Addiction - 2 - 31 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 31

अजिंक्यला जाऊन आज तेरा दिवस झाले होते ..रियाने अजिंक्यची तेरावी करण्याचा विचार मृणालला एकविला होता पण त्याला या सर्वांवर विश्वास नसल्याने तिने रियाला साफ नकार दिला त्याऐवजी काही पैसे आणि कपडे जवळच्या आश्रमात भेट देण्याविषयी मृणालने रियाला सांगितले ..म्हणून आज दोघीही सकाळी - सकाळी आश्रमात पोहोचल्या होत्या ..अजिंक्यच्या जाण्याने दोघांच्याही जीवनात एक जागा खाली झाली होती आणि त्याच अस अचानक जाण दोघांनाही आतून तोडून गेलं होतं ..मागील काही दिवस त्या शांतच होत्या पण आज आश्रमात आल्यावर छोट्या - छोट्या मुलांचा आवाज ऐकून त्यांच्याशी खेळून काही क्षणकरिता का होईना दोघीही आपलं दुःख विसरू शकल्या होत्या ..काही अंतरावरच वृद्धाश्रम देखील होत ..तिथल्या प्रत्येक व्यक्तीसोबत त्या अगदी सहजपणे जुळून गेल्या ..ते आईबाबा त्यांना आपले किस्से एकवत होते आणि नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ..त्याही आज त्यांच्यासोबत मनमोकळेपणे बोलत होत्या ..त्यांना बघून तिला अजिंक्यच्या आईबाबांची आठवण झाली ..तिला याक्षणी तरी ते सोबत हवे होते पण मागील काही दिवसापासून त्यांनी एक साधा कॉलसुद्धा केला नव्हता ..जेव्हा त्या वृद्धांचे आशीर्वाद मृणालला मिळाले तेव्हा नकळत मृणालच्या डोळ्यात पाणी येऊन गेले आणि आईबाबांशी भेटण्याची ओढ तिला सतावू लागली ..फक्त आता तिने स्वतःहून त्यांच्या घरी जाण्याचा हक्क गमावला असल्याने ती हिम्मत करूनही घरी जाऊ शकत नव्हती ..दोन्ही आश्रमाना काही भेट देऊन ते आपापल्या घरी परतले...
सायंकाळची वेळ होती ..मृणाल एकटीच आपल्या विश्वास हरवली होती ..त्याचवेळी दारावर बेल वाजल्याने तिची तंद्री भंग झाली आणि आपल्याकडे कोण येऊ शकत हे पाहायला ती समोर गेली ..दार उघडलं तर तिला समोर सुरज दिसला ..तिनेही उदार मनाने त्याच स्वागत केलं ..किचनमधून चहा घेऊन येत ती म्हणाली , " काय रे सुरज अचानक आलास ? काही काम होत का ? " आणि सुरज उत्तर देण्यापूर्वी चहा घेण्यात व्यस्त झाला ..दोन मिनिटात चहा घेतल्यावर तो म्हणाला , " हो वहिनी कामानिमित्त्यच आलो आहे ..काहीतरी द्यायचं आहे तुला .." मृणाल आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होती आणि सुरजने तिच्या हातात एक चिट्ठी सोपवली ..ती काही क्षण त्याच्याकडे पाहतच होती ..सुरजचे डोळे पाणावले होते आणि म्हणून तिने लगेच ती चिट्ठी वाचायला घेतली ..त्यात लिहून होत .....

" प्रिय मृणाल...

खर तर प्रिय म्हणण्याचा हक्क आम्हाला आहे की नाही हे पण माहिती नाही पण मनाला समाधान मिळावं म्हणून म्हणते आहे ..तुला वाटलं असेल ना की कसे आईबाबा आहेत आता अजिंक्य सोबत नाही तरी यांचा अहंकार काही कमी झाला नाही ..कमीत कमी दोन शब्द तर बोलायचे होते ..पण खरंच हिम्मत झाली नाही म्हणून हे पत्र सुरजच्या हाताने पाठवत आहे ..तू म्हणाली होती की यात माझी काय चूक आणि मी कुणाला सांगू ? ..अगदी खरं आहे बेटा ..तुमंच सर्व बोलणं आधीच एकूण घेतलं असत तर अजिंक्य आपल्यातून कधीच गेला नसता पण आमचा इगो मधात आला आणि सर्व काही अस्ताव्यस्त झालं ..खर सांगू जेव्हा तू मला तुझ्या मनातलं सांगितलं तेव्हा वाटलं की तुला मिठी मारून सर्व संपवून टाकावं पण मनाने म्हटलं तू तर माफ करशील पण आम्ही तुला दिलेल्या यातना त्याने कमी होतील का ? ..म्हणून मनाला केव्हाच आवरून बसलोय ..बेटा तू कधीच चुकीची नव्हतीस .चुकीचा आहे तो हा समाज आणि त्यात राहणारे बुरसटलेल्या विचारांचे आमच्यासारखे लोक..तुझा भूतकाळ आमच्यासाठी इतका खास होऊन गेला की मागील काही वर्षात तू आमच्यासाठी जे काही केलं ते सर्व त्यासमोर विसरून गेलो ..आणि तू त्याहीक्षणी आमच्यावर ओरडण्याऐवजी आमची माफी मागत होतीस ...बेटा अजिंक्य तुझ्यामुळे गेला नाही तो आमच्यासारख्या लोकांमुळे गेला आहे तेव्हा तर हे गिल्ट आधी मनातून काढून टाक ..तुझ्यासारखी मुलगी मिळणं हा नशिबाचा भाग आहे आणि आम्हाला तू भेटली असताना तुला संभाळू शकलो नाही याची खंत आज वाटते आहे ..( पत्र वाचताना मृणालचे डोळे भरून आले ..ती आपल्या डोळ्यावरून हात घेत पुन्हा वाचू लागली ..)
रिया खर म्हणाली ग की आम्ही समाजाचा विचार करताना हिऱ्यासारख्या मुलाला गमावून बसलो ..आईवडील खरच असे नसतात ..मुलांच्या सुखात स्वतःला सुखी होणारेच आईवडील असतात हे कधी लक्षात घेतलं नाही आणि आज ना आम्हांला स्वतःची लाज आणि तुमच्या दोघांचा अभिमान वाटतो आहे ..हो खूप खूप अभिमान तो यासाठी की तू अजिंक्यसाठी आपलं सर्व जीवन आम्हाला समर्पित केलं..तुला माहिती होत की भरपूर त्रास होईल तुला तरीही तू मागे हटली नाहीस आणि अजिंक्य यासाठी की त्याने सर्वांच्या विरोधात जाऊन तुझी साथ दिली ..हेच तर खर प्रेम आहे ... नात तेच जे जग विरोधात असताना आपल्या पाठीशी उभं राहिलं पण हे समजायला फारच उशीर झाला आहे असं वाटत ..तुला माहिती आहे रिया खर म्हणाली होती अजिंक्यची ती निरागस नजर आम्हाला झोपू देत नाही ..डोळे लावले की तो समोर दिसतो आणि स्वतःच्याच नजरेत आम्ही कित्येकदा पडतो ..गेले काही दिवस तर आम्ही काढले पण मला नाही वाटत आता ते शक्य होईल ..त्याच्याशी नजर मिळविण आता आम्हाला शक्य नाही आणि आमच्याकडे एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे अजिंक्यची पाय पकडून माफी मागण ..हे पत्र जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा आम्ही या जगात नसू ..खर तर आम्ही स्वतः सुरजला ही चिट्ठी दिली आणि आधीच सांगितलं की तिला यातलं काहीच सांगू नको..जेव्हा त्याला ही चिठ्ठी दिली तेव्हा आम्ही विष घेतलं आणि त्याच्याकडे पर्यायच ठेवला नाही ....तुला बोलावलं नाही यासाठी नाही की तुझा राग आहे पण यासाठी की मरताना आम्ही तुला फेस करू शकणार नाही ..आम्ही आमच्या नजरेत इतके खाली पडलोया आहे की त्याक्षणी सुद्धा आम्ही तुला फेस करू शकलो नसतो ..असो आम्ही तुझ्याकडून आणखी एक हक्क हिरावून घेतोय त्यासाठी माफ कर ..तू म्हणशील की एकदा माझ्याशी बोलायला तरी हवं होत आणि तू माफ देखील केलं असत पण मृणाल काही पश्चातापाना माफी नसते ..हाही त्यातलाच एक ..तुला पुन्हा एकदा दुखविण्यासाठी माफ कर पण आम्हाला आता अजिंक्यच्या पायावर पडून माफी मागायची आहे त्यासाठी आम्ही तिथे जातोय ..आणि आज अभिमानाने सांगते की तुम्ही जगातले सर्वात सुंदर आईवडील आणि मूल आहात फक्त तुमच्यासोबत राहण्याचा हक्क आम्हाला नाही ..कारण जाणून केलेल्या चुकांना कधीच माफी नसते ..बेटा माफ कर आम्ही जातोय पण कदाचित समाधानानें ..पुढच्या जन्मात आमची मुलगी होऊन नको येऊ कारण आम्ही तुला शोभत नाही ..आणि अजिंक्य मृणाल कधीच हरले नाहीत ..हरला तो हा बुरसटलेला समाज त्यांच्या प्रेमापुढे ..अजिंक्य जिंकला आणि सदैव जिंकत राहील ..आपलं संपूर्ण आयुष्य जगून झाल्यावर वर येशील तेव्हा तुझेही पाय पकडून माफी मागायची आहे ..पण तू जग तुमचं प्रेम अमर करण्यासाठी..आम्ही तिघेही तुला वरून पाहत आहोत ...काळजी घे स्वतःची आता तुझ तुलाच सांभाळायचं आहे ..चल बेटा येतो आम्ही ..

तुझेच गुन्हेगार
आई बाबा
पत्र वाचून झालं तेव्हा मृणालच्या डोळ्यात अश्रू होते ..समाजाचा विचार करताना आपल्या मुलांना वेगळं करणाऱ्या आई बाबांवर अशी अवस्था आली की ते आपल्याच मुलांशी नजर मिळवू शकले नाहीत आणि त्यांच्या मरनात आपलं म्हणावं अस कुणीच रडल नाही यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही ..आणि याच मृणालला फारच वाईट वाटलं ..तिच्यासाठी ते आजही तेव्हढेच खास होते त्यामुळे त्यांच अस जाण तिला अजिबात आवडल नव्हतं ..मृणाल खंबीर असताना देखील तिचे अश्रू थांबत नव्हते ..सुरजला हे पाहावत नव्हतं आणि त्याने तिला पाण्याचा ग्लास आणून दिला ..मृणाल सुमारे अर्धा तास रडत होती आणि त्यानंतर शांत झाली ..तेव्हा सुरज म्हणाला , " वहिनी तुला माहिती आहे मी कालच दिल्लीवरून परत आलो .." ..दिल्लीच नाव घेताच तिचा चेहरा खाडकन उतरला ...सुरजच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही आणि तो म्हणाला , " तुझा चेहरा मला बरच काही सांगून गेला ..आणि मी तिथे पियुषणे बोलवलं असल्याने गेलो होतो ..आज कधी नव्हे ते पियुषने मला सर्व हकीकत सांगितली ..ती हकीकत ज्याने सर्वांच आयुष्य उध्वस्त केलं ..म्हणूनच काय देवाने समीरला शिक्षा दिली ..अजिंक्य दादा आणि आईने त्याला आपल्या मुलासारखं पाहिलं होतं..इतकं प्रेम तर माझ्या आईनेही त्याला कधी दिल नाही ..पण तुला मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार झाला ..त्यांच अस अचानक जाण त्याला परवडल नाही .त्याच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं आणि तो कायमच खचला ...शेवटच्या क्षणी का होईना त्याला देवाने शिक्षा दिली आणि तीही अशी की तो सदैव तडफडत राहील .वहिनी तो वेडा झालाय आणि खरच आज जगातली सर्वात सुंदर बातमी मला मिळाली ..खर सांगू आज समीर चांगला असता न तर मी स्वतःच त्याला मारुन फेकलं असत ..पण बर झालं की तो एकाच वेळी मरणार नाही ..तो सदैव तडफडत जगेल हीच त्यांची सर्वात मोठी शिक्षा आहे आणि पियुषलाही मी पोलिसात दिल आहे ..वहिनी आता दादा परत येणार नाही याचं वाईट वाटत ..पण त्याच प्रेम मात्र सदैव जिंकत राहील हे नक्कीच विश्वासाने सांगू शकतो .."

सुरजच्या बोलण्याने मृणाल फार खुश झाली नव्हती पण आज सर्वाना कळून चुकलं होत की इथे केलेलं पाप इथेच फेडावे लागत...ज्या चुका आपण करतो त्यापेक्षा भयंकर शिक्षा आपल्याला याच जगात मिळत असते आणि सत्याचा विजय व्हायला वेळ लागला तरी ते कधीे ना कधी जिंकतच .. . मृणाल आज समाधानी होती ..ती शांत आहे हे पाहून सूरज पुन्हा म्हणाला , " वहिनी मी पुन्हा एक गोष्ट तुझ्यापासून लपवली आहे ..तुला वाटत असेल ना तुम्ही इतकं सर्व सहन करताना मी कुठे होतो ? ..का मी घरच्यांच्या बाजूनेही बोललो नाही आणि तुमच्या बाजूनेही बोललो नाही त्याला एक कारण आहे ..माझं एका मुलीवर प्रेम आहे .ती दुसऱ्या जातीची आहे ..ताईने जेव्हा पळून लग्न केलं तेव्हा घरचे तिला खूप काही बोलले आणि माझ्या मनात भीतीने घर केलं ..ती मला सदैव लग्नासाठी विचारत राहिली आणि मी मात्र तिला काहीच उत्तर देउ शकलो नाही ..नेमकं त्याच वेळी तुझा भूतकाळ बाहेर आला ..तुला घरचे खूप काही बोलायचे तेव्हा फार वाईट वाटायचं पण मीही समाजातीलच एक भाग असल्याने तुम्हाला मदत करण्याची हिंमत दाखवू शकलो नाही .पुढे दादा तुझ्यासाठी संपूर्ण जगाशी लढण्यासाठी तयार झाला आणि तुझ्यासाठीच घर सोडल तेव्हा मला कळाली ती प्रेमाची भाषा .प्रेमाची अबोल भाषा !!! .प्रेमात वय , रंग , भूतकाळ अस काहीच नसत..प्रेम ते प्रेम असत ..त्यात चांगलं वाईट काही नसतं .गुण दोषासहित समोरच्याला स्वीकारायच असत ..जेव्हा आपण एखादया व्यक्तीला पसंद करतो तेव्हा तीच मन शरीर सर्व स्वीकारतो पण हा समाज कधी जातीवरून तर कधी परिस्थीतीमुळे आलेल्या दोषांना ओहून आपल्याला त्यांना स्वीकारू देत नाही .हा समाज त्यांना किती त्रास देतो आपल्याला हे मी जवळून तर पाहिलं आहे ..अगदी तुमच्या रूपाने ..आणि आपण मूर्ख त्यांच्या बोलण्यात येतो ..आणि माझ्यासारखे लोक देखील समाजाच्या भीतीने घाबरून जातात ..खरच आम्ही समाजाला घाबरणारे लोक आयुष्यभर आपल्या साथीदारांची साथ निभाऊ शकतो ? पण दादाने या जगाला सांगितलं की प्रेम हे प्रेम असत .. तुम्ही जेव्हा एका परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तीला उभं करू इच्छिता तेव्हा त्या मुलीसारख प्रेम कुणी करूच शकत नाही .. तिला यापेक्षा दूसर सुख आणखी मिळन शक्य नसतं आणि हे तू आम्हाला शिकविल आहेस .फरक आहे फक्त विचारांचा ..आणि आम्ही सुशिक्षित म्हणणारे लोकच माणूस म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकार देत नाही .. खर सांगू आजपर्यंत मी फार गोंधळलो होतो पण आज नाही ..वहिनी मी तुला शब्द देतो की माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी जिच्यावर प्रेम करतो तिच्याशी लग्न करण्यासाठी झटेल मग कुणी सोबत असो व नसो मला त्याची पर्वा नाही ..हा माझा शब्द आहे तुला ..अजिंक्य दादा आज तू जीवंत नाहीस पण आनंदाने सांगू इच्छितो की तू आम्हाला शिकविल आहेस की प्रेम कस करतात ? आणि हो आज अभिमानाने सांगतो आहे तु जिंकलास अजू दा ..तू जिंकलास ..तू जिंकलास .."

मृणालचे डोळे चटकन पाणावले पण यावेळी ते अश्रू आनंदाचे होते ..अजिंक्य खरच म्हणाला होता की समाजात असे अनेक अजिंक्य आहे जे आपला लढा पाहत आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी लढायचं आहे आणि मृणाल मनातल्या मनात म्हणाली , " साहेब तुम्ही जिंकलात ..तुम्ही जिंकलात ..तुमचं शरीर जरी नश्वर असलं तरीही तुमचं प्रेम मात्र अजिंक्य आहे ..तुमचं प्रेम मात्र अजिंक्य आहे .."

धुंडते रहे लोग मंजिलो को
अकसर किसीं के कदमो मे
खुद निकल कर राह पर चलना
यही तो मोहब्बत का इमतेहा है

क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED