kadambari premaavin vyarth he jeevan - 5 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ... भाग -५

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

भाग – ५ वा

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी अभि.. अभिजित .सागर देशमुख बोलतोय ,

मित्रांनो -

आपल्या आयुष्यात “प्रेमाचे महत्व अनन्य साधारण असेच आहे “.माझी आई -सरिता ..

खूप प्रेमळ स्वभावाची . प्रेमाच्या सगळ्या छटा- तिने तिच्या आयुष्यात अनुभवल्या ,म्हणून

..आपल्या वडिलांनी बांधलेल्या सुंदर आणि देखण्या ..वस्तूला मोठ्या हौसेने तिनेच तर नाव दिले –

“प्रेमालय “.

पण, जेव्हा तिच्या वडिलांनी ..म्हणजे माझ्या आजोबांनी . निवडलेल्या कर्तबगार अशा .

सागर देशमुख या माणसाशी ,त्यांच्या एकुलत्या एक लेकीचे लग्न लावून दिले ..

तो क्षण , तो दिवस ..पुढे अगदी लवकरच आजोबांना मोठा धक्का देणारा ठरला

आजोबांना स्वतःच्या निर्णय-क्षमतेचा , दूर-दृष्टीचा “ खूप अभिमान .

आजोबांना असलेला त्यांचा हा अभिमान ..

सागर देशमुख या माणसाने . .येणाऱ्या प्रत्येक दिवसा-गणिक धुळीस मिळवला .

आईने – तिच्या उध्वस्त स्वप्नांच्या झळा- आपल्या वडिलांना जाणवू नये याची काळजी घेतली .

पण याचा काही उपयोग झाला नाही .

आपल्या लेकीचे उध्वस्त नशीब “ तिच्या या अवस्थेस “मी कारणभूत आहे “ अशा मोठ्या अपराधी भावनेने .

.आजोबा या जगातून निघून गेले ..

त्या वेळी मी लहान होतो ..घडलेले हे सर्व बारकाईने जरी समजले नव्हते मला

माझ्या त्या लहानपणीच्या दिवसातल्या त्या प्रसंगाचे ओरखडे ..मनावर कायमचे उमटले .

आईला – प्रेम हे आयुष्याचे सार्थ करणारे वाटायचे , आणि वडिल–सागर देशमुख – प्रेम म्हणजे

निव्वळ व्यर्थ “ असे बोलून दाखवणारे ..

अशा जोडप्याच्या संसारात .. आमच्या – प्रेमालय “ घरात ..

प्रेमा -शिवाय सगळ काही होतं.

माझ्या आणि माझ्या ताईच्या ..

हो –मला एक मोठी बहिण पण आहे....

.. आमच्या वाट्याला वडिलांचे प्रेम कधीच आले नाही .

ताईचे दुर्दैव असे की ..ती बिलकुल आईच्या स्वभावाची झाली ..साधी..सरळ , स्वप्नाळू , सगळ्यांना

आपले मानणारी .

कॉलेजच्या फायनल वर्षाला असतांना .. ताई अजयच्या प्रेमात पडली .

अजय आणि ताईच्या वयात तसे बरेच अंतर .पण, म्हणतात ना ..”या प्रेमा सामोर सारे व्यर्थ

असते “, तसेच झाले .. ताईच्या मनाने एकदा एक गोष्ट ठरवली ..की .ती करणारच .

वडील -सागर देशमुख यांचा – “जिद्दी आणि हटवादी –स्वभाव “,त्यांच्या लेकीत येणारच

तो आला ही तसाच .जशाचा तशा .

तसे पाहिले तर अजय डबल पदवीधर, अगदी होतकरू तरुण म्हणावा असा

पण ..नोकरी न करता ..मुक्तपणे कलंदर आयुष्य जगणारा ,

त्याला जंगल , दर्या – खोर्यातून निसर्ग –मैत्री करण्याची आवड

तो अतिशय प्रसिध्द असा निसर्ग-प्रेमी , वन्य-जीवन चळवळ कार्यकर्ता .

अफलातून छाया-चित्रकार आणि उत्कृष्ट चित्रकार ..सगळीकडे त्याच्या कलाकृतींची

प्रदर्शने सतत चालू असायची .

वन्य-प्राणी , वन्य -जीवन , निसर्ग –दर्शन “, अजयच्या फोटोतून आणि चित्रातून अगदी जिवंत जाणवते

त्यामुळं त्याच्या फोटोंना आणि चित्रांना रसिकांची खूप मोठी डिमांड असते

फोटो –आणि चित्र “यांची विक्री ..यातून त्याला मिळणारे उत्पन्न समाधानकारक असते

यातले पोटापुरते ठेवून बाकीचे सारे उत्पन्न अजय आणि ताई ..

वन्य-प्राणी , वन्य –जीवन ,निसर्ग –संवर्धन “ या कार्यासाठी सढळ हाताने देणगी देतात .

हे सगळ करीत असतांना ..

घड्याळ्याच्या चौकटीतले , आयुष्य त्याच्यासाठीचे नव्हते .

तरी पण -एक लोक-संस्थेने अजयला नोकरी दिली होती

..तो ज्या संस्थेत नोकरी करीत होता ..

तिथे त्याला सन्मानपूर्वक नोकरी दिली गेली होती . कारण अजय सारखा कार्यकर्ता आपल्या संस्थेत आहे “,

यातच संस्थेला मोठा गौरव झालाय असे वाटत होते .

या नोकरीमुळे पैश्याभावी उपासमारी होण्याची भीती पण उरलेली नव्हती .

ताईचे नशीब अजून चांगले ..तिला पण संस्थेने नोकरी देत सामवून घेतले .

अजय आणि ताई .अगदी आनंदाने राहू लागले .

मला तर माझ्या या दिदीचा आणि जीजू –अजयचा खूप अभिमान आहे. पण ,

पण माझ्या वडिलांना ..हे अजिबात मंजूर नव्हते .आणि अजून ही नाही.

ताईच्या आणि अजयच्या प्रेमाला त्यांचा तीव्र विरोध .

आईला त्यांनी स्पष्ट सांगितले ..

तुला मुलगी- जावई हवे असतील तर ..आपला संबंध यापुढे नसेल.

काय हवे, ? ठरव निर्णय तुझा .

त्यांनी मला तर काही विचारलेच नाही ..कारण ..

मी अगोदरच आमचे घर “प्रेमालय “ सोडून

माझ्या मित्रांच्या सोबत वेगळ्या ठिकाणी राहू लागलो होतो.

आईच बिचारी दुर्दैवी ..स्वताच्या मुलीला कायमची दुरावली ती...

कारण ..आपल्याला ..मुलगी नाहीये , जी होती,तिच्याशी काही संबंध नाही .

असे सागर देशमुख यांनी जगजाहीर करून टाकीत ..ताई आणि अजयशी संबंध संपवले.

मला एक सांगा तुम्ही ..

या गोष्टी ..तुम्हाला सागर देशमुख यांनी सांगितल्या का ?

नाही ना !

आणि .

सरिता देशमुख यांनी पण नसेलच सांगितले , त्यांनी त्यांचे कारण पुढे केले असणार

अहो मला ..बोलण्याचे नीटसुधरत नाही ,

आलेल्या समोर तिसरेच काही बोलून बसते मी “ असे त्या म्हणाल्या असतील .

मग असे काही ही बोलून बसल्या बद्दल सरिता देशमुख यांनी नंतर

सागर देशमुख सुनावतील ती शिक्षा भोगायची ..

या भीतीने आई कधीच कुणाला “ताईबद्दल तुम्हाला काहीच सांगणार नाहीये.”

मित्रांनो -

असे आहोत पहा ,आम्ही सारेजण.

नाती मानली तर खूप जवळची आणि जर हीच नाती

मानायचीच नाही असे वागत राहिलो तर ,

मनातून ..एकमेकाबद्दल प्रेम वाटावे असे काही शिल्लकच नाही रहाणार .

अशा रिकाम्या मनाने मी मोठा होत गेलो . शाळा , कोलेज , शिक्षण टप्प्या टप्प्याने व्यवस्थित

पार पडले.

सगळ्यांनी गृहीत धरले होते की.. सागर देशमुख –ग्रुपचा अधिकृत वारस ..अभिजित ..

त्याच्याकडे सगळी सूत्र आपोआपच येणार .

आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ..सर्वांच्या अपेक्षा सागर देशमुख यांनी चुकीच्या आहेत “,असे कधीच दर्शविले नाही.

पण, मला या उद्योग धंद्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता . माझे इंजिनियर मित्र आणि मी

आम्ही सर्वांनी मिळून आमची स्वतंत्र कंपनी सुरु केली . इतर कंपन्यांना सेवा-कार्य देणे “

हे आमच्या कामाचे स्वरूप होते .

माझ्या या प्रोजेक्टची बातमी ..बाबांच्या कानावर गेली ..त्यांना कौतुक वाटणे तर दूरच ..

दळभद्री आईच्या दरिद्री पोराकडून .अशीच अपेक्षा होती . त्याची कुवत आणि मर्यादा आहेच अशी.

असे बोलून दाखवण्यात आनंद मानला .

माझ्या सारखा बिझीनीसमन होण्यासाठी ..शून्यातून विश्व निर्माण करण्याची हिम्मत लागते ..

तो हा कधीच करू शकणार नाहीये.

आयता बिझीनीस आहे, तो घेता येत नाही त्याला

अंगात तेवढे बळ, आणि हिम्मत पाहिजे ना ? ती माझ्यासारख्या एखाद्याच सागर देशमुखच्या

अंगात असते .

अभिजित देशमुख माझ्या सोबत आला काय नि आणखी कुठे गेला ?

या सागर देशमुखला काही फरक पडणार नाही ..

असे आहे पहा सगळे त्रांगडे ..

आमच्यापैकी कुणी भेटले तर काय म्हटले ..सांगा बरे का मला ..आपण मित्र झालोत की आता ..

बाय ..

भेटू लवकरच ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाग- ५ वा ..

बाकी वाचू या पुढच्या भागात ..

भाग – ६-वा लवकरच येतो आहे ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

9850177342

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय