Addiction - 2 - 22 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 22

अजिंक्यच म्हणणं बरोबर निघालं ..लोक बोलून - बोलून थकून गेले आणि दोघानिही त्याकडे लक्ष न दिल्याने सर्व आपोआपच आपल्या कामात व्यस्त झाले ..कंमेंट पास करण सुरू होत पण त्याचा फार प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडत नव्हता ..अजिंक्य आपल्यासाठी लढतोय हे पाहून तर मृणाल आणखीच जिद्दीने सर्व प्रसंगांना सामोरे जायला उभी झाली होती ..नात्यांची परीक्षा दुःखाच्या काळातच होते हे आईच्या वागण्यावरून पटलं होत ..विश्वास ठेवणारे कुणाच्याही शब्दात न येता आपल्या शब्दांवर टिकून राहतात हे अजिंक्यच्या वागण्यावरून तिला कळून चुकलं ..परिस्थिती कशीही असो पण जेव्हा हा विश्वास नात्यांची परीक्षा घेऊ लागतो तेव्हाच तर प्रेमाची परिक्षा सुरू होते आणि नंतरच प्रेम या शब्दाची ओळख आपल्याला नव्याने पटू लागते ..त्यामुळे अजिंक्य - मृणाल आताही न खचता आपलं आयुष्य जगत होते..

सर्व काही पुन्हा पटरिवर येऊ लागलं होतं ..अजिंक्य पुन्हा आपल्या कामात व्यस्त होऊ लागला होता तर मृणालनेही आपल्या संसारात लक्ष द्यायला सुरुवात केली ..या सर्व काळात तिला फक्त आपल्या मुलीची काळजी सतावत होती आणि त्यासाठी ती लोकांसोबत वाद घालायलासुद्धा तयार झाली ..मुंबईची ती मृणाल पुन्हा परत आली होती आणि सर्वांच्या शब्दाला नि शब्दाला उत्तर देऊ लागली ..तिचा असा अवतार पाहून सर्वच तिला भिऊ लागले ..एखादा शब्द जरी तोंडून काढायचा तरी तिच्या फक्त धारदार नजरेने त्यांची वाचा बंद व्हायची ..अशा या मृणालला बघून सर्व शॉक झाले .

अजिंक्य पुन्हा ऑफिसच काम छान पद्धतीने हाताळू लागला ..आजसुद्धा अजिंक्य ऑफिसला पोहोचला ..काम भरपूर असल्याने नाश्ता न करताच तो बाहेर पडला ..अजिंक्य स्वताच कंपनीची ब्रँच सांभाळत होता तर त्याच्या साथीला रिया होती ..या काही दिवसात अजिंक्य आपल्या कामात मन लावू शकला नव्हता आणि त्याला जाणवलं की आपली बरीच काम अजूनही पूर्ण झाली नाहीत .. त्यामुळें तो पुन्हा झपाट्याने काम आवरु लागला ..रिया फाइलवर फाइल आणून द्यायची आणि तो तिच्याशी काहीच न बोलता आपलं काम पूर्ण करू लागला ..हाच दिवस नाही तर पुढचा पूर्ण आठवडा असाच गेला ..तो काहीच न खाता बाहेर पडायचा आणि रात्री उशिरा - उशिरा घरी परतायचा ..पण या सर्व वेळात एक गोष्ट मात्र त्याने ठरवली होती ..तो दिवसातून किमान चार - पाच वेळा तरीही मृणालला काळजीने फोन करायचा आणि ती ठीक आहे हे एकल्यावरच तो फोन ठेवायचा ..नेमकी हीच गोष्ट रियाच्या चाणाक्ष नजरेने हेरली ..तिला त्याच्याशी खरं तर यावर बोलायच होत पण अलीकडे अजिंक्य कामाव्यतरीरिक्त कुणाशीही बोलत नसे त्यामुळे ऑफिस टाइम मध्ये बोलणं शक्यच नव्हतं ..त्याच्याशी बोलता यावं म्हणून आज मुद्दामहुनच ती सायंकाळी ऑफिसला जास्त वेळ थांबली होती ..सकाळपासूनच अजिंक्य काम करून थकला होता ..तरीही काम पूर्ण झालं नव्हतं ..कामाणे डोकंही जड झालं आणि तो चेअरला टेकून बसला ..रियाच्या हातात कॉफीचा कप पाहून तो दचकलाच ..समोर ती दिसली आणि तो स्मित करून शांत बसला ..त्याने तिच्या हातातला कप घेताच ती म्हणाली , " अजिंक्य काही प्रॉब्लेम आहे का रे ? मी खूप दिवस झाले तुला बघते आहे खूप टेंस असतोस तू अलीकडे ..काही झालंय का ..मला माहित नाही की मला हा प्रश्न विचारण्याचा तुला अधिकार आहे की नाही पण तरीही मी तुला अस बघू शकत नाही ..प्लिज सांग ना काय झालं तर.. " , रिया एकाच श्वासात सर्व काही बोलून गेली होती पण अजिंक्य आताही शांत होता ..केबिनमध्ये आवाज येत होता तो फक्त कॉफी पिण्याचा ..तिला कळून चुकलं की हा काहीच बोलणार नाही आणि ती पुन्हा म्हणाली , " अजिंक्य एक वेळ अशी होती जेव्हा तू मला समजावलं होतस आणि मी समजून घेऊन लग्नही केलं ..लग्न केल्याने तो माझा हक्क गमावलाय का मी ? ..तुझ्यासाठी मी आता काहीच नाही ..बघ अजिंक्य संवाद साधल्यानेच मन हलकं होत आता तुझी इच्छा ..तुला हवं तेव्हा सांग ..मी वाट पाहीन !! " आणि ती केबिनच्या बाहेर जाऊ लागली ..

समोर जातानाच तिचा हात अजिंक्यने पकडला ..ती समोर काही रिऍक्ट करणार तेवढ्यातच त्याने तिला बाजूच्या चेअरवर बसविले आणि तो तिच्या पायाशेजारी बसला ..त्याचे डोळे पाणावले होते ..फक्त त्याने ते अश्रू बाहेर येऊ दिले नाही ..आणि अजिंक्य बोलू लागला .." सॉरी .. असा विचार कसा करू शकते तू की तुझा हक्क तू गमावला आहेस ? ..हो पण हे मात्र खरं की तुझ लग्न झाल्याने हे विसरूनच गेलो की आजही हक्काचं बोलू शकणारी माझी जिवलग मैत्रीण माझ्याकडे आहे ..मागे खूप काही घडून गेलंय त्यामुळे खूप टेंस असतो आणि त्यामुळेच फार घुसमट होतेय ..इच्छा तर होती कुणाशी बोलावं पण स्थिती अशी झाली की कुणाशी बोलताही आलं नाही पण आज तुला मनातलं सर्व सांगून मला मोकळं व्हायचं आहे.. सुमारे पंधरा वीस मिनिटं अजिंक्यने मागे घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली आणि हे सर्व एकूण रियाचे होशच उडाले .." तिला काय बोलू तेच कळत नव्हतं तर अजिंक्य आताही तिच्याकडे पाहत असल्याने तिने स्वतःच्याच चेहऱ्यावर हलकेच स्मित आणले आणि डोक्यावरून हात फेरत तिने त्याला सावरलं ..अजिंक्य पुढे म्हणाला , " रिया खूप त्रास होतो ग आईच्या अशा वागण्याचा ..गावातले लोक असे वागतात तेव्हा काहीच वाटत नाही पण जेव्हा आपल्या घरचेच आपल्याला स्वीकारत नाहीत तेव्हा मात्र फार त्रास होतो पण तेव्हाही आईला काहीच फरक पडत नाही..मान्य आहे की आम्ही चुकलो पण त्याची इतकी मोठी शिक्षा आम्हाला का मिळतेय ? ..गेले कित्येक दिवस पाहतो आहे , मृणालला शांत झोप आली नाही ..ती मला सांगत नाही पण तिच्या मनातलं मला सर्व कळत ..ती मला नेहमीच विचारते की तुला त्रास होत नाही का ? पण तूच सांग रिया तिला इतका त्रास होताना मी तिला हे कसं सांगू की मलाही फार त्रास होतो ..तिच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा बघतो ना तेव्हा मला माझेच दुःख कमी वाटू लागतात आणि मग स्वतःच्याच अश्रूंना मनात कोंबून जीवन जगू लागतो ..मागील काही दिवस इतके टेंशनमध्ये गेले न की काहीच सुचत नव्हतं ..पण आज तुझ्याशी बोलून मला फार बर वाटत आहे ..खरच संवाद साधल्याने प्रॉब्लेम्स सॉल्व होत नसले तरीही तरीही लढण्याची जिद्द नक्कीच मिळते आणि या क्षणापासून मी पुन्हा एकदा लढायला तयार झालो आहे .." रिया काहीच बोलली नव्हती कदाचित ती त्या शॉकमधून बाहेर पडूच शकली नव्हती ..आणि थोडा हॅपी असलेला अजिंक्य पुन्हा एकदा म्हणला , " रिया मला एक फेवर करशील ..जर ही झुंज देताना मी या जगातून नाहीसा झालो तर मृणालची काळजी घेशील ..आणि मृणाल - प्रज्ञाला कधीही वेगळं होऊ नको देऊ .." अजिंक्य समोर काही बोलणार तेव्हड्यातच रिया त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली .." अजिंक्य काहीही वेड्यासारखं बोलू नको ..तू आमच्यासोबत सदैव असणार आहेस ..आणि राहिली मृणालची काळजी तर ती आपण मिळुन घेऊ ..चालेल " ..अजिंक्य तिच्याकडे बघून हसला ..पण तो काहीच बोलला नाही ..रियाला कळून चुकलं होत की अजिंक्यच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे पण तो काहीच संगणार नाही ..मनमोकळं केल्याने अजिंक्य आता थोडा फ्रेश वाटत होतं ..बोलताना बराच वेळ झाला आणि ते दोघेही घराकडे निघाले ..

अजिंक्य घरी परतला तेव्हा रात्रीचे साडे नऊ वाजले होते ..मृणाल जेवण करण्यासाठी त्याची वाट पाहत होती ..अजिंक्य येताच तिने वाढायला घेतलं ..दोघेही जेवणाला सोबत बसले असताना अजिंक्यला काहीतरी मिस्सिंग वाटत होतं तरीही तो मृणालला काहीच बोलला नाही ...मृणालला प्रज्ञाबद्दल विचारलं असताना ती आजीकडे असल्याचं तिने सांगितलं होतं परंतु तेवढच बोलून ती पुन्हा एकदा शांत झाली ..शेवटी जेवण आटोपलं आणि दोघेही झोपायला बेडरूमला पोहोचले ..मृणाल त्याच्या बाजूलाच बेडवर पडलेली असताना अजिंक्य अचानक उद्गारला .." काय मॅडम काय लपवत आहात माझ्यापासून ..? कितीही लपविल तुम्ही तरी तुमचा चेहरा सर्वच काही सांगतो ..काय झालं ? " आणि मृणाल खुश असण्याचा आव आणत म्हणाली , " कुठे काय ..काहीच झालं नाही तुला उगाच काहीतरी वाटत .." अजिंक्यने तिच्या मनातले भाव ओळखले पण तो तिला काहीच न बोलता दुसऱ्या बाजूला वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागला ..काही क्षणच झाले असतील आणि मृणाल म्हणाली , " तुझ्यापासून लपवून काहीच फायदा नाही ..प्लिज माझ्याकडे बघ ( तो वळाला) ..अजिंक्य आज ना मला प्रज्ञाच्या शाळेत जायला उशीर झाला ..ती बऱ्याच वेळ तिथे एकटीच होती आणि कंटाळून बाहेर पडली ..मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा जाणवलं की तिला काही मुलं माझ्यावरून चिडवत होते ..भरपूर वेळ तिला ते काहीतरी बोलत होते आणि प्रज्ञा रडवेली झाली ..मी पोहोचले तेव्हा ते सर्व पळून गेले पण मला कळायचं ते कळालं ..प्रज्ञाला ते काय बोलत आहेत त्यातलं काही कळाल नाही पण तिच्या मनावर घाव झालेत हे नक्की म्हणूनच ती घरी आली तेव्हापासूनच आजीकडे आहे ..आपण लोकांकडे लक्ष देत नाही म्हणून त्यांनी आपल्या मुलीला टार्गेट करायला सुरुवात केली आहे ..शी किती नीच मानस आहेत या जगात ..? " अजिंक्य थोडा टेंस झाला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला , " तुला माझ्यावर विश्वास आहे न मग मी म्हणेन ते करशील ? " मृणालने होकार भरताच अजिंक्य पुन्हा बोलू लागला .." तथागत सिद्धार्थ बुद्ध जेव्हा जन्मले तेव्हा ज्योतिष्यानी भविष्यवाणी केली होती की हा संन्यासीच बनणार पण त्यांच्या वडिलांना हे मान्य नव्हत ..त्यांनी कितीतरी वर्ष सिद्धार्थला बंदिस्त करून ठेवल पण एक दिवस जेव्हा त्याच्या जगाशी संबध आला ..त्याने जगातील दुःख बघितले तेव्हा ते मनातून कळवळले आणि कुणाचीही पर्वा न करता सुखी संसाराचा त्याग केला ..आणि तेही जगातील दुःख दूर करता याव या कारणासाठी ..तुही त्यांच्या वाडीलांसारखीच चूक करते आहेस ..प्रज्ञाला बंदिस्त करून तू तीला स्वतःजवळ काही दिवस ठेवशील पण केव्हापर्यंत ..? ..सत्य कधीतरी तिला कळणारच तेव्हा आपल्या घरचेच तिला सांगतील की तू कस तिला फसवलंस आणि ती नकळत जगाच्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागेल ..तू तिला काहीच न सांगता लपवून ठेवलस तरीही लोकांच्या संपर्कात आल्याने तिच्या मनात काही गोष्टी नक्कीच बसतील आणि लोकांच्या बोलण्यावर तिला विश्वास बसत जाईल ..तेव्हा तिला बंदिस्त नको ठेवू , उंच उडू दे ..आकाशातील पक्षाप्रमाणे ..तिला त्या स्थितीला स्वतःच फेस करू दे ..जर तिला आपला त्याग कळाला तर ती स्वताच या सर्वांचा विरोध करेल .." आणि ती अजिंक्यच बोलणं अर्ध्यातच तोडत म्हणाली , " आणि त्याग कळाला नाही तर ? " आता अजिंक्य मात्र शांत होता .त्याच्या डोक्यात हाच विचार होता तरीही स्वतःचा त्रास तिला कळू नये म्हणून स्मित करीत तो म्हणाला , " तुला आठवतंय तू एकदा मला नकार दिलास तेव्हा प्रज्ञा जन्माला आली आणि नकळत आपण एकत्र आलो ..कदाचित तो आपल्या नशिबाचा भाग आहे ..तिची काळजी घेणं , तिला योग्य संस्कार देण आणि तिला योग्य वयात खर सांगणं ही आपली जबाबदारी आहेच पण प्रत्यक्षात ते सर्व तिलाच सहन करायचं आहे..समजून घ्यायच आहे ..तिने समजून घेतलं तर ती स्वताच आपल्या बाजूने उभी राहिल ..प्रज्ञा एकदा का स्वतःच्या पंखानी उडू लागली की तिला जगाच ज्ञान येईल ..मग त्याच जगात राहायच की परत आपल्याच घरट्यात परत यायचं हे तीच तिला ठरवू दे ..तसही तिला नाती जपायची असेल तर ती परत नक्कीच येईल आपण असू त्या अवस्थेत स्वीकारायला ..आणि नाहीच आली तर ? ..आपण आपला निर्णय घेताना इथल्या कुठल्याच व्यक्तीला विचारलं नव्हतं ..आपणच एकमेकांना वचन दिल ते साथ निभावण्याचं मग त्यांच्याकडून अपेक्षा करन चुकीचच ..मृणाल तुझ्यासोबत कुणी असा वा नसो मी तुझी साथ शेवटपर्यंत निभावेन पण त्यासाठी प्रज्ञाला बंधनात ठेवण मला पटत नाही ..आणि मृणाल तिने घरट्यात परत न येण्याचा निर्णय घेतला तर हे विसरू नकोस की तीही कधीतरी आई होणारच आहे ..तेव्हा कळेल तिला आपल्या भावना आणि कदाचित तेव्हा आपण नसू ..जर तो पश्चाताप तिला झाला तर समज की आपण जिंकलो आणि नाहीच झाला तरी आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपलं प्रेम निभावल हे जगाला नक्कीच स्वीकारावं लागेल आणि पूढे जाऊन कदाचित एखादा अजिंक्य मृणाल ला सहज स्वीकारलेही .."

अजिंक्यच बोलणं संपलं होत ..मृणालला त्यातला शब्द न शब्द पटला होता पण आईच मन काही मानायला तयार नव्हत ..अजिंक्य - मृणाल दोघेही डोळे मिटवून असले तरीही त्यांच्या डोक्यात एकाच प्रश्न घर करून होता ..ती परत आली नाहीच तर ? .. मृणालच्या डोक्यात आणखी एक प्रश्न होता ..आईचा श्राप ..म्हणतात आईने दिलेला श्राप हा सर्वांत शक्तीशाली असतो जो समोरच्याला कधीच सुखाने जगू देत नाही ..आणि तिलाही भीती वाटू लागली ..अर्थात ज्या आधुनिक जगात आईवडील प्रामाणिक प्रयत्न करून त्याना पोसतात त्याचा आईवडिलांना बोल सूनवायला कुणी मागे पुढे बघत नाहीत तर मग एका वैश्येची मुलगी तिला समजून घेईल का ? ..डोक्यात प्रश तर भरपूर होते पण उत्तर मात्र तिच्याकडे नव्हतं ..

क्रमशः ....


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED