जुळले प्रेमाचे नाते - भाग-६७ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६७

"थँक्स गणु. कुठून तरी मार्ग निघाला." मी हात जोडून गणुचे आभार मानले. आणि सगळी बुक्स बाजुला ठेवून देऊन झोपण्याचा प्रयत्न केला.

पण न राहून मला सारखा एकच प्रश्न सतावत होता आणि तो म्हणजे ती व्यक्ती नक्की कोण असेल... अशी जिला माझ्या आवडीनिवडी महित आहेत. कोण असेल जो मला एवढा चांगलं ओळखत असेल, आणि काय हवं असेल त्याला. असे एकना अनेक प्रश्नांनी डोकं बधीर करत होते. मी एका कुशिवरून दुसऱ्या कुशीवर अलटून-पलटून झोपत होते. पण झोप काही केल्या येत नव्हती. शेवटी देवाचे स्मरण केले तेव्हा कुठे निद्रे देवीने ततास्तु म्हटलं. आणि मी झोपेच्या स्वाधीन झाले. कारण सकाळी कॉलेजनंतर राज च्या घरी जायचं होतं.

यासर्वात आम्हला अभ्यासावर लक्ष देणे ही तेवढंच महत्त्वाचे होते.
उद्या कॉलेज असल्याने मी झोपले.
जाग आली ते आई च्या आवाजाणे...

"प्राजु.., उठ. जायचं नाही आहे का कॉलेजला...??" आईच्या आवाजने मी ही जास्त आढेवेडे न घेता उठले आणि तय्यार होऊन नाश्ता करायला बसले. सोबत बाबा होतेच. चेहऱ्यासमोरचा पेपर बाजुला करत त्यांनी खुणेनेच मला.., "बरी आहेस ना..??" अस विचारलं. आणि मी ही त्यांना मान डोकावून होकार दिला.

नंतर आईने आणून दिलेल्या चहा-नाश्ता करून कॉलेजसाठी निघाले. नेहमीप्रेमाणे कॉलेजमध्ये पोहोचल्यावर निशांतला कॉल केला तर तो कॉल घेत नव्हता. कदाचित बाईकवर असेल. मी कॉल ठेवला. मला त्याला एवढंच सांगायचं होत की आज आम्हाला राजसोबत त्याच्या घरी जायचं होतं. त्याच्या डॅड ला भेटायला. रिसेसमध्ये सांगेल अस ठरवुन मी माझ्या क्लासरूम निघून गेले.


लेक्चर्स चालू झाले.. खरतर माझा बिलकुल लक्ष लागत नव्हत. पण मी स्वतःला समजावलं आणि लक्ष केंद्रित केलं. काही लक्चर्स नंतर रिसेस झाली आणि मी कँटीनमध्ये पोहोचले.

एक टेबलावर बसुन राज आणि निशांतची वाट बघत होतेच की दोघे ही काही तरी बोलत कँटीनच्या दिशेने येताना दिसले.

"हाय प्रांजल..." जवळ येताच राजने मला हाक मारली.


"हॅलो राज" मी ही लगेच त्याला प्रतिसाद दिला.

दोघे ही माझ्या समोर बसले.. तसा मीच विषय काढला.

"निशांत आज आपल्याला राजच्या घरी जायचं आहे. त्याचे डॅड आले आहेत आणि त्यांनी आपल्याला भेटायला बोलावले आहे. ते आपल्याला मदत करतील असे बोलले बरोबर ना राज...!" मी राजकडे बघत बोलले..

त्याने ही लेगच स्वतःची मान डोकावून होकार दिला.

"ठीक आहे. एक सांग प्रांजु.. तुला त्याने परत मॅसेज केला होता का..??" निशांतने माझ्याकडे बघुन विचारले..

"नाही...! काल रात्री आणि आज सकाळी त्याचा कोणताच मॅसेज, कॉल नाहीये."

"ओके ठीक आहे. कदाचित तो त्याच्या पुढच्या प्लॅन बद्दल विचार करत असेल. आता आपल्याला ही जरा सांभाळून आणि विचार करून सर्वकाही केलं पाहिजे." निशांत आम्हाला समजावत होता आणि आम्ही सगळं नीट लक्ष देऊन ऐकत होतो.

बोलता बोलता थोडं खाण ही झालं. आणि त्यानंतर परत भेटायचं ठरवुन आम्ही जायला निघालो.


"गाईज लास्टचा लेक्चर संपला की आपण इथेच भेटुया." राजच्या बोलण्यावर आम्ही होकार देऊन आम्ही आप-आपल्याला क्लासरूम मध्ये निघून गेलो.

शेवटचा लेक्चर संपताच आम्ही आमच्या भेटायच्या जागी जमा झालो आणि निघालो राजच्या घरी जायला. राज त्याच्या कारने तर मी आणि निशांत बाईकने असे निघालो.

पंधरा ते वीस मिनिटात आम्ही त्याच्या घरच्या खाली होतो. कार आणि बाईक पार्क करून आम्ही राजच्या घरी पोहोचलो. राजने दारावरची बेल वाजवली एक नोकराने दार उघडलं. आम्ही तिघे ही हॉलमध्ये पोहोचलो आणि समोरच्या गालिच्यावर बसलो.

"मी आलोच या डॅड ला बघून. कदाचित तो कॉल वर असेल आपल्या रूममधे. आलोच...!!!" एवढं बोलून राज आत गेला. मी आणि निशांत शांत बसुन होतो. इतर वेळी आम्ही दोघे ही सरळ राज च्या रूममधे जाऊन बसायचो. पण आज त्याचे डॅड असल्याने आम्ही हॉलमधेच बसुन राहायचं ठरवल.


काही वेळाने राज आज सोबत एक पाच- सहा फूट व्यक्ती आमच्या समोर उभा होता. अंगात महागडा कोट, फॅन्सी टाय.., हातात महागड घड्याळ. असे त्याचे डॅड आमच्या समोर उभे होते. त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवल असल्याने राज नक्कीच त्यांच्यावर गेल्याच कळत होतं. ते समोर येताच मी आणि निशांत उभे राहिलो...

"अरे गाईज बसा बसा.. मी काही कॉलेजचा प्रिन्सिपल नाहीये..!" त्याच्या या वाक्यावर मात्र हॉलमधला ताण कमी झाला.

त्यानंतर नाव गाव.., कोण कुठलं अस थोडक्यात आटपल आणि मेन मुद्यावर आलो.

"प्रांजल मला राजने सगळं सांगितलं आहे. आणि त्यावरून मला वाटत की तुम्ही पोलिसांची मदत घेतली पाहिजे होती. हे जे असे सांगणारे असतात ना ते काही खर करत नाहीत. ते फक्त समोरच्याला घाबरवत असतात. त्याने तुम्हाला घाबरवल आणि तुम्ही घाबरलात."



"व्हेल, आता तुम्ही माझ्याकडे मदत मागितली आहे म्हणून मी एकला बोलावल आहे. मुंबईचे आय पी एस पोलीस ऑफिसर हे माझे खुप चांगले मित्र आहेत. त्यांनीच मला त्यांच्या ओळखीतल्या ऑफिसर ला पाठवलं आहे. आपण डिटेक्टिव्ह म्हटलं तरी चालेल. ते येतीलच आणि त्यानंतर आपण त्यांना आपल्याला माहीत असलेली माहिती देऊया." एवढं बोलून त्यांनी आमच्याकडे पाहिलं. त्याच्या बोलण्यावरून तरी आम्हला एक आशेचा किरण दिसत होता खर.., पण कितपत हे सफल होईल हे सध्यातरी सांगेन पॉसीबल नव्हतं.


"बाय द वे..., चला छान जेवुन घेऊया. म्हणजे ते येतील तेव्हा तुम्ही नीट उत्तर देऊ शकाल. हो, नाही करत जेवणाचा आग्रह झालाच आणि आम्ही जेवायला बसलो. राजचे डॅड मेन खुर्चीवर बसले होते. राज त्याच्या डाव्या बाजुच्या खुर्चीवर बसला होता. तर, मी त्यांच्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसले होते आणि निशांत माझ्या बाजुला.


To be continued....