कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग - ८ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग - ८

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग -८ वा

-------------------------------------------------------

हेल्लो , मी अनुषा

अभिजित सागर देशमुखची मैत्रीण , मागच्या वेळी एका फंक्शनमध्ये आपली भेट झालेली ,

त्यावेळी खूप छान गप्पा झाल्या आपल्या .

आठवतंय की नाही ?

मला माहिती आहे ..तुम्ही मला चांगलेच लक्षात ठेवले आहे.

त्यादिवशी मी माझ्याबद्दल तर सांगितलेच तुम्हाला आणि माझ्या लव्ह-बॉय बद्दल – म्हणजे अभिजित

बद्दलसुद्धा सांगितले तुम्हाला

कुणाला सांगायचे नाही “ या बोलीवर .

आमचे हे सिक्रेट मी फक्त तुम्हाला सांगितलाय ,

तुम्ही जर का हे लिक केलात ना !

खूप मोठा गोंधळ होईल .

तुम्ही म्हणाल मला -

अनुषा -..कधी ना कधी तरी तुमचे हे बिंग फुटणारे आहेच की ,

तुमचे अफेअर आहे ना ?झाले तर , मग घाबरायचे काय त्यात ?

प्यार किया तो डरना क्या ?

दोस्तो हो , तुमचे सगळे प्रश्न मला मान्य आहेत . का लपवून ठेवायचे मी माझे प्रेम ?

अहो ,त्याचेच कारण मी तुम्हाला आपल्या आजच्या भेटीत सांगणार आहे.

मग ऐका तर ,

सुरुवातीला आमच्या भेटीत मला अभी फार रिझर्व्ह वाटला होता , त्याचे वागणे ..जरी छान पद्धतीचे

आहे, तरी झालेल्या ओळखी , परिचय अधिक वाढवण्याची उत्सुकता त्याला फारशी नसते “ हे मी

पहात होते .

अभिचे सगळे मित्र त्याच्या बिझनेस लाईनचे होते ,त्यातील फार कमी जणांना इतर गोष्टींची

आवड होती , अशा मोजक्याच पाच-सहा जणांनी अभिला आमच्या ग्रुप मध्ये घेऊन येण्यास सुरुवात केली

जे आधी पासूनच आमच्या ग्रुपमधले मेम्बर होते .

दर आठवड्याला आम्ही सगळे मेम्बेर्स येण्याचा जास्तीत पर्यंत करीत असतो , ज्याला नाही

जमले , तो नाही आला तरी त्याला माफी .पण, खोटी कारणे देऊन ग्रुपला ,मित्रांना टाळायचे नाही “,

हा नियम सगळ्यांना पाळणे बंधनकारक होते . याचा परिणाम असा व्हायचा की, अगदी मजबुरी

असणारच यायचा नाही , बाकी सगळे न विसरता हजर.

आपण जी नोकरी करतो , ज्या बिझनेस मध्ये आहोत , त्याबद्दल ..स्वतःच्या बढाया मारायच्या

नाहीत , स्वतःची टिमकी वाजवायची नाही “ या गोष्टीला बंदी होती.

एखदा मेम्बर खरोखरच प्रोब्लेम मध्ये असेल , त्याला अडचण असेल तर मात्र आमच्या सगळ्यांचे

मदतीला पुढे असायचे .

या ग्रुप मध्ये चालती-फिरती मिडिया पर्सन मी होते , साहजिकच माझे सर्कल खूप मोठे होते.

माझ्या एका कॉलवर ..अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणारे सगळ्या फिल्ड मधले माझे मित्र

मदत करीत .

मुख्य म्हणजे ..आपण ज्या समाजात राहतो , त्यातील दुर्लक्षित लोकांच्या साठी काही केलेच पाहिजे “,

हा विचार
कृतीतून आणण्याचा प्रयत करणारे मित्र “माझ्या या ग्रुपमध्ये आहेत याचा मला खूप अभिमान आहे.

तर हे या सांगायचे प्रयोजन यासाठी की..

