kadambari jivlagaa Part-28th books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ..भाग-२८

कादंबरी –जिवलगा ..

भाग-२८-वा

----------------------------------------------------------

ऑफिसमध्ये एकट्या नेहाचीच अशी बदली झालेली नव्हती , तिच्या सारख्या अनेक मेम्बर्सना

वर्क चेंज होणे आवश्यक आहे “या नावाखाली ..या मजल्यावरून –त्या मजल्यावर शिफ्ट केले होते .

या सगळ्यां नव्याने भरती झालेल्यानच्या मनात एकच भावना ..

नऊ तास जॉब करायचा , कोणता टेबल, कोणती टीम ?

..काही फरक अडणार नव्हता या सर्वांना . समोरचा टेबल आणि

त्यावरचा कॉम्पुटर आणि त्यातला प्रोग्राम ..याबद्दल माहिती करून घेतली की ..ही सारी जण

अगदी सफाईदारपणाने आपापल्या कामात गुंतून घेत ..ऑफिस आणि जॉब एन्जोय करीत आहेत .

ऑफिसमध्ये आल्यावर नेहाला हा सीन रोजच पाहायला मिळत असे .

आता तीन आठवडे झाले होते ..तिला , तिच्या या नव्या सेक्शनला येऊन .. .

तिच्या बॉस-हेमकांत पांडे असे होते तरी .सगळे त्यांना हेमूसर म्हणत असतात हे तिला जाणवले .

त्यांच्या कामाची पद्धत तिला आवडली ,सोबतच्या सगळ्या स्टाफशी अदबीने ,सभ्यतेने बोलणारा

बॉस, तिच्याशी एक मर्यादा आणि अंतर ठेवूनच वागत होता .

नेहाच्या समोर तो बसायचे टाळतोय ",बोलायचे असते पण न बोलता निघून जातो ",

हे तिने बरेच वेळा पाहिले , पण ,नेहा काही न बोलता गप्प बसून रहाते "हे त्याला आवडले नाही का ?

अशी शंका तिच्या मनात येऊन गेली ,त्यला तिच्या मते महत्व द्यायची गरज नाही.

हेमूसरांची कामे चोखपणे करण्याची वृत्ती ..नेहाला मनापासून आवडली .

ऑफिससंपल्यावर रूम वर आले की ..घरी असल्या सारखे वाटत असे ..याचे सारे क्रेडीट

आपल्या सतत सोबत असणार्या ,आपल्याला खूप आधार देणाऱ्या दोन मैत्रिणींचे आहे.

सोनिया आणि .अनिता यांचे बरोबर .आता ती छान पैकी सेटल झाली होती .

..दिवसभर ..ऑफिसमध्ये काय-काय झाले हा विषय जेवतांना खमंग भाजीसोबत जास्तच टेस्टी

लागायचा ..या गप्पांच्या ओघात ..जेवण ही कधी होऊन जायचे कळायचे नाही.

अनिता आणि सोनिया ..दोघीजणी पारिवारिक विषयावर बोलण्यास फारश्या उत्सुक नसायच्या ,

अनिता म्हणे ..

नेहा – आमच्या आठवणी म्हणजे सगळ्या ..मनाला दुखी करून टाकणार्या असतात ,

त्या पुन्हा आठवणे म्हणजे ..आपल्याच माणसांनी दिलेले त्रास आठवून .आपल्या मनस्ताप वाढवून

घेण्यासारखे आहे.

सोनिया तिच्या बोलण्याची री ..ओढीत म्हणे ..

माझे तरी कुठे फार वेगळे आहे .. ज्या शैलेशला जीव लावला , त्याच्यावर भरभरून प्रेम केल ,

त्या प्रेमाचं फळं काय मिळाले मला ?

आवडीने उभारलेला माझा संसार , माझा मुलगा , माझे घर ...किती .छान आणि सुंदर होतं माझे हे सारे माझे जग !

पण, शैलेशने दुसर्या स्त्रीच्या मोहापायी माझ्या भावनांचा ..माझ्या प्रेमाचा बळी दिला ,

त्याचे त्याला काहीच वाटत नाही.

आता तर आम्ही एकमेकांच्या आयुष्यातून सुद्धा बाजूला होणार आहोत .,

फक्त कधी आणि केव्हा ? हे कोर्टाचा आदेश ज्या दिवशी निघेल त्या दिवशी कळेल ,

माझे सगळे आयुष्य पूर्ण उध्वस्त होऊन गेलेले असेल .. कल्पनेने ..मनात नाना विचार येतात ..

माझा शैलेश ..माझ्या या मित्रावर ..जिवलगावर किती जीव होता माझा ,आणि त्याने असा विश्वासघात घात केला .

प्रेम या भावनेवरचा विश्वास उडून गेलाय आता तर ..!

जेवण संपता संपता ..विषय भलताच वळणावर आलेला पाहून ..

अनिताने सोनियाला सावरत म्हटले ..

हे बघ ..आता तुझ्या हातात काही उरलेले नाहीये . तू ज्याच्यासाठी इतकी दुख्ही होते आहेस ..

तो तर ...तिच्या बरोबर मजा मारीत असेल ..

हिम्मतीने वाग आणि अशा नालायक माणसाला पुन्हा आठवून..स्वतहा दुख्ही होऊ नकोस.

यावर नेहा म्हणाली ..

सोनिया – अनिता समजावते आहे ते बरोबरच आहे..

आणि तू जे बोलून दाखवते आहेस ..ते ही बरोबरच आहे..

तूझे शब्द म्हणजे तुझे दुक्ख आहे,जे तुझ्या जिवलगाने -शैलेशने तुला फसवले आहे, म्हणून ते

जास्त वाईट आहे, चीड आणणारे आणि संतापदायक आहे.

काहीच कसे वाटले नाहीये त्याला ?

सोनिया म्हणाली – नेहा , यातले तुला आता समजणे अवघड आहे , आणि मला समजावून सांगणे

हे त्याहून अवघड आहे. जाऊ दे.

आमची रडगाणी ऐकून तू मात्र बोर होऊन जातेस ,पण, काय करू, मनातले ओठावर येतेच नेहा ,

आणि बोलून दाखवले की मन मोकळे होऊन जाते .

अनिता म्हणाली –

नेहा – इतके दिवस आम्ही दोघीच ,त्यामुळे .. एकमेकीना आम्ही त्रासदायक वाटणारे विषयवार शक्यतो

बोलत नसायचो .

पण, आता तू आलीस ना , एक तिसरी व्यक्ती ..ऐकून घेणारी ..,मग हे असे होते कधी ..

मनातल्या जखमा वाहायला लागतात .

दोघी मैत्रिणींना नेहा म्हणाली –

तुम्ही जरूर सांगत चला ,माझ्याजवळ तुम्ही तुमचे मन मोकळे करून सांगता ,त्यामुळे तुमचे मन हलके होते

“ याचाच मला आनंद आहे. मला काय वाटेल ?

याचा प्लीज विचार करीत जाऊ नका .

अनिता आणि सोनिया दोघी एकाच आवाजात म्हणाल्या ..नेहा यु आर गुड फ्रेंड !

नेहाच्या मोबाईलचे रिंग वाजली ..आणि स्क्रीनवर “मधुरिमादीदी ..असे नाव चमकू लागले ..

आज बरेच दिवसांनी तिचा फोन आला होता ..

सोनिया आणि अनिता दोघींनी तिचे बोलणे ऐकायला काहीच हरकत नव्हती म्हणून ..

नेहाने म्हटले -दीदी तू..व्हिडीओ-कॉलच लाव आम्ही तिघी एकाच वेळी बोलतो तुझ्याशी ..चालेल ना !

दीदीने ..व्हिडीओ कॉल सुरु केली .. सोनिया ,अनिता ,नेहाशी हाय ,हेल्लो झाले ..

दीदी म्हणाली ..सोनिया ..नेहा सेटल झाली की नाही नव्या सेक्शन मध्ये ?

तू काहीच अपडेट दिले नाहीस..

सोनिया म्हणाली –

अहो दीदी ..काय सांगू तुम्हाला ..ही नेहा ,तिच्या ऑफिस रुटीन बद्दल आमच्याशी काही शेअर करीत

नसते ,एक शब्द ही बोलत नाही की सांगत नाही.

.मग, आम्हाला कसे कळणार ..

नेहाबाईची गाडी सुरु झाली की ..अजून आहे तिथेच आहे .?

दीदी म्हणाली ..अनिता आणि सोनिया ..काय हे ,तुम्ही एवढ्या अनुभवी ..आणि अजून या नेहाची

पाटी कोरीच्या कोरी ..नो नो ...!

मलाच काही करावे लागेल असे दिसते आहे ..

बरे ते जाऊ दे ..

आज मला खूप महत्वाचे सांगायचे आहे –

ते म्हणजे .. रणधीरने माझा इथला मुक्काम तीन महिन्याच्या ऐवजी ..सहा महिने असा वाढवून

टाकला आहे.

सो, अनिता आणि सोनिया ..

नेहा आता आणखी काही दिवस ..तुमच्याकडेच असणार आहे..

काही हरकत नाहीये ना ?

नेहाच्या मावशी आणि काका ,आणि मी ..बहुदा एकाच वेळी भारतात परत येउत असे वाटते आहे मला .

मधुरिमा दिदीचा हा निरोप ऐकून ..अनिता आणि सोनिया म्हणाल्या ..

अहो ,यात हरकत कसली यात , खुशाल राहू दे नेहाला आमच्या सोबत .

आता ,नेहाला मात्र विचारा बाई ..ती रेडी आहे ना ? आमच्या सोबत राहायला .

नेहाने दीदीला म्हटले –

दीदी मी इथे खूप मजेत आहे, व्यवस्थित आणि सुखरूप आहे.

मावशी –काका ,आणि तू परत येईपर्यंत .. या दोघी सोबत मी आनंदाने राहीन ,उलट मला यांच्या

सोबत रहाणे अगदी मनापासून आवडते आहे.

नेहाचे बोलणे ऐकून ..दीदी म्हणाली ..

अरे वा , छान वाटले हे ऐकून .

मजेत रहा ,आनंदात रहा सगळे ..

बाय बाय ग पोरींनो ..!

आपला इथला मुकाम अजून वाढला याचा खरोखरच खूप आनंद अनिता –सोनिया दोघींना झालाय

हेजाणवून नेहाला खूप बरे वाटले . ती म्हणाली ..

सोनिया ..तुम्ही दोघी माझ्या पाठीशी नसता तर ..माझे काय झाले ? कल्पना नको वाटते .

तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात ,इथे सोबत राहिल्या पासून तर मला माझ्या परिवारातीलच अगदी

घरातील व्यक्तीच वाटत आहात .

माझे आई-बाबा ,आणि माझ्या घरचे सगळे अगदी निश्चिंत झालेत ..

तुम्ही माझी किती काळजी घेता मला किती सांभाळून घेता “ हे सगळे मी त्यांना नेहमी सांगत असते .

माझी आई तर म्हणते ..

नेहा –तू खूप नशीबवान आहेस पोरी , आजच्या या अशा दिवसात तुला अशा मैत्रिणी मिळाल्या ,

नाही तर कोण कुणाला विचारीत नाहीत आजकाल .

नेहा – तू एकदा तुम्ही तिघी मिळून या आपल्याकडे , मला खूप छान वाटेल तुझ्या या मोठ्या

बहिणीसारख्या असणार्या मैत्रिणींना भेटून आणि पाहून .

नेहाच्या आईच्या आपल्या बद्दलच्या कौतुक आणि आपलेपणाच्या भावना ऐकून ..अनिता आणि सोनियाचे

मन भरून आले .

.त्या दोघी म्हणाल्या ..

नेहा –आम्हाला आमच्याबद्दल असे कुणी छान वाटणारे कधी बोलणारे भेटलेच नाहीये ग.

किती छान बोलतात तुझ्या आई ..

तू इतकी गोड मुलगी ..कशी काय ?

याचे उत्तर आज मिळाले –

तू तुझ्या आई सारखीच आहेस , हो ना ?

नेहा म्हणाली –

हो – माझ्यावर माझ्या आईचा खूप प्रभाव आहे, तसाच आणि तितकाच प्रभाव माझ्या आज्जीचा आहे .

या दोन स्त्रियांनी ..आमच्या परिवाराला प्रेमाने एकत्र घट्ट बांधून ठेवले आहे.

माझी आजी म्हणजे ..माझ्या बाबांची आई , आता तिचा अमृतमहोत्सव ..म्हणजे ७५ वा वाढदिवस

आणि आजोबांचे सहस्त्र –चंद्र दर्शन सोहळा “ म्हणजे ..त्यांचा ८१ वा वाढदिवस ..

हे दोन्ही बिग इव्हेंट ..यावर्षीच्या दिवाळीत आमच्या परिवारात आहेत .

सोनिया आणि अनिता ..आतापासूनच ठरवू या .माझ्या घराच्या या कार्यक्रमाला आपण तिघी

मिळून जाणार आहोत .

तुम्हाला आवडेल ना ? आमच्या लहान गावाकडे येणे ?

आणि आमच्या घरातील कार्यक्रमाला ?

नेहा – अगदी पक्का प्रोमीस ..,आजच फिक्स आणि फायनल

–आपण सगळे मिळून तुझ्या गावी या कार्यक्रमाला जायचे म्हणजे जायचे .

खुश ना आता नेहा राणी ?

हो हो ..खूप खुश झाले मी . आणि

अजून काही दिवस मला तुमच्या सोबत राहायला मिळणार आहे याचा खूप आनंद झाला आहे.

अनिताने सोनियाकडे पहात म्हटले -

नेहा ..आता मी काय विचारते आहे ते नीट ऐक

आणि खरे खरे उत्तर दे !

अनिताकडे गोंधळून गेलेल्या चेहेर्याने पहात नेहा म्हणाली -

कशाबद्दल खरे काह्रे उत्तर दयाचे आहे मी ?

तुम्हाला सगळे माहिती असते माझ्याबद्दल ,

मग,कशाची शंका येते आहे ? मला तर कळातच नाहीये ?

कधी कधी मला असे फील होत असते की -

तुमच्या मनात नक्कीच काही तरी शिजवलेले आहे, आणि त्या अपेक्षे प्रमाणे घडत नाहीये

यामुळे तुम्ही अधून मधून मला विचारीत असता ..काय झाल काय झालं ? हो ना ?

अनिता –सोनिया ..

आता तुम्ही सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगा मला ..तुम्हाला काय अपेक्षित आहे माझ्याकडून ?

ओके नेहा बेबी ..ऐक तर मग ..

ही तुझी जी बदली ,सेक्शन चेंज झाले आहे ना ..हे मधुरिमा दिदीचा ठरवलेला plan आहे ..

तुला एकदम ऑफिसर पोस्त देऊन बदली करणे ..जोक वाटला कि काय तुला ?

वर्षान नू वर्षे खितपत पडलेत इथे ..प्रमोशनसाठी ..आणि

तू कल की मामुली छोकरी ..आज एकदम ऑफिसर ?

का आणि कशामुळे ?

तर तुझ्या मधुरिमा दीदीला वाटते ..

की आपल्या या येड्या नेहाला ..

एक छान बोय –फ्रेंड मिळावा , तिच्या आयुष्यात तिच्य्वर प्रेम करणारा

जीवाला जीव लावणारा कुणी मजनू – जिवलग तिच्या आयुष्यात यावा .

आणि तुला सांगते नेहा ..

दीदीच्या या प्लानला आमचा फुल सपोर्ट आहे. कारण .

तुझा बोस .आणि ऑफिसचा चोकलेट बोय – हेमू पांडे ..तुझ्यासाठी अगदी योग्य आहे असे आम्हाला

कधी पासूनचे वाटते ,.

मग आम्ही ..दीदीला हे सांगितले ..

तुला हेमू पांडेच्या सेक्शनला पाठवणे “हा बाये हाथ का खेळ ..

त्यांनी बिग बॉस .विश्वजीतसरांना फोन करून सांगितले .

..मग काय दुसर्याच मिनिटाला ..

या नेहा मादाम ..तुम्ही सिस्टीम ऑफिसर झालात .

कळेल का आता तरी .

आम्ही रोज रोज तुला तुझ्या बॉस बद्दल खोदून-खोदून का विचारीत असतो ते ?

दोघींचे बोलणे ऐक्ल्य्वर , नेहा थक्क झाली ..

कोपरापासून हात जोडीत ती म्हणाली ..

धन्य धन्य आहात तुम्ही सगळे ..

तरी मला वाटले ..दीदी माझ्या ऐवजी ..तुम्हालाच सारखे सारखे ..का विचारते आहे ?

तुम्हाला सांगितलेल्या कामाचे काय झाले ?

जसे तिने सोपवलेले काम ,त्यातले काही तुम्ही काही करीत नाही .म्हणून दीदी नाराज झालीय

यस नेहा –अनिता म्हणाली ..

तुला सांगते ..तो हेम्या ..तुझ्या सारखा येडा –बांबू निघाला , आम्हाला वाटले होते ..एकदम बोल्ड ,

दशिंग आहे पोरगा ,

या नेहाला सहजपणे सांगेल ..बोलेल .

पण, कसचं काय ..

तो म्हणतो .

.नेहाला नाही आवडले तर कसे ? मला तिची भीती वाटते .म्हणून मी तिच्या समोरच

येण्याचे आणि बसण्याचे टाळीत असतो.

सोनिया म्हणाली –

अनिता – आता एक करायचे .. कसे कसे ,काय काय होते हेच आपण पहायचे ..

आपले काम काय होते ..ते आपण केले

या नेहा आणि हेमू पांडे ..दोघांना एकत्र आणणे ..ते तर दीदींच्या मुळे सहज शक्य झाले .

पण..

या दोघा येड्या पोरांना ..आपण कसे सांगणार की

बाबानो ..आता तुम्ही एकमेकावर प्रेम करा बरे का !

अनिताला तर हसू आलेच , नेहाच्या चेहेर्यावर हसू उमटले आहे हे दोघींच्या नजरेतून सुटले नव्हते .

ती मंत्ल्या मनात म्हणाली -

अरेच्च्या -ही नेहा तर हसते आहे छान !

म्हणजे ..काही तरी होऊ शकते अजून ही !

नेहा – अगदी मनापासून सांग ..

हेमुकांत पांडे ..कसा आहे ?

मित्र ,सहकारी आणि वूड बी युवर लवर –बॉय ?

नेहा लाजेल आणि खाली मान घालून एक शब्द बोलणार नाही असेच दोघींना वाटले ..

पण नेहा म्हणाली ..

तुम्ही असे काही अंदाज करू नका ..

माझ्या मनात असे काही नाही ..

अजून तरी ...असे काही ...!

अनिताने नेहाचा हात आनंदाने घटत धरीत म्हटले ..

हो का ...!...बरं बरं !

सोनिया –ऐकतेस ना काय म्हणाली ही पोरगी ..

अजून तरी ..!

मीन्स ..उद्याचे सांगता येत नाही ..

चालू दे चालू दे .. ये दिल कभी तो पिघ्लेगा

अनिता म्हणाली – हेम्याला उद्या सांगते ..

बेट्या ..धीर नको सोडू पोरा ..लगे रहो ..

सोनिया –अनिता मोठ्या आनंदाने नेहाकडे पाहत होत्या ..

नेहाच्या चेहेर्यावर गुलाबी स्मित खुलत होते ...

------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात –

भाग -२९ वा लवकरच येतो आहे ..

--------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी .जिवलगा ..

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED