प्रेम हे..! - 21 प्रीत द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम हे..! - 21

....... " विहान इथे नाहिये.... 😩"

" म्हणजे..... कुठे आहे तो??? 😨"

" बँगलोर.......! 😓"

निहिरा ला गरगरायला लागलं..
"बँगलोरला?.. पण का???" तिने कसबसं सोनिया ला विचारलं...

सोनिया ने तिला सर्व सांगायला सुरुवात केली..

"त्यादिवशी पार्टी मध्ये जे काही झालं... त्यानंतर एक एक करून सर्व निघून गेले.. फक्त मी आणि विहान आम्ही दोघेच होतो तिथे... विहान ने स्वतःला अडकवून घेतलं होतं आतल्या रूम मध्ये...पंधरा वीस मिनिटांनी तो बाहेर आला.. आणि मला घरी सोडलं.. एक शब्द ही बोलला नाही माझ्याशी.. मला खाली गेट जवळ सोडून तो कुठेतरी निघून गेला.. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझ्यावरच चिडला... त्या रात्री बराच वेळ मी त्याच्या मेसेज ची वाट पहात होते.. मला खूप काळजी वाटत होती त्याची... शेवटी एक नंतर त्याने तो घरी आल्याचा मेसेज केला... मला बरं वाटलं हे ऐकून की तो घरी आला.. पण दुसर्‍या दिवशी सकाळीच आँटींचा फोन आला की त्याला हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केलंय.. मी घाईघाईतच तिथे पोहोचले... विहान ची अवस्था बघवत नव्हती.. त्याला high fever होता.. 😓
.. चार दिवस तो तिथे अ‍ॅडमिट होता... पाचव्या दिवशी सकाळी त्याला घरी आणलं... मी दुपारी त्याला भेटायला गेले... खूप रडला तो माझ्याजवळ... त्याला सारखी तुझी आठवण येत होती... 😑त्याला असं बघून माझ्या डोळ्यांत ही पाणी आलं... 😢.. मी त्याला विचारलं काय ठरवलंयस? तो म्हणाला.. स्वतःला सावरायचं ठरवलंय.. पण म्हणजे त्याच्या मनात नेमकं काय चालू होतं ते मला नाही कळालं.... 😑 थोडा वेळ बोलून मी तिथून निघून गेले... रात्री साडे आठ च्या सुमारास आँटींचा फोन आला.......... "

- - - - - - - - XOX - - - - - - - -

दहा महिन्यांपूर्वी .....

थोडा वेळ बोलून सोनिया निघून गेली... विहान ने बराच वेळ स्वतःशीच विचार केला... आणि निर्णय घेतला...!
संध्याकाळी सात नंतर त्याचे डॅड घरी आले तेव्हा तो रूम मधून बाहेर आला... डॅड फ्रेश होऊन हॉल मध्ये बसले होते.. मॉम ही तिथेच होती... तो ही तिथे गेला..

"मॉम.. डॅड... थोडं बोलायचं होतं... 😐" विहान म्हणाला..

"काय झालं बेटा? .... ये बस इथे आणि बोल काय बोलायचंय ते...🙂" चार दिवसांनी विहान स्वतःहून काहीतरी बोलायला आला होता.. त्याच्या आईला आनंद झाला होता.. पण विहान चा चेहरा बघून हा नेमकं काय बोलतोय याची काळजी वाटत होती त्यांना...

तो जाऊन मॉम च्या बाजूला बसला...
" मला बँगलोरला जायचंय.... 😔 "

" काय?... कशासाठी?.. 😕 " त्याच्या डॅडींनी विचारलं

"तिकडचं ऑफिस जॉईन करतोय....😔" तो मान खाली घालूनच बोलत होता...

"अरे... काय बोलतोयस तू?.. हे काय तुझं मध्येच..? अचानक का जायचंय तुला??😧" आईच्या साशंक मनाने विचारलं....

"मॉम.. मला वाटतं इथे डॅड आहेत सर्व सांभाळायला... तिथे पण कुणीतरी पाहिजे ना लक्ष द्यायला... डॅडींना फेर्‍या माराव्या लागतात सारख्या तिकडे... त्यापेक्षा मी तिथे असलो म्हणजे टेन्शन नाही राहणार... मी तिकडचं सर्व सांभाळेन... " विहान मॉम ला समजवायच्या उद्देशाने म्हणाला...

पण आईची नजर ती....! जरी त्याने सांगितलं नाही तरी तिच्या नजरेतून थोडी ते सुटणार होतं...

" विहान काय त्रास आहे तुला? कशाचं एवढं टेन्शन घेतलंयस??? मला ही नाही सांगणार का? 😓 " त्याच्या मॉम ने विषयालाच हात घातला...

विहान ने मोठ्या कष्टाने आपले अश्रू अडवले... 😣 एक आवंढा गिळला... आणि म्हणाला..

"मॉम.. खरच तसं काही नाहिये... मला आवडेल तिथे काम करायला... 😐" तो मॉम ची नजर चुकवत म्हणाला..

" पण बेटा असं अचानक काय झालं की तुला तिथे जावसं वाटतंय??".. डॅडींनी विचारलं..

"डॅड.. Don't you trust me? Hope at least you will understand.. 😓"

"OK.. तू ठरवलंच आहेस तर बघ जाऊन.. पण कधी येणार आहेस परत...?" डॅडींनी विचारलं..

"माहीत नाही डॅड... 😔 कदाचित तिथेच सेटल होईन... 😑"

"काsssय...? विहान तू आम्हाला सोडून तिथे जाणार आहेस कायमचा 😨.." विहान च्या मॉम ला विचार करूनच कसंतरी झालं..

"मॉम प्लीज... Try to understand.. 😞" विहान केविलवाणा होऊन म्हणाला...

"तुझं ठरलंच आहे मग कशाला formality करतोयस 😢" विहान ची माॅम अश्रू गाळतंच थोडं चिडून बोलली..

विहान च्या डोळ्यांत ही अश्रू जमा झाले.. त्याने मॉम ला hug केलं..
"मॉम प्लीज जाऊ दे ना..." " डॅड तुम्ही तरी समजवा ना तिला.. 😓"तो डॅडींकडे बघून म्हणाला...

डॅडींनी एक सुस्कारा सोडला...
" कधी निघणार आहेस... 😐"

"लगेच... 😑" विहान म्हणाला..

त्याची मॉम उठली आणि रडतच तिच्या रूम मध्ये निघून गेली... विहान ला खूप वाईट वाटलं.. त्याच्याही डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.. पण तो मॉम ला समजवायला गेला नाही.. त्याला माहित होतं तिला convince करायला गेलो तर आपलं जाणं कठीण होऊन बसेल... 😑

तो तिथून उठला आणि आपल्या रूम मध्ये जाऊन बॅग भरायला लागला... तो एक एक वस्तू आठवून आठवून घेत होता... त्याच्या कपाटातून त्याने निहिरा ची फोटो फ्रेम घेतली... फ्रेम मधल्या हसर्‍या निहिरा कडे बघत त्याने एकदा फ्रेम वरुन हात फिरवला... 😖 आणि ती फ्रेम उराशी घट्ट कवटाळली....

🎼🎶
कुछ बचा ही नहीं दरमियाँ
सांस लेती हैं अब ये दुरियाँ
दिल नहीं जानता राहो में
हाथ से हाथ छुटे थे कहाँ
क्यूँ नजर के किनारे..
टूटे हैं ख्वाब सारे.. तू बता
सुना सुना समा है..
खाली खाली जहा हैं.. अब मेरा
बिन तेरे बिन तेरे बिन तेरे
कोई खलिश है हवाओ में बिन तेरे....

"विहान... 😐" मागून मॉम चा आवाज आला तसे विहान ने पटकन डोळे पुसले.. फ्रेम बॅग मध्ये ठेऊन दिली.. आणि मॉम च्या दिशेने मागे वळला..

"जायलाच पाहिजे का 😢" मॉम ने परत विचारलं.. अजूनही तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते..

विहान मॉम च्या जवळ गेला.. आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले.. आणि म्हणाला..
"मॉम.. तुझ्या विहान वर विश्वास आहे ना तुझा? ☺️.. तो काही चुकीचं करेल असं वाटतय का तुला?? 😓"

" तसं नाहिये रे... पण मला माहितीये काहीतरी आहे जे तुला सलतंय... पण तू सांगायला तयार नाहीस तर मी तरी काय बोलणार.. 😖😢.. एवढा लहानाचा मोठा केला पण कधी नजरेआड नाही होऊ दिलं आणि आज तू आम्हाला असं सोडून निघालायस 😥😥" मॉम अश्रू गाळतच म्हणाली..

" मॉम प्लीज...तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन.. पण मला वेळ हवाय गं... आत्ता या क्षणी मला तुझ्या सपोर्ट ची गरज आहे.. माझ्या पाठीशी उभी रहा.. प्लीज... 😥 " विहान आर्जवे करत होता..

विहान ची मॉम त्याच्या डोक्यावर हात ठेऊन बाहेर निघून गेली.. बाहेर हॉल मध्ये आली.. विहान चे डॅड फोन वर आपल्या PA ला विहान चं फ्लाईट चं तिकीट बूक करायला सांगत होते... त्यांचं बोलून झाल्यावर विहान ची मॉम त्यांना म्हणाली...
" अहो.. तुम्ही तरी समजवा ना त्याला..."

"हे बघ मधू.. त्याने आता ठरवलंय ना जायचं मग जाऊ दे त्याला.. उगीच नकारघंटा नको लावूया.. नंतर बघुया काय करायचं ते... 😐 सकाळी पाच ची फ्लाईट आहे.. " विहान चे डॅड विहान च्या मॉम ला समजावत म्हणाले..

तशा त्या सोफ्यावर बसल्या... शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी सोनिया ला फोन लावला..

सोनिया जेवायला घेणार तोच तिचा फोन वाजला... विहान च्या मॉम चा होता... तिने कॉल रिसीव्ह केला..

" हॅलो... सोनिया... प्लीज घरी येशील?? आत्ता लगेच.."

"काय झालं आँटी.. सर्व ठीक आहे ना... विहान? ... विहान ठीक आहे ना?" तिने घाबरतच विचारलं

"विहान बँगलोर ला चाललाय.." एवढं म्हणून त्या आसवे गाळू लागल्या... 😥😥

"काssय...😨 मी येतेय.." म्हणून सोनिया ने फोन ठेवला.. आणि जेवायचंही सोडून ती धावतच विहान च्या घरी जायला निघाली...

To be continued..
🙏
#प्रीत