अभिजितला या सोशल वर्कची खूप आवड आहे , ग्रुपसाठी ,यातील उपक्रमासाठी तो खूप वेळ देतो “

हे मी पाहत होते . त्याचा हा गुण मला आवडला .

मी त्याच्याशी अधिक ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू लागले आहे “, हे अभिने लगेच ओळखले ,

त्यानी –मला एकदम झटकून टाकले “असे तर केले नाही ,

पण, फार जवळीक वाढणार नाही इतके अंतर “

तो जाणीवपूर्वक ठेवतो आहे हे माझ्या लक्षात आले.

हे जाणवले ,तसा मला रागच आला अभिचा .. गेलास उडत !

मी एक मुलगी असून ..पुढे होऊन दोस्ती वाढवते ..आणि हा खुशाल दूर दूर करतोय मला .

पण म्हणतात ना , प्यार वो जादू है , चल ही जाता है !

वेळोवेळी भेटी होत जाण्याने आमच्यातला दुरावा कमी कमी होत गेला आणि संवाद वाढत गेला .

माझ्यात आणि अभी मध्ये एक नवे नाते रुजते आहे ,आणि ते अधिक वाढावे “असे आम्हाला

दोघांना वाटते आहे “, हे एकमेकांच्या सोबत असतांना जाणवू लागले .

कळत-नकळत होणारे पुसटते – निसटते स्पर्श “, मनात होणारी धाकधूक ..बरीच कमी झाली होती .

कारण स्पर्श खूप बोलके असतात “असे मी ऐकले होते , ते कसे आणि किती बोलके असतात

याची गोड अनुभूती ..अभिच्या सहवासात मी अनुभवू लागले .

चेहेरा कितीही कोरडा ठेवून वागले तरी ..नजर वेगळेच काही सांगते “,झालेला स्पर्श खूप काही

सांगतो “, न बोलता ही अभिच्या नजरेतून तो खूप काही सांगतोय असे मला वाटायचे .

पण ,न बोलणे , मनातले मनात ठेवणे , बोलून दाखवले तर जग बुडेल की काय ?

असेच अभिच्या मनाला वाटत असते ,म्हणून स्वारी काही न बोलता खूप काही सांगते ,

त्याचे हे असे निशब्द , मूक- प्रेम ..माझ्या मनावर गारुड करू लागले “,

माझ्या मनाने तर कधीच माझ्याजवळ कबुली दिली होती ..

अनुषा – यही ही तेरा मेहबूब .

प्यार तो दुनिया से छुप कर किया जाता है !

आमचे ही तसेच होते ..चोरी –चोरी , चुपके –चुपके “ आमची लव्ह –स्टोरी दिवसे दिवस घट्ट

होत जाते आहे ..असे मी समजत होते ..

कारण ..अजून एकदा ही ..

चहाच्या टेबलावर . बोलतांना , किंवा ..संध्याकाळी ..असेच फिरतांना ..हात हात घेऊन

आम्ही एकमेकांना एकदा ही आय लव्ह यु !

म्हणालो नव्हतो .

मना मध्ये ..ना ना नाहीये ..पण.. यस यस ..असे पण सांगायचे होते अजून .

ते तर होईल ...कारण आपण एकमेकासाठी आहोत , made for each other …!

यावर आमचे अगदी एकमत आहे ..याची खात्री होती मला .

हे असे सगळे चालू असतांना ..आम्ही आमच्यात इतके गढून गेलेलं असायचो की ..

कधी कधी मला वाटायचे .. यार , या अभीला समोर बसवून एकदा आपणच प्रपोज केले पाहिजे ,

सोक्ष –मोक्ष लावून टाकू या . एकतर्फी समजून काय फायदा ..आहे आहे “ म्हणून खुश व्हायचे.

तसे पाहिले तर ..आमच्या पारिवारिक आयुष्याबद्दल आम्ही एकमेकाशी काहीच शेअर केले नव्हते .

त्याच्या घरच्यांना ..मी आवडेल का ? त्या घरातील माणसे कशी असतील ? आपले जुळेल का ?

एक न अनेक ..प्रश्न मी स्वतःलाच विचारात असे.

माझ्या आई-बाबंना माझी निवड न आवडावी असे काहीच नव्हत , एक योग्य उपवर –मुलगा

म्हणून अभिजित कुणालाही आवडावा असाच आहे.

आमच्या घरात एक बर आहे..

बाबा आणि आई ..दोघे ही नोकरीवाले ..सगळ्या लोकात राहून , मिसळून त्यांचे विचार तसे

खूप मोकळे आहेत . वाद , वितंडवाद ,एखाद्या मतासाठी विनाकारण आग्रह , असे काही करण्याचा

दोघांचा स्वभाव नव्हता .

मला त्यांनी मोकळीक दिलीय म्हणजे ..त्यांचे माझ्याकडे दुर्लक्ष आहे, असे समजू नका “

ते माझ्या कामाबद्दल कायम अपडेट असतात .

म्हणून मला एका परीने वाटते की. इतर कुणी सांगण्यापेक्षा ..मी स्वतहा त्यांना ..माझ्या आणि

अभीच्या रिलेशन बद्दल मोकळेपणाने सांगावे..

पण इथे घोळ असा आहे की ..

आमच्यात अजून मोकळेपणान सांगायचा दिवस उजाडायचा आहे.

कधी उजाडेल सांगता येत नाही

आपापल्या कामाच्या दिवसात मात्र आम्हा दोघांना अजिबात वेळ मिळत नाही , फोन वर

बोलणे जमत नाही ,तिथे समक्ष भेटून बोलणे तर दूरच .

तरी एखादि सुखद संधी अवचित मिळायची ..मी माझ्या कामा निमित्ताने फिरू लागले

आणि अभीच्या ऑफिसच्या जवळपास असेल तर , त्याला प्रयत्न करकरून कॉल लावायचे ,

महाराज्ना बोलायचे .. मी अगदी बाजूच्या कॅफेमधून बोलते आहे , फक्त थोड्या वेळासाठी

ये ना प्लीज.

सुरुवातीला , तो येतच नसायचा , पण अलीकडे येतो , म्हणत नाही ,येतो कागेच.

त्यादिवशी ,अशीच मी त्याच्या एरियात होते , त्याला बोलावले , तो येई पर्यंत ,मी ठरवले ..

आज याच्याशी बोलायचे , विचारायचेच .. जो होगा सो होगा ..

आणि आला की अभिजित ..

त्याच्याकडे मी पाहतच राहिले ..

किती छान दिसत होता आज तो ..लाल टी –शर्ट,

मस्त डार्क ब्ल्यू जीन , भारी स्पोर्ट्स शूज .. एकदम किलर..

खुर्चीत बसत ..तो म्हणाला .. काय , आज पहिल्यांदा पाहते आहेस की काय मला ?

इतक्या कौतुकाच्या नजरेने पाहिलेस ..मीच लाजायला हवे आता !

त्याचे बोलणे ऐकून .मी म्हणाले ..अरे वा ..तुला इतके छान बोलता येते. ग्रेट.

बर बोल .. आज काय विशेष ..मला बोलावले आहेस ..?

अभिने मला विचारत म्हटले -

जरा गंभीर होत ..मी म्हणाले ..

अभि.. एकमेकांच्या मनातले न बोलता जाणवून घेणे आता पुरे झाले .

आपले हे नाते ..असे अर्धवट नकोय , मी फार ओक्वर्ड फील करते नेहमी .

त्याचा हात हातात घेत मी म्हणाले

अभी ..आय लव्ह यु ..!

डू यु ?

मी असे आणि इतके स्पष्टपणे बोलून दाखवील याची अजिबात कल्पना नसल्याने

अभीला नाही म्हटले तरी आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता .

माझ्याकडे तो काही क्षण फक्त पहात राहिला ..पण चेहेर्यावर गोंधळ दिसत नव्हता त्याच्या ,

हे मला सुचिन्ह वाटले .

या वेळी त्याने माझा हात हातात घेत .. म्हटले ..

यस , अनुषा , आय लव्ह यु टू..!

हे गोल्डन शब्द , अडीच अक्षरे की काय म्हणतात ती प्रेमाची ..एकदाची कानावर पडली .

मी मला आणि अभिला चिमटा काढत म्हटले ..

ओएम्जी -..हे स्वप्न नाहीये , हकीकत है .

थांक्यू अभी ..

अनुषा , आपण एकमेकांना प्रेमाची कबुली तर दिलीय , आता इथून पुढे तर तुझ्या माझ्या

प्रेमाची परीक्षा सुरु होणार आहे. जेव्हा आपण आपल्या फमिली बद्दल जाणून घेऊ , त्याबद्दल

सांगुत , त्या नंतर मात्र आपल्या प्रेमाच्या भावनेत काही फरक पडणार नाही..

आपण शेवट पर्यंत एकमेकांचे राहू ..प्रोमीस करशील अनुषा ?

अभिचा हात घेत मी म्हणाले -

अभि.. आपल्या प्रेमासाठी ,तुझ्यासाठी ..आपल्या प्रेमात कितीही कटु आणि कठोर प्रसंग आले तरी

मी तुझ्यासोबत सावली सारखी असेल.

अभी ..मी मनापासून प्रेम क्रेत आहे तुझ्यावर .. तुझ्या प्रेमाविण व्यर्थ आहे हे जीवन ..!

अनुषा .. तू अजून स्वप्न दुनियेत आहे ,आता जमिनीवर ये आणि वास्तवातल्या जगातील

माणसाना जाणून घे . मला भीती वाटते ..की ..माझ्या बद्दल तुला कळेल , माझ्या घरातील

माणसांच्या बद्दल समजू लागेल ..तंव्हा तुझे मन बदलू देऊ नकोस .

अभिच्या बोलण्यावर मी म्हणाले -

हे बघ ..असून असून काय होईल ..मला तुझ्या घरून स्वीकारणार नाहीत , तुझ्या माझ्या प्रेमाला

विरोध होईल ..तरी माझी तयारी आहे परिस्थितीला सामोरी जाण्याची.

अभि इतकी प्रतिकूल असेल तर ..एक काम काम करू या ..

आपण आपले नाते आत्ताच जगजाहीर नाही करायचे . योग्य वेळी सांगू या .

पण ..माझी एक अट आहे .. तू माझ्यावर सोपवावे , बघ ,मी तुझ्या घरून सुद्धा कसा

होकार मिळवते ते ..

अनुषा ,तसे नाही, तू ऐक तर , मी प्रसिध्द उद्योजक सागर देशमुख यांचा मुलगा आहे,

त्यांच्याशी कुठला ही संबंध नसलेला , कारण त्यांनीच मला बे-देखल केले आहे .

मी त्यांच्या सोबतपण नाही राहत , मी माझ्या मित्रांच्या सोबत राहतोय.

आणि या सागर देशमुख यांचे मन बदलणे , मत बदलणे ..हा चमत्कार घडणे अशक्य आहे.

अभिची हे माहिती ऐकून मला क्षणभर धक्काच बसला .

एवढ्या मोठ्या माणसाचा हा मुलगा , बाप रे ..

अनुषा ,कठीण आहे ऑपरेशन ..सागर देशमुख .

हे बघ ..अभि.. तुला माझ्या घरचे ओळखत नाही ,आणि मला तुझ्या घरचे ..

याचा फायदा मी घेणार , तो कसा ..ते तू फक्त पाहत राहा आता ..

अपने प्यार पे भरोसा रखो ..

तू जा तुझ्या ऑफिसला , आता येते काही महिने ..आपण एकमेकांना समक्ष भेटायचे पण नाही,

अनोळखी म्हणून वावरायचे , मित्रांच्या मध्ये सुद्धा असेच.

बाय ..भेटू रे

बाय - माय डियर अभि..

-----------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात

भाग -९ वा लगेच येतो आहे.

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि .देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------