Two points - 13 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग १३

भाग १३


विशाखा सायलीसोबत राहुन राहुन बरीच शांत झाली होती. पण मागच्या आठवड्यापासून जरा तीची चिडचिड वाढली होती. आणि त्याच टेन्शन काकाने घेतलं होतं. कारण मनातलं असं पटकन बोलुन दाखवण‌ विशाखाचा स्वभावच नव्हता. ती फक्त समोरच्यावर रागवून मोकळी होते पण मनातला त्रास बाहेर नाही काढत.
आणि काका सारखं रागवु नको म्हणतो म्हणून तीने आश्रमात यायचं बंद केलं. आता घरीच रहायला लागली. मागचा एक आठवडा विशाखा फिरकलीच नाही. काही कळायला मार्ग नव्हता शेवटी काकाने सायलीला फोन केला,
" हां बोला ना काका. काय झालं ?? "

" काही नाही. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. "

" आपण नंतर बोलुयात का ?? आत्ता मी थोडं बिझी आहे. "

" बर ठीक आहे. " आणि सायली ने फोन ठेवुन टाकला. काकाला जरा हे विचित्रच वाटलं. म्हणजे सायली असं कधीच करत नाही. जाऊदे, असेल बिझी. नाहीतर ती असं कधीच करणार नाही म्हणून स्वत:च्याच मनाची समजूत काढली त्याने.
नंतर सायली वेळ मिळाला की फोन करेल म्हणून कितीतरी वेळ तो वाट बघत बसला होता. पण तीचा फोनचा आला नाही. मेसेज केला असेल तीने म्हणून बघितलं तर ते ही नाही. हे जरा अजबच वाटत होतं की सायली ने फोन केलाच नाही परत. विसरली असेल फोन करायच. मीच करतो राहुदे. असं म्हणून त्यानेच करायचं ठरवलं. फोन लावला पण तीने उचललाच नाही. परत लावला पण तीने फोन उचललाच नाही. मिसकॉल बघुन तरी करेल परत म्हणून त्यानेही विषय सोडून दिला. पण तरी काका विशाखा ची काळजीत पडला होता.
का परत चिडचिड करायला लागलीये ?? काय झालं असेल ?? घडाघडा बोलत पण नाही. कसं कळणार नाही बोलली तर ?? सायलीला फोन करून विचारावं तर ती ही फोन उचलत नाहीये. ‌‌

इकडे विशाखा ची मात्रा चांगलीच चिडचिड होत होती. सायली आजकाल आधी सारखं बोलतच नव्हती‌. कदाचित तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींमुळे असेल पण आधी सारखे फोन होतच नव्हते. आधी रोज होणारे फोन आता आठवड्यातुन एक-दोनदाच व्हायचे. रोजची सकाळ तिच्या मेसेज ने सुरु होणारी आता होतच नव्हती. विशाखा कितीतरी वेळ केबीनमध्ये बसुन विचार करत होती,
काय झालं हिला काय माहिती ?? आधी तर कितीही बिझी असली तरी बोलायची आता बोलतच नाही. मी केले तरी उचलत नाही फोन लवकर. उचलले तरी बोलायला काहीच नाहीये आमच्यात..... का होतंय असं ??? आधी तर बोलायला आमच्याकडे भरपुर टॉपिक होते, मग आताच का होत नाहीये बोलणं. बोलायला विषय का मिळत नाहीये ?? नुसतं काय चाललंय, काय नाही. ह्यावर काही बोलतच नाही. बापरे डोकं फुटायची वेळ आली आहे. चहा प्यावा लागेल तरच बरं वाटेल.

आणि केबीनमधून निघून ती हॉस्पिटल बाहेर आली. गाडी काढली आणि नेहमीच्या जागी येऊन एक चहा मागवला आणि शांत बसली. चहा पित होतीच की मागुन कोणाच्यातरी भांडणाचा आवाज ऐकायला यायला लागला.
" च्यायला, इथे शांत आहे म्हणून इथं येऊन बसले तर इकडे पण आहेच. कोण पिटपिट करतय काय माहिती ?? "
असं म्हणून मागे वळुन बघितल तर एक मुलगा कोणालातरी भांडत होता. त्याचा चेहरा दिसत नव्हता म्हणून विशाखा ने थोडं झुकुन बघितलं तर तोच मुलगा होता तो, जो तिला धडकला होता.
" हा 😲. मग बरोबर आहे. याला तर भांडायची सवयच आहे ना. त्या दिवशी माझ्यासोबत भांडला, आता इथे पण कोणासोबत तरी भांडतोय 😏. आता मला बघितलं तर परत डोकं खाईल. "

त्याने बघु नये म्हणून पटापट चहा पिऊन पळायच्या तयारीत असतानाच तो समोर येऊन बसला.

" हाय " त्याने विशाखाला हाय केलं पण विशाखा बघुन न बघितल्या सारखं केलं. तर परत त्याने हाय केलं.
तरीही विशाखा ने लक्षच दिलं नाही. उठून पैसे देऊन जातच होती की तो बडबडला.

" काय चिडके लोक आहेत आजकाल. " त्याच ते वाक्य ऐकुन विशाखा लगेच त्याला म्हणाली,

" एएएएएए. मी चिडकी नाहीये. "

" मी कुठं तुला चिडकी म्हणालो. "

" आत्ता तर म्हणाला. "

" तुझ नाव कुठं घेतलं. मी फक्त एवढंच म्हणालो की आजकाल जगात फारच चिडकी लोक आहेत. "

" जास्त हुशारी नाही दाखवायची 😤. "

" दाखवायची 😲. मी तर ऑलरेडी हुशार आहे 🤗. " आपल्या केसातुन हात फिरवत तो म्हणाला.

" 😏 "

" खरंच. मग 3 महिन्यांचा MS-CIT चा कोर्स मी दोन महिन्यांत पूर्ण केला होता 😎. आहे की नाही हुशार. " आपली कॉलर वर करत म्हणाला.

" काय 🙄. कसला कोर्स ?? "

" कम्प्युटर कोर्स 😳. तुला नाही माहिती.... " एकदम आश्र्चर्यचकित होऊन त्याने विचारल.

" नाही. "

" कोणत्या कोणत्या जगात जगता यार तुम्ही लोक ?? कम्प्युटर कोर्स‌‌‌ माहिती नाही म्हणजे काय ??? "

" ज्या जगात जगतीये तिथे तरी आत्तापर्यंत माझं ह्या कोर्समुळे काहिही अडल नाहीये. "

" तरीच तु अशी आहेस. अकडु 😏 " आधी मोठ्याने म्हणाला पण अकडु एकदम लहान आवाजात बोलला तरी ते विशाखा ने ऐकलं.

" अकडु 😳. एएएए मी नाहीये अकडु. तुच आहेस. "

" पण मी तुला कुठं म्हणलं ...... "

" हां मग, तरीच तु तशी आहेस अकडु, असं कोण म्हणलं 🤨 " विशाखा ने त्याच्याच टोन मध्ये ते वाक्य बोलुन दाखवलं.

" वाव !!! तु मिमिक्री आर्टिस्ट आहेस ??? "

" काय 😳🙄. कोण म्हणलं ?? आणि एक मिनिट कोणत्या अँगलने वाटते 🤨 "

" कसला मस्त आवाज काढला माझा. एकदम शेम तु शेम "

" मी पण कुणाला बोलत बसलीये..... "

" आकाशला. त्या दिवशी‌ तर नाव सांगितलं. लगेच विसरलीस. "

" तुझ नाव का लक्षात ठेवु मी. 😏 "

" मी कसं अकडु म्हणून तुला लक्षात ठेवलय तसं 🤭 "

" मी अकडु नाहीये 😤😤😡 "

" हो अकडु नाहीस पण चिडकी नक्कीच आहेस 🤭 "

" नाहीये. नाहीये. नाहीये 😡. "

" हे पण चिडुन सांगतिये 😜 " आणि तो हसत हसत उठला.
तसं चिडुन विशाखा रागात गाडी कडे निघाली. हां कितीतरी वेळ तिला मागुन आवाज देत होता पण हीन मागे वळुन बघितलच नाही. तशीच निघुन त्या बागेत आली जिथे पहिल्यांदा त्या दोघी भेटल्या होत्या.
" कसा मुलगा आहे हा. किती डोकं खातो यार. म्हणे मी अकडु. मी अकडु दिसते ह्याला. ह्याचेच डोळे खराब आहेत. कसं होणार ह्याच्या बायकोचं लग्नानंतर. अरे मी का काका सारखं बोलायला लागले. शी 😖😖😖. एक आठवडा झालं भेटले नाहीये. आज जर नाही गेले तर परत दारात उभा करायचा नाही तो. आज जावंच लागेल. " आणि आश्रमाकडे निघाली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED