Addiction - 2 - 19 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 19

गावात मृणालबद्दल फक्त चर्चा सुरू नव्हती तर तिच्यावर वेगवगेळे आरोप देखील लावल्या जात होते ..अजिंक्य / मृणालचे ज्या - ज्या व्यक्तींसोबत वाद होते त्यांनी तर होत नव्हतं सर्व सांगायला सुरुवात केली ..त्यात अजिंक्यचे मित्र देखील होते ..त्यांनीही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी उघड करण्यास सुरुवात केली ..संबंध चांगले असताना चांगल्या मित्रांना सांगितलेल्या गोष्टी संबंध बिघडल्यावर पसरायला मात्र वेळ लागत नाही आणि हेच त्यांच्यासोबत होत होतं फक्त याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हत ..गावात वाऱ्याच्या वेगाने जरी ही गोष्ट पसरली होती तरी अजिंक्यच्या घरी मात्र पोहोचली नव्हती .तेवढे दिवस तरी त्यांच्या घरी प्रेमाचं , सलोख्याचे वातावरण होते ..पण आता तोही क्षण येणार होता जेव्हा आपलीच नाती आपल्याला काही प्रश्न विचारनार होती आणि अजिंक्य - मृणालकडे उत्तर असतानाही त्यांना शांत राहावं लागणार होतं ..

अजिंक्यच्या आईला गावात नक्कीच काहीतरी गोंधळ सुरू आहे असं जाणवू लागल पण तिला कुणीच काहीच जाणवू दिलं नव्हतं ..इकडे अजिंक्यच्या काकांचा छोटा मुलगा मित्रांमध्ये गप्पा मारण्यासाठी निघाला होता ..तों तिथे पोहोचण्यापूर्वी मित्रांमध्ये त्याच गप्पा सुरु होत्या ..तो मागून येत आहे याबद्दल कुणालाच काहीच कळाल नाही आणि ते बोलत राहिले .,..तो जवळ गेला आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं तोपर्यंत त्याने काही शब्द ऐकले होते ..अर्थात त्याला त्याचा पूर्ण अर्थ कळला नव्हता ..त्याला ऐकू गेलं असेल म्हणून सर्वच हळूहळू तिथून निघू लागले ..फक्त आता तिथे एकच व्यक्ती उरला होता ..तो म्हणजे त्याचा जिवलग ..सुरजने ( काकांचा लहान मुलगा ) त्याला थांबविले ...दोघाणीही नेहमीप्रमाणे सिगारेट घेतली आणि सुरज त्याला विचारू लागला .., " काय रे काय बोलत आहेत होते ते सर्व ? मला सर्व काही एकू आलं नाही पण इतकं कळाल की ते आमच्याबद्दलच बोलत होते आणि मी आलो म्हणून लगेचच पळून गेले .." आणि तो म्हणाला , " नाही रे अस काही नाही ..सहजच गेले ते .." , तो म्हणाला आणि त्यावर सुरज म्हणाला , " भावा इतके वर्ष राहतोय तुझ्यासोबत एवढं कळतं मला तू खर बोलतो आहेस की नाही तर ..सांगायच नाही तस म्हण ...जाऊ दे आपण कोण म्हणा तुझे ? " मित्र त्याला समजावत म्हणाला , " नाही यार अस काहीच नाही ..बर सांगतो पण मला नाही वाटत तुला विश्वास बसेल म्हणून सांगत नाही आहे .."

सुरज म्हणाला , " सांगून तर बघ !! मग विचार करू त्यावर .." आणि तो हिम्मत करून बोलू लागला , " आपल्या गावात एकच अफवा आहे की तुझी वहिनी वैश्या आहे ..अर्थात त्याचे विडिओज आहेत सर्वांकडे ..तसे विडिओ डिलीट केले पण सर्वांनी आधीच डाऊनलोड केल्याने काहींकडे ते तसेच राहिले.." हे ऐकून सुरजला धक्काच बसला ..त्याने हातातली सिगारेट फेकून दिली आणि त्याच्या हातातले विडिओज पाहू लागला ..तोही एकावर एक व्हिडिओ पाहत होता ..विश्वास तर बसत नव्हता पण चेहरा साफ दिसत असल्याने त्याला शंका घेणे शक्य नव्हते ..त्याने मोबाइलमध्ये विडिओ घेतले आणि सरळ घराकडे निघाला ..

