Sparsh - 11 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 11

फ्लाइट लँड होण्याचा पुकारा झाला आणि घट्ट मिटलेले डोळे आपोआप उघडल्या गेले ..एक नजर फिरवून सर्वांकडे पाहिली आणि स्वतःवरच हसू लागलो ..आज तब्बल तीन वर्षांनी ते सर्व आठवलं होत ..कॅनडाला होतो तेव्हा याचा त्रास व्हायचा पण त्या आठवणींनी पुन्हा एकदा उजाळा दिला ..मुळात आठवणी असतातच खूप सुंदर ..कारण ते क्षण कितीही दुःखदायक असले तरी फक्त आपले असतात आणि ते कुणीच हिरावून घेऊ शकत नाही ..रुमाल काढून एकदा चेहरा साफ केला आणि पुन्हा एकदा माझ्या जुन्या दुनियेत जाण्याची तयारी सुरू झाली .काही स्वप्न जोते जे पूर्ण करायचे होते ..काही नाती होती ज्यांना पण एक माळेत गुंफायच होत..फ्लाइट लँड झाली आणि सर्व उतरू लागले ..मी हळूहळू पाऊल टाकू लागलो ..काही क्षणातच खाली उतरलो..इकडे - तिकडे पाहत होतो आणि आपल्या मातीचा सुगंध जाणवू लागला ..खरच जगात कुठेही जा पण आपल्या दुनियेत परत येण्याची मज्जाच वेगळी असते..

कैसी खुशबू है ए मिट्टी
'तेरी सोहोबत मे
देस बदल गये कुछ वक्त के लिये
पर यादो मे हर पल तुही बसती है

काही वेळात बाहेर आलो ..कुणाचे तरी पत्नी , कुणाचे आईवडील तर कुणाचे नातेवाईक त्यांना रिसिव्ह करायला आले होते आणि एकमेकांना भेटून आलिंगन देत होते ..तर कुणाची पत्नी आपल्या पतीला भेटून सुखावली होती ..दूरवर कुणीतरी मूल आरडाओरड करत होते आणि त्यांच्या ओरडण्यामुळे त्यांच्याकडे लक्ष गेलं ...त्यांच्याकडे बघितलं तेव्हा समजलं की तीन जिवलग मित्र आपल्या मित्राला न्यायला आले होते ..त्यांना एकमेकांना भेटताना जगाची चिंता नव्हती ..आमच्याकडे कुणी पाहत आहे म्हणून ते शांत बसले नाहीत उलट मित्र येण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता ..त्यांना बघून मलाही विकास , शाश्वत आणि सोनालीची आठवण झाली ..जॉबच्या नादात थोडा सेल्फीश झालो असल्याने नीट त्यांना फोनसुद्धा केला नव्हता पण आता त्यांच्याविना राहणं शक्य नव्हतं ..बॅग टॅक्सीमध्ये टाकली आणि रेल्वे स्टेशनकडे प्रस्थान केल ..सीट आधीच रिजर्व केली होती ..काहीच वेळात तिथे पोहोचलो आणि अगदी अर्ध्या तासात पुन्हा औरंगाबादला निघालो ..तिथेही तसच ..मुंबईपासून जाताना ते मोठे मोठे घाट असोत की मग गर्द झाडी ..सर्व अगदी जूनच होत तरीही नव्याने त्यांच्या प्रेमात पडू लागलो ..बाजूलाच एक ताई आपल्या मुलाला खेळवत होती आणि ते छोटंसं पाखरू माझ्याकडे पाहून हसू लागलं ..ताईच्या परवानगीने मी त्याला हाती घेतल ..ट्रेनमधून एक - एक झाड मागे जाऊ लागलं आणि ते पाखरू त्यांना पाहुन अधिकच हसू लागल .मीही त्याच्याशी खेळताना अगदीच लहान बनून गेलो ..खेळता - खेळता ते पाखरू झोपल आणि मी पुन्हा निसर्गात रमू लागलो ..दूरवरून टाळ्यांचे आवाज येत होते आणि त्यांना बघून सर्वच दूर होऊ लागले .मला कळून चुकलं की ते किन्नर आहेत ..सर्व त्यांच्यापासून दूर पळत असताना , त्यांना शिव्या देताना मी मात्र स्वताच त्यांच्याशी जाऊन बोलू लागलो ..त्यांनाही मी स्वतः येऊन बोलल्याच समाधान मिळाल ..अस म्हणतात की ते लोक खूप त्रास देतात पण माझ्याशी अस काहीच होत नव्हतं ..मी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न करू लागलो पण ते घेण्याच टाळू लागले आणि त्यातला एक म्हणाला , " बहोत लोग देखे है पर तेरे जैसा दिलदार कही देखा नही ..ये पैसे बहोत सस्ती चीज है तेरे प्यार के सामने ..मै दुआ देता हु की तुझे दुनिया के सारे सुख मिले और तुझे ऐसी साथी मिले जो तेरी जिंदगी को हसीन बना दे " ..मी जबरदस्तीने त्याच्या हातात पैसे दिले आणि तो आशीर्वाद देऊन निघून गेला ..डब्ब्यात भरपूर गर्दी होती ..सर्विकडे आरडाओरड होती तरीही मी शांत होतो ..त्या किन्नरने दिलेला आशीर्वाद माझ्या लक्षात राहून गेला ..खरच मला हवी तीच माझ्या आयुष्यात येईल का ?? विचार करता - करता स्वतःवरच हसू लागलो , " अभि तू काही पण विचार करतो ..तीच राहुलसोबत लग्नही झालं असेल ..असो तिला तरी तीच प्रेम मिळालं ..छोड ना यार ती झाली असेल त्याची पण माझ्या मनात सदैव तशीच राहील " म्हणत तसाच तिच्या आठवणीत हरवून बसून राहिलो ..प्लेन आणि ट्रेनच्या प्रवासानंतर सुमारे 4 वाजता औरंगाबादला पोहोचलो .हळूहळू आपल्या गल्लीतून जाताना ते जुने दिवस आठवू लागले आणि काहीच अंतरावर असलेल्या घराची ओढ आणखीनच जाणवू लागली ..

घराचा गेट पार करत दारावर पोहोचलो आणि बेल वाजवायच्या आधीच दार उघडल्या गेलं ..आई माझी आतुरतेने वाट पाहत होती ..काही क्षण ती मला तसच न्याहाळत होती आणि मी तिच्याकडे पाहून हसू लागलो ..काही क्षण असेच गेले आणि न राहवता सरळ तिला मिठी मारली .." वेडा कुठला काय झालं तुला ? " , आई म्हणाली आणि त्यावर माझं उत्तर , " आता आईलाही मिठी मारायला वडिलांची परवानगी घ्यावी लागेल का ? " ..ती मला फार प्रेमाने कुरवाळत होती ..खूप दिवसानंतर तिने मला पाहिलं होतं त्यामुळे तीही स्वताला रोखू शकत नव्हती ..शेवटी मी आत गेलो .." अभि मला मिठी मारलीस ती ठीक आहे पण बाबांना नको मारू " , आई म्हणाली ..मला थोडं विचित्र वाटलं म्हणून विचारलं " का ग ? " ..आणि ती हसत म्हणाली " तुझे वडील रोमँटिक झाले ना तर या वयात तुला छोट्या बहिणीला सांभाळाव लागेल बर " ..आतापर्यन्त सिरीयस असलेले आम्ही हसू लागलो .. " काहीही असत तुझं ..तू ना जगातील अँटिक पीस आहे जे फक्त भारतात सापडत ..हो पण मला आवडतो हा तुझा स्वभाव .." मी तिला म्हणालो ..

" पुरे पुरे हा अभि जास्त स्तुती मला सहन होणार नाही ..बर एक काम कर आधी फ्रेश हो मी तुला गरम गरम वाढते .." आई म्हणाली .

" आई नको ना ग मी खूप थकलो आहे आधी शॉवर घेऊन पडतो ..रात्री उठलो न की मग भरव तुला हवं तेवढं ..मग मी काहीच म्हणणार नाही .." मी म्हणालो ..तिनेही मला थांबविल नाही ..मी शॉवर घेऊन बेडवर पडलो ..बराच प्रवास झाला असल्याने फार थकलो होतो ...त्यामुळे बेडवर पडलो आणि लगेच झोप लागली ..

झोपून उठलो तेव्हा साधारणतः रात्रीच्या जेवणाचीच वेळ झाली होती .फ्लाइटमध्ये जेवण करूनही बराच वेळ झाला होता ..आई रूममध्ये येऊन जेवण करण्यासाठी सांगून गेली होती ..माझ्याही पोटात कावळे ओरडू लागले होते ..त्यामुळे लगेच फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर पोहोचलो ..मला पाहताच बाबांनी मला सरळ येऊन झप्पी दिली ..आई बाजूलाच उभी होती ..बाबांना अस बघून आईने दुपारी बोललेली गोष्ट आम्हाला आठवली आणि आम्ही दोघेही जोराजोराने हसू लागलो ..बाबांना काहीच कळत नव्हतं आणि त्यांनी विचारलं , " अस हसायला काय झालं ..मुलगा आहे माझा एवढं तर प्रेम दाखवूच शकतो .." आम्ही तरीही हसन बंद केलं नाही आणि आई म्हणाली , " काही नाही हो असच हसतोय .." तुमच्यासोबत राहून मीदेखील वेडा होणार आहे म्हणत बाबांनी जेवणास सुरुवात केली ..आज आईने मला आवडत तस झणझणीत चिकन बनविल होत ..चिकनला पाहताच तोंडाला पाणी सुटल आणि मी सुरुवात केली ..पहिलाच पीस तोंडात धरला आणि जुण्या दिवसाची आठवण झाली ..आई जेवताना बोललं की ओरडायची म्हणून तिची स्तुती करू शकलो नव्हतो पण आज खूप दिवसांनी आईच्या हातच जेवण करून समाधान मिळालं होतं ..तसही स्वतःच्याच हातच पांचट जेवण करून कंटाळलो होतो..आई वाढतच होती आणि मी खातच होतो ..आमचं जेवण झालं आणि आई आवरून माझ्या रूमला आली ..
मी एकटाच बेडरूममध्ये बसून होतो .." कामात आहेस अभि आत येऊ का ? " , आई दारातूनच परवानगी घेत म्हणाली .." आई ये ना परवानगी का घेत आहेस ( ती आत आली )....तस पण मी तुलाच बोलावणार होतो .खूप दिवस झाले न आपण मनमोकळ्या गप्पा नाही मारल्या ..खूप आठवण येते ग तुमची ..स्वप्न पूर्ण करायला गेलो पण तिथेही एकटाच पडलो ." ती केसांवरून हात फेरत म्हणाली , " आम्हाला पण खूप आठवण येते रे तुझी बाळा ..आम्ही पण एक - एक दिवस मोजून काढतो तुझ्याशिवाय ..तुला काय माहिती किती ओढ होती तुला भेटण्याची " आणि अचानक तिच्या डोळ्यातुन अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ..मी तिच्या जवळ जाऊन डोळ्यावरून हात घेतले आणि म्हणालो , " चल ना मग माझ्यासोबत कायमच ..प्लिज आई चल ना .." माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच बाबा आत येत म्हणाले , " माय - लेक माझ्या चुगल्या करत आहात वाटत .." आणि त्यावर आईच उत्तर , " हो तुम्ही मोठे जेम्स बॉण्ड आहात न तुमच्या चुगल्या करायला " ..ती तशी नेहमीच विनोदी बोलत असे त्यामुळे तिच्यासोबत असताना घरात एक वेगळंच वातावरण असायचं ..ती घाबरायची फक्त एका व्यक्तीला म्हणजे आजोबांना ..त्यांच्यासमोर तर ती अगदी शांत बसायची आणि बाबा - मी तिला सतत चिडवायचो .त्याक्षणी चिडवून घ्यायचो पण दुसऱ्या दिवशी मात्र आमचं काहीच खर नसायचा ..अशा या आमच्या मतिश्री..ती माझ ऐकणार नव्हती म्हणून बाबांकडे मोर्चा वळविला .., " बाबा बघा ना मी आईला समजावून थकलो की माझ्यासोबत चल पण ती ऐकायला तयार नाही ..तुम्ही समजवा न तिला " ...बाबा क्षणभर हसत म्हणाले , " बेटा समजवायच तिला नाही तर तुला आहे ..इथे आपलं कुटुंब आहे , गावाला माझे वडील आहे त्यांना हवं नको ते बघावं लागत शिवाय आमचं हेच जग आहे ..इथेच आम्हाला करमत आणि एवढ्या मोठ्या शहरात आम्हाला नाही करमनार ..खर तर तुला जाऊच देणार नव्हतो पण तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिथे जाऊ दिल..तरीही आम्ही खुष आहोत ." मलाही त्यांचं संपूर्ण बोलणं पटलं होत ..बाबांच बोलून झाल्यावर आई संधी साधून म्हणाली , " जर एवढंच एकट वाटत असेल तर लग्न कर मग घेऊन जा तिला तिथे ..मग एकटेपणाही नाहीसा होईल आणि सुंदर सुंदर जेवणही खायला मिळेल .." नंतर मी तिच्याकडे पाहत म्हणालो , " आई माझी यावेळी लग्न करण्याची ईच्छा नाही पण तुला हवं असेल तर पुढच्या वेळी येईल तेव्हा नक्की बोलू यावर मग तुला हवं ते कर .." तिनेही सहमती दर्शवली ..बोलता - बोलता वेळेच भान राहील नाही ..रात्रही बरीच झाली होती त्यामुळे आई - बाबा गुड नाईट विश करून झोपायला गेले ..मलाही आज खूप समाधानाने झोप येणार होती ..कितीतरी दिवस अशांत असलेला मी आज शांततेने झोपी गेलो होतो ..
दुसरा दिवस ..आईबाबांसोबत बोलून त्यांची नाराजगी दूर केली होती ..पण आता नाराजगी दूर करायची होती ती माझ्या जिवलग मित्रांची ..कामाच्या नादात त्यांना वेळच देऊ शकलो नव्हतो ..कधी - कधी शाश्वतसोबत बोलणं व्हायचं त्यामुळे तो फारसा नाराज नसायचा पण मागील काही दिवसांपासून विकास माझ्याशी एक शब्द देखील बोलला नव्हता तेव्हा त्याला मनवन फारच कठीण जाणार होत शिवाय चूक माझीच असल्याने मला ते करणं आवश्यक असत ..आज शाश्वतला दुसऱ्या नंबरवरून फोन केला ..फोनची रिंग वाजत होती ..काही सेकंदात कॉल उचलल्या गेला आणि त्यावरून आवाज आला , " हॅलो कोण बोलत आहात ? "..मी त्यावर म्हणालो , " मी शाश्वत सरांशी बोलू शकतो का ? " आणि तिकडून उत्तर आलं , " हो पण आपण कोण ? .." आता मी त्याच्यावर हसू लागलो आणि म्हणालो , " साल्या आवाज पण ओळखता येत नाही का ? ..अभि बोलतोय 15 मिनिटात कट्ट्यावर भेट ..खूप आठवण येत आहे तुमची .."

त्यावर तो म्हणाला , " साल्या आता तुला आठवण आली आमची ..हो वाट बघ मी आलोच .."

काहीच वेळात आम्ही चहाच्या टपरीवर पोहोचलो ..मी लवकरच पोहोचलो तर तो माझ्या मागून आला ..त्याला पाहताच घट्ट मिठी दिली आणि जुन्या कॉलेज दिवसाची आठवण झाली ..कॉलेजला असताना खूपच मज्जा केली होती ..आता पुन्हा एकदा तीच मज्जा आम्ही अनुभवणार होतो ...शाश्वत माझ्यावर ओरडला होता पण तो विकाससारखा अडून बसणारा नव्हता ..त्यामुळे त्याच टेंशन मला नव्हतंच टेंशन होत ते विकासच आणि तो म्हणाला , " अभि मला तर समजावलं पण त्याला कस समजावनार आहेस ?? ..त्याला एकदा राग आला की मग लवकर जात नाही सो विचार कर त्याच्याकडे जाण्यापूर्वी ." मी त्याच्याकडे हसून पाहिलं आणि तो समजून गेला ..मस्त चहा घेऊन आम्ही त्याच्या घराकडे निघालो ..मी जाणूनच सुट्टी पाहून आलो होतो त्यामुळे ते दोघेही घरी असतील हे माहिती होत .शाश्वतने गाडी पार्क केली आणि आम्ही त्यांच्या दारावर उभे झालो ...सोनालीने दरवाजा उघडला तर समोर शाश्वत होता ..तिने त्याच्याकडे पाहून स्माईल केली ..मी त्याच्यामागे लपून होतो .तो बाजूला झाला आणि मला पाहून तिचा चेहरा पुन्हा एकदा खुलला ..तिने मला धावतच मिठी मारली आणि जोराने म्हणाली , " अभि तू ..किती दिवसांनी भेटतो आहेस ..खूप मिस केलय रे आम्ही तुला ..बाय द वे डॅशिंग दिसतो आहेस बर का ..खुप आनंद होतोय तुला पुन्हा एकदा पाहून !! " ..संपूर्ण वेळ तीच बोलत होती आणि शाश्वत रागावून म्हणाला , " आता घरात घेशील का इथेच ठेवणार आहेस ...? "..तिने त्याचा डोक्यावर एक टपली मारली आणि आम्ही आतमध्ये जाऊ लागलो .." सोनाली विकास आहे ? " , मी तिला हळूच विचारलं .तिने माझे शब्द एकताच मोर्चा बेडरूमकडे वळविला .." विकास बघ तरी अभि आला आहे " आणि त्याने अपेक्षित उत्तर दिलं , " कोण अभि ..मी नाही ओळखत कुठल्या अभिला ..जायला सांग त्याला .." ..मी त्यावेळी दारावर उभा राहून सर्व एकत होतो ..मी तिला बाहेर जायला सांगितलं आणि शाश्वत , मी दोघेही आतमध्ये गेलो .." सॉरी ना भावा चुकलं माझं एकदा माफ कर " , मी म्हणालो आणि तो माझ्यावर रागावत म्हणाला .. , " साल्या कॉलेजला असताना भरपूर दिवस एकत्र जगले पण अस कधी वागशील वाटलं नव्हतं ..मान्य की तुझं स्वप्न पूर्ण करायचं होतं..आम्ही त्याला कुठे मनाई केली पण तुला एकही दिवस मिळाला नाही आमच्याशी बोलायला ... साल्या लग्नातसुद्धा आला नाहीस एक दिवसासाठी
.किती वाट पाहत होतो तुझी ..मला नाही बोलायच शाश्वत घेऊन जा रे याला .."

" तुझं सर्व बरोबर आहे पण एकदा माझं बोलणं ऐक मग निघून जातो मी स्वताच .." , मी म्हणालो ..शाश्वत आणि सोनालीने त्याला एकविण्यासाठी मनवल आणि मी पुन्हा बोलू लागलो , " तुम्हाला सर्वाना महितच आहे की ज्याक्षणी मी मानसीला पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो ..सतत तिचेच विचार मनात यायचे ..मी माझं संपूर्ण आयुष्य तिच्यासाठी जगायच ठरवलं होतं पण एक गोष्ट तुम्हाला माहिती नाही ती अशी की ..ज्यादिवशी सोनाली तुला आपल्या मनातल सांगत होती त्यादिवशी वेगळ्याच जागेवर एक प्रसंग घडला ..ट्रॅडिशनल डेच्या दिवशी राहुलने मानसीची स्तुती केल्याने मला तिच्यावर फार राग आला होता पण सायंकाळी माझा मूड छान झाला आणि माझ्या मनातलं सांगण्यासाठी तिला शोधू लागलो .तिला शोधता - शोधता इलेक्ट्रिकल शाखेला पोहोचलो . तिथे राहुल गुडघ्यावर बसून मानसीला प्रपोज करत होता ..राहुलने तिला प्रपोज केलं..ती त्याच्या मिठीत गेली आणि माझे सारे स्वप्न एका क्षणात नाहीसे झाले ..खर सांगू तर तेव्हा खूप तुटलो पण इकडे शाश्वतची स्थिती एकदम खराब होती आणि सोनालीने तुला तब्बल 5 वर्षानंतर मनातलं सांगितलं होतं त्यामुळे तो क्षण तुमच्यापासून हिरावून घ्यायला आवडला नसता म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगायला मन तयारच झालं नाही .. खरं सांगू शाश्वतला सांभाळताना जाणवलं की मित्रांपेक्ष्या जास्त काही नसतंच आणि तुमची सोबत असताना हळूहळू मी यातून बाहेर पडलो ..आता तुला वाटेल की मग मी हे सांगितलं का नाही .इतकं दूर का केलंस आम्हाला..पण मला एक सांग प्रत्येक वेळा मैत्री तुम्हीच निभवायची का ? ..तुम्हीच नमत घ्यायचं का ..तुम्हीच त्रास सहन करायचा ??..तर मन म्हणाल अजिबात नाही....मला त्याक्षणी जे योग्य वाटेल ते केलं आणि मला विश्वास आहे माझ्याजागी तू असतास तरी हेच केलं असत ..आणि राहिला प्रश्न लग्नाचा ..मला वेळेवरच कंपनीने अमेरिकेला पाठवलं ..खूप इच्छा होती तुझ्या लग्नात येऊन नाचण्याची पण सुट्टीच मिळाली नाही आणि माझ्या बेस्ट फ्रेंडच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणापासून मला मुकाव लागलं ..साल्या एक खंबा पिऊन नाचायच होत तुझ्या लग्नात पण शक्य नाही झालं ..तुलाही आताही वाटत असेल मी चुकलो तर मी जातो कायमचा "..मी जायला निघालो तेवढ्यात त्याने माझे हात पकडला आणि झप्पी देत म्हणाला , " सॉरी यार मीच चुकलो ..मान गये आपको.. जिंदगी जिते - जिते ये भूल गया की दोस्ती निभानि तो मैने तुझसेही सिखी है .." ..त्याने मला मिठी मारली आणि सोनाली , शाश्वत देखील आम्हाला येऊन जॉइन झाले ..पुन्हा एकदा बेस्टीज एक झाले होते ..कायमसाठी...

सोनाली किचनमध्ये गेली होती ..मी विकासला बिअरची बॉटल दाखवत म्हणालो , " विक्या तेरे लिये " ..त्यानेही लगेच हातात घेतली ..तो फोडणारच तेवढयात सोनाली दारावर आली ..आता सर्विकडे शांतता पसरली ..मीच पुढाकार घेत म्हणालो , " सोनाली जा चार ग्लास घेऊन ये ..मी खूप दिवसाने आलोय सो रागावू नको त्याच्यावर ." तिने एक विकासावर कटाक्ष टाकला ..तो खाली पाहू लागला होता तरीही ती ग्लास घेऊन आली .." अय्या चार ग्लास .म्हणजे आपण पण पिणार आहोत ना ? " , सोनाली म्हणाली ..विकास - शाश्वत दोघेही तिच्याकडे पाहू लागले आणि मीच मधात म्हणालो , " हो चार ग्लास आहेत पण आपण सॉफ्ट ड्रिंक घेणार आहोत .." हे ऐकून दोघाणीही प्यायला सुरुवात केली आणि ती माझ्याकडे डोळे काढून पाहू लागली. " बे शाश्वत तू नेहाला प्रॉमिस केलं होतं ना पिणार नाही अस ? " , मी म्हणालो ..आणि त्याच उत्तर , " मी तिला म्हणालो होतो की त्रास करून घेणार नाही पण आज चलता है बॉस प्यार के चक्कर बहोत बोतले खाली की है आज दोस्त की खुशी मे कर लेता हुे " ..नौटंकी साला

आज आम्ही चारही झन खूप खुश होतो ..खूप दिवसानंतर मित्रांची यारी पाहायला मिळाली होती .सर्वांची एकत्र पार्टी करण्याची इच्छा असल्यामुळे मी त्यांना उद्या घरी जेवायला बोलविल होत ...सकाळची - सायंकाळ झाली आणि शाश्वत मला ड्रॉप करून घरी गेला .
घरी पोहोचलो पण झोप काही येईना ..आईबाबा झोपी गेले होते..माझं कुठेच मन लागत नव्हत त्यामुळे खूप दिवसांनी पुन्हा एकदा मोर्चा पुस्तकांकडे वळविला ...जवळपास सर्वच पुस्तक वाचली होती त्यामुळे पुन्हा एखादं- नवीन पुस्तक शोधू लागलो .पुस्तक शोधताना पुस्तकाच्या संचामधून एक पेज बाहेर आला ..पेज उचलायला गेलो .पेज उलट पडलं होतं त्यामुळे त्यात काय होत ते लक्षात आलं नाही...पेज सरळ केलं आणि त्यात ती होती ..मानसी ..जेव्हा ती पहिल्यांदा भेटली होती तेव्हा तिची प्रतिमा मी कागदावर उतरवून ठेवली होती ..कॉलेजला असताना मी त्या स्केचकडेच बघून दिवस काढायचो पण कॅनडाला गेलो आणि ती प्रतिमा पुस्तकात कुठे तरी हरवल्या गेली ..मी पुस्तक बाजूला ठेवून तिच्या प्रतिमेकडे पाहू लागलो ..आजही ती तेवढीच सुंदर दिसत होती ..तिला कितीतरी वेळ तसाच पाहत होतो.. तीन वर्षानंतर देखील ती तेवढीच सुंदर भासत होती आणि तिला पाहून नाना पाटेकरच्या त्या ओळी आठवण आल्या...

कैसे बताऊ मै तुम्हे
मेरे लिये तुम कोण हो
कैसे बताऊ

कैसे बताऊ मै तुम्हे
तुम धडकनो का गीत हो
जीवन का तुम संगीत हो ..
तुम जिंदगी तुम बंदगी
तुम रोशनी तुम ताजगी
तुम हर खुशी तुम प्यार हो
तुम प्रीत हो मनमित हो...
निंदो मे तुम ख्वाबो मे तुम
तुम हो मेरी हर बात मे
तुम हो मेरे दिन रात मे...
तु सुबह मे तू श्याम मे
तू सोच मे तू काम मे..
मेरे लिये पाना भी तुम
मेरे लिये खोना भी तू
और जागना सोना भी तुम ..
जाऊ कही देखू कही
तुम हो वहा तुम हो वही
कैसे बताऊ मै तुम्हे
तुम बिन तो मै कुछ भी नही ...

कैसे बताऊ तुम मेरे लिये कोण हो
कैसे बताऊ...

ये जो तुम्हारा रूप है
ये जिंदगी की धूप हा
चंदन से तरशा है बदन
बहती है जीसमे एक अगन
ये शोखीया ये मस्तीया
झुमको हवाओ से मिली
जुलफे घटाओ से मिली ...
होठो को कलिया मिल गयी
आखो को झिले मिल गयी
चेहरे से सिमटी है चांदणी
आवाज मे है रागिणी ..
शिशे के जैसा अंग है
फुलो के जैसा रंग है
नदियो के जैसी चाल है
क्या हुस्न है क्या हाल है..
ये जिस्म की रंगिनीया
जैसे हजारो तितलीया
बाहो की ये गोलाइया
आंचल मे ये परछाइया..
ये नगरीया है ख्वाब की
कैसे बताऊ मै तुम्हे
हालत दिलं - ए - बेताब की

कैसे बताऊ मै तुम्हे
मेरे लिये तुम कोण हो
कैसे बताऊ

कैसे बताऊ कैसे बताऊ मै तुम्हे
मेरे लिये तुम धरम हो
मेरे लिये इमान हो
तुम ही ईबादत हो मेरी ..
तुम ही चाहत हो मेरी
तुम ही मेरा अरमान हो
ताकता हु मै हर पल जिसे
तुम ही तो वो तसवीर हो
तुम ही मेरी तकदिर हो ..
तुम ही सीतारा हो मेरा
तुम ही नजारा हो मेरा
युध्यान मे मेरे हो तुम
जैसे मुझे घेरे हो तुम ...
पूरब मे तुम पश्चिम मे तुम
दक्षिण मे तुम उत्तर मे तुम
सारे मेरे जीवन मे तुम
हर पल मे तुम हर चिर मे तुम ..
मेरे लिये रस्ता भी तुम
मेरे लिये मंजिल भी तुम
मेरे लिये सागर भी तुम
मेरे लिये साहिल भी तुम ..
मै देखता बस तुमको हु
मै सोचता बस तुमको हु
मै जाणता बस तुमको हु
मै मानता बस तुमको हु
तुम ही मेरी पहचान हो
कैसे बताऊ मै तुम्हे
देवी हो तुम मेरे लिये
मेरे लिये भगवान हो ...

कैसे बताऊ मै तुम्हे
मेरे लिये कोण हो तुम
कैसे बताऊ ..कैसें बताऊ..


आताही तिच्या प्रतिमेकडेच नजर होती .." खूप प्रयत्न केला ग मानसी तुला विसरण्याचा ..जगासमोर तुला आठवण्याची हिम्मत नव्हती पण एकट्यात मात्र तुला विसरन कधीच शक्य झालं नाही ..मी म्हणालो होतो की प्रेम करून चूक केली पण आता कबूली देतोय की तो सर्वात सुंदर क्षण होता माझ्या जीवनातला ..तो तुझा हळुवार स्पर्श झाला आणि संपूर्ण आयुष्य बदललं ..प्लिज ये ना पुन्हा एकदा ..मला नाही फरक पडत तू कुणाची आहेस का ??..तुझ्या शरीराचा लोभही नाही की तुझ्या वेळेची पर्वा नाही...समाज , घरचे सर्वांचा विरोध करूनही तुझी साथ द्यायला तयार आहे ..फक्त पुन्हा एकदा ये ..

करता रहता हु तेरा इंतजार
सुबह के घने कोहरे मे
रास्ते सुने पडे है दूर तलक
पर इन नजरो को अब भी तेरा इंतजार है
कही से तो आयेगी तू
पल भर मे मेरी बन जायेगी तू
अब तो रात दिन तेरा खयाल रहता है
शायद ये सब सपणे मे सच हो जाये ..
येशील ना तू पुन्हा एकदा आयुष्यात आणि अचानक तिच्या पापण्या हलण्याचा भासा झाला म्हणजे तू येणार आहेस ??


क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED