कादंबरी - जिवलगा ...
भाग - १४ - वा .
ले- अरुण वि.देशपांडे
-------------------------------------------------------------------------------------
सकाळचा चहा आणि ब्रेकफास्ट आटोपून .बराच वेळ झाला होता ..मावशी-काकांच्या प्रवासा साठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व गोष्टी
आणलेल्या होत्या ,सोबत सामान घेऊन जाण्यासाठीनियम व मर्यादा लक्षात ठेवूनच bag भरणे चालू होते.
बराच काळ परदेशात जाऊन राहायचे आहे, तिथे काही त्रास झाला तर ? काय औषधी
घेऊन जायची की तिकडे कशी मदत होईल ?
या सगळ्या चौकशी निमित्ताने नेहा मावशी -काकांना
नेहमीच्या डॉक्टरकडे घेऊन गेली, तिथे रेगुलर चेक-अप करून झाला , दोघांच्या ही तबयेती उत्तम आहेत , औषधी आणि
खाण्या-पिण्याच्या वेळा पाळीत रहा ,काळजीचे कारण नाही असे डॉक्टर म्हणाले, तेव्हा सगळ्यांना धीर आला.
मावशी-काकांच्या परदेस यात्रे ची तयारी झाली होती ..तरी पण.ऐनवेळी काय लागेल का ?अंदाज करता येत नव्हता .
इतक्यात मधुरिमा खाली आली ती अगदी उत्साहाच्या भरात,तिच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहात होता. मावशी जवळ बसत
ती म्हणाली ..नेहा ,आता पार्टी हवी तुझ्याकडून .
मावशी म्हणाल्या .अग हो हो ,
देईल ती पार्टी , अगोदर कारण सांगशील की नाही ,
उगीच आमची उत्सुकता नको वाढवू बाई तू.
मग ऐका तर काका आणि मावशी .. तुम्ही परदेशी जाण्या अगोदर तुमची एक मोठ्ठी काळजी मी दूर केली आहे..
तुमच्या या नेहाची माझ्या मित्राच्या कंपनीत जॉबसाठी निवड झाली आहे.
नेहाला आत्ताच्या आत्ता म्हणजे आजच
रिपोर्ट करायचा आहे .
नेहा ,आता 8 वाजत आहेत ,लवकर आटप , अकरा वाजता रिपोर्ट करायचा आहे .
मी येणार आहे आज तुझ्या सोबत .तुला त्या ऑफिसच्या खुर्चीत बसवूनच
घरी येणार आहे
नोकरीच्या पहिल्या दिवशी .. ऑफिसला जायचे आहे हे लक्षात ठेवून तू तयार हो, कळला न तुला ?
काका आनंदाने म्हणाले - वा मधुरिमा ,हे मात्र तू खरेच खूप महत्वाचे काम केले आहेस ,तिकडे जाण्याच्या अगोदर नेहाला जॉब मिळाला , तिचे ऑफिस जाणे आमच्या समोर सुरू होणार
आहे ,
आमची मोठ्ठीच काळजी तू दूर केलीस . आणि खरे सांगू का ,तळमळीने करणारे आमचे असे तुझ्याशिवाय कुणी नाही. तू आहेस म्हणून इथे
नेहा जरा तरी रमण्याचा आणि राहण्याचा प्रयत्न करते आहे ही मी सुरुवातीपासून पाहतो आहे , तू नसतीस तर ही नेहा कधीच पळून गेली असती
तिच्या आवडत्या गावाकडे आणि तिच्या लोकांच्या मध्ये राहिली असती मजेत.
अहो काका ..आता असे काही करणार नाही ही नेहा ,
सहा महिन्या नंतर तुम्ही परत इकडे याल ना ,तुम्हाला ही नेहा ओळखू येणार नाही ,
या नेहा नावाच्या मुलीचा मी असा काही कायापालट करणार आहे की ..ही नेहा स्वतःला ओळखू शकणार नाही .
माधुरीमाच्या या बोलण्याला दुजोरा देत मावशी म्हणाल्या -
मधु ..कर बाई कर ,ही नेहा अगदी बदलत्या रुपात दिसली पाहिजे .
हे सगळ ऐकून नेहा मात्र मनातून खूप घाबरली होती ..जॉब करायचा ,jobजॉब मिळाला पाहिजे ",
बोलण्यापुरते छान होते ,पण आता प्रत्यक्षात जॉब जॉईन
करायचा तो ही आजच्या आज,
बाप रे , ! देवा ,माझी फजिती होऊ देऊ नको रे , सगळ व्यवस्थित पार पडू दे .
या नव्या दुनियेत माझा निभाव लागावा रे बाबा !
अर्ध्या तासात नेहा तयार झाली , आणि मधुरिमा पण लगेच तयार होऊन खाली आली ,
साध्याच कपड्यात छान दिसणाऱ्या नेहाला पाहून मधुरिमा म्हणली ..अरे वा , मस्त रेडी झालीस की नेहा तू,
मला वाटले, तुला मदत करावी लागणार की काय,
गुड, तुला कळायला लागलंय ,
कसे प्रेझेंट करायचे असते स्वतःला,
माझी बरीच एनर्जी आणि मेहनत वाचवलीस तू.
काका म्हणाले, आज आपलीच गाडी घेऊन जा,आणि नेहाला तू सोडून ये, मग ऑफिस सुटल्यावर नेहा येईल घरी,
काय ग नेहा येशील ना ?
हो हो, व्यवस्थित येईन मी घरी, तुम्ही नका काळजी करू.
आणि माझ्या मोबाईल वरून अपडेट देईनच की तुम्हाला सगळ्यांना.
नेहाच्या बोलण्यातील कॉन्फिडन्स पाहून
मधुरीमा खुश होत म्हणाली-
बघा मावशी-
खरेच बदलते आहे बरे का, तुम्ही बिनधास्त रहा आता परदेशात,
तुमची नेहा खरेच बदलते आहे .
नेहा राहू शकते स्वतःची स्वतः.
ठरल्या प्रमाणे नेहा आणि मधुरीमा निघाले,
जाता जाता मधुरीमा सांगू लागली-
नेहा- आज पासुन तुझे एक नवे जीवन सुरू होते आहे,
हे ऑफिस , इथल्या व्यक्ती, स्त्री-पुरुष,
वातावरण तुझ्यासाठी अगदी नवीन आहे,जे या पूर्वी तू न ऐकलेले आहे आणि कधी न पाहिलेले, असे असले तरी घाबरून न जाता,
सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्याच जमले की तुला कठीण वाटणार नाही.
तुझा बॉस माझा मित्र आहे, वयाने मोठा आहे तरी आम्ही जवळचे फॅमिली फ्रेंड आहोत,
तो तुला घेईल सांभाळून, पण तसे दाखवणार नाही कधी,
आणि तू ही हे कधी कुणाजवळ बोलून नको दाखवुस, की माझ्या ओळखीमुळे तुला ही नोकरी काही इंटरव्ह्यू वगैरे न देताच मिळालीय.
तुला जॉब लेटर मिळाले की ,मग, नॉर्मल स्टाफ सारखे राहायचे आणि वागायचे,
बॉस माझ्यासाठी तुझ्यावर दुरून लक्ष ठेवून असेन हे लक्षात ठेव,
काही वावगे वागून प्रॉब्लेम येऊ देऊ नकोस.
नेहा लक्षपूर्वक ऐकत राहिली, तिच्या मनावरचे दडपण वाढतच होते, तिचा चेहेरा मात्र नॉर्मल दिसत होता.
ऑफिस समोर गाडी थांबली, पार्क केल्यावर दोघी लिफ्ट ने ऑफिस फ्लोअरवर पोंचल्या.
हॉल मध्ये आल्यावर मधुरीमाने बाहेर बसलेल्या लेडी स्टाफ ला कार्ड दाखवले, तसे तिने केबिन मध्ये फोन करून विचारले
या दोघींना मध्ये पाठवू का ?
यस, पाठव, येऊ दे त्यांना.
आत केबिन मध्ये गेल्यावर मधुरीमाने येणाचे कारण सांगून नेहाची ओळख करून दिली.
बॉस बहुदा वाटच पाहत असावे,
मधुरीमा, सॉरी, मी आता फार घाईत आहे,तुला अजिबात वेळ देऊ शकणार नाही,
माझ्या फ्लाईट ची वेळ होत आली आहे,
I have to leave now,
पण, तू काही काळजी करू नको, मी तुझ्या समोर एच आर मॅनेजर ला सांगून जातो,
तो सगळं काम करीन, आणि तुझ्या समोरच
ही नेहा या ऑफिसच्या खुर्चीवर बसेल,
ते पाहून मगच जा तू, ओके.
बॉस म्हटल्या प्रमाणे झाले, ज्या टीम मध्ये
लेडी स्टाफ जास्त आहे आशा सेक्शन मध्ये
नेहा ऍड होणार होती.
, टीम लीडर ला एच आर ने नेहाच जॉब लेटर देत म्हटले, ही तुमची न्यू कलीग , आजपासून ,
आणि इतर स्टाफ ला म्हटले, टेक केअर ऑफ धिस न्यू कमर,
सर्वांनी नेहाला वेलकम म्हटले, आणि
नेहाच्या जॉबचा पहिला दिवस सुरू झाला,
मधुरीमा तिला सोडून घराकडे परत निघाली..
----------------------------------------------------------
बाकी पुढील भागात..
भाग -१५ वा लवकरच येतो आहे.
----------------------------------------------------------
कादंबरी- जिवलगा...
भाग- १४ वा
ले- अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
------------------------------------------------------------