रस्त्यावरून चालताना सुरजच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले ..घरच्यांना सांगणं योग्य की अयोग्य यावरून त्याच्या मनात वाद निर्माण झाले होते पण गोष्ट फारच मोठी असल्याने त्याने घरी सांगणंच योग्य समजलं ..आज कालच्या जमान्यात असे फेक विडिओज बनवता येतात हे सुरजला माहिती होत त्यामुळे अस काही असेल तर आपल्याला त्यावर काहीतरी करता येईल अस त्याला वाटत होतं म्हणून तो घराकडे पटापट जाऊ लागला ..शेवटी तो घरी पोहोचलाच ..पटापट चालत आल्याने त्याला दम लागला होता ..त्याची आई आणि अजिंक्यची आई त्यांच्याच घरी बसले होते .सुरजच्या वागण्यावरून त्यांना काहीतरी चुकीच घडलं आहे असं वाटत होतं ..त्यामुळे त्याला आधी पाणी दिलं आणि शांत होत त्याने सर्व हकीकत सांगितली ..सुरजने स्वतः डोळ्याने ते व्हिडीओज पाहिले असल्याने त्यांनी त्याच्यावर शंका घेतली नव्हती ..सुरजने आपलं बोलणं पूर्ण केलंच नव्हतं ..त्याला सांगायचं होत की असे फेक व्हिडीओज पण बनू शकतात पण काही बोलण्याच्या आधीच अजिंक्यच्या आई रागातच घरी पोहोचल्या ....
आज रविवार असल्याने मृणाल निवांत काम करत बसली होती तर अजिंक्य बाहेर फिरायला गेला होता ..प्रज्ञा देखील घरात टीव्ही पाहत बसली होती ..आईला फारच राग आला होता ..तरीही प्रज्ञा घरात असल्याने ती काहीच बोलली नव्हती ..सुरजने आधी प्रज्ञाला आपल्या घरी नेऊन बसविले आणि परत आला ..आई रागा - रागातच मृणालकडे गेल्या आणि तिचा हात धरून हॉलमध्ये घेऊन आल्या ..आईने तिचा हात इतका घट्ट पकडला होता की तिला त्याचा त्रास होऊ लागला ..दोघेही हॉलमध्ये पोहोचले..त्याबरोबरच सुरज त्याची आई , बाबा सर्वच तिथे जमा झाले ..मृणालला काय घडत आहे याची जरासुद्धा कल्पना नव्हती आणि सर्वाना एकत्र बघून ती घाबररून गेली ..तेव्हाच आईने तिला सरळ प्रश्न केला , " तू वैश्या आहेस ? " ..प्रश्न ऐकताच तिचे हात पाय थरथरायला लागले ..तिची दातखिळी बसली ..आणि आईने पुन्हा एकदा रागाने प्रश्न केला , " मृणाल मी काय म्हणाले ऐकू येत आहे की नाही ? ..आम्हाला तुझे मुंबईला असताना विडिओ पाहायला मिळाले आहेत ..मला तिथलं काही समजत नाही म्हणून सरळ तुलाच विचारते आहे ..मृणाल तू वैश्या आहेस ? " आई फारच रागात होत्या ..मृणाल आपला भूतकाळ एकूण डोकं गरगरायला लागलं ..हातापयातल अवसान गळाल ..मृणालला या क्षणी अजिंक्यची साथ हवी होती आणि तीच संपूर्ण लक्ष दाराकडे लागलं होतं ...ती काहीच बोलत नाही पाहून अजिंक्यचे काका म्हणाले , " वहिनी तिच्याकडे काही उत्तर असेल तेव्हा उत्तर देईल ना ती ..तिची चुप्पीच सर्व काही सांगत आहे ..वहिनी मी तर म्हणतो हिला या घरातूनच काढून टाकले पाहिजे ..आपल्या सर्वांना फसवलं हिने .." आई काहीच बोलल्या नाही हे पाहून काका तिचा हात पकडून घराबाहेर काढू लागले ...मृणाल आई थांबवेल अशी वेडी आशा मनात धरून होती पण आईने तर तिच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं ..काका मृणालचा हात धरून दारावर पोहोचलेच होते की समोरून अजिंक्य आला ..त्याला घराबाहेर बरीच गर्दी दिसली ..काहीतरी अगणित घडलंय हे त्याला जाणवलं ..काका मृणालच्या हाताला घट्ट पकडून होते आणि मृणालच्या डोळ्यात अश्रू होते ...अजिंक्य मृणालचा हात काकांच्या हातातून सोडवत तिला पुन्हा आतमध्ये घेऊन आला ...आणि विचारू लागला .." काय झालं कुणी सांगू शकेल का मला ? " आणि शांत बसलेली आई पून्हा जोराने म्हणाली तुझ्या बायकोलाच विचार काय झालं तर .." अजिंक्य मृणालला काय झालं ते विचारत होता पण ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती ..तिची ती स्थिती ओळखत अजिंक्य आईला म्हणाला , " तू तरी सांग काय झालंय तर ? " आणि आई तिच्या अंगावर जात म्हणाली .." तुझ्या बायकोने काय रंग उधळवून ठेवले आहे हे साऱ्या जगाला माहीत झालं आहे आणि मी तिला तेच विचारत होते ..पण किती निर्लज्य ही बाई उत्तरच देईना ..हिला न काही लाज शरमच नाही..कोणत्या घळीला तू हिला इथे आणलं काय माहिती ? " आईचा प्रत्येक शब्द मृणालच्या मनावर घाव करीत होता आणि आई थांबायचं नाव घेत नव्हत्या ..मृणालची चुप्पी पाहून सर्वच तिला काही बाही बोलत होते आणि मृणालला हे सर्व असह्य होऊ लागलं ..आणि ती आपली चुप्पी तोडत मोठ्याने म्हणाली , " हो आहे मी वैश्या !! "

तिच्या उत्तराने सर्व वातावरण शांत झाल..बोलणारी सर्व तोंड आपोआप गप्प झाली ..आणि मधातून आईचा आवाज बाहेर आला .." बघ अजिंक्य मिळालं तुला तुझं उत्तर ..मी म्हणते हे सर्व स्वीकारायला तिला लाज कशी वाटत नाही ? ..जीभ कशी झळली नाही या बाईची ? " अजिंक्य हे सर्व एकूण शॉक होता ..मृणालची तब्येत आधीच बरी नव्हती त्यात या सर्व बोलण्याने तिचा कोंडमारा होऊ लागला आणि अचानक तिला ग्लानी आली ..अजिंक्यने मृणालला सावरत सोफ्यावर बसविले आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आला ..तिने पाणी पिले आणि तशीच शांत पडून होती ..तेवढ्यात काका म्हणाले , " ती या घरच पाणी प्यायच्या लायकीची सुद्धा नाही ..काढ तिला घरातून ..अजिंक्यने त्यांचं काहीच एकल नव्हतं ..काकांना राग अनावर झाला आणि ते तिला त्याही अवस्थेत बाहेर काढायला निघाले ..त्यांनी तिचा हात पकडलाच होता की अजिंक्य काकांचा हात जोराने खेचत म्हणाला , " ती वैश्या होती हे मला आधीच माहिती आहे .." त्याच्या या अशा बोलण्याने क्षणात वातावरण बदललं ..काका एक पाऊल मागे झाले ..तर आई खालीच पडली ..सुरजने तिला कसतरी सावरलं आणि बाजूला बेडवर बसविल ..अजिंक्य आईला हात लावायला समोर जाणार तेवढयात आई म्हणाली , " अजिंक्य मला हात लावू नकोस ..इतका मोठा विश्वासघात ...तुला सर्व माहिती असताना आमच्यापासून इतकं मोठं सत्य लपविलस ..मी तुला मोकळीक देत आले म्हणून अस वागलास माझ्याशी ..काय जादू केली या भवानीने की आमच्यावरचा विश्वास उडाला ..लग्न करायला तुला एक वैश्याच मिळाली ..गेले कित्येक वर्षे आम्ही या घराचं नाव अबाधित ठेवलं आणि तू एका क्षणात बुडवलस...हे बर नाही केल तू अजिंक्य .लग्न केलंस ते मान्य केलं म्हणून तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण नाही करू शकत ...मी खूप दुखावले तुझ्या अशा वागण्याने .." आई समोर बसून बोलत होती आणि अजिंक्य तिच्या जवळ जात म्हणाला , " आई माझं एकूण तर घे आधी .." आणि आई त्याला दूर ढकलत म्हणाली , " विनाशकालिन विपरीत बुद्धी..मला काहीच एकूण घ्यायचं नाही ..तू विश्वासघात केला आहेस माझा ..आणि याला माफी नाही ..आता ऐकण्याची वेळ नाही तर निर्णय घेण्याची वेळ आहे .." आणि अजिंक्य म्हणाला , " कसला निर्णय ? " ..आई सुरजच्या साहाय्याने उभी होत म्हणाली , " तुला आमच्यातून एकच निवडाव लागेल ..आई की बायको .." अजिंक्य मात्र शांत होता ..त्याच्या डोक्यात बरेच प्रश्न उभे झाले होते ..त्यामुळे तोही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता तेव्हाच आई म्हणाल्या , " अजिंक्य मी काहीतरी विचारलं आहे तुला ? " आणि अजिंक्य हळू आवाजात म्हणाला , " आई मला माफ कर पण मी मृणालला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल अस वचन दिल आहे .." आई तडकाफडकी बाहेर जाऊ लागली ..अजिंक्य मागून तिला विचारू लागला .." आई कुठे जात आहेस .." आणि आई उत्तर देत म्हणाली , " अजिंक्य तू तुझा निर्णय एकविला ..आता वेळ आहे मला निर्णय घेण्याची ..आम्ही दोघे या घरात एकत्र राहू शकत नाही त्यामुळे मी हे घर सोडतेय " भाऊजी आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का असा प्रश्न तीने अजिंक्यच्या काकांना केला आणि त्यांच्या होकार येताच आई लगेच दार ओलांडून सुरजच्या घराकडे निघाली
एकीकडे आई होती तर दुसरीकडे मृणाल ..आई रागाने घराच्या बाहेर निघाली होती तर मृणाल सोफ्यावर निपचित पडली होती ..श्वास सुरू होते पण हालचाल मात्र होत नव्हती ..अजिंक्य थोडा घाबरला ..तो मृणालला आपल्या बाहूत उचलून कारकडे घेऊन जाऊ लागला ..बाहेर सर्वच उभे होते पण अजिंक्यच आईकडे लक्ष नव्हतं ..आपल्या मुलाला आताही आपली काळजी नाही म्हणून आई रागातच काकांच्या घरी गेली ..तर अजिंक्य मृणालला गाडीत बसवून हॉस्पिटलकडे निघाला ..हॉस्पिटलला नेताना त्याच्या मनात बरेच प्रश्न होते पण सध्या तरी त्यावर विचार करणं त्याने टाळलं होत ..मृणालला हॉस्पिटलला घेऊन जाताच तिची ट्रिटमेंट सुरू झाली ..अचानक बीपी वाढल्याने दातखिळी बसली होती ..डॉक्टरांनी चेकअप केलं आणि काहीही सिरीयस नसल्याचं सांगितलं परंतु तिला एक दिवस तिथेच ठेवण्याच डॉक्टरांनी सांगितलं आणि अजिंक्यनेही तिला ऍडमिट करण्यास सहमती दर्शवली ..सर्व चेअकप वगैरे करून दुपार टळून गेली होती ..मृणालला सलाइन लावली असल्याने ती काही वेळ तर झोपूनच होती ...

नर्सला मृणालची काळजी घ्यायला सांगून अजिंक्य जेवणाचा डबा , चादर वगैरे आणायला घरी आला ..सुमारे एक दीड तास तो किचनमधील काम करून मृणालसाठी डबा बनवीत होता ..आईच लक्ष जात होतं पण तरीही तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ..अजिंक्य फ्रेश होऊन हॉस्पिटलला निघाला ..समोर आई उभी होती ...तो तिच्याशी बोलणार तेवढ्यात ती आत गेली ..समोरून प्रज्ञा सुरज सोबत येत होती ..वडिलांना बघून ती त्याच्याकडे गेली ..ती मृणालला भेटण्याविषयी बोलत होती पण अजिंक्यने कशीतरी वेळ मारून नेली ..सुरजला तिला शाळेत नेण्याबद्दल सांगून तो पुन्हा हॉस्पिटलला परतला ..एव्हाना एक सलाइन संपून नर्सने दुसरी चढवली होती ..अजिंक्य हॉस्पिटलमध्ये बेंचवर टेकून बसला आणि त्याचा डोळा लागला ..मृणालची सलाइन संपली होती त्यामुळे नर्स ती काढायला आत आली ..नर्सच्या आवाजाणे अजिंक्यला जाग आली ..मृणाल अजिंक्यकडे पाहत होती पण सिस्टर समोर असल्या कारणाने ती काहीच बोलली नव्हती ..सिस्टर गेल्यावर मृणालचा बांध तुटला आणि ती आईबद्दल विचारू लागली पण अजिंक्यने उत्तर देण टाळलं होत आणि तो हट्ट करून तिला भरवु लागला ..जेवणही आटोपलं होत ..सुरजने प्रज्ञाच मृणालशी बोलणं करून दिल आणि प्रज्ञा समाधानाने झोपी गेली ...

बरीच रात्र झाली होती ..त्या रूममध्ये दोन तीन पेशंट होते तेदेखील झोपी गेले होते ..मृणाल - अजिंक्य कितीतरी वेळेपासून एकमेकांकडे पाहत होते पण कुणीही कुणाशी काही बोलल नाही ..बऱ्याच वेळाने अजिंक्य पाणी घेण्यासाठी बाहेर आला आणि त्या मागोमाग तीही आली ..तिला बाहेर येताना पाहून तो रागावला पण तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना तो काहीच बोलू शकला नाही ..बाहेरच्या बेंचवर अजिंक्य बसला आणि मृणाल त्याच्या मांडीवर डोकं टेकवून बाकावर पडली ..अजिंक्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि ती म्हणाली , " अजिंक्य काय होऊन बसल ना हे ? ..किती सुंदर आयुष्य होत न आपलं आणि बघ आता ...? आज माझ्यामुळे घरचे दुखावले रे !!!..मी स्वताला कधीच माफ करू शकणार नाही ..किती गिल्टी फील करतेय मी माझं मलाच माहिती ..आज स्वतःच्याच नजरेत पडले मी अजिंक्य ..सॉरी खूप खूप सॉरी ..माझ्यामुळे तुलाही खूप काही ऐकावं लागलं .." आणि अजिंक्य तिला समजावत म्हणाला , " तुझ्यामुळे काहीच झालं नाही ..सत्य कधीच लपत नाही ..ते कधीतरी येणारच होत याबद्दल मला आधीच माहीत होतं ..जे झालं ते बदलवू शकत नाही पण जे होणार आहे त्याला खंबीरपणे तोंड द्यावं लागेल ...आईच आहे ना ती !! किती दिवस नाराज राहील ..कधीतरी माफ करेलच आपल्याला ..आणि तू काळजी नको करू ..मी आहे ना ..मी करेल सर्व ठीक ..शेवटच्या श्वासापर्यन्त मी आहे ..सो तुझ्या डोळ्यात आता मला अश्रू नको आहेत ..आपण घेऊ सर्व सांभाळून " मृणालला अजिंक्यवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे ती पुढे काहीच बोलली नाही ..मृणाल कितीतरी वेळ त्याच्या पायावर डोकं टेकवून होती ..दोघेही शांतच होते परंतु मनात खूप काही सुरू होत ..अजिंक्यने मृणालची समजूत तर काढली होती ..अजिंक्यवर कधीही न ओरडणारी आई चक्क त्याला सोडून गेली होती त्यामुळे त्याला कळून चुकलं होत की आपण समजतोय इतकं सोपं प्रकरण नाही ते ..आजपर्यंत ही गोष्ट फक्त आमच्या दोघांची होती परंतु आता ही कुटुंबाची , समाजाची गोष्ट झाली आहे ..पळून जाऊन लग्न केलं म्हणून नात तोडणारे सर्व एका वैश्येला स्वीकारन म्हणजे विचार न केलेलाच बरा ..नकळत का होईना या सर्व गोष्टींचा घरच्यांवर प्रज्ञावर परिणाम होणारच आहे तेव्हा आता मलाच पुढाकार घेऊन सर्व सांभाळाव लागेल असा अजिंक्यचा विचार पक्का झाला ..त्याला जणू कळून चुकलं होत की हे वादळ आता इथेच थांबणार नाही तर उलट कितीतरी लोकांना घेऊन डुबणार आहे आणि त्या सर्व गोष्टीसाठी त्याने मनाची तयारी केली..आणखी हे वादळ काय काय घेऊन जाणार होत याची कल्पनासुद्धा न केलेली बरी ...

क्रमशः .....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED