कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग-१ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग-१

क्रमशः

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ,,

ले- अरुण वि.देशपांडे

------------------------------ ------------------------------ ------------------

वाचक मित्र हो ,
कादंबरी लेखन हा वाचकप्रिय लेखन-प्रकार पहिल्यांदा मी सुरु केला तो मातृभारती -मराठीच्या माध्यामातून ..
मातृभारतीवर माझी पहिली कादंबरी ..जिवलगा ..क्रमशा : सुरु आहे , १४ भाग प्रकाशित
झाले आहेत ..या लेखनाला आपण खूप चांगला प्रतिसाद देता आहात ...त्याबद्दल खूप खूप आभार .


मातृभारती मराठी टीमचे आभार ,
त्यांच्यामुळे माझे कादंबरी -लेखन सुरु होऊ शकले आहे..


वाचक मित्रांनो ,तुमचे अभिप्राय आणि वाचन-प्रतिसाद असाच लाभत राहो.

तुमचे मन:पूर्वक आभार ..
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------

क्रमशः“ कादंबरी –

प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

भाग- १ ला

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------

समोर दिसणारे हे अतिभव्य ,अलिशान निवासस्थान ,शहरातील सर्वात मोठ्या व्यक्तीचे आहे .या इमारातीवरची अक्षरे

गोल्डन वर्डस ..सोन्याच्या रंगात रंगवलेली आहेत . "प्रेमालय " किती छान नावं आहे ना !

जिथे केवळ प्रेमाचा आवास आहे , निवास आहे . प्रेम माणसाच्या

आयुष्याला सर्वार्थाने सुंदर , भावूक आणि एक चांगला माणूस बनवत असते .

प्रेमाचे महत्व कालातीत आहे . हजारो ,शेकडो वर्षापासून ..प्रेम “या शब्दाने ,त्यातील

अर्थाने माणसाचे जीवन व्यापून टाकलेले आहे .

सांगायची गोष्ट अशी आहे की..

हे प्रेमालय “ म्हणजे “वास्तू – प्रेमाची “ आहे . यात राहणर्या माणसांनी या वास्तूचे

नामकरण “प्रेमालय “ठेवतांना ..सर्वांना ..”प्रेमाचा संदेश दिला आहे “असेच वाटते.

या घरातल्या माणसांचा ..व्यक्तीचा परिचय करून देतो..कारण ही या सगळ्यांची एक प्रेमकहाणी

आहे..

प्रेमालय – या घरात .. सागर आणि सरिता “ हे जोडपे. आणि त्यांच्या तरुण –एकुलता एक मुलगा

अभी – अभिजित , अशी इन-मीन –तीन “माणसे राहतात .

आजच्या आधुनिक जीवनाचे प्रतिनिधी वाटावेत अशी ही तीन माणसे ..आणि त्यांचे हे त्रिकोणी कुटुंब

आणि यांच्या आयुष्याला अनेक अर्थाने वळण देणारी दुसरी एक फमिली .या कथानकाचा महत्वपूर्ण

भाग आहे ..

हा दुसरा परिवार

संजय – आणि सुनीता ..हे पती-पत्नी ,आणि त्यांची कन्या – अनुषा ..यांचा .

हा परिवार देखील आजच्या जीवनशैलीत राहणारा आणि वावरणारा आहे.

या दोन कुटुंबाचे एकमेकाशी कसे संबंध येतात ? अनेक घटना आणि प्रसंग “घडतात .

अशावेळी माणूस नव्याने दिसयला लागतो , “

आपला स्वभाव कसा आहे ?” अचानकपणे दाखवत असतो “

माणसांचे अभावितपणे होणारे दर्शन आपल्याला अधिकच गोंधळात टाकणारे असते.

माणूस आणि त्याचा स्वभाव ..म्हणजे अथांग सागराचा तळ शोधण्या सारखे असते ..

“ प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ... ही एक प्रेमकथा आहे

अभिजीत आणि अनुशाच्या नवथर प्रेमाची ,

तरुण मन –स्वप्नाळू मन ..जेव्हा प्रेमात पडते ..तेव्हा काय काय होते ?

त्यांच्या सोबत आपल्याला यांच्या प्रेमाचे इंद्रधनुषी रंग दिसू लागतील .

पती-पत्नी म्हणजे दोन भिन्न व्यक्ती ..विवाह –बंधनाने आयुष्यभर सहजीवनाचा प्रवास
करणारे जीवनसाथी असतात “

अशा दोन जोडप्यांच्या सहजीवन-प्रवासाची ,त्यातील कधी सोपी, कधी सुकर , कधी काट्या –

कुपात्याच्या रस्त्यावरची , कधी खड्डे आणि खाच –खळग्यांच्या रस्त्यावरून कराव्या लागणार्या

वाटचालीची ..जीवन -कहाणी आहे,

या वाटचालीत ,संसारच्या गाडीचे इंधन असते..”प्रेम “, या प्रेमाच्या पेट्रोलवर तर सगळा प्रवास

न थाबता ,न अडखळता करता येत असतो “ आणि असे हे प्रेम “ नावाच्या शक्तीचे कमी-जास्त होणे ,ते कमी पडणे किंवा ..

पेट्रोल सारखे “प्रेम” देखील हवेत विरून जाऊ लागते तेव्हा काय होते ?

मग जीवनात खूप काही ..घडत असते ,

अशा विचित्र आणि कठीण प्रसंगी माणूस कसा वागतो ,त्याचे इतरांच्या बादल काय भावना आहेत

हे कळू लागते , हे असे पहाणे म्हणजे मनाला आनंद देणारे असे कधीच नसते .

माणसांच्या मनातील - राग-लोभ ,संताप , संशय , समाज आणि गैरसमज ,लायकी ,पात्रता , नशीब , कर्तव्यशून्य माणसे “

या भावना आणि त्यासाठी बोलायचे असणारे शब्द हे मनावर कायमचे ओरखडे

ओढणारे असतात , मनाला होणार्या या जखमा कायमच ओल्या रहाणार्या असतात.

असेच अनेक वादळे या प्रेम-कहाणीत येणार आहेत ..

तेव्हा

सागर आणि सरिता हे जोडपे ,संजय –आणि सुनीता ..पती-पत्नीची ही जोडी ..प्रेमाच्या ,विश्वासाच्या

बळावर कसे कसे मार्ग काढून पुढे जातात का ?

की अभि आणि अनुशाच्या लव्ह-स्टोरीत घरच्यांचा विरोध ,खानदान की इज्जत “, इगो- टकराव ,

आणि श्रीमंती ,हे स्पीड- ब्रेकर लागतात का ?

याचे आपण साक्षीदार होणार आहोत .

प्रेम “एक भावना म्हणजे ..श्रद्धा आहे,तशीच भक्ती आहे, विस्वास आहे , अतूट असे भाव-बंधन आहे.

प्रेम-धागी मन एकदा बांधले आज्ते ना ! मग या रेशमी-बंधनातून मनाची सुटका नाही !

प्रेमाची ही एक छोटीशी चारोळी --

-------------------------------------

प्रेम- अडीच अक्षरे अवघी ही

जगास सुंदर किती बनवती

ज्या मनास स्पर्शिते प्रेम हे

जगण्याची नवी उर्मी देती ...

--------------------------------------------------------------

तर मग ..आरंभ करू या ..

पहिली भेट घेऊ या .. प्रेमालय “ मध्ये रहाणारऱ्या ..सागर-सरिता –आणि अभि या तिघांची ..

त्यांचा परिचय ..त्यांच्याच शब्दातून करून घेऊया .

व्यक्ती स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडून गेलेली असली म्हणजे ती कशी बोलते ते पहा ..

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------

पुढे वाचू या ..दुसऱ्या भगात ..

लवकरच येतो आहे ..भाग - २ रा .

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ....!

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

9850177342

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -