Sparsh - 5 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 5

त्या क्षणानंतर आयुष्याने थोडीशी पलटी घेतली ...मस्तीचे दिवस संपले आणि आता वेळ होती पेपरची ..दररोज येणारे सेमिनार , वायवा , सबमिशन्समुळे सर्वच व्यस्त झाले ..एक गोष्ट झाली की दुसरी यायची ..कॅन्टीनला सुद्धा फारच कमी वेळ भेटत होता ..कॉलेजच्या कॉलेजला राहून हाय बाय एवढंच बोलत होतो ..अभ्यासामुळे माझ्यावरचीही प्रेमाची नशा कुठेतरी दूर उडून गेली होती ..मी तसा बाकी वेळ सिरीयस नसलो तरीही पेपरच्या वेळी फार सिरीयस असायचो ..त्यातल्या त्यात कधी नेहा , मानसीला अभ्यासबद्दल मदत करावी लागायची त्यामुळे तेवढं काय तर भेटणं व्हायचं ..एक तर प्रेमाच्या चक्करमध्ये रात्रभर झोप नव्हती लागत त्यामुळे बराच अभ्यास करायचा बाकी होता ..मीही तेवढ्याच झपाट्याने अभ्यासाला लागलो ..या काही दिवसात साधं कुणाशी भेटणं देखील होत नव्हतं ..शेवटी पेपर आले आणि तसे गेलेही ..कोमेजलेले चेहरे आता प्रसन्न दिसत होते ..काहींचे पेपर फार सुंदर गेले असल्याने ते फार खुश होते तर काहींना डी.सी. होण्याची भीती ..तरीही पेपरसोबतच थोडस टेंशन गेलं ..आज पेपर संपले होते त्यामुळे डोक्यावरच थोडफार ओझं कमी झालं ..आज खूप दिवसांनी समाधानाने झोप लागणार होती शिवाय उद्यापासून पुन्हा मानसीला वेळ देता येणार होता आणि मनातलं सांगायचंही होत त्यामुळे आज फार आनंदी होऊन झोपी गेलो ..
कॉलेजचा दुसरा दिवस ..पहिल्या दिवसापासून क्लास सुरू होणार नाहीत हे माहिती असल्यामुळे आज उशिराच उठलो ..आईनेही आज मला उठवण्याचा प्रयत्न केला नाही ..मोबाइलवर शाश्वतने फोन केला तेव्हा कुठे झोप उघडली ..लवकरच फ्रेश झालो ...आईने आज मस्त गरम - गरम कॉफी हातात आणून दिली त्यामुळे दिवसाची सुरुवात मस्त झाली ..आज खूप दिवसांनी गाणे ऐकण्याचा मूड झाला म्हणून घरातल्या होम थेटरवर गाणे लावले आणि पहिलंच गाणं प्ले झालं ..ते गीत एकूण जणू वाटलं की हे गीत फक्त माझ्यासाठी बनलं आहे...

होशवालो को खबर क्या
बेखुदी क्या चीज है
ईश्क किजिये फिर समझिये
जिंदगी क्या चीज है ..

होशवालो को खबर क्या
जिंदगी क्या चीज है

हम लबो से कह न पाये
उनसे हाल दिलं कभी
और वो समझें नही ये
खमोशी क्या चीज है

होशवालो को खबर क्या
बेखुदी क्या चीज है
ईश्क किजिये फिर समझिये
जिंदगी क्या चीज है ..

मी गाण्यात इतका हरवलो की डोळे मिटून घेतले ..तेवढ्यात आई आत येत म्हणाली , " ओय होशवाले तुम्हाला खबर आहे का तुम्हाला उशीर होत आहे " ..

घड्याळीकडे बघितलं तर फारच उशीर झाल्याचं लक्षात आलं ..आईने गरम पाणी टाकलं आणि मी अंघोळीला गेलो ..तिथेही फक्त गितच गुणगुणत होतो ..लवकरात लवकर अंघोळ केली आणि बेडरूमला परत आलो ..गाणे आताही सुरूच होते ...

तुमको देखा तो ये खयाल आया
जिंदगी धूप है तुम घना साया

तुम चले आओगे तो सोचेंगे
तुम चले आओगे तो सोचेंगे
हमने क्या खोया
हमने क्या पाया
जिंदगी धूप है तुम घना साया
तुम को देखा तो ये खयाल आया ..

आज गीतांनी मला चक्क वेळ लावलं होत ..त्यावेळी फक्त टॉवेल गुंडाळून होतो आणि तुमको देखा तो ऐकताच मानसीचा चेहरा आरशात दिसला आणि गुंडाळलेला टॉवेल अचानक सुटला ..समोर बघितलं तर ती नव्हती ..बाजूला बघितलं तरी आईसुद्धा नव्हती त्यामुळे थोड्या फार प्रमाणात माझी इज्जत वाचली ..आईने कॉलेजचे कपडे प्रेस करून ठेवले होते ..मी एकदा कापड्यांकडे बघितलं मला रोज तोच कॉलेजचा ड्रेस लावून कंटाळा आला होता त्यामुळे ते कपडे तसेच ठेवून व्हाइट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट परीधान करून निघालो ..जाताना चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता ..तेवढ्यात आई समोर आली ..तिच्या गालावर हळूच पप्पी देऊन मी कॉलेजला निघालो ..आई मात्र मला जाईपर्यंत पाहत राहिली ..
काही वेळातच कॉलेजला पोहोचलो ..गाडी पार्क करून सरळ कलासकडे गेलो ..मी कलासमध्ये डोकावून पाहिलं तर संपूर्ण कलास खाली होता ..मला बोलावून सर्व कुठे गायब झाले होते काय माहिती ..मोबाइल हातात घेत सोनालीला फोन लावला , " हे व्हेअर आर यु , आय एम वेटिंग फॉर यु इन कलास "

" अरे कॅन्टीनला आहोत आज शाश्वत ट्रीट देतोय ना म्हणून " , सोनाली बोलली ..

मी हसत - हसत म्हणालो , " तो कंजूष आणि ट्रीट !! बर किस खुशी मे ? "

" खुशी की ही बात है मेरी जाण , बस जलदी आ बादमे बताती हु तुझे ..आ जलदी " , सोनाली फारच आनंदाने बोलत होती ..

" ओके वेट आय एम कमिंग " , म्हणत मी फोन ठेवून दिला ..

कॅन्टीनकडे जात होतो ..समोरच मानसीचा क्लास होता ..ती आली की नाही पाहावं म्हणून खिडकीतून वाकून पाहू लागलो ..कलासमध्ये मुलींची गर्दी होती ..पण ती त्यात आहे की नाही हे स्पष्ट दिसत नव्हतं ..मी गर्दीत पुन्हा लक्ष घालू लागलो आणि ती दिसली ..ती बहुदा कुणाशी तरी बोलत होते ..ती आज मस्त मोकळे केस सोडून आली होती ..शिवाय फॅनमुळे तिचे केस उडत होते ..आणि सकाळच्या अपूर्ण राहिलेल्या ओळी पुन्हा सुचल्या ..

खुलती जुल्फो ने सिखायी
मौसमो को शायरी
झुकती आखो ने बताया
महकशी क्या चीज है

होशवालो को खबर क्या
बेखुदी क्या चीज है
ईश्क किजिये फिर समझिये
जिंदगी क्या चीज है

मी तिला काही वेळ तसाच पाहू लागलो ..तीही नकळत माझ्याशी लप्पन - छुप्पनचा खेळू लागली ..कधी अचानक मागे व्हायची तर कधी समोर त्यामुळे मलाही मागे पुढे व्हावं लागायचं ..तरीही तिच्यापासून नजर काही हटली नव्हती ..तीच अचानक खिडकीकडे लक्ष गेलं आणि माझी चोरी सापडली ..मी क्षणाचाही विलंब न करता तिथून पळ काढला आणि सरळ कॅन्टीनला जाऊन थांबलो ..

" एवढा वेळ लागतोय हा कॅन्टीनला यायला " , सोनाली चिडून म्हणाली ..

" अग तो मित्र भेटला होता म्हणून उशीर झाला " , माझं खोटं - खोट उत्तर ..

तिने माझं खोट पकडलं आणि म्हणाली , " मित्र की मानसीला पाहत होतास !! ..खोटारडा कुठला "

माझ्या गालावरची लाली बघून तिला सर्वच समजल ..

" माझं सोड , मला आधी सांग ह्या कंजूषने पार्टी कशाची दिली आधी " , मी शाश्वतकडे पाहत म्हणालो ..

" सर आज कॉलेजमध्ये इतिहास घडला ..नाऊ शाश्वत इज इन रिलेशनशिप " , सोनाली खेचत म्हणाली ..

हे ऐकताच मी सरळ शाश्वतला झप्पी दिली ..भावा खरच भारी हा ..मी आज खूप खुश आहे तुझ्यासाठी अस म्हणालो आणि त्याचा चेहरा लाजून पार लाल झाला होता ..मी पण लगेच वाहत्या गंगेत हात धुवावे म्हणून मला हवं ते मागवून घेतलं ..मी समोर काही बोलणारच तेवढ्यात सोनाली म्हणाली , " अभि पण तू मुलीच नाव नाही विचारलं " ,

" चल सांगून टाक , अब तो इंतजार भी नही होता .." , मी उत्सुक होऊन म्हणालो

आणि तीच उत्तर , " चशमिश ."

" व्हॉट आर यु किडींग , म्हणजे आपली ज्युनिअर नेहा " , मी म्हणालो ..

" हो साल्याने लई मोठा हात मारला आणि सांगितलं पण नाही आपल्याला " , विकास म्हणाला

तोच रागात येत शाश्वत म्हणाला , " साल्या विक्या जल मत बराबरी कर ."

" मै नही जलता तेरे से , साले तेरे पे हजार लडकीया कुर्बान अस विकासने म्हटल्यावर सरळ शाश्वतने त्याला हग केलं ."

एव्हाना चहाचे ऑर्डर आले होते .. " आता तरी सांग नेहा काय म्हणाली तर , तू म्हणाला होता न अभि आल्यावर सांगेल सर्व ..चल बोल पटापट .." , सोनाली म्हणाली ..

तसच शाश्वतने बोलायला सुरुवात केली .. " काही नाही यार सहज बोलता - बोलता तिच्याशी मैत्री झाली ..दोघाणीही नंबर एक्सचेंज केले ..तस आम्ही रोजच चॅटिंगवर बोलायचो ..पण माझा रेकॉर्ड पाहता मी तिला मनातलं सांगन शक्य नव्हतं बहुतेक तिनेच माझ्या मनातील ओळखलं ..काल रात्रीही तिचा मॅसेज आला ..बऱ्याच वेळी चॅटिंग करून झाल्यावर तिने सकाळी कॉफी शॉपला बोलावलं ..मी ठरलेल्या वेळेला तिथे पोहोचलो ..बाईसाहेब आज फार सजून आल्या होत्या त्यामुळे तिला पाहताच फ्लॅट झालो ..थोड्या वेळ इकडच्या - तिकडच्या गोष्टी झाल्या ..आता बोलण्यासारख काहीच उरलं नव्हतं त्यामुळे मी निघू लागलो ..तेव्हा तिने मला थांबवलं ..बॅगेत केव्हापासून लपवून ठेवलेलं गुलाबाचं फुल काढलं आणि ते तीन जादुई शब्द " आय लव्ह यु " म्हणत तिने प्रेमाची कबुली दिली ..बस एवढीच काय तर कहाणी "

आम्ही सर्वच शॉक होतो कारण आम्हाला वाटलं प्रपोज याने केला असावा पण इथे मात्र उलटंच घडलं होत ..एक तर नेहा क्लास टॉपर आणि त्यात ती फार कमी मुलाशी बोलत असे तेव्हा याला ती पटलीच कशी असा आम्हाला प्रश्न पडला होता ..

