कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग - ९ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग - ९

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन....

भाग -९ वा

------------------------------------------------------------------------------

हेल्लो फ्रेंड्स ,

मी अभिजित सागर देशमुख , खूप दिवस झालेत न आपल्या भेटीला , म्हणून पुन्हा एकदा

माझ्या नावासहित ओळख देतोय . कसे आहे ना ..आपले रोजचे रुटीन इतके फास्ट होऊन

बसलय की , दिवसभराच्या वर्कलोड मधून मोकळे झाल्यावर काही वेळ निवांतपणाने बसायचे

म्हटले तरी छान असा वेळ आपण स्वतःला देऊ शकत नाहीत . म्हणून मग अशा गडबडीत ,

आणि रोजच्या धामधुमीत आपल्याला कोण कोण भेटलाय , त्याच्याशी आपले काय बोलणे झाले ?

हे लक्षात ठेवणे मला जसे फारसे जमत नाहीये , तुमचे पण असेच होत असेल “ याची कल्पना

आलीय मला ,

म्हणून तर म्हटले

नाव सांगितले की माझी ओळख पटेल

आणि आपण भेटलो आहोत हे पण आठवेल.

त्याही पेक्षा आणखी एक हिंट देऊ का तुम्हा ..मग तर तुम्हीच म्हणाल ..

अरेच्या ..तू अनुशाचा अभी आहे म्हण की ,

आता आम्हाला अधिक काही सांगण्याची गरजच नाहीये

हो कि नाही. ? असो.

मित्रांनो ..

असे म्हणतात की ..अजाण आणि अबोध अशा लहानपणच्या दिवसात आपण जे काही पाहतो ,

जे ऐकतो ,जे पाहणे आणि ते ऐकणे आपल्या समजण्याच्या पलीकडचे असते ,सगळ्याच गोष्टी

मनाला उमजतील अशा नसतात , पण, त्यातून आपल्या मनावर त्याचे जे अर्थ उमटून जातात ..ते एखाद्या बरे न होणार्या जखमे सारखे असतात ,

वरून खपली दिसेल , पण त्या खालची जखम तसीच ..ठणकणारी “, असते .

ज्याच्या मनात अशा जखमा असतात , त्याच्या वेदना त्यालाच होणार ,

समोरच्या माणसाला त्याच्या दुखाची तीव्रता तितकीशी जाणवत नसते .म्हणतात न परदुखः शीतल ...!

तसे आहे हे.

आतापर्यंत तुम्ही माझ्या परिवारातील म्हणजे- बाबांशी बोललात, आईबरोबर तर दोनदा भेट झालीय तुमची .

आणि आता मी पुन्हा भेटतो आहे , त्यवर तुम्ही मला म्हणाल सुद्धा –

या मुलाच्या मनात –स्वतःच्या बापाविषयी प्रेम कमी आणि रागच जास्त आहे बुवा ..!

हो, दुर्दैवाने हे खरे आहे.

.माझ्या मनात बाबांच्या विषयीची भावना , त्यांची प्रतिमा फारशी चांगली नाहीये.

मागच्या भेटीतच मी तुम्हाला आमच्यातील नाते मोकळे नाहीये . त्यात एक प्रकारचा तणाव

असतो ,ज्यामुळे आमच्यात अंतर आहे “ हे तुम्हाला सांगितले आहे, त्यमुळे आमचे वडील आणि मुलगा

हे नाते निर्मल तर नाहीच , उलट त्यांचे आमच्यापासून दूर रहाणे ,मला मुळीच आवडत नाही ,त्यामुळे

आपणहून मी त्यांना भेटायचा प्रश्नच येत नाहीये.

जाऊ द्या , नेहमीचा विषय ऐकून तुम्ही कंटाळून जाल ,आणि मला ही या विषयावर पुन्हा पुन्हा

बोलणे आता अजिबातच नकोसे वाटत असते.

मागच्या काही दिवसापूर्वी तुमची आणि अनुषाची मस्त गप्पा मैफिल झाली म्हणे, तिच्याकडून

तुम्हाला आमच्या बद्दल खूप माहिती मिळाली ,जी अजून पर्यंत कुणालाच माहिती नाहीये ,

कारण आम्ही आमचे नाते जगजाहीर केलेलं नाहीये ,आणि इतक्या लवकर ते कुणाला सांगायचे नाही

असे आम्ही ठरवले , पण, तुम्ही काय जादू केली कुणास ठाऊक ,

अनुषाने तुम्हाला आमच्याबद्दल सगळे सांगून टाकले आहे म्हटल्यावर ..तुमचा रोल आता आमच्या

इनर ग्रुप मधल्या खास फ्रेंडचा असणार आहे. कारण आमचे सिक्रेट ..फक्त आणि फक्त तुम्हाला

माहिती आहे “, सो, तुम्हाला अगदी हात जोडून रिक्वेस्ट आहे की ..

तुम्ही सुद्धा आमचे सिक्रेट तुमच्या मनातच ठेवायचे , जर का लिक केले , की आमची लव्ह-स्टोरी “

आहे तिथेच कायमची संपेल .

ये दो हंसो का जोडा “ अलग होऊ नये असे जर का तुम्हाला वाटत असेल तर , तुम हमारे सिर्फ –

दोस्त ही नही ..हमराज बन के रहो.

तुमच्यावर विस्वास ठेवून मी आणि अनुषा तुमच्याशी बोलूत , गोष्टी शेअर करनार आहोत ,त्या

तुम्ही ऐकून आम्हाला योग्य त्या सुचना नक्की करीत जावे. यु आर वेलकम !

असो .

अनुषाने तुम्हाला काय काय सांगितले हे मी तुम्हाला विचारणार नाहीये , पण, मी मात्र तिच्याबद्दल

माझ्या मनातील भावना ..आजच्या भेटीत मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे..

मित्र हो –

आमच्या घरातील वातावरणात राहून रिलेशन, रिलेशनशिप “ या शब्दांच्या अर्थाबद्दल माझ्या मनात

फारसा गोडवा शिल्लक नव्हता . आणि ..

ज्या वास्तूचे नावच फक्त – प्रेमालय “ आहे , आत राहणाऱ्या माणसांना एकमेकाविषयी प्रेमच वाटत

नाही ,अशा विरोधभास असणार्या माझ्या घरापासून मी फार लवकर दूर झालो , माणसांपासून

दूर झालो . हेतू एकच निदान वातावरणात बदल झाला म्हणजे .मनस्थितीत फरक पडून बरे वाटेल.

त्यामुळे .मी माझ्या मित्रांच्या सोबत त्यांच्या flatवर राहू लागलो .

बाबांच्या मोठ्या बिझनेस लाईन पासून दूर राहिलो ,कारण बाबांच्या स्वभावानुसार तिथे माझे

आस्तित्व नाममात्र असणार होते ..आणि त्यंच्या सावलीत मी अधिक खुजा होणे “मला अजिबात मंजूर

नव्हते.

काही म्हणा तुम्ही ..मी सागर देशमुखचा मुलगा .त्यामुळे माझ्या स्वभावात त्यांचे गुण थोडेफार तरी

येणारच न. तसा मी मी पण हट्टी, मनाला पटेल तेच करणार , जे ठरवले त्यात तडजोड नाही ,

बदल नाही “ इथ पर्यंत मी बाबांची कॉपी , पण, या स्वभावाचे परिणाम पाहतच मी मोठा होत गेलो

आणि आता मात्र मी माझ्यात अनेक बदल करण्याचा प्रयत्न करीत असतो.माझ्यात समोरच्या माणसाशी संवाद झाले की

..मी माझ्या मताशी कायम राहण्याचा आग्रह सोडून देण्यास तयार असतो.

मला कायम माणसात रमायला आवडते , माणसासाठी धन देण्यास माझा हात कधीच आखडता

नसतो , पण याही पेक्षा माझा अधिक भर ..दुर्लक्षित असणार्या माणसांना मदत करण्याकडे आहे ,

त्यासाठी मी मनापासून तन-धन दोन्हीसाहित तयार असतो .

असे कार्य करीत असणार्या माझ्या काही मित्रांच्या संस्था ज्या अशा सामाजिक कार्यात सक्रीय

आहेत अशा संस्थेत कार्यकर्ता म्हणून मी माझा वेळ आवर्जून देतो . या ठिकाणी आल्यावर

आपली नेहमीची ओळख विसरून जायची आणि सेवाकार्य करायचे “हा नियम मला खूपच आवडला .

तरुणाईच्या उत्स्हास तोड नसते आणि काही मदतीच्या स्वरूपातले कार्य करतांना ही मुले एका

भरवलेल्या , झपाटलेल्या मनाने काम करीत असतात ..मग श्रमदान असो, अन्नदान असो, की

रक्तदान असो ..आमचा ग्रुप या उपक्रमात खूप फेमस होता .

अशा संस्थेत कार्यकर्ता म्हणून येण्यास इतर क्षेत्रातले तरुण-तरुणी कायम उत्सुक असत .

अशा पैकी एक ..मुलगी आमच्या ग्रुपमध्ये आली आहे हे मी पाहिले .

फ्री-लान्स पत्रकारिता करणारी ही मुलगी ..तिचे नाव अनुषा आहे ,हे लगेच कळाले .कारण ग्रुप

मध्ये नवीन असली तरी ..तिचा सगळ्यांशी खूप छान परिचय आहे हे जाणवत होते.

शहरातील एका नामवंत शिक्षण संस्थेत ती मास –कम्युनिकेशन या विषयात PG करीत आहेअसे

कळाले.

आजकाल फटाफट डिप्लोमा करून नोकरी मिळवायचे सोडून .. पदवी घेऊन त्यात पी.जी करून

पुढे पीएचडी पण करणार आहे “ असे ही समजले . एकूण ही मुलगी साधारण नाहीये “

तिचे असे हटकेपण “ मला आकर्षक वाटले होते.

सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या ,संस्थाच्या कार्याचा परिचय , मुलाखती , तसेच लोकांचे

आवडते कलावंत , खेळाडू , असे वलयांकित व्यक्ती ..यांच्याशी “थेट भेटी “, अनेक TV-channelS

ती आयोजित करीत असते , तिच्या कामातील अचूकपणा ,नेमकेपणा आणि तळमळ “ यामुळे

अनुषा “ शहरातील सगळ्या क्षेत्रात लोकप्रिय व्यक्ती होती ..हे काही दिवसातच मला पहायला मिळाले.

आमच्यात सुरुवातीला ..फार वेळा एकमेकासोबत आलो असे झाले नाही ..माझे ऑफिस , त्यातले

बिझीपण यामुळे आमच्या ग्रुपमध्ये मी तसा कमीच असे . पण, जेव्हढा वेळ असेल ,तो सगळा वेळग्रुपसाठी “ यावर माझा भर असे.

ग्रुपसाठी –यातील कार्यासाठी ..सर्वांना सोयीसाठी उपयुक्त म्हणून

आमच्या ऑफिस तर्फे मी एक सोळा सीटर बस दिली होती .बससाठी लागणारा सगळा खर्च मीच

देणार “ हा माझा हट्ट सगळ्या ग्रुपने मान्य केला . त्यादिवशी

अनुषा –पहिल्यांदा माझ्याजवळ येऊन बसली आणि बोलली , बोलण्याचा विषय गृपब्द्द्लचा होता .

तिला माझे ग्रुपमध्ये मिसळून जाणे खूप आवडते, माझे सगळ्यांशी छान जमते .ही गोष्ट तिला आवडली ,

म्हणून ..”मी पण तिला आवडू लागलो आहे “ हे सरळ स्पष्ट सांगण्याचे डेअरिंग तिने आमची

ओळख झाल्या पासून ,मैत्री झाल्या पासून अगदी पाच-सहा महिन्यातच करीत हे सांगून टाकले .

सगळ्यांच्या समोर माझ्याशी फार कमी बोलणार्या अनुशाच्या मनात माझ्या विषयी असे काहीतरी “

आहे “ हे माझ्यासाठी अनोखे होते.

“अभि- तू मला खूप आवडतोस “ तिच्या तोंडून हे ऐकणे “ माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता .

माझ्या मनातील भावना बोलून दाखवण्य इतक्या क्लियर नव्हत्या “ मग, मी काहीच बोलो नाही .

माझ्या बद्दल , माझ्या परिवाराबद्दल जेव्हा अनुशाला कळेल , तेव्हा काय ?

आताचे अनुकूल ,गोड गोड मत .प्रतिकूल झाले तर ?

या भीतीनी मी काहीच बोललो नाही . पण, माझ्या न बोलण्यात्तून सुद्धा तिला हवा असलेला

अर्थ “ अनुशाने बरोब्बर हेरला . आणि आम्ही मनाने खूप जवळ येतो आहोत असे जाणवू लागले.

पण, आपल्यातले हे नाजूक नाते “ समोरच्यांना , घरच्यांना कळू द्यायचे नाही “ कारण अजून

खूप गोष्टी साध्य करायचे बाकी होते . आपल्याकडे ..प्रेम आहे हे कळाले की याचा दुसरा आणि

शेवटचा अंक. “लग्न “ कधी सुरु होतो याची घाई सगळ्यांना झालेली असते.

मित्रांनी – अनुशाने .एकदा मला हॉटेलमध्ये बोलवून सपष्ट शब्दात सांगितले ..

अभी –माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यु ..!

त्या दिवशी मी पण माझ्या प्रेमाची कबुली दिली ,

पण माझ्या मनात भीती ही आहे की ..

अनुशाच्या आई-बाबांना ..मी सागर देशमुख यांचा मुलगा आहे हे कळाले तर ?

कारण बाबा किती ही मोठे बिझीनेसमन असतील पण एक व्यक्ती , माणूस म्हणून परिचित

सार्वजनिक सर्कल मध्ये त्यांची ओळख फारशी आवडावी अशी नव्हती .

तसेच माझ्या आईबद्दल .होते .. तिच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती होती.. की ती .थोडी अधू आहे,

मतीमंद आहे , वरवर नॉर्मल आहे असे दिसत असले तरी .. रोज काय काय होत असेल ?

एक लग्नाळू मुलगा म्हणून कदाचित मी ठीक असेल त्यांच्यासाठी

पण, त्यांच्या मुलीसाठी .मुलाचा परिवार ,त्यातील माणसे .महत्वाचा असतो , शिवाय देशमुख

म्हणजे खूप श्रीमंत माणसे.

अनुशाला मी माझ्या मनातील मोकळेपणाने सांगितले तेव्हा तिनेच मला धीर देत म्हटले ..

अभि- तुझे आणि माझे नाते मी सांगेपर्यंत आपण कुणालाही सांगणार नाही आहोत , फक्त तू

माझ्यावर सोड ..मी काय काय करते हे पाहत रहा , तुला काहीच करायचे नाही ,करणार ते

सगळ मी ,

अभी ..हे तुझ्यासाठी- माझ्या प्रेमासाठीचे असेल रे . विश्वास ठेव माझ्यावर

आता तुम्ही सांगा .. मला तर काही सुचेनासे झाले आहे . माझ्या प्रेमाची परीक्षा आहे ही

आणि परीक्षा देणार आहे ती एकटीच अनुषा .

काय करणार आहे कुणास ठाऊक ही मुलगी ?

पण एक नक्की .. आपण प्रेमात पडावे , कुणावर प्रेम करावे .. आपले जगणेच बदलून जाते ,

अनुशाच्या प्रेमाने एक नवी उमेद दिली माझ्या मनाला . तिच्या प्रेमातील सच्चेपणा

खूप भावतो मला , निर्मल मन ..नितळ आरश्यासारखे ..यात वाईट असे काही दिसणार नाही.

आमच्या प्रेमाची कहाणी कशी फुलत गेली ,आम्ही कसे जवळ येत गेलो हे ऐकायचे न

तुम्हाला ,

हे सगळ पुढच्या भेटीत .

अनुषा भेटणारच आहे म्हणे तुम्हाला .

बाय दोस्त हो ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग- १० वा –लवकरच येतो आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि , देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------