Prem he - 19 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 19

............. सोनिया तरी काय सांगणार होती त्याला... तीही त्याच्यासोबत मूकाश्रू ढाळत होती...! 😢

कितीतरी वेळ तो तसाच तिच्याजवळ रडत होता... 😫

"विहान.. शांत हो... आँटी येतील... 🙁" सोनिया म्हणाली..

तसे त्याने डोळे पुसले.. सोनिया ने त्याला विचारलं..

"विहान तू आँटींना विश्वासात घेऊन का सांगत नाहीस सर्व ?? त्यांनाही किती काळजी वाटते तुझी... त्यांनी जर कधी मला विचारलंच तर काय सांगू मी त्यांना...?? किती वेळ खोटं बोलणार मी तरी आणि तू तरी... 😓 शिवाय तुलाही ऑफिस तर जॉईन करावंच लागेल.. हे असे किती दिवस घालवणार आहेस तू..? "

"ह्म्म्म.. ऑफिस तर जॉईन करावंच लागणार... पण डोन्ट वरी तुला कुणालाही काही सांगायला लागणार नाही.. मी बघून घेईन ते.. माझ्यामुळे मॉम, डॅड ना त्रास नाही होऊ देणार मी... "

" काय ठरवलंयस तू???😓"

" स्वतःला सावरायचं ठरवलंय.. 😔😔" असं त्याने म्हटलं खरं पण परत त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहायला लागले... 😫😫😭

" विहाssन.. असं करून कसं चालेल.... किती दिवस असा रडत राहणार आहेस... 😧असा नव्हतास तू कधीच... Be strong विहान... 😓 मला माझा पूर्वीचा विहान परत हवाय... 😥 नाही बघू शकत मी तुला असं!! 😭" आणि सोनिया ही रडायला लागली...

"निहिराssss😭😭" विहान कसंबसं एवढंच बोलू शकला.. त्याच्या डोळ्यांतले अश्रू आज थांबायचं नावच घेत नव्हते...त्याला खूप आठवण येत होती तिची!!

❤️🎵
ही तुझी याद.. घाली थैमान
हे भान आवरेना
भंगले ध्यान.. गुंतले प्राण
पीळ वेडा सुटेना....
सखे गं साजणी.. ये ना....!! 😫

बर्‍याच वेळाने तो शांत झाला.... थोडा वेळ बोलून सोनिया ही घरी निघून गेली... विहान ने थोडा वेळ स्वतःशीच विचार केला.. आणि निर्णय घेतला....!

- - - - - - - XOX - - - - - - -

" विहाsssssन 😨😨" निहिरा जोरात ओरडतच बेड वर उठून बसली...

ती खूप घाबरलेली होती..😰ऐन थंडीत ती घामाघूम झाली होती... डोळे चोळत तिने घड्याळाकडे बघितलं... पहाटेचे साडे चार वाजले होते..'म्हणजे हे स्वप्न होतं..😓' ती स्वतःशीच म्हणाली...

निहिरा ला स्वप्न पडलं होतं...
ती आणि विहान बीच वर बसले होते.. तिचा हात विहान च्या हातात होता.. आणि तिने त्याच्या खांद्यावर आपली मान टेकवली होती... विहान ने एक हात तिच्या खांद्यावर टाकून तिला आपल्या जवळ ओढून बसला होता ... आणि... अचानक.... वरुन दोन लांबच लांब हात आले आणि विहान ला तिच्यापासून दूर घेऊन गेले....! ती खूप रडत होती...😭ओरडत होती... 'सोडा त्याला' म्हणून विनवत होती... 😫 पण विहान तिच्यापासून दूर निघून गेला होता....

तिने विहान झोपला असेल याचाही विचार न करता त्याचा नंबर डायल केला... पण त्याचा फोन बंद येत होता... तिने दोन - तीन वेळा ट्राय केलं.. पण फोन बंदच!!.. तिने मोबाईल बाजूला ठेवला... आणि ती रडायला लागली... कितीतरी वेळ ती त्याला आठवून रडत होती... रडता रडताच कधी झोपी गेली तिलाच कळलं नाही....

सकाळी उठल्यावर ही तिला रहावलं नाही म्हणून तिने परत विहान चा नंबर डायल केला... तरीही फोन बंदच! आता मात्र ती चिडली..ह्याला बोलायचंच नाही माझ्यासोबत म्हणून फोन बंद करून ठेवलाय....😣 आता काय रान मोकळंच झालं असणार... तिच्या सोबत फिरायला 🙄😖!! मला वाटतं ते स्वप्नातले दोन हात तिचेच असावेत... 😏 तिनेच विहान ला माझ्यापासून दूर केलंय.... 😥... पण मी का दोष देतेय कुणाला.. 😒 विहान ला तर मीच दूर केलंय स्वतःपासून 😑
... पण मला काही हौस नव्हती तसं करायची... तो माझ्यासोबत तसं वागला.. म्हणून मला दूर करावं लागलं त्याला.. 😖😖 But... Still...... I miss you Vihaan!! 😫😫 आणि तिच्या डोळ्यांत पाणी आलं.. कुठेतरी तिला जाणवायला लागलं की विहान शिवाय ती अपूर्ण आहे.. आणि त्याच्याशिवाय इतर कुणाचाही विचार ती करू शकत नाही... पण त्याने तिच्यासोबत जे केलं ते आठवलं की तिला त्याचा राग ही यायचा!.... आणि मग विहान वरच्या तिच्या प्रेमापेक्षा तिचा मूळ स्वभाव जोर करायचा...!

- - - - - - - XOX - - - - - - -

निहिरा ची फायनल एक्झाम झाली.. प्रोजेक्ट मधून तिला आपलं नाव काढून घ्यावं लागलं होतं... सोनियाचीही आता प्रोजेक्ट वरची इच्छा उडाली होती... तिनेही तिचं नाव काढून घेतलं होतं.... दोघी बर्‍याचदा एकमेकींसमोर यायच्या... पण दोघीही न बघितल्यासारखं करून निघून जायच्या... कॉलेज मध्ये ज्या ज्या टवाळ मुलांना तिच्या आणि विहान च्या रिलेशन बद्दल माहित होतं ती उगीचंच तिला टोमणे मारत रहायची... त्यांचं ब्रेकअप झाल्याचं आता सर्वांनाच समजलं होतं... निहिरा ने सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.. पण नंतर मात्र तिने त्यांना चांगलंच सुनावलं... त्यानंतर तिच्या वाटेला जास्त कुणी गेलं नाही....

पण विहान ला ती विसरू शकली नव्हती... येता जाता जिथे तिथे तिला तोच दिसायचा... कॉलेज गेट मधून बाहेर पडताना तीचं लक्ष नकळत समोर जायचं जिथे उभा राहून तो तिची वाट बघायचा... 😑 त्याच्या सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण तिला बेचैन करून सोडायची... 😥 मन रमवण्यासाठी तिने तिचे dance classes परत जॉईन केले.. पण तिथे नाचताना ही तिला विहान आठवायचा.. त्याच्या सोबत केलेला dance आठवून तिच्या अंगावर शहारा यायचा..! तिला वाटायचं कधीतरी जिम ला जाताना तो चुकून तरी दिसेल... पण तो कधीच तिला दिसला नाही... ना सोनिया तिथे दिसली.... 😓

- - - - - - - XOX - - - - - - -

मागचं सर्व विसरून तिने फायनल एक्झाम चा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता.. रिजल्ट लागायच्या आधीच तिला कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू एका नामांकित कंपनीत जॉब ही मिळाला... सुरुवातीला एक महिना ती as a ट्रेनी जॉईन झाली.. मग तिच्यातील गुणवत्तेनुसार तिला IT developer ची पोस्ट मिळाली... चांगली सॅलरी ही तिला मिळत होती...

अशातच सहा महिने गेले... एक ही दिवस ती विहान ला विसरली नव्हती... तिने जॉब लागल्यानंतर दोन वेळा त्याला कॉल करायचा प्रयत्न ही केला... पण फोन लागलाच नाही.. मग मात्र तिने आशा सोडून दिली... त्याच्यामागे धावण्याचा निष्फळ प्रयत्न तिने सोडून दिला.. पण तरीही तिच्या मनात तोच होता.... ❤️

क्या-क्या न सोचा था मैंने
क्या-क्या न सपने सजाए
क्या-क्या न चाहा था दिल ने
क्या-क्या न अरमां जगाए
इस दिल से तूफ़ां गुजरते हैं
तुम बिन तो जीते न मरते हैं
आ जाओ लौटकर तुम
ये दिल कह रहा है ...😥😥

- - - - - - - - XOX - - - - - - -

सोनिया ने ही तिच्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला...
आज Sunday म्हणून ती घरीच होती... बेडरूम मध्ये बसून मोबाईल मधले जुने फोटोज् आणि व्हिडिओज् बघत होती... कॉलेज मधल्या आठवणींनी तिला भरून आलं.... त्यांच्या ग्रुप चे फोटोज् ती बघू लागली... एकत्र घालवलेले ते क्षण किती सुंदर होते.... विहान चे हसताना.. मस्ती करताना फोटोज् बघून तिला किती छान वाटलं... पण त्या एका पार्टी नंतर सर्वच बिघडलं 😑.. ना ग्रुप राहिला ना ती मजा... 😖
त्या पार्टी ला जे काही झालं त्यानंतर तिने ते फोटो ही कधी open केले नव्हते.. तिला त्या आठवणी नको वाटायच्या... पण आज बर्‍याच दिवसांनी.. जवळ जवळ दहा महिन्यांनी तिने तो फोल्डर ओपन केला... आणि एक एक फोटो बघू लागली... आणि अचानक ती थांबली... फोटो झूम करून बघितला...! मग तिने त्या दिवशी चे videos open केले.. जे पियुष ने शूट केले होते तिच्या मोबाईल मध्ये.. एक video तिने बघितला... स्टॉप केला.. परत rewind केला... परत बघितला... जवळ जवळ दहा वेळा तरी तिने तो video बघितला असेल.... 😓 आणि मग थोडासा विचार करून तिने तिने एक कॉल केला.... तो कॉल कट केल्यावर तिने लगेच निहिरा ला कॉल केला...

Sunday म्हणून निहिरा आज जरा उशीराच उठली... जेमतेम आंघोळ करून ती पेपर वाचत बसली होती... इतक्यात तिचा फोन वाजला... स्क्रीन वरचं नाव बघून ती चकित झाली......
सोनिया...!!!????

To be continued..
🙏
#प्रीत


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED