कादंबरी- जिवलगा .. भाग - १६ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा .. भाग - १६

कादंबरी जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे

-----------------------------------

कादंबरी – जिवलगा ..

भाग- १६ वा

---------------------------------------------------

कंपनी आणि जॉब जॉईन करून आता नेहाला पंधरा दिवस होऊन गेले होते .पहिले दोन-चार

दिवस टाईम-टेबल सेट होण्यास वेळ लागला होता . त्यासाठी घड्याळाशी दोस्ती करावी लागली ,

स्वतहाला थोडे जास्त अलर्ट व्हावे लागणार “याची जाणीव होताच नेहाने नव्याने काय काय

करायचे ? याची लिस्ट तयार केली आणि त्याप्रमाणे दिनक्रम सुरु केल्यावर मात्र ..तिची गाडी रुळावर आली,

मावशी आणि काका ..त्यांच्या ठरलेल्या तारखेला परदेशी रवाना झाले, त्यांना एअर-पोर्टपर्यंत

सोडण्यासाठी मधुरिमासोबत नेहा पण गेली होती. एअरपोर्टकडे जातांना नेहाच्या मनात विचार येत

होते .. माणसाच्या नशिबात काय नि कसे कसे योग असतात ? ..ते त्याच्या वाटयाला आल्याशिवाय काही कळत नसते हेच खरे .

आता आपलेच पहा ना !

लहानपणी आजूबाजूच्या गावी जायचे असे तेव्हा अगदी लहानपणी ..लाल डब्याच्या गाडीत बसून जायचे ,मग

त्यातून उतरायचे , मेन रस्त्यापासून गाव आत असायचे ..मग, त्यासाठी वाड्यावरची गडी-माणसे बैलगाडी

घेऊन आलेले असायचे , त्यात बसून घरापर्यंत जायचे ,कित्ती छान वाटायचे .

.खिल्लार्या बैलानाची जोडी ..

लाल रंगाचा –लाल्या , पांढर्या रंगाचा – ढवळ्या “मस्त बैल –जोडी गावात दुसरी नव्हती . मुलांना ही

गोडी खूप असायची.

रस्ते सुधारले, गावे आधुनिक झाली ..बैल-गाड्या जाऊन फाट्यावर डीझेलवर चालणारे ऑटो उभे राहू

लागले , मग पंधरा –वीस किलोमीटर पर्यंत पळणार्या काळ्या –पिवळ्या जीपा आल्या . त्यात इतकी

माणसे गर्दी करून बसायची की ही जीप पालटली तर काय होईल ? अशी भीती मनात चमकून जायची.

नेहाच्या घरी ..अशा जीप मध्ये बसून प्रवास करण्याची कल्पना सुद्धा केली जात नसायची .

जसे जसे दिवस बदलत गेले ..आपण मोठे होत गेलो .. मोटर –सायकली आल्या , अगदी लहान गावात

चार-चाकी मोटार-गाड्या दारासमोर उभ्या असल्याचे दिसू लागले .

लहानपण जाऊन मोठे होण्याचे वय आले की “ ,आगोदर आज्जी- आजोबांचे गाव दुरावते ,पण ते दिवस

आणि त्या आठवणी .मनात कायम असतात , आठवून डोळ्याच्या कडा ओलावतात.

नेहाने हळूच डोळ्याच्या काठी जमा झालेले पाणी पुसून टाकले , मधुरिमा खिडकीच्या बाहेर पाहते आहे”,

हे दिसले आणि नेहाला बरे वाटले .

इतके दिवस झाले ,आपण रेल्वे , बस, फमिली कार , दू-व्हीलर , ते अगदी बैलगाडी “अशा सगळ्या प्रकारच्या वाहनातून प्रवास केलाय ,

आता राहिलंय ते विमानात बसून प्रवास करणे. ते पण होईल कधी तरी.

आज पहिल्यांदा विमानतळावर तर जायला मिळते ..हे काय कमी आहे.

तिथेगेल्यावर समजले की.. मावशी आणि काकांना फक्त आत जायला मिळणार आहे, सगळे सोपस्कार

आणि विमान निघण्यास ..वेळ आहे ..अगदी मध्यरात्री आहे त्यांची फ्लाईट.

आत जायला मिळणार नाहीये ,आणि इतका वेळ थांबणे पण शक्य नाहीये “,

मावशी आणि काका म्हणाले ..

तुम्ही दोघी निघा आता, घरी जाईपर्यंत उशीर व्हायला नकोय . आम्ही आत जाऊन बसतो निवांत .

आम्हाला आता सगळ पाठ झालय .त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त निघा .

मावशी मधुरीमाला म्हणाल्या –

तू नेहाची काळजी घेशीलच ,मला खात्री आहे . तुला सुद्धा पुढच्या काही दिवसात परदेसी

जाऊन याचे आहे . त्या अगोदर ..नेहासाठी एखादे लेडीज –होस्टेल बघ, जॉब-वाल्या मुली आणि

लेडीज सुद्धा असतात अशा ठिकाणी .

नेहाला या ठिकाणी ..तू येई पर्यंत राहू दे ,

कारण ,आपल्या एवढ्या मोठ्या बंगल्यात एकट्या

नेहाने राहणे बरोबर नाहीच , आपली काळजी आपणच वाढवणे बरोबर नाही.

मधुरिमा – तुझ्या मैत्रीणच्या मदतीने उद्याच अशा होस्टेलचा शोध घेऊन नेहाच्या राहण्याची

व्यवस्था करशील , म्हणजे मोठ्ठे काम होईल ,आणि तू जाण्याच्या ऐन दिवसात हे काम

घाई-घाईत करणे बरोबर नाही.

हो मावशी ..माझ्या लक्षात आहे या सगळ्या गोष्टी .

तुमच्या इतकी काळजी जरी नाही घेऊ शकत , थोडी तरी काळजी घेईनच की मी .

मधुरीमाचे बोलणे ऐकून ..काका म्हणाले ..

खरेतर ..नेहाला असे लेडीज –होस्टेल मध्ये राहावे लागणे ..मला पटलेले नाहीये , कारण

तिच्या घरच्यांना या गोष्टी सहजा सहजी पटणार नाहीये .

पण, प्रोब्ल्र्म असा आहे की ..तू सुद्धा नेमकी याच दिवसात जाते आहेस , आणि तुला जायचे

आहे महिन्याभरासाठी , पण काय सांगता , बाहेरगावी गेलेला माणूस परत कधी येईल ,काही

भरवसा नसतो . म्हणून काळजी वाटते , की तुला उशीर लागला तर

नेहाला जास्त दिवस होस्टेलवर राहावे लागेल.

मावशी आणि काका ,काही काळजी नका करू , तुम्ही तुमचा प्रवास ,तिथला मुक्काम

एन्जोय करा . नेहाला एकटी “पडू देणार नाही मी . लगेच येईन परत इकडे.

आणि आपल्या घराकडे लक्ष देण्यास ..मी माझ्या दोन मुलांना .म्हणजे फ्रेंड्स ना सांगून

ठेवलाय ..की अधून –मधून रात्रीच्या वेळी मुकामास येऊन राहत जा .घरात लाईट लागलेले

पाहून बाहेरच्या माणसाना कळते ..की हे घर बंद नाहीये . कुणी ना कुणी असते.

हे ऐकून – मावशी म्हणाल्या ..

मधुरिमा – हे बाकी छान केलेस. आम्ही निश्चिंत मनाने जाऊन येतो .

तुम्ही काळजी हेत रहा . मोबाईलवर रोज बोला म्हणजे बरे वाटेल.

चला , निघा आता , उशीर नका करू.

मावशी आणि काकांचा निरोप घेऊन ..नेहा आणि मधुरिमा घराकडे परत निघाल्या .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ...

भाग-१७ वा ..लवकरच तेतो आहे...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी - जिवलगा ..

ले- अरुण वि.देशपांडे - पुणे.

9850177342

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------