कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ... भाग - ६ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ... भाग - ६

कादंबरी –

प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

भाग- ६ वा

--------------------------------------------------------------------------------

मी अनुषा ,

अभिजित सागर देशमुखची मैत्रीण ...

अगदी खूप जवळची मैत्रीण आहे मी त्याची .

त्याच्या मनातली .. सखी , त्याची ड्रीम गर्ल...स्वप्न सुंदरी.. वगेरे वगरे.. असे खूप काही बोलतो

कधी कधी ..मूड मध्ये असला म्हणजे .

मला पण हा अभि..कभी कभी नाही .हो .

आधीपासूनच तो आवडतो मला ,अगदी आमची घट्टमैत्री होण्याच्या आधी पासून आवडायचा

आम्ही कोलेजला असतांना पासून .

अगदी “पेह्ली नजर मे..मुझे तो प्यार हो गया .. पण, असे पाहून ज्याच्यावर आपले प्रेम जडते “,

त्याचा प्रतिसाद मिळतो की नाही ? ही मनात भीती ,

त्याचे ही माझ्यावर प्रेम असले तर ठीक ..आणि त्याच्या मनात असे काही बिलकुलच नसेल तर ?

असे हे एकतर्फी प्रेम करीत झुरायची माझी मुळीच तयारी नव्हती .

हा –अभिजित आपल्याला नेहमीसाठी खूप खूप आवडतो आहे “ हेच आपले प्रेम आहे “,

या प्रेमाविण व्यर्थ हे जीवन “, असे काहीच्या काही सुचू लागल्यावर मात्र मी ,अभिमध्ये इंटरेस्ट

घेऊ लागले

त्याचे माझे शिक्षण वेगळे , आवडी-निवडी बर्याच सारख्या आणि काही बिलकुलच वेगळ्या ,

माझ्यासाठी सोयीचे एकच होते ..ते म्हणजे .. आमच्या दोघांची कॉलेज एकाच कॅम्पूस मध्ये होती .

अभिच्या सहवासात जसे जसे येत गेले , तशी त्याची नवी नवी ओळख होत गेली .

आपल्या सोबतच्या वर्गात शिकणार्या पोरा-पोरींच्या सोबत मैत्री नको “, यावर दोघांचे पक्के एकमत झाले “

वर्गात असे पर्यंत हे सगळे मित्र , पण, एकदा वर्गाच्या बाहेर पडले के बस, हम इधर –तुम उधर “

तेच ते विषय , कुठे ही जा .. नेहमी गोसापिंग .. तेच-ते काही फरक नाही . जाम बोरिंग कंपनी “,

“ यामुळे तर माझी पक्की खात्री झाली , अरे यार “ यही बंदा अपने लिये है.

कॉलेजमध्ये असल्यापासून जरा हटके “ असणार्या मुलांच्या टोळीचे .ग्रुपचे अभिला खूप आकर्षण ,

अशी वेगळी ,काही नवे करू पहाणारी पोर-पोरी म्हणजे माझ्या जर्नालिझम –कोर्स साठी खूपच पूरक .

त्यामुळे माझे प्रोजेक्ट .आणि रायटिंग “ इतरांच्या पेक्षा खूप वेगवेगळे करण्याची एक लेखन –नजर

आली . आणि डिग्री हातात येण्या अगोदर पासून माझे लेख पेपर ,आणि मासिकातून प्रकाशित

होण्यास सुरुवात झाली “ त्यामुळे कॉलेजमध्ये मी एक हटके “असणारी मुलगी म्हणून फेमस झाले.

तसे तर ..आमच्या दोस्त –कंपनीला ..म्हणजे अगदी क्लोज फ्रेंड्सन सुद्धा अजून

आमच्यात मैत्री-पेक्षा अजून जास्त काही तरी असेल याची खात्री नाही-

कारण .बाहेरच्या जगात ..आम्ही सगळेच मित्र अगदी फ्रेंडली वागतांना दिसत असलो

तरी ..सगळ्यांना –सगळ्यांचे- सगळेच माहिती असते “,असे मात्र मुळीच नाही.

माझ्या आणि अभिच्या मैत्रीचे असेच आहे..

एक प्रोब्लेम मात्र आहे मित्रांनो ..लक्षात घ्या ..

हे असे आमचे नाते ..तुम्ही सोडून कुणाला ही माहिती नाहीये बरे का .

म्हणून यापुढे तुम्ही पण आपले हे सिक्रेट शेअर नाही कुणाला असे प्रोमीस करा .

तरच मी तुमच्याजवळ माझे मन मोकळे करू शकेल .

हो ,मन मोकळे करता आले पाहिजे माणसाला ,

त्यासाठी आपली माणसे भोवताली असावी लागतात . असे नसेल तर ,किती तरी

व्यक्ती मनावर ओझे घेत तसेच जगात असतात ,

एकटे- एकाकी , होऊन आयुष्य जगावे लागणे “,

माणसाला या पेक्षा मोठी शिक्षा असूच शकत नाही “ असे मला नेहमीच वाटते .

म्हणूनच मी नेहमी सांगते माझ्या जवळच्या लोकांना ..

ज्याला सगळ्यावर प्रेम करता येते ..त्यालच जग जिंकता येते ..

फक्त स्वतःवर प्रेम करीत जगणारा – माझ्यामते ..”एक स्वार्थी माणूस असतो ..अ सेल्फिश अभिला ..

माझे असे वेगळेपण “ अभिजीतला आवडले असावे .. तो आमच्या वेगळ्या धाटणीच्या ग्रुप मध्ये

तो नियमित येऊ लागला . आणि आमच्यातली मैत्री हळूहळू वाढत जाऊ लागली.

माझ्या भावना त्याला कळाव्या यासाठी मी सतत सुचकपणे त्याच्याशी बोलायचे .

पण, हा गडी त्याच्या चेहेऱ्यावर काहीच दिसू द्याचा नाही. कोरा करकरीत चेहेरा ,

मलाच त्याचा राग यायचा .

अभि..मित्रांच्या समोर काहीही बोलायचा नाही, मग, त्याच्या मनातले कळायचे दूरच .

असे प्रसंग किती तरी आले की ..

त्याच्या बाईकवर बसून मी माझ्या एखाद्या पेपरच्या ऑफिसला गेले .

कधी त्याच्या कार मध्ये सुद्धा त्याने रात्री उशिरा माझ्या घरी सोडलेले .

कार चालवतांना सगळ्या दुनियेच्या गप्पा करील ,

पण, माझ्याबद्दल .चकार शब्द नाही बोलणार कधी ..

माझ्या दिसण्याची , माझ्या असण्याची ..तारीफ वगरे करणे “ असंभव ..!

मी मनात ठरवायचे आपणच डायरेक्ट विचारू या –

अभि-

ज्या अर्थी तू मला तुझा इतका वेळ देत असतो , माझ्याबद्दलची काळजी दाखवून “,

कुठे जायचे ? असे विचारून तिथपर्यंत सोडतो “,

ये सब क्या है बच्चू ?

हे सगळे विचारणे राहूनच जायचे....

त्याच्या मनातले कळायला मात्र मला खूप वाट पहावी लागली .

तसा हा माणूस फार खडूस ..आतल्या गाठीचा ..पत्ता लागू देत नाही ..त्याच्या मनात काय

चालू आहे याचा .

पण , मजा असते न ..आपल्यावर खूप प्रेम करणारा ..एक मित्र ..

आपल्याला हवा असलेला असा ”मनातला माणूस होतो “

तेव्हा , या जगात आता कुणाचीच गरज नाही ..!असे पण वाटू लागते , किती मस्त ना !

प्रेमाविन व्यर्थ हे जीवन ..अगदी खरे आहे बरे का ..

अभिच्या प्रेमाने मला याची जाणीव करून दिली ..

अभीवर माझे मनापासून प्रेम आहे ,हे त्याला माहिती आहे ,मेरे लिये यही काफी है

अभि..लव्ह यु रे ......

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात –

भाग- ७ वा लवकरच ..

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि. देशपांडे – पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------