" विक्या मला सांग जीच्यामागे बरेच लोक मागे लागून होते ती मुलगी याला पटली तर कशी , काही जादू वगैरे येते का याला "

मी अस बोलताच समोरून विक्याने टाळी दिली आणि म्हणाला " हो न साल काय माहिती कधी कुणाच नशीब खुलेलं आणि भिकार्यालाही श्रीमंत बनवून होईल .."

त्याचा टोमणा ऐकताच शाश्वत म्हणाला , " नाही सुधारणार साल्यानो कधी तुम्ही , करून घ्या मजा मेरा भी दिन आयेगा कभी "

आज आम्ही सर्वच खूप खुश होतो ..शाश्वतने पार्टी दिली म्हणून अगदी जेवणावर तुटून पडलो ..होत नव्हतं सर्वच मागवलं ..शेवटी बिल निघालं 1500 रुपये ..आम्ही बोट तोंडात टाकुन त्याच्याकडे पाहत होतो तेवढयात तोच म्हणाला , " काळजी करू नका देतोय मी बिल ." ..100 रुपये खर्च करण्यासाठी मागे पुढे बघणारा शाश्वत आज वेगळाच चक्क 1500 रुपये खर्च करून गेला ..आणि मनात विचार येऊन गेला मानलं पाहिजे प्रेमाला ..काय ताकद असते त्यात ..एकदा माणूस प्रेमात पडला की त्याला स्वतःचच भान राहत नाही ..

कुछ तो होगा
ए मोहब्बत 'तेरी अदाओ मे
वरना युही नही हर कोई
तेरा कायर होता ..

आज आम्ही संपूर्ण दिवस इकडे तिकडे फिरत होतो ..बऱ्याच दिवसांनी आम्ही चौघेही इतके आनंदी होतो ..माहिती नाही काय जादु होती त्या प्रेमात ज्याने आम्हा सर्वांना वेड लावलं होत ..अर्थात सोनालीलादेखील विकास आवडायचा हे मला कळाल होत फक्त तिने स्वतः सांगण्याची मी वाट पाहू लागलो ..आमच्या कॉलेजला छोटीशी बाग होती तिथेच कितीतरी वेळ मस्त्या करत बसलो होतो ..सोनालीचे केस ओढण्यात तर आम्हाला सर्वात जास्त मजा यायची ..ती आमच्या ग्रुपमधली एकटीच मुलगी त्यामुळे तिची गंमत घेण्यात आम्हाला खूप मजा यायची ..शिवाय ती एकदा रुसली की मग तिला मनविण्यासाठी विकास , शाश्वत आणि मी वेगवेगळ्या पद्धती शोधून काढायचो ..विकास चावट एकटिंग करायचा तर शाश्वत पांचट जोक मारायचा सहसा यातच काम बनायचं पण त्यानेही काम झालं नाही की मग शेवटी मला डान्स करावा लागत असे ..आमचं तिघांचची फार प्रेम होतं तिच्यावर ..मी तर तिला सख्या बहिणीसारखं मानायचो ..आज खूप दिवसांनी आम्ही सेल्फीसुद्धा काढली होती ..शेवटी फार थकलो आणि कलासकडे निघालो ..त्या तिघांनाही लायब्ररीमध्ये बुक परत करायचं असल्याने ती तिकडे गेले तर मी कलासकडे जायला निघालो ..

आजचा दिवस खरच खूप मस्त होता ..मला हव्या तशाच सर्व गोष्टी घडल्या होत्या ..मी कलासकडे जावं आणि मानसी , नेहा दारातून वळण घेत समोर आल्या ..आम्ही एकमेकांकडे पाहून हलकीशी स्माईल दिली ..

" हाय अभि ..आज व्हाइट शर्ट वगैरे ..खूप हॅन्डसम दिसतो आहेस ..आज मुलीचं काही खर दिसत नाहीये " , नेहा माझी खेचत म्हणाली ..

