Sparsh - 8 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 8

आमचा डान्स परफॉर्मन्स झाला आणि आम्ही इतरांचे डान्स पाहू लागलो ..जवळपास सर्वच कलासमेंट्स एकाच लाइनमध्ये बसून होतो..एखादा डान्स सुंदर झाला की शाश्वत आणि विकास ओरडायचे तर मी शिट्टी वाजवायचो ..आम्हाला निकालाच काहीच टेंशन नव्हतं पण मानसीचा चेहरा मात्र फार उतरला होता ..राहुल तिच्या बाजूला बसून होता व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता पण तरीही तिचा मूड काही ठीक झाला नाही ..डान्स स्पर्धा नंतर रॅम्प व्हॉकदेखील संपली ...आता होती निकालाची वेळ ..प्रत्येक वेळा एखाद्या स्पर्धेच्या विजेत्यांच नाव घेतलं जायचं आणि तो व्यक्ती खुश होऊन समोर जात होता..त्यांच्या चेहऱ्यावरच हसू बघून मानसिचे हावभाव बदलत होते ..थोड्याच वेळात डान्स स्पर्धेचे निकाल जाहीर होणार होते आणि मानसी नजर रोखून सर्व पाहू लागली ..ग्रुप डान्स मध्ये आम्हाला दुसरं प्राइज मिळाल तेव्हा तिचा चेहरा थोडा खुलला पण पुढच्याच क्षणी ती अगदी सिरीयस झाली ..फायनली निकाल आला ..2 रनर अप गेलं मेकॅनिकलला ..1 रनर अप गेलं इलेक्ट्रिकलला आता हृदयाची धडधड आणखीच वाढली होती आणि सुत्रसंचालकाने नाव घेतलं ..अँड द विनर इज ..मानसी अँड अभिनव ..तीला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता ..ती जायला उठली आणि मी फक्त तिच्या चेहऱ्यावरील आनंदाकडे पाहू लागलो ..तिला पाहण्यात इतका हरवून गेलो की तिच्यासोबत मिसुध्दा जिंकलो आहे हे लक्षातच आलं नाही " अभि चल की मानसी म्हणाली आणि तिच्या शब्दाने भानावर आलो ..पावले टाकत - टाकत स्टेजवर पोहोचलो ..आणि तिने जिंकलेली ट्रॉफी हातात उचलून सर्वांशी शेअर केली ..माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता तो कारण पहिल्यांदाच मी तिला काहीतरी देऊ शकलो होतो ..
प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं आणि सर्व फोटो काढण्यात व्यस्त झाले ..मुळात शाश्वतने देखील नाटकात दुसरं बक्षीस जिंकल होत त्यामुळे त्यांच सेलिब्रेशन सुरू झालं ..कॉलेजचा प्रत्येक कोपरा सेल्फीनी भरला ..मी मात्र मित्रांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होतो ..ज्यांनी ज्यांनी बक्षिस जिंकली त्यांना शुभेच्छा दिल्या ..मुलांचे फोटो काढून झाले होते आणि आता अंधार व्हायला सुरुवात झाली ..मानसी समोर जात होती आणि माझं तिच्याकडेच लक्ष होत ..तिला काय वाटलं माहिती नाही ती तशीच माझ्याकडे परत आली , " अभि एक फोटो काढुया सोबत " ..मी थोडासा हसलो आणि तिने फोटो काढला ..बहुदा फोटोतही मी तिला पाहत होतो ..ती बाय म्हणून निघू लागली आणि मी फक्त तिच्याकडे पाहत होतो ..मला वाटत होत की तिने एकदातरी माझ्याकडे पलटून पाहावं ..ती गाडी घेऊन निघाली आणि गेटपासून गाडी टर्न करताना तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी तो क्षण अगदी मनात साठवून ठेवला ..

देखा है तुझको अकसर
सपणो की दुनिया मे
आज हकीकत मे देखा तो जाना
बडी मासुमियत है तेरे हर अंदाज मे ..
स्नेहसंमलेन संपलं होत ..त्यानंतर शनिवार , रविवार असल्याने पुन्हा कॉलेजला जाणं शक्य झालं नाही ..मलाही सर्दीमुळे ताप आला होता ..त्यामुळे इच्छा असूनही कॉलेजला जाउ शकत नव्हतो ..मित्र आम्ही कॉलेजला खूप मज्जा करतोय म्हणून सांगायचे आणि मग खूप जिलस फील व्हायचं ..सर्वांचेच मला फोन करून झाले होते पण जिच्या फोनची मी आतुरतेने वाट पाहत होतो तिचा फोन काही आला नव्हता आणि इकडे आई साधा फोनसुद्धा वापरू देईना ..दिवसरात्र झोपून - झोपून आता कंटाळा येऊ लागला होता ..चार दिवस झाले ..मला बर नसल्याने औषध घेऊन झोपी गेले होतो ..तेवढ्यात फोन वाजला ..मी घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 1 वाजले होते आणि शाश्वत फोन करीत असल्याच स्क्रीनवर दिसलं ...स्वताला सावरत फोन रिसीव्ह केला .." एवढ्या रात्री फोन करत का कुणी यार ..? "

" अरे हो मला माहिती आहे तुझी तब्येत बरी नाही पण काम होत म्हणून फोन केला " , शाश्वत म्हणाला ..

" एवढ्या रात्री तुला मोठे काम सुचतात बे " , मी चिडून बोलत होतो ..

" हो आहे काम ..मानसीबद्दल काहीतरी सांगायचं होत.. आता नाही सांगायचं मला काहीच जाऊदे झोप तू " , शाश्वत म्हणाला ..

" बर बर !! आता एवढ्या रात्री कॉल केलाच आहेस तर सांगून दे काय सांगायचं आहे तर " , मी मानसीबद्दल एकूण शब्द पलटवले

" बर ऐक ..मी नेहाशी बोलत होतो तेव्हा तिने सांगितलं की उद्या मानसीचा वाढदिवस आहे " , शाश्वत म्हणाला ..

" काय मानसीचा वाढदिवस !! ..मग तुम्ही सेलिब्रेट करणार आहात ? आणि ते पण माझ्याविना .. " , मी नाराज होत त्याला विचारलं ..

" वेडा झाला आहेस का ..तुझयाविना कस शक्य आहे ..अभि ही खूप मस्त संधी आहे तिला इम्प्रेस करण्याची तेव्हा ही संधी सोडू नको " , शाश्वत काळजीने बोलत होता ..

मी थोड्या वेळ विचार केला आणि म्हणालो , " ठीक आहे मग आपणच करूया सेलिब्रेट ..फक्त नेहाला सांग की उद्या ठीक 12 वाजता तिला सनशाइन कॅफेला घेऊन ये आणि तिला कारण सांगू नको म्हणा ..करशील ना एवढं ? "

" हो ठीक आहे पण प्लॅन काय आहे ? " , उद्या सकाळी 8 ला भेट आपल्या कट्ट्यावर तिथेच सांगतो ..

शेवटी गुड नाईट वीश करून आम्ही दोघेही झोपी गेलो ..

आज मानसीचा वाढदिवस ..सकाळी - सकाळी उठून तयार झालो ..आईला परवानगी मागायला जावं आणि तिने झापायला सुरुवात केली ..मी तिला खूप मनवायचा प्रयत्न करत होतो पण तरीही ती ऐकायला तयार नव्हती ..शेवटी खर कारण सांगितलं आणि आईकडून परवानगी मिळाली शिवाय ती काही पैसे द्यायला विसरली नाही ..ठरल्याप्रमाणे शाश्वत तिथे आला शिवाय विकासलाही सोबत घेऊन आला होता ..तसा कॅफे दहा वाजता खुलायचा पण कॅफे माझ्या मित्राचा असल्याने मी त्याला लवकरच उघडायला लावलं ..कॅफेत प्रवेश केला तेव्हा कॅफे नीटनेटका होता त्यामुळे जास्त काही तयारी करावी लागणार नव्हती ..सुरुवातीला संपूर्ण कॅफे बलूननि सजवून घेतला ..वेगवेगळ्या रंगांच्या रिबीन्स लावून कॅफे आणखीनच बहारदार दिसत होता ..मी नेहाकडून मानसिचे काही सुंदर फोटो मागवून घेतले होते आणि त्यातला डान्स जिंकल्यानंतरचा फोटो मी मोठ्या फ्रेममध्ये बनवून घ्यायला सांगितला होता ..विकासला मी त्यासाठी सकाळपासूनच ओरडत होतो ..तोही मला लवकरच येईल अस समजावत होता ..मित्राला सकाळीच थ्री लेयर केक बनवायला सांगितला होता ..जवळपास दुपारचे साडे अकरा वाजले ..नेहाने आम्ही निघालो आहे हे मॅसेज करून कळविल .
अजूनही तिचा फोटो आला नव्हता त्यामुळे मला विकासचा फारच राग येत होता ..शेवटी विकास ती फ्रेम घेऊन आला आणि आता कुठे माझ्या जीवात जीव आला ..आम्ही जवळपास सर्वच मित्रांना बोलावून घेतलं होतं ..त्यामुळे ते सर्व तिच्याआधी आले आणि आता प्रतीक्षा होती फक्त मानसीची ..काहीच क्षणात मानसीची गाडी येताना दिसली आणि आम्ही सारेच दुसऱ्या रूममध्ये लपून बसलो ..थोड्या वेळात ती आतमध्ये येऊन बसली आणि नेहाला रागावत म्हणाली , " यार तू म्हणाली होती ना की आपण शॉपिंगला जाणार आहोत मग इथे कशाला आलो आहोत ? "

" हो ग बाई ..तिथेच जाणार आहोत त्याआधी म्हटलं काही खाऊन घ्यावं म्हणून आलो ..प्लिज ना रागावू नको " , नेहा तिला शांत करत म्हणाली ..

नेहाने काहीतरी ओर्डर केलं आणि मानसीच्या समोर थ्री लेयरचा केक समोर आला ..ती त्या शॉकमधून बाहेर येणारच तेवढ्यात सर्व बाहेर येऊन एकाच सुरात तिला विश करू लागले ..ती अवाक होऊन सर्व पाहत होती आणि सर्वांनी तिला सेंटरमध्ये उभं केलं ..मी आताही तिला मागेच उभं राहून पाहत होतो ..ती नेहाला विचारू लागली , " कुणी केली एवढी तयारी ? "

नेहा माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली , " प्लॅनिंग अभिच होत बाकी आम्ही थोडी फार मदत केली त्याला ."

ती माझ्याकडे येणारच तितक्यात सर्वांनी तिला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली ..ती या सर्वात माझ्याशी बोलायच विसरून गेली .आता वेळ होती केक कापण्याची ..तेव्हाच मला आईचा फोन आला आणि मी तिच्याशी बोलायला बाहेर गेलो ..साधारण काही वेळ झाला होता ..मला वाटलं केक कट झाला असेल पण मी जेव्हा परतलो तेव्हा सर्वच माझ्याकडे पाहत होते ..मानसीने माझ्याविना केक कापण्यास मनाई केली ..किती मस्त होता तो क्षण ..मी जेव्हा तिच्या बाजूला येऊन उभा राहिलो तेव्हा कुठे तिने केक कापला ..
कॅफे मित्राचाच असल्याने थोडा गोंधळ केला तरी काहीच हरकत नव्हती शिवाय मी तो ब्लॉक बुक केला असल्याने काहीच टेंशन नव्हतं ..प्रत्येक व्यक्ती हवं तसं वागत होता ..सर्वांनी हवं ते ऑर्डर केलं होतं ..सर्वांच्या प्लेट्स खूपच जास्त भरल्या होत्या तरीही कुणीच माघार घ्यायला तयार नव्हत..मानसी वारंवार सजावटीकडे आणि तिच्या फोटोकडे पाहत होती तर मी तिला बारीक नजरेने पाहत होतो ..तिने माझ्याकडे पाहिलं की मी दुसरीकडेच पाहत असल्याच भासवत होतो .ती फारच खुश होती ..सर्वांनी भरपोट खाऊन घेतलं आणि निघू लागले ..मी विकाससोबत बोलण्यात व्यस्त होतो तेव्हाच मानसी कॅश काउंटरवर गेली , " दादा किती झालंय बिल ? "

तिच्या प्रश्नावर मित्र म्हणाला , " मॅडम तुमचं बिल आधीच अभिने पेड केलं आहे सो तुम्हाला देण्याची गरज नाही .."

" बर !! पण बिल किती झालं ते तरी कळू शकेल ? " , मानसी विचारू लागली ..

" दहा हजार ? " , तो म्हणाला ..

हे ऐकून तिला खूपच राग आला होता ..ती बाहेर निघून गेली तेव्हा मित्राने मला घडलेल सर्व सांगितलं ..मी त्याच्यावर ओरडून बाहेर निघालो ..ती माझ्याकडे थोडी रागाने पाहत होती शिवाय ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होती पण मीच तिच्यापासून दूर पळू लागलो ..तरीही ती माझ्याजवळ आली आणि पुन्हा एकदा आईच्या फोनने मला वाचवलं ..मी सरळ फोन तिच्या हातात दिला आणि ती आईसोबत बोलण्यात व्यस्त झाली ..काही वेळ ती आईशी बोलली आणि फोन परत केला ..तिलाही घरून फोन येत असल्यामुळे ती नेहासोबत लगेच निघाली ..आम्हीही पैसे पेड करून घरी निघालो ..
प्रेम ? ..काय असत हे प्रेम ?? ..समोरच्या व्यक्तीच्या एका आनंदासाठी आपण जगातली अशक्य गोष्ट देखील करून जातो ते असत प्रेम ...तीही माझ्या आयुष्यात आली आणि मी नव्याने जगायला शिकलो ..पुस्तकी जगाच्या बाहेर एक आयुष्य असत हे तिच्यामुळेच कळलं होतं फक्त तिला याबद्दल काहीच माहिती नव्हती ..खरच नशा असते खऱ्या प्रेमात ज्यात आपण आपलेच नसतो ..प्रेम म्हणजे स्वार्थापालिकडच जग जिथे अपेक्षांनादेखील स्थान नसत ..फक्त जगायचे असतात ते क्षण ..ना दुनियेची फिकर ना ना उद्याची चिंता ..नदिसारखं सतत वाहत जाण म्हणजेच कदाचित प्रेम ..
सकाळी काम करून झाल्याने शिवाय तब्येत बरी नसल्याने लवकरच लाईट ऑफ करून झोपायची तयारी करू लागलो ..तेवढ्यात मोबाइलवर एक मॅसेज आला ..नंबर सेव्ह नव्हता ..म्हणून " आपण कोण ? " असा मॅसेज केला ..ती होती मानसी ..आज तिचा मॅसेज पाहून फारच आनंद झाला होता ..मी समोर काही टाइप करणार तेवढ्यात म्हणाली , " माझ्यासाठी एवढा खर्च करायला नको होता तू , मला नाही आवडत माझा खर्च कुणी करावा ते "

" हो माहिती आहे मला ते पण कुणाचा आनंद बघताना पैसे लक्षात घ्यायचे नसतात शिवाय माझ्या आईनेच मला अर्ध्यापेक्षा जास्त पैसे दिले .तिने स्वतः सांगितलं होतं तिच्या आनंदात काहीच कमी पडू देऊ नको...तिला यायचं होत पण जमलं नाही ..तुला आताही वाईट वाटत असेल तर तस मी आईला सांगतो .." , मी उलटा डाव तिच्यावरच फेकला ..

" तस नाही रे पण ......" , ती म्हणाली ..

" म्हणजे तुला आमचं सरप्राइज आवडलं नाही तर ? " , मी तिला टाउंट मारत म्हणालो ..

" मी अस म्हणाले का शहाण्या ..माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर बर्थडे पार्टी होती ही आणि ते पोस्टर मला खूप जास्त आवडलं ..तुझीच कल्पना होती न ती ? " , ती आनंदी होत बोलू लागली ..

" हो ..तुझ्यासाठी तो क्षण खूप खास होता म्हणून म्हटलं तेच करावं ..", माझं उत्तर

" खूप खूप धन्यवाद ..मला हे सरप्राइज आयुष्यभर लक्षात राहील ..थोडी रागावले होते तुझ्यावर पण आता काहीच टेंशन नाही " ..ती म्हणाली ..

मग मीच म्हणालो , " तुझं गिफ्ट समजून घे वाटल्यास ..आणि गिफ्टला नाही नसत म्हणायचं "

" हो न तुला मस्त जमत रे शब्दात फसवायला मला ..मग मीही तुझ्या वाढदिवसाला खूप खर्च करेन !! " , ती म्हणाली ..

" ते शक्य नाही कारण मी सेलिब्रेट करत नाही उलट तेच पैसे गरजूना देतो .." , मी म्हणालो ...

" मस्तच ..छान वाटलं ..आजचा दिवस खरच खूप खास होता आणि त्याला खास बनविण्यासाठी अभि खूप खूप धन्यवाद ..

सुमारे दोन तास मी तिच्याशी बोलत होतो ...शाश्वतने खरच म्हटलं होतं हीच संधी आहे तीच मन जिंकण्याची आणि मी ते करू शकलो होतो ..आता एकदा तिला विचारायचं होत की " विल यु बे माईन ? " ..आणि मग आमचं आयुष्यही अगदी स्वर्ग बनलं असत ..

अशाच गप्पा - गोंधळ करण्यात कॉलेजचे दोन वर्षे गेले ..आता शेवटचं वर्ष ... हेच वर्ष होत ज्याने आम्हा बेस्टीच संपूर्ण आयुष्य बदलवून टाकलं आणि आमची मैत्री आणखीनच घट्ट झाली ..काय घडलं अस की या शेवटच्या वर्षात की भारतसोडून कॅनडाला जावं लागलं आणि गेल्या 3 वर्षात फक्त एकदाच भारतात आलो होतो ..

क्रमशः ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED