Prem he - 26 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 26

........विहान ने तिच्या भोवतीची मिठी सैल केली आणि तो सरळ चालायला लागला... सरळ जाऊन कार मध्ये बसला आणि निघून गेला... निहिरा मात्र गोंधळून त्याच्याच कडे बघत राहिली...!!

विहान घरी आला.. आणि एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखा सोफ्यावर बसला.. तो निहिराचाच विचार करत होता... 😓 गेले दोन दिवस तो निहिरा सोबत जे वागला होता त्याचं त्याला खूप वाईट वाटत होतं... आपण असं कसं वागू शकतो तिच्यासोबत...?? ती आपल्यासाठी इथपर्यंत आली...आपल्याला भेटण्यासाठी ऑफिस च्या फेर्‍या मारल्या... तिने तिची चूक मान्य केली तरीही आपण तिला हर्ट केलं... 😑😑 ती कधीपासून आलीये इथे .. कुठे राहते.. सोबत कोणी आहे की एकटीच आहे.. आपण साधी चौकशी ही केली नाही तिची...😓तिच्यासाठी हे शहर नवीन आहे.. इथलं सगळंच वेगळं... तिला काही त्रास तर नसेल ना... काही काही विचारलं नाही ... एवढे कसे निर्दयी झालो आपण... आणि विचार करूनच तो रडायला लागला...

- - - - - - - XOX - - - - - - -

निहिरा ला आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा होता... विहान चं अजूनही आपल्यावर तेवढंच प्रेम आहे हे तिला आत्ता जे झालं त्यावरुन कळलं होतं... तिनेही लगेच ऑटो केली... आणि विहान च्या घरी गेली.. सात मजली इमारत होती ती! आजूबाजूचा परिसर ही खूप सुंदर होता... बिल्डिंग समोर छोटासा बगीचा.. त्यात विविध प्रकारची फुलझाडे.. फुलांवर बागडणारी फुलपाखरे...त्या फुलपाखरांसोबत बागडणारी लहान लहान मुले....! इविनिंग वॉक साठी खाली उतरलेले तरुण तरुणी.. शिवाय ज्येष्ठ मंडळीही!! खूप छान वातावरण होतं तिथलं.... निहिरा ला त्याही स्थितीत प्रसन्न वाटलं.... सोनिया ने दिलेल्या address नुसार ती लिफ्ट ने फोर्थ फ्लोअर ला आली.. आणि विहान च्या रूम च्या दिशेने वळली... दरवाजा अर्धवट ढकललेला होता.. आतून रडण्याचा आवाज येत होता... 😐 निहिरा च्या काळजात धस्स झालं.... तिने दरवाजा उघडला आणि आत आली... समोर सोफ्याजवळच खाली जमिनीवर विहान बसला होता... शर्टाची इन अर्धवट निघालेली होती.. टाय आणि सूट सोफ्यावर अस्ताव्यस्त पडलेले होते... केस विस्कटलेले... डोळे रडून रडून लाल झाले होते.. हातात एक फोटो फ्रेम होती.. आणि त्या फोटो फ्रेम कडे बघून तो जोरजोरात रडत होता.. 😫😫😭😭 निहिरा च्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळू लागले... तिने नीट निरखून बघितलं... त्याच्या हातातल्या फ्रेम मध्ये तिचाच फोटो होता.... ती तशीच स्तब्ध उभी राहून त्याच्याकडे बघत आसवे गाळत होती... इतक्यात विहान चं लक्ष तिच्याकडे गेलं.... आणि तो फ्रेम बाजूला ठेवून धावतच तिच्या जवळ आला आणि तिला गच्च मिठी मारली..! दोघेही एकमेकांच्या मिठीत बराच वेळ रडत होते...

मिठी सोडत विहान ने तिचे हात हातात घेतले.. आणि तिच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणाला..
"निहू.... मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय...एक क्षण ही नाही.. 😫😫"

"मला तर का वाचवलंस तू? सुटले असते मी... तुझा विरह नाही सहन होत आता... 😭😭" म्हणत ती पण रडायला लागली..

"निहिरा प्लीज... असं नको बोलू.. तुला काय झालं असतं तर माझं काय झालं असतं.. 😥😥😥"

"मग सोड ना हा अबोला... माफ कर ना तुझ्या निहू ला... एकदाच...😢"

विहान ने तिला हात पकडून सोफ्यावर बसवलं... आणि तो स्वतः खाली जमिनीवर बसला आणि तिच्या मांडीवर डोकं टेकून म्हणाला...

" निहू... खूप चुकीचा वागलो ना मी तुझ्यासोबत 😓 खूप वाईट आहे मी... 😑😑 I m sorry यार.. "

"नाही विहान... माझ्यामुळे तू जे सहन केलंस त्यापुढे हे सर्व काहीच नाहिये.... 😖😖" ती त्याच्या केसांमध्ये बोटं फिरवत म्हणाली..

"सोड... जे झालं ते झालं.. सहा वाजायला आलेत .. खाल्लं नसशील ना काही... थांब मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणतो.. " विहान डोळे पुसून उठला..

" तू कशाला... थांब मी बनवते... तू बस इथे "

" अगं एवढीही वाईट नाही बनवत मी कॉफी... घाबरू नकोस.. 😅😅" विहान हसतच म्हणाला.. मेन डोअर बंद करून तो किचन कडे वळला..

निहिरा ही हसली... 😄
" विहान... एक मिनिट..... "

आणि विहान किचन मध्ये जाता जाता थांबला.. निहिरा ने इकडे तिकडे बघितलं... आणि जवळच्याच फ्लॉवर पॉट मधला एक रोज🌹 तिने घेतला... आणि विहान च्या समोर गुडघ्यांवर बसली... रोज त्याच्यासमोर धरत ती म्हणाली...

"हा रोज खोटा असला तरी माझं प्रेम मात्र खरं आहे.... 😓
I Love You Vihaan .... I want to be yours forever!! Will you be mine???" ♥️♥️

विहान च्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले... एक वेळ होती जेव्हा त्याने निहिरा ला प्रपोज केलं होतं आणि त्यावेळी तिच्या डोळ्यांत पाणी होतं... आज निहिरा ने प्रपोज केलं होतं आणि विहान च्या डोळ्यांत पाणी होतं..!!

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
कधीपासून पाहतेय किती कासावीस झालायस
वाऱ्याशी भांडलायस सावल्यांपासून लपलायस...
दमलायस खूप....
पावसाने फसवलंय.. उन्हाने ओरबाडलंय..
ये आता माझ्यापाशी!!
खांद्यावरती डोकं टेक..
स्पर्शाचं पांघरुण.. ओठांचं मलम
थोडीशी ऊब देऊ दे परत..
मी इतके दिवस कुठे होते??
इथेच!!
इथेच आहे.. इथेच असणार आहे
बरा झालास, जरा सावरलास
निघशील लगेच, ठाऊक आहे..
मी?.. कुठे जाणार?
तुझ्यासाठी इथंच कायमची थांबणार आहे!! 💕
(स्पृहा जोशी )

विहान ने रोज घेतला आणि तिला मिठी मारली...

"I m yours dear.... Forever and ever !!" 💕..

काही क्षण असेच गेले... आणि मग विहान थोडा सिरिअस होऊन म्हणाला...

"तुझ्याशी थोडसं बोलायचंय निहू.. 😓"

निहिरा पण गंभीर झाली...
"काय झालं विहान.. Anything serious? 😕"

"सांगतो नंतर... आधी कॉफी घेऊया..." म्हणुन तो किचन मध्ये गेला... आणि त्याने गॅस चालू करून दोघांसाठी कॉफी ठेवली... गॅस मंद ठेऊन तो पटकन फ्रेश होऊन किचन मध्ये आला...

तेवढ्यात निहिरा किचन मध्ये आली आणि तिने विहान ला मागून मिठी मारली... त्याने मान किंचित मागे वळवून आपला हात मागे नेत तिच्या केसांमधून फिरवला...

" विहान....... " ती तिची मिठी न सोडता म्हणाली..

"हां बोल..." तो कॉफी मग मध्ये ओतता ओतता म्हणाला..

"प्लीज... मला आता आपल्या दोघांच्या मध्ये काही नकोय... मला कोणत्याही परिस्थितीत तुला गमवायचं नाहिये.. 😐😑"

विहान फक्त हसला...
"चल आधी कॉफी घेऊया... मग बोलू... "

निहिरा थोडीशी नाराज होत हॉल मध्ये येऊन बसली... विहान एका ट्रे मध्ये कॉफी चे दोन वाफाळते मग आणि डिश मध्ये केक चे पिसेस घेऊन आला..

त्याने निहिरा च्या पुढ्यात एक मग ठेवला आणि एक स्व:ताच्या हातात घेऊन तो तिच्या शेजारीच बसला..

" निहू केक टेस्ट करून बघ.. मी बनवलाय...😊"

"काय...?!! खरच?? 😱" म्हणत तिने केक चा एक पीस तोंडात टाकला... "अम्म्म्म्म्.... Yummy!!!! 😍" किती भारी केक बनवतोस तू... आणि तिने कॉफी चा एक घोट घेतला... "कॉफी सुद्धा जबरदस्त... 😙😙😙" म्हणून तिने त्याला फ्लाइंग किस दिला...

विहान तिच्याकडे बघत नुसताच हसत होता...

" ए पण एवढा भारी केक कसा येतो तुला बनवता.. मला तर थोडंफार जेवणाचं सोडून बाकी काहीच नाही येत 😬😬😬"

😂😂😂 विहान मनापासून हसला..!!
"अगं ए.. तू काय मला मास्टर शेफ समजलीस की काय... 🤣🤣 मी फक्त कॉफी बनवलीय... तो केक समोरच्या वहिनींनी दिलाय सकाळीच!! 🤣🤣🤣" म्हणत तो अजून हसायला लागला..

निहिरा ने लटक्या रागाने त्याच्याकडे बघितलं.. आणि ती पण हसायला लागली.. दोघांनी कॉफी संपवली..आणि निहिरा विहान च्या आणखी जवळ सरकून बसली.. त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन तिने त्याला विचारलं..

" विहान काहीतरी सांगणार होतास......"

विहान चं हृदय धडधडायला लागलं...
"निहिरा... I m sorry... पण... काही दिवसांपूर्वी मॉम, डॅड ने मला लग्नासाठी विचारलं होतं.. सावनी डॅडींच्या फ्रेंड ची मुलगी आहे... आमची आधीपासूनची ओळख आहे.. परवा तू ऑफिस मध्ये आलीस आणि रागाच्या भरात मी मॉम ला माझा होकार कळवला.. 😑 एव्हाना मॉम ने तिच्या घरी ही कळवलं असेल... कदाचित त्या लोकांनी एंगेजमेंट ची तयारीही सुरू केली असेल... 😖"

त्याच्या खांद्यावरची आपली मान उचलत तिने ब्लँक चेहर्‍याने त्याच्याकडे बघितलं... 😐 ती उठून बाजूला झाली... आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली... विहान ने ही उठून मागून तिला मिठी मारली... आणि तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवत तो म्हणाला

" रागावू नको ना.. प्लीज.... मी सांगेन मॉम ला की मला तिच्यासोबत लग्न नाही करायचंय... मला माझ्या निहू सोबत लग्न करायचंय......"

"आणि तू होकार कळवल्यानंतर तिने जी स्वप्ने बघितली असतील त्याचं काय.... 😓"

आणि तेवढ्यात निहिरा चा फोन वाजला.... सोनिया ने व्हिडिओ कॉल केला होता... निहिरा ने कॉल चालू केला.. आणि मोबाईल समोर धरला... विहान अजूनही तिला मिठी मारून उभा होता...

" अरे वा..! लैला मजनू का रोमान्स चल रहा है क्या.. लगता है गलत टाईम पर कॉल किया.. 😬😬😬"

"शट अप सोनिया.... बोल..." विहान मिठी अजिबात न सोडता म्हणाला..

"कैसा लगा सरप्राईज???? 😅😅" सोनिया ने हसुन विहान ला विचारलं..

विहान ने निहिरा च्या खांद्यावरची मान उचलत एकदा निहिरा कडे बघितलं..
" अच्छा... हिला इकडे पाठवायचं हे होतं का तुझं सरप्राईज... ☺️"

" नाही.... ते निहिरा चं सरप्राईज होतं..... माझं सरप्राईज अजून बाकी आहे.... " सोनिया म्हणाली... आणि दोघीही एकमेकींकडे बघून खळखळून हसल्या..... 😂😂😂

विहान गोंधळून आळीपाळीने त्या दोघींकडे बघत होता.....!

To be continued..
🙏
#प्रीत

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED