kadambari jivalga - 23 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ...भाग - २३

कादंबरी – जिवलगा ..

भाग – २३ वा

------------------------------------------------------------------------------

ऑफिसमध्ये आलेल्या नेहाने सोनियाच्या टेबलाजवळ थांबत विचारले -

सोनिया – अनिता दिसत नाहीये आज पण ?

काय झाले ?

काल तर ठीक होती , काही प्रोब्लेम तर नाही ना झाला अचानक ?

असे काही आपल्या पैकी कुणाला झाले की, मी खूप घाबरून जाते .

काही सुचत नाही कळेपर्यंत.

सोनिया म्हणाली –नेहा –पोर्ब्लेम वगरे असे काहीही झालेले नाहीये आणि

काही सिरीयस वगरे असे तर बिलकुलच नाही , तू excite होऊ नकोस एकदम.

आता मी काही सांगणार आहे ते फक्त आपल्यातच असणारी गोष्ट आहे.

कुठेही कुणाजवळ बोलायची नाहीस . असे प्रोमीस कर तरच सांगेन तुला .

जर मला कळाले की तू आपल्यातल्या गोष्टी बोलण्याच्या नादात सहजपणे चार-चौघात शेअर करतेस

तर ..

त्या दिवसापासून आपली मैत्री आहे तिथेच संपेल , त्या नंतर आमच्या लिस्ट मधून

“नेहा “ हे नाव कायमचे डिलीट होऊन जाईल हे लक्षात असू दे.

सोनियाच्या बोलण्याच्या टोनवरून नेहाला अंदाज आला –की काही तरी

वेगळे असे ऐकयला मिळणार आहे ? काय असेल ? अनिताला काही

न सांगण्यासारखा आजार वगरे तर नाहीये ना ?

त्यामुळे ती अशी एकाकी नाही येत .दोन दिवसापासून .

ती म्हणाली

हे बघ सोनिया – गेल्या काही दिवसापासून तुझ्या सहवासात आहे मी .

तू माझ्याबद्दल नक्कीच काही तरी मत बनवलेच असशील . त्या आधारे जर तुला

माझ्यावर विस्वास ठेवा असे वाटत असेल तर जरूर सांग , आणि ,मी तुला विश्वासू

वाटत नसेल अजून तर , नको सांगू . मला राग वगेरे नाही येणार.

नेहाचे बोलणे ऐकून ..सोनियाच्या चेहेर्यावर हसू आले .

नेहाचा हात हातात घेत सोनिया म्हणाली ..

आय नो- नेहा , तू गोस्पिंग करणारी मुलगी नाहीयेस . मला जाणवले आहे हे.

आणि आता तर तू , अनिता आणि मी .आपण एकमेकांच्या सोबतच असतो ऑफिस मध्ये .

पण, काय असते की- सगळ्याच गोष्टी कॉमन होऊ शकत नाही . त्या नेहमीच सिक्रेट स्वरूपाच्या

असतात . अनिताची ही गोष्ट असेच आहे . वेरी वेरी पर्सनल.

अनिताने किनई आताची जी सुट्टी घेतलीय ना ती , सुट्टी एन्जोय करणार आहे.

अनिताचा जिवलग -मित्र – रोहन आलाय तिला भेटण्यासाठी ..

म्हणून बाईसाहेबांनी शनिवार –रविवार जोडून दोन दिवस सुट्टी घेतली आहे .

अनिता मैडम आता थेट सोमवारीच उगवणार ऑफिसमध्ये .

तीन-चार दिवस मनोसक्त मौज-मजा करतील दोघे मिळून ,

आणि मग

रात्री येईल अनिता येईंल रूमवर आणि तो जाईल त्याच्या मित्राच्या रूमवर .

अनिताबद्दलची ही माहिती नेहासाठी नवीन आणि धक्कादायकच होती .

ती म्हणाली – सोनिया –

हे असे कसे वागायचे माणसाने ? , किती वेगळ आणि विचित्र आहे .

नेहाच्या मनाला हे सगळे पटणारे नाहीये हे सोनियाला जाणवले .

ती म्हणाली – हे बघ नेहा , या सगळ्या गोष्टी ..जो तो आपल्या दृष्टीकोनातून पाहू लागतो ,

त्यावेळी त्या चूक आहेत असे वाटतच नाही.

नेहा लगेच म्हणाली -

हो सोनिया – मी पहाते –कोलेजच्या शिक्षणाच्या निमिताने बाहेरून

आलेले मुले आणि मुली – अगदी धीटपणे, कोणाची पर्वा न करता रहातात ,त्यांचे

एकत्रपणाने रहाणे ..म्हणजे ? सगळे काही गुंडाळून ठेवून असते .

इथे आल्यावर या गोष्टी मला जाणवल्यात , खटकल्या सुद्धा

. पण.. माझे मत , माझे विचार ..आणि अशी विचार करणारी मी “,

अशा लोकांच्या मते तर “मी मूर्ख “, हे कळण्या इतका शहाणपणा या वातावरणाने शिकवला आहे मला .

सोनिया –

टीन- एज “ मधल्या पिढीने हे सुरु केले आहे..मग तर ,

अनिताची –रोहनची बातच वेगळी म्हणायची .

हे दोघे तर matured आहेत , नोकरी करून –कमावणारे “ त्यांना कोण काय बोलणार ?

सोनिया – मला एक सांग -

अनिता रोहनच्या बरोबर ती इतक्या मनमोकळेपणाने राहते आहे म्हणजे ,

अनिताचे लग्न-बिग्न तर नक्कीच ठरले असेल ना त्याच्याबरोबरच?

सोनिया म्हणाली –

नेहा – तू अधिक खोलात जाऊन नकोस , या गोष्टी तुझ्या बुद्धीला आणि मनाला पटणाऱ्या

नाहीत .

अनिता –रोहनची मैत्री , त्यांचे नाते ,त्यांच्या कल्पना “ हे सगळं तुझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे .

आता वर्ष होत लाय ही दोघे रिलेशनमध्ये आहेत ही आणि नाहीत ही ,

आता हेच बघ ना ,

सोबत राहतात , मज्जा करतात , पण, रात्रीच्या वेळी एकमेकापासून दूर राहतात

पुन्हा आपल्यालाच म्हणतात की -हे बघा – आम्हाला उपदेश वगरे करायचा नाही .

आम्हाला दोघांनाही लग्न करण्यात अजून तरी इंटरेस्ट नाही .

त्यांचे म्हणणे ..आम्ही लग्न कशासाठी करायचे ? एकत्र राहण्यासाठी असेल तर ?

आता सुद्धा एकमेकांच्या सोबत असतो,सोबत राहतो , आमचे प्रेम आहे एकमेकावर,

नवरा-बायको घेतात तो सुख-अनुभव ,आनंद ..घायचा की नाही ? कधी घ्यायचा ? हे आम्ही ठरवू ,

त्यासाठी इतकी घाई कशाला .

सध्या तरी मानसिक आणि जितकी शारीरिक जवळीक होते आमची “,आम्ही त्यातच खुश आहोत.

मग , लग्नाचे झंझट कशाला लावून घ्यायचे. ?

तूच सांग नेहा – या अनिता आणि रोहनला काय बोलावे आपण ?

नेहा काही न बोलता ऐकत राहिली ..

सोनिया सांगू लागली -

रोहन ..अनिताला हवा तसा तिचा खास - जिवलग मित्र मिळाला आहे .

दोघे ही एकाच शहरात रहातात , पण ..स्वतःचे घर घेणे शक्य नाही , म्हणून वेग-वेगळे राहतात .

मी पाहिलंय दोघांना एकत्र असतांना ..

..दोघात खूप छान नाते आहे, खूप प्रेम आहे त्यांचे एकमेकावर .

अनिता म्हणते .. लोक म्हणतात म्हणून आम्ही लग्न नाही करणार ,

पण, आमच्या मनाला

ज्या दिवशी वाटेल ..आपण लग्न करू या , छान वाटेल . “,

तर नक्की लग्न करेन मी माझ्या या जिवलगा बरोबर . !

सोनियांकडून अनिताची अशी अजब लव्ह –स्टोरी ऐकूनच नेहा गोंधळून गेली ..

अनिता फारच धाडशी विचारांची आहे रे बाबा !

असे काही आपल्या स्वप्नात पण येणे शक्य नाहीये ..!

सोनियाला अधिक काही न विचारता .. नेहा आपल्या सेक्शनला जाऊन बसली खरी ..

तिच्या मनात मात्र ..अनिताबद्दलचे विचार चालू होते . अनिता आणि तिचा न पाहिलेला रोहन “

ही जोडी तिच्या नजरेसमोरून काही केल्या हटेना .

नेहा विचार करू लागली – या दोघी -

अनिता आणि सोनिया -खूप जवळच्या मैत्रिणी आहेत “, अनिताच्या या प्रेम-प्रकरणा बद्दल

ती किती काळजी बाळगते .

नाही तर . एखादी मुलगी मोठ्या उत्साहाने गावभर तिखट-मीठ लावून रंगवून

ही प्रेम-कहाणी सगळ्यांना सांगत सुटली असती.

सोनियाने अनिता बद्दल सांगितले खरे पण, ती स्वतः बद्दल फारशी काही सांगत नाही ..

तिची पण नक्कीच अशीच काही तरी स्टोरी ..असणार आहे , बोलण्याच्या ओघात ..

कळेल कधी तरी ..

कधी नव्हे तो ..आज पहिल्यांदा आपल्या मनात ..मैत्री , मित्र , प्रेम , प्रेमाचे नाते ,

प्रेम-सहवास “ या बद्दलचे विचार येत आहेत “. याचे नेहाला आश्चर्य वाटत होते .

मग नेहमी प्रमाणे. मनात येणारे असे विचार सवयीने लगेच झटकून टाकले.

तसे तर आज नेहाचे काही केल्या कामात लक्ष लागत नव्हते . कारण पुढच्या आठवड्यात

मधुरिमा दोन महिन्यासाठी परदेशात जाऊन येणार होती ..अनिताचा जीवलाग तर इथेच

लोकलला आहे, पण ..या मधुरीमाला .तिच्या जिवलगाला .भेटण्यासाठी ..किती दूर जावे

लागत आहे.. ते ही हजारो रुपये खर्च करून.

आपल्या आवडत्या जिवलगाला आतुर झालेलीय मधुरिमा .” नेहा पाहत होती

.गेल्या काही दिवसात ..ती तिच्या ..दूरदेशी असलेल्या रणधीर शिवाय दुसरे काही बोलतच नाहीये .

सारखं एकच सुरु – माझ्या रणधीरला ..हे खूप आवडते ..घेऊन जाते..आवडीने खाईल तो ..खूप पदार्थ केले

हा रंग त्याला खूप छान दिसतो , म्हणून त्याच्या आवडीचे टी-शर्ट घेतले .

मधुरिमाच्या तोंडून तिच्या लाडक्या ..जिवलगा बद्दल नेहाच्या कानावर सतत इतके काही

पडत गेले की –

न पाहिलेल्या रणधीरचे इमेज तिच्या मनात फोटो सारखी आपोआपच तयार झाली ..

रणधीर नक्कीच असा असेल...

उंचापुरा – उजळ वर्णाचा , स्पष्टवक्ता , अभ्यासू आणि आपल्या कामात स्वतःला पूर्णपणे

झोकून देणारा , आणि आपल्या व्यवसायातून होणार्या कमाईतून ..खूप मोठा भाग ..

वंचित –अनाथ – आणि दुर्गम अशा भागात रहाणार्या भटक्या – आदिवासी लोकांसाठी

आपल्या समाजकार्य करणाऱ्या संस्थांच्या मार्फत मदतीसाठी सतत कार करणारा एक

संवेदनशील माणूस.

मधुरीमाचा हा रणधीर खूपच वेगळा आहे “, त्याचे कार्य ,कार्य-स्वरूप ,कार्य उद्देश “

आणि ते करण्यासाठी ..त्यच्या मनाची तयारी ..समर्पित सेवावृत्ती “

हे नक्कीच साधारण गोष्टी नाहीयेत .

मधुरिमा आणि रणधीर –या जोडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या मनाला

खूप लागली आहे , तिच्या बद्दल , तिच्या जिवलगा बद्दल -रणधीर बद्दल

या दोन-तीन दिवसात जाणून घेतले पाहिजे

मधुरिमा परदेशी गेली की सांगणे लांबणीवर पडेल.

नेहाच्या मनात विचार येत होते –

“जिवलगा .. जिवलग “, किती छान शब्द आहे ना हा ?

ज्याच्यावर आपला जीव जडतो , हवावासा वाटतो , त्याची सोबत,त्याचा सहवास

हेच मिळणे “म्हणजे सगळ्यात मोठा आनंद असतो “.

जीवाला जीव देणारा , जीवाला वेड लावणारा , बेजान –मनात “नवी जान “ आणणारा “,

असा “मनाला आवडणारा , “जो , त्यालाच जिवलगा म्हणत असतील का ?

आज आपल्याला आपल्या दोन मैत्रिणींच्या जिवलगा बद्दल ऐकायला मिळाले .

अनिताचा रोहन , माधुरीमाचा – रणधीर ,सोनियाचा जो कुणी असेल तो ..

किती खुश असतात न या सगळ्या ,..यांना त्यांचा “ जिवलग “,मिळालेला आहे..

तिला आठवले .. रणधीर बद्दल सांगतांना मधुरिमा म्हणायची -

नेहा -खरे सांगते ..

कुणी आपला ..जिवलग बनतो , त्याच्या येण्याने आपल्या जगण्याला अर्थ येतो .

तू पण शोध ना तुझा एक जिवलग ..मग बघ ..दुनिया कितनी खुबसुरत लागणे लगेगी ..

नेहाने – स्वतःच्या मनाला विचारले ..

काय रे माझ्या मना ?, येईल का कुणी माझ्या जीवनी , जिवलग माझा होऊनी ...”

अरे वा – शायरी सुचते आहे आपल्याला तर ..

नेहाच्या मनाला हवेच्या अनोख्या झुळूकेचा स्पर्श झाला ,त्याची ही सुरुवात तर नाही ना ?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाग-२३ .

बाकी वाचू या पुढच्या भागात ..

भाग -२४ वा लवकरच येतो आहे ..

कादंबरी – जिवलगा ..

ले- अरुण वि. देशपांडे –पुणे.

9850177342

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED