दोन टोकं. भाग ११ Kanchan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दोन टोकं. भाग ११

भाग ११


विशाखा आश्रमात फक्त शनिवार आणि रविवारीच जायची. आणि सायली शनिवारचा पुर्ण दिवस तिकडेच असायची. तसं तर सुट्टी म्हणलं की सगळ्याच पोरी सकाळी ८-९ पर्यंत झोपायच्या. आज सकाळी सकाळीच काकाने सायलीला कॉल केला. सायली कॉलेजला अॅडमिशन घ्यायला गेली होती. काकाचा कॉल कट करून त्याला मेसेज केला की नंतर कॉल करते. मग पटपट अॅडमिशनच काम करून तिकडे गेली. ती पोहोचली तेव्हा दहा वाजत आले होते. घरात जाऊन बघितलं तर सगळं सामसुम. काका सोडलं तर कोणच दिसत नव्हतं.

" इतना सन्नाटा क्यों है भाई...... " सायली ने घरभर नजर फिरवत विचारलं.

" एक जण उठलं नाही. सगळे झोपलेत. "

" काय 😳. दहा वाजायला आलेत आणि अजुन झोपलेत सगळे. "

" हो सुट्टीच कोण लवकर उठणार. रोज शाळेमुळे लवकर उठाव लागत ना मग एक तर दिवस मिळतो झोपायला तेवढा झोपुन घेतात त्या. "

" बाकिच्यांच एक वेळ ठिक आहे पण विशाखा सुद्धा. "

" हो. ती तर सगळ्यात जास्त बिझी असते. रात्री पण उशीरा आली मग मीच नाही उठवलं. "

" अवघड आहे रे. कसं होणार...... "

" माझं माझ्या सासरी मस्त होणार आहे. प्लीज सायु तु सकाळी सकाळी सासर पुराण चालु करून नकोस. " सायली पुढे बोलतच होती की मागुन येणाऱ्या विशाखा ने तिला टोकत उत्तर दिलं.

" 😕😕😒 "

" ओय हॅलो, असला लुक द्यायची गरज नाहीये. For ur kind information मी घाबरत नाही तुला 😏 "

" बर तुमच्या दोघींचं झालं का ?? " त्यांचं आता वाजेल हे बघुन काका पटकन मध्ये बोलला.

" आमचं कुठं काय झालय. बर काका चहा कर ना मस्त. ते पण आल्याचा. "

" का ?? तुला येत नाही का " विशाखाची ऑर्डर बघुन सायली म्हणाली.

" नाही. अजिबात येत नाही. " म्हणून आता आवरायला गेली. काका चहा करायला गेलाच होता की सायली ही त्याच्या मागोमाग आली.

" हिला काहिच कसं येतं नाही. बाकिच्या मुली हिच्यापेक्षा लहान आहेत तरी त्यांना काहि ना काही येत पण हिला काहिच कसं येतं नाही. "

" कारण ती कधी शिकलीच नाही. ना तशी कधी इच्छा दाखवली मग कसं येईल. "

" तेच. तु का नाही शिकवलं. एकतर चिडकी, त्यात खुप पटकन बोलते आणि घरकाम तर काहिच नाही. "

" बघ. जसं सातवी होते तसं मी मुलींना हळु हळु स्वयंपाक शिकवायला चालु करतो. पण हिने मला आधीच सांगितलं होतं की, काका माझ्या मागे काम कर म्हणून मागे लागु नको. मी असल्यास भरपूर करते त्यात कमी पडले तर काम लाव. आणि असं म्हणून तीने जे असल्यास करायला सुरुवात केली ती केलीच. कॉलेजला असताना तर वेळच मिळायचा नाही तीला मग ठरवलं की नंतर शिकवता येईल तर मॅडम जॉबला लागल्यावर तर कॉलेजपेक्षा जास्ती बिझी इकडे झाल्या. सांग मग आता कधी शिकवायला हवं होतं मी. आणि खरं सांगु का. विशाखा कशी का असेना पण ती बेस्ट आहे. मला नाही वाटत तिला काही नवीन‌ शिकवायची गरज आहे. स्वयंपाक नका का येईना बाकी गोष्टींमध्ये तर ती परफेक्ट आहे ना. मग....... "

" पण तरीही काका. स्वत:पुरता का होईना पण करता यायला पाहिजे. काहिच येत नाही म्हणजे कसं. "

" एक गम्मत सांगु......😉 "

" काय 🙄 "

" तिला सगळ येत बरं का 😬 "

" काय 😳. मला तर नेहमी म्हणते की काहिच येत नाही आणि तु म्हणतोस येत सगळं. एक मिनिट आत्ता तर म्हणाला होता ना की काहिच येत नाही मग आणि आत्ता लगेच म्हणतोय की सगळं येतं. "

" अरे म्हणजे तिला करायला येत पण फक्त theory 😹🤣 "

" म्हणजे 😕. थेअरी म्हणजे. "

" अरे म्हणजे काय करताना काय टाकायचं ते सगळं माहितीये, अगदी तोंडपाठ फक्त बनवताना ती सगळं विसरते. थेअरी येत सगळं फक्त प्रॅक्टिकल करताना गडबडीत सगळं. एकदा तीने ट्राय केलं होतं त्यांच्यानंतर कधीच केलं नाही "

" थेअरी पाठ आहे. पण ती तरी कशी पाठ झाली. "

" सगळ्या लहान आहेत बघ मुली. म्हणजे या आश्रमाची सुरूवातच विशाखा सोबत झाली. मग लहान असताना मी काम करताना सोबतच असायची. जेवण बनवताना इथं कट्यावर बसुन सगळं बघायची त्यामुळे तसं तीला सगळंच माहितीये फक्त कधी ट्राय केलं नाही तीने. "

" ............. "

" काय झालं. शांत का झालीस ?? "

" विशाखाचा हा corner पण आहे हे पहिल्यांदाच बघितलंय मी. ☺️ "

" हो मग. माझी मुलगी एकदम‌ परफेक्ट आहे म्हणून आता परफेक्ट पार्टनर पण शोधायचाय. "

" काय 😳. लग्न माझं 🙄. नाही मी अजिबात करणार नाही. मला करायचचं नाहीये ना. त्यामुळे नो पार्टनर. काका तु अस काही अजिबात करणार नाहीयेस कळलं का तुला. हे या माकडिणीनेच डोक्यात भरवले असेल ना तुझ्या. नाही म्हणजे नाही. "
मागुन येणाऱ्या विशाखा ने परत शेवटचं वाक्य ऐकलं आणि येऊन लगेच दोघांवर फायरींग सुरु केली.

" तु नेहमी शेवटचचं कसं ऐकतेस गं ?? 🤨" सायली

" शेवटचं नाही की पहिल नाही. पण सांगितल ना मी. नाही म्हणजे नाही. मी जड झालीये का तुम्हाला 🥺 "

" असले इमोशनल डायलॉग आमच्यावर फेकुन काहिही होणार नाही. 😏 " सायली

" काका 😭😭😭😭😭😭 " असं म्हणून विशाखा मोठ्याने रडायला लागली.

" डोळ्यातून पाण्याचा थेंबही येत नाही आणि नाटकी तर बघा. 😬 " सायली

" असं नाही वाटत का. आज जरा जास्तच टोमणे मारतीये तु 😕 🤨 "

" नाही. मला तर नाही वाटत 🤭 "

" चुप. ( काकाकडू बघत ) हे बघ काका मला खरंच लग्न नाही करायचं. मी आहे तशी छान आहे ना एकटी. मग का करायचं. नाही करायचं ना. प्लीज ना. "

" आयुष्यभर एकटी राहणारी आहेस का तु ??? बघ एकटीने आयुष्य काढता येत नाही असं नाही. पण कधीतरी एका पॉइंटला असं वाटेल की कोणीतरी हव होत सोबत...... मग काय करणार तु.... "

" का ?? तुला आहे का सोबत कोण ?? तु राहतोच ना एकटा मग...... " आणि तेवढ्यात पाय-यावरून ती पाय जोरात घसरून पडली. काय चाललंय काहिच कळत नव्हत तिला. हळु हळु चालत गाडीत येऊन बसली आणि घराकडे निघाली. इतका वेळ आपण बोलत होतो ते स्वप्न होत............