" धन्यवाद नेहा जी ..पण मला वाटत आज मुलीचं काही खर असो वा नसो पण मला अस जाणवतंय की आज नेहा मॅडमचच काही खर दिसत नाहीये " , मी अस म्हणताच नेहा लाजली ..

" ए तुम्ही दोघे कोड्यात नका बोलू बर सरळ सांग काय झालं तर " , मानसी रागावत म्हणाली ..

" म्हणजे मानसीला काहीच माहिती नाही ? ", मी नेहाकडे पाहून बोलू लागलो ..

नेहाने नकारार्थी मान हलवली आणि मानसीचा पारा चढला ..

" मला सांगणार आहात काय नेमकं काय घडलं तर ? " , मानसी फार रागात बोलत होती आणि आम्ही हसत होतो

" ए अभि प्लिज नको सांगू यार तिला " , नेहा म्हणाली ..

मानसीने रागावून विचारण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला शेवटी तिच्याकडून प्लिज हा शब्द एकला आणि मग मात्र राहू शकलो नाही , " अग नेहा प्रपोज शाश्वत "..

" व्हॉट ?? " , मानसीच रीऍक्शन

" शहाणे मला सांगितलं पण नाही पण मी फार खुश आहे तुझ्यासाठी ..आणि तिने नेहाला मिठी मारली .."

मी काही वेळ त्यांना तसच राहू दिलं ..शेवटी दोघी वेगळ्या झाल्या आणि नेहाला म्हणालो , " ऑफिशिअली आजपासून तुझं आमच्या ग्रुपमध्ये स्वागत आहे .."

माझे शब्द पूर्ण होणारच तेवढ्यात मागून विकास , सोनाली म्हणाली " खूप खूप स्वागत आहे वहिनी " आणि ती लाजून दूर पळून गेली ..मलाही मानसींने माझ्यावर एवढंच प्रेम करावं असं वाटत होतं .

मानसी आताही सोनाली सोबत बोलत होती आणि मी फक्त तिच्याकडे पाहत होतो एवढ्यात तिच्याशी नजर मिळाली पण यावेळी मी मात्र नजर खाली केली नाही तर तेवढ्याच प्रेमाने तिच्याकडे पाहू लागलो

उनसे नजरे क्या मिली
रोशन फिजाये हो गयी
आज जाना प्यार की
जादूगरी क्या चीज है

होशवालो को खबर क्या
बेखुदी क्या चीज है
ईश्क किजिये फिर समझिये
जिंदगी क्या चीज है
ईश्क किजिये फिरसे समझिये
जिंदगी क्या चीज है

आजचा दिवस आमच्या आयुष्यातला फार सुंदर दिवस होता ..आज प्रत्येक व्यक्ती आपल्या मनासारखं जगत होता ..प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होता ..पुन्हा सायंकाळी कॅन्टीनमध्ये चहा घेताना फार गप्पा रंगल्या ..आज फक्त शाश्वत आणि नेहाबद्दल चर्चा होती ..आम्ही सर्व त्यांची खेचण्यात व्यस्त होतो आणि बाकी सर्व खळखळून हसत होते ..आता घरी जायची वेळ होती ..विकास आणि सोनालीला हग करून आम्ही जाण्यासाठी निघालो ..नेहा आणि शाश्वतला आज एकमेकांना हग करून दिवस संपवायचा असल्याच मला लक्षात आलं आणि मी बाकी सर्वाना व्यस्त ठेवलं ..त्या दोघानाही ते लक्षात आलं आणि त्यांनी एकमेकांना हग करून आजचा दिवस सेलिब्रेट केला ..कॉलेज लाइफ असतेच खूप खास त्यातही तिला खास बनविण्यात मित्र आणि प्रेम फार मोलाचा वाटा असतो ..कदाचित त्यांच्याविना आपलं जीवन अपूर्णच असत ...आता ही कॉलेज लाइफ आमच्या आयुष्यात आणखी किती रंग भरणार होती हेच पाहायचं होत आणि जेही घडेल त्यात स्वताला वाहवून घ्यायचं होत ..

क्रमशः ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED