्याचा कधीच राग केला नव्हता ..हा असा काळ होता जेव्हा मृणाल स्वप्नात जास्त जगत होती .कधी कधी काही लोक तिच्यासमोर यायचे आणि प्रत्यक्षात कधीच नसायचे ..तर कधी कधी कधी मनात असलेल्या गोष्टी तिला स्वप्नात दिसायच्या आणि नंतर अस काहीच नसायचं ...पण जे काही होत ते सर्व भयावह होत ....

हा पाच वर्षांचा काळ फार मोठा होता ..त्यात सुख - दुःखाचे क्षण येऊन गेले पण त्यांच्या नात्यात कुठलाच दुरावा आला नव्हता ..समस्या होत्याच पण कधी मृणालच्या पुढाकाराने तर कधी अजिंक्यच्या पुढारकराने त्या सोडविल्या जात होत्या ..आजपर्यंत रिया त्यांच्यातलं दुराव्याच कारण बनू लागली होती पण तीच लग्न झालं आणि सर्व काही सुरळीत होऊ लागलं पण मृणालची मानसिक स्थितीच आता तिच्या आयुष्यात खूप जास्त समस्या आणणार होती ज्याबद्दल अजिंक्य मृणालला काहीच माहिती नव्हत ..अस वादळ जे मागे काहीच ठेवून जात नाही ..असतो तो हाहाकार..

4 मार्च ..आजची रात्र मृणाल - अजिंक्यच्या आयुष्यात फार महत्त्वाची होती ..5 मार्चला त्यांची मॅरेज अनिवर्सरी होती ..रात्रीचे ठीक बारा वाजले ..मृणाल अंगावर ओढून शांत झोपली होती तर अजिंक्य अजूनही जागा होता ..बारा वाजताच त्याने तिच्या गालावर किस केले आणि झोपेचं नाटक करत असलेली ती उठली आणि अजिंक्य तिला जवळ करत म्हणाला , " लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राणीसरकार .." आणि ती त्याच्या जवळ जात म्हणाली , " तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा नवरोबा ..अजिंक्य सात वर्षे झाली लग्नाला ..कधी वाटलंच नव्हतं की माझे सर्व स्वप्न पूर्ण होईल ..सात जन्माच बंधन काय असत माहिती नाही पण या सात वर्षात बरच काही मिळाल ..कुटुंब , तू आणि लाडकी मुलगी ..सुख - दुखानी परीक्षा घेतली तरीही आपण तसेच आहोत ..किती मस्त होते ना रे हे दिवस " आणि अजिंक्य तीला म्हणाला , " हो ना अविस्मरणीय क्षण ..ए मृणाल आज जाउया दोघेच बाहेर छान फिरायला ..फक्त तू आणि मी ..जस आधी जायचो तस .." ती काही बोलणार तेव्हड्यात प्रज्ञा उठत म्हणाली , " ए नाही हा बाबा मी पण येणार तुमच्यासोबत .मला पण मज्जा करायची आहे तुमच्यासोबत .." आणि मृणाल तिचा कान खेचत म्हणाली , " लपून आमचं बोलणं एकत होतीस तर .." मृणालने तिचा हात धरून बाजूला झोपविले आणि प्रज्ञा म्हणाली , " तुम्ही रोमँटिक बोलत होतात म्हणून काहीच बोलले नाही ..पण तुम्ही मला एकट सोडून जाणार म्हणून मग मला राग आला .." आणि मृणाल तिला जवळ करत म्हणाली , " माझी लाडकी ..अस होईल का ? आपण कुठेच बाहेर जाणार नाही आहोत तर घरीच सेलिब्रेट करू ..चालेल.. " " आणि मला शॉपिंग " , प्रज्ञा म्हणाली ..मृणालने तिला कपडे खरेदी करण्याची हमी दिली आणि तेव्हा ती शांत झाली ..तिघांत बऱ्याच वेळा गप्पा झाल्या आणि प्रज्ञा अजिंक्य मृणालच्या मधातच झोपी गेली ..
सकाळ झाली होती ..अजिंक्य मृणालचा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा जाणवत होता ..आईबाबांना आमचा वाढदिवस आठवन असेल म्हणून ते त्यांच्या आजूबाजूला घिरट्या घालत होते पण त्यांनी काही शुभेच्छा दिल्या नाही ..सकाळपासूनच अजिंक्य मृणालच्या कामात मदत करत होता ..याच बहाण्याने त्याला तिच्यासोबत काही क्षण घालविता येत होते ..प्रज्ञानेही शॉपिंगला जायचं असल्याने सुट्टी घेतली होती तर मृणालने आजीआजोबांना काहीच सांगायचं नाही अस सांगितल्याने प्रज्ञानेही त्यांना काहीच सांगितलं नव्हतं .अजिंक्य दुपारी ऑफिसवरून परतणार होता ..खर तर जायची इच्छा नव्हती तरीही थोडं काम असल्यामुळे त्याला जाण भाग पडलं ..अजिंक्य ऑफिसला पोहोचला होता ..पण रिया त्याला कुठेच दिसली नव्हती ..आज अजिंक्यनेही मृणालला आल्यापासून बरेच कॉल केले होते आणि घरी केव्हा जातो याची वाट पाहू लागला ..दुपार टळून गेली होती ..अजिंक्य सुट्टी मागायला सरांकडे गेला पण सर स्वताच घरी जाऊ लागले ..उलट आज अर्ध ऑफिस दुपारीच खाली झालं होतं म्हणून सरानी त्याला सुट्टी दिली नव्हती ..तर इकडे दुपारपासूनच प्रज्ञा मृणालला शॉपिंगसाठी त्रास देऊ लागली आणि नाईलाजाने मृणाल तिला लवकरच शॉपिंगला घेऊन गेली ..आज दोघानाही एकमेकांसोबत राहायचं होत पण काही ना काही कारणामुळे ते शक्य झालं नाही आणि दोघेही एकमेकांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहू लागले ..सायंकाळ झाली होती .अजिंक्यने क्षणाचाही विलंब न करता घराचा रस्ता पकडला ...मृणालचिही शॉपिंग झाल्याने तिने सरळ अजिंक्यला कॉल केला आणि अजिंक्य त्यांना रिसिव्ह करायला गेला ..आज प्रज्ञाने खूपच शॉपिंग केली होती आणि मृणाल बॅग्स उचलून कंटाळली होती ..लाडाची लेक असल्याने ते दोघेही तिला काहीच म्हणत नसत ..अजिंक्य दोघानाही पीक करून घरी पोहोचला ..
तिघेही दारावर उभे होते पण आतुन दार लावून होत ..काही क्षणातच आतून दार उघडल्या गेलं .. तिथे रिया होती .दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले ..दोघेही काही बोलणार तेवढ्यात रिया म्हणाली , " किती वेळ लावता यार तुम्ही ? केव्हाची वाट पाहत आहे ..चला लवकर तयारी करा .." अजिंक्य - मृणाल तिला बरेच प्रश्न विचारत होते पण त्याचा काहीच फायदा झाला नाही ..तिने अजिंक्यला कोट देऊन तयारी करायला पाठवल होत तर रिया स्वताच मृणाल - प्रज्ञाची तयारी करू लागली ..रियाने मृणालला नवरीसारख नटविल होत ..साजो शृंगारमध्ये कुठलीच कमतरता उरली नव्हती तर अजिंक्य आपली तयारी पूर्ण करून बाहेर उभा होता ..रियाही मृणालची अर्ध्या तासात तयारी करून बाहेर पडली ..अजिंक्यच्या हातातली गाडीची चावी घेऊन स्वताच गाडी चालवू लागली ..या सम्पूर्ण प्रवासात दोघाणीही तिला बरेच प्रश्न केले पण रिया काहीच बोलत नव्हती तर प्रज्ञा एकटीच हसू लागली ..दोघानाही काहीतरी गडबड असल्याची खात्री झाली पण विचारून काहीच फायदा नसल्याने ते शांत बसले ..शेवटी गाडी एका लॉनच्या समोर जाऊन थांबली ..रियाने खाली उतरत गाडीचे दार उघडले आणि समोरचा नजारा बघून शॉक झाली ...आईबाबा , सर - त्यांची पत्नी , ऑफिस स्टाफ , नातेवाईक , मित्रमंडळी सर्वच त्यांच्या स्वागतासाठी तयार होते आणि अजिंक्यला सकाळपासून घडत असलेल्या सर्व घटना आठवल्या ..अजिंक्यला सरप्राइज देण्यासाठी ही पूर्ण योजना आखण्यात आली होती ..ते हळूहळू समोर जाऊ लागले ..त्यांनी कोर्ट मॅरेज केलं असल्याने हे सुंदर क्षण अनुभवता आले नव्हते परंतु या सरप्राइजने त्यांना सर्व काही अनुभवता येणार होत ..छोटासा लॉन परंतू त्याची सुंदर सजावट बघून ते दोघेही त्यात हरवून गेले ..थोड्या फार अंतरावर असणारे त्यांचे हात एकमेकांच्या हातात आले आणि हातात हात टाकून ते दोघेही समोर जाऊ लागले ..बाजूला असलेले सर्वच त्यांच्यावर फुलांची उधळण करत होते आणि नव्यानेच ते आपल्या नात्याला अनुभवू लागले ..रस्त्यात सर्वच त्यांना शुभेच्छा देत होते ..आणि दोघेही मनभरून त्यांना कबूल करत होते ..काही क्षणात ते स्टेजवर पोहोचले ..सर्व लोक पंडितजिना शोधत होते आणि अजिंक्यने रियाला इशारा करून बोलवून घेतले ..रियाकडून त्यांना कळाल की ही सर्व सरांची कल्पना होती ..त्यामुळे दोघांच्याही आनंदात आणखीच भर पडली ..अजिंक्यची आईही त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली ..त्यांना एकावर एक धक्के बसत होते ..समोरून निशा दम टाकत त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि तिला पाहताच ते पटकन उभे झाले .. " सॉरी मला उशीर तर झाला नाही ना ? बर झालं ..मला वाटलं प्रोग्रॅम झाला की काय ? " , निशा म्हणाली ..तिच्या येण्याने दोघांच्याही आनंदाला सीमा नव्हती ..दोघाणीही मिठी मारून तीच स्वागत केलं ..काहीच क्षणात पंडितजी आले आणि त्यांना न जगता आलेले सुंदर क्षण त्यांना जगायला मिळाले ..खर तर प्रत्येक मुलीच स्वप्न असत की मी लग्नात हे करेन ते करेन पण मृणालच्या नशिबात तस काहीच झालं नव्हतं त्यामुळे हा क्षण जगून तिला फारच आनंद मिळत होता ..शिवाय त्यांच्या लग्नात फक्त दोघेच होते ..इथे त्यांच्या घरचे सर्वच असल्याने आनंद द्विगुणित झाला होता ..काहीच क्षणात त्यांनी अग्निकुंडाभोवती फेरे घेतले ..सर्व गोष्टी अचानक घडत होत्या आणि त्यांना विचार करायला क्षणाचाही वेळ मिळाला नाही पण काहीही असो त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर क्षण होता ..लग्नाचा हा वाढदिवस त्यांना खूप आनंद देऊन जात होता कारण मागील 5 वर्ष त्यांनी खूप स्ट्रेस मध्ये काढले होते ...

त्यांचं पुन्हा एकदा लग्न झालं आणि उरलेले सर्व मित्रमंडळी त्यांना शुभेच्छा द्यायला समोर येऊ लागले ..एक एक व्यक्ती शुभेच्छा देऊन समोर जात होता आणि काही क्षणात एक मुलगा येऊन थांबला ..वय जवळपास 25 वर्ष ..अजिंक्यच्या जवळ जात म्हणाला , " काय दादा ओळखलस की नाही ..लग्नालासुद्धा बोलविल नाहीस आणि आताही नाही ..बर झालं की आईने सांगितलं नाही तर हा क्षण पण मला मिस करावा लागला असता .." अजिंक्य त्याला हग करत म्हणाला , " अस का समीर तूच आपल्या जॉबमध्ये बिजी असतोस आणि सर्व माझ्यावर फेकतो आहेस ..हे बर नाही हा ..काकांना सांगू का मी .." दोघेही हसत - हसत एकमेकांशी गप्पा मारू लागले ..समीर म्हणजे काकांचा मोठा मुलगा ..दिल्लीला जॉबवर होता आणि कधीकधीच इकडे यायचा .आई बाबांना त्याने येण्याची विनंती केली होती पण त्याने नकार दिला होता ..आज कितीतरी वर्षानी तो सर्वाना भेटला त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्याची विचारपूस करू लागली ..अजिंक्यने त्याची मृणाल सोबत ओळखी करून दिली ..त्याच वेळी त्याला फोन आल्याने तो बोलण्यात व्यस्त झाला ...समीरने मृणालला शुभेच्छा देण्यासाठी हात समोर केला ..तिनेही त्याच्याशी हात मिळविला ..पण समीरचा तो स्पर्श तिला फार विचित्र वाटत होता ..त्याने तिचा हात घट्ट पकडून घेतला आणि चुकीच्या अर्थाने स्पर्श करू लागला ..मृणालला ते सर्व असह्य होऊ लागलं ..आणि तिने जोर लावून आपला हात सोडवून घेतला ..त्याने हात जरी सोडला असला तरीही मृणालवरून त्याची नजर मात्र हटली नव्हती ..

आज खूप दिवसांनी सर्व भेटले होते ..डीजेवर गाण्यांची मेहफिल सुरू झाली ..प्रत्येक व्यक्ती आपला पार्टनर घेऊन कपल डान्स करू लागला ..त्यात रिया आणि तिचा पती होता , सर आणि त्यांची पत्नी होती आणि बाकी सर्व ऑफिस स्टाफ होता ..रियाने विनंती केल्याने मृणाल - अजिंक्यही त्यांना जॉइन झाले होते ..अजिंक्य डान्स करताना मृणालच्या नजरेत हरवला होता तर मृणालच लक्ष आताही समीरच्या घृणास्पद नजरेवर होत ..तिच्या लक्षात आलं की त्याच संपूर्ण लक्ष आपल्या कमरेवर आहे ..तिने साडीने ते झाकण्याचा प्रयत्न केला आणि डान्सकडे दुर्लक्ष करून बसली ...डान्सकडे दुर्लक्ष झाल्याने तिचा पाय लडखडला आणि पायात लचक भरली.. ती वेदनेने ओरडू लागली ..तिला भरपूर त्रास होत होता ..सर्व लोक घाबरू लागले ..तिचा पाय सुधरविण्यासाठी अजिंक्यने पायावरून थोडी साडी वर केली ..आणि आधीच लक्ष देऊन असलेल्या समीरचे डोळे मोठे झाले ..त्यांची ती नजर मृणालच्या शरीरभर दरवळू लागली आणि मृणालला कसतरी होऊ लागलं ...अजिंक्यने काही क्षणातच तिचा पाय मोकळा केला ..पण त्याची ती भेदक नजर आताही तिच्यापासून दूर झाली नव्हती ..

डान्स झाल्यावर सर्व लोक जेवण करून निघाले होते ..निशा , अजिंक्य - मृणाल एकाच गाडीने जाणार असल्याने बाकी सर्व लवकरच घराकडे निघाले ..प्रत्येक व्यक्ती त्यांना पून्हा शुभेच्छा देऊ लागला आणि त्याच संधीच्या शोधात समीर पुन्हा एकदा समोर आला ..त्याने हात मिळविण्याचा प्रयत्न केला पण मृणालने काहीतरी कारण काढून त्याला बाजूला सारल ..तिला तस बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं ..हॉलमधील सर्वच लोक घरी पोहोचले होते ..मृणालचा पाय पूर्णपणे ठीक झाला नसल्याने अजिंक्य तिला आसरा देऊन घरी घेऊन जाऊ लागला ..तर समीर आताही मागून तिच्या सुंदर देहाला न्याहाळत होता ..कदाचित हीच सुंदरता पुन्हा तिला उध्वस्त करणार होती


क्रमशः ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED