स्पर्श - भाग 6 Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - भाग 6

कॉलेज एक असा कट्टा जिथे प्रत्येक व्यक्ती हरवून जातो ..हीच ती वेळ असते जेव्हा आपण घरच्या वातावरणातून मुक्त होऊन एक प्रेमाचा आधार शोधत असतो आणि नवनवीन व्यक्तींकडे आकर्षिल्या जातो आणि त्यांचा सहवास हवाहवासा होतो ..रात्र फक्त कशीतरी घरात काढावी लागते बाकी ओढ असते पुन्हा मित्रांना भेटण्याची त्यातही आपण प्रेमात पडलो की मग मजाच वेगळी ..कुणीतरी आपल्याला पाहणार म्हणून थोडं नटून - सजून जाण्याचे ते दिवस अगदीच जवळचे वाटू लागतात आणि मग खऱ्या अर्थाने कॉलेज लाइफ काय असते ते जाणवू लागत ..माझ्याकडे तर जिवाभावाचे मित्र होते आणि नव्याने प्रेमात पडलो त्या क्षणांना शब्दात मांडण देखील शक्य नव्हतं त्यामुळे माझ्यासाठी तर ही कॉलेज लाइफ विशेष होती ...
नेहा ऑफिशिअली ग्रुपमध्ये आल्याने एक फायदा झाला होता की मानसी सतत आमच्यासोबत असायची ..त्यातही नेहा आणि शाश्वत मूवी पाहायला वगैरे गेले की ती आमच्यासोबतच राहायची आणि मला न मागताही तिचा सहवास लाभायचा ..बहुतेक वेळा तिला पाहायचो आणि तीच प्रतिमा डोक्यात बसायची ..ती हसायला लागली की तिच्या गालावर खडे पडायचे आणि ती अधिकच सुंदर दिसायची ..तशी ती दिसायला सुंदर पण तिचे हावभाव तिला अधिकच सुंदर बनवायचे ..काय होत तिच्यात माहिती नाही पण आकर्षणावरून मी सरळ झेप घेतली ती प्रेमावर आणि कधी कुणात सहज न मिसळणारा मी क्षणात तिचा झालो ..द बेस्ट फीलिंग इन माय लाइफ इज लव्ह ..आय कान्ट डीस्क्राईब इट इन माय ओन वर्ड्स ...

आज मस्त मूड होता म्हणून क्लास करण्यासाठी सर्व आत गेलो ..एका मागोमाग एक लेक्चर सुरू झाले ..त्यात आमच्या पांडे सरांचं शिकवण आमच्या डोक्यावर जायचं ..सरांचा क्लास सुरू झाला आणि आधीच दुखत असलेलं डोकं आणखीनच दुखू लागलं ..मी शाश्वत आणि विकासाकडे पाहिलं तर ते मला खुणेने बाहेर जाण्यासाठी विचारत होते पण एकदा क्लास सुरू झाल्यावर बाहेर जाण बर वाटनार नाही म्हणून मी जाण्यास नकार दिला ..जवळपास 45 मिनिटे लेक्चर सुरू होत आणि डोकं अगदीच कामातून गेलं ..पुढचं लेक्चर सुरू होणार त्याआधीच आम्ही सर्व कॅन्टीनला गेलो ..एक मस्त चहा मारला आणि त्यानंतर कुठे डोकं शांत झाल आणि मी आता कुठे बोलू लागला , " उद्या काय आहे आठवण आहे न ? "

" काय आहे आम्हाला काय माहीत तू सांगशील तेव्हाच कळेल " , शाश्वत म्हणाला ..

विकास त्याच्या अगदीच बाजूला बसून होता ..त्याने हे ऐकताच त्याच्या डोक्यावर टपली मारली ..आणि समोरून सोनाली म्हणाली , " हा जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आहे तेव्हापासून नेहाशिवाय याला दुसरं काहीच दिसत नाही ..नाही तर 15 डिसेंबरला काय असत हे याला आपल्या आधीच माहिती असत ."

" सॉरी ..उद्या काकूचा वाढदिवस आहे न ..सॉरी न यार विसरलोच होतो मी " , चेहरा पाळत शाश्वत म्हणाला

" अभि मग उद्या सेलिब्रेशन करायचं न " , सोनाली उत्साहित होत बोलू लागली ..

"अफकोर्स मॅडम ..मग आपापली जबाबदारी वाटून घेऊयात " , मी म्हणालो ..

उद्या आईला आपण सेलिब्रेशन करणार आहोत याबद्दल काहीच माहिती नाही सो रात्री तिला कुणीच कॉल करू नका ..विकास आणि शाश्वत तुम्ही केक आणि सजावटीच सर्व सामान आणायचं ..सोनाली तू आणि मी बिर्याणी बनवू ..आणि हो ऐका 11.30 च्या पूर्वी घरी येऊ नका ..नाही तर आईला कळेल ..माझ्या फोनची वाट पाहा म्हणजे तिला आपल्याबद्दल कळणार नाही ..

" ए पण आई घरीच असेल तर मग सरप्राइज कस देणार " , सोनाली म्हणाली ..

मी हसत म्हणालो , " त्याची काळजी नका करू प्लॅन रेडी आहे फक्त तुम्ही तयार राहा "..

आता चहा घेऊन झाला होता शिवाय उद्या धमाल करायला मिळणार म्हणून आम्ही फार खुश होतो ..

" बर मी काय म्हणतो अभि फक्त आपणच असू का पार्टीला ? " , शाश्वत म्हणाला ..

मला जाणवू लागलं की मी नेहाला बोलवावं अस त्याला वाटत होतं म्हणून त्याची खेचायला मुद्दामच म्हणालो , " बे विक्या आपण नाही तर कोण येणार तिथे ..पुन्हा कुणी सुटलं का बोलवायचं ? "

" हे काय तू , मी , शाश्वत आणि सोनाली सर्वच तर आहोत आणखी कुणाला बोलवायचं आहे ..नाही नाही अजिबात नाही " , विकासने मला साथ दिली ..

एव्हाना शाश्वतचा चेहरा पडला तेवढ्यात सोनाली त्याची बाजू घेत म्हणाली , " कशाला रे छडता माझ्या मित्राला ? ..हो आता त्याला वाटलं असेल नेहाने पण यावं ..पण मला सांग तुझ्या आईच्या वाढदिवसाला हा कसा काय बोलवू शकतो कुणाला "

त्यालाही जाणवलं की सोनाली आपली बाजू घेऊन आपलीच खेचत आहे म्हणून तो रागाने तिच्याकडे पाहू लागला ..तो आता फारच शांत झाला होता ..आणि खाली मोबाइलमध्ये मान घातली ..

" हे नेहा कुठे आहेस , प्लिज कॅन्टीनला ये मला थोडं काम आहे तुझ्याकडे एवढं बोलून मी फोन ठेवला आणि उदास असलेला शाश्वत माझयाकडे पाहू लागला ..

" गंमत करत होतो रे भावा तिला नव्हतो बोलावणार का " , मी म्हणालो आणि आतापर्यंत चेहरा पाळून बसलेला तो हसू लागला ..

काही वेळातच नेहा आली पण तिच्यासोबत मानसी काही आली नाही ..मी एक - दोनदा मागे पलटून पाहिलं आणि सोनालीच्या ते लक्षात आलं

" नेहा मानसी नाही आली का , तू एकटीच आली आहेस म्हणून विचारलं " , सोनाली म्हणाली ..

" अग ती येत आहे घरून कॉल आला आहे तिला , सांग न कोणतं काम आहे तुला " , नेहाच उत्तर ..

तिला येऊ दे मग सांगतो म्हणत मी वेळ मारून नेली ..शेवटी ती आली आणि आता कुठे मनाला समाधान मिळालं ..

" बर ऐका उद्या आईचा वाढदिवस आहे सो तुम्हाला इन्व्हाइट करतोय शिवाय सजावट करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे ..सो प्लिज याल का ? " , मी त्या दोघींना विचारू लागलो ..

माझे शब्द पूर्ण होताच नेहाने होकार कळवला आता आमचं संपूर्ण लक्ष मानसीकडे होत ..ती काहीच बोलत नव्हती पण तिचा चेहरा सांगत होता की तिला यायला जमणार नाही ..

" सॉरी यार मला जमणार नाही , घरचे परवानगी देणार नाहीत " , मानसी म्हणाली ..

तिने घरी यावं म्हणून मी हे सर्व प्लॅनिंग केलं होतं तेव्हा तिच्या नकाराने सर्व मजाच गेली ..माझा चेहरा पडताच सोनाली म्हणाली , " मानसी प्लिज यार खूप खास दिवस असतो हा आमच्यासाठी शिवाय ह्या शाश्वत , विकासला जमणार आहे का सजावट ..?

शाश्वत त्यावर काही कंमेंट करणार तेवढयात तिने त्याला पाय मारला आणि त्याला कळाल की हे सर्व तिला मनविण्यासाठी सुरू आहे आणि तो सुद्धा तिला मनवु लागला ..

तू आलीस तर आम्हाला मदत पण होईल आणि शिवाय तू आलेलं काकुला पण आवडेल नाही तर त्या तुझ्याबद्दल विचारतील तेव्हा बर नाही वाटणार आम्हाला ..प्लिज ये ना " , सोनाली म्हणाली ..

ती पुन्हा विचार करू लागली आणि आम्ही सर्व तिच्याकडे पाहू लागलो " अस काय पाहत आहात , येत आहे मी " , ती चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली ..

मी त्या दोघांना सर्व प्लांनिंग समजावून सांगितलं आणि आम्ही आमची मिटिंग बरखास्त झाली ..त्या दोघी घराकडे निघाल्या , " विकास हे पैसे घे ..सजावटीच साहित्य आणायला लागतील तुला " , मी म्हणालो ..

" मोठा श्रीमंत आहेस तू ठेव ते पैसे स्वतःजवळ ..काकुसाठी मी एवढं नाही करू शकत का " ? , विकास म्हणाला ..

आई शपथ तो फार कमी बोलायचा पण एकदा बोलला की मग मात्र उत्तर नसायच..मी त्याला लगेच हग केलं ..मागून शाश्वतसुद्धा आम्हाला जॉइन झाला आणि आम्ही घराकडे निघालो ..
घरी पोहोचलो ..आईने मला पाहताच चहा टाकला ..एव्हाना बाबा पण घरी आले होते त्यामुळे आम्ही मिळूनच चहा घेतला ..पण माझ्या डोक्यात एक प्रश्न सतत घुमत होता की आईला घरातून बाहेर काढायचं कस ..तेवढयात बाबा माझ्याशी बोलू लागले आणि माझ्या डोक्यात चटकन लाईट पेटला ..थोडा वेळ टी. व्ही. पाहण्यात गेला ...हिवाळा असल्याने आईने लवकरच स्वयंपाक बनविला होता ..त्यामुळे जेवण करून घेतलं आणि बाबा एकट्यामध्ये भेटण्याची वाट पाहू लागलो ..पण झालं उलट बाबा सरळ झोपायला निघून गेले ..मागून आई पण गेली ..माझा सर्व प्लॅन बाबांवर अवलंबून होता त्यामुळे आज त्यांच्याशी बोलणं गरजेचं होतं ..मी लगेच बाबांच्या रूममध्ये गेलो ..बाबा झोपणार होतेच तेवढ्यात म्हणालो , " बाबा आज जेवण खूप झालं आहे , चला न पाय मोकळे करायला जाऊ "

" नाही रे बाळा मी आज खूप थकलो आहे सो मी झोपतो " , बाबा म्हणाले ..

मला त्याक्षणी बाबांचा खूप राग आला पण हलकीशी स्माईल देत मी त्यांच्याकडे गेलो आणि ते काही बोलणार तेवढ्यातच त्यांच्या हात पकडून बाहेर घेऊन आलो ..शेवटी बाबा यायला तयार झाले आणि आम्ही घराबाहेर पडलो .घरापासून थोड्या अंतरावर पोहोचलो असेल तेव्हा बाबा म्हणाले , " काय रे आज कस काय अचानक फिरायला घेऊन आलास मला "

" उद्या काय आहे " , माझा प्रश्न ..

बाबा हसून उद्गारले , " गुरुवार ..हे विचारण्यासाठी मला घेऊन आला आहेस . "

" तुम्ही उद्या ओरडा खाणार आईचा ..अहो उद्या वाढदिवस आहे तिचा " , मी रागावत म्हणालो ...

बाबा डोक्यावर हात मारत म्हणाले , " अरे देवा !! बर झालं सांगितलं तर नाही तर ओरडा काय घेऊन बसला आहेस उपाशी ठेवल असत तिने मला चार दिवस . "

मी त्यांच्यावर हसत म्हणालो , " असच हवं तुम्हाला ."

" बर ते सोड काही तयारी केली की नाहीस मग उद्याची " , बाबांचा प्रश्न ...

" सर्व तयारी झाली आहे पण तुमच्या मदतीशिवाय काहीच शक्य नाही " , मी चेहरा पाळत म्हणालो ..

" बोल की मला काय करायचं आहे " , बाबा म्हणाले ..

" काही खास नाही फक्त उद्या सुट्टी घ्या आणि दुपारी 12 ते 3 मूवी ला घेऊन जा तिला ..म्हणजे आम्हाला तयारी करायला वेळ मिळेल ..आणि हो ममीला काही गिफ्ट घ्यायचं विसरू नका " , मी म्हणालो ..

" हो का नाही ??..आईचा चमचा कुठला " , बाबा हसून म्हणाले ..

शेवटी आम्ही जस ठरवलं तस सर्व पक्क झालं होत..येताना आईला आइस - क्रीम घेऊन आलो...आता वाट होती ती उद्याची ..
आज ममाचा वाढदिवस ..

" ए अभि चल उठ लवकर ..बघ तर 9 वाजले आहेत ..तू अजून कसा उठला नाहीस कॉलेजला जायचं नाही का ? " , ममा कानाजवळ येऊन चक्क ओरडत होती ..

मी चादर ओढून घेत म्हणालो , " ए ममा आज मला उशिरा जायचं आहे कॉलेजला सो प्लिज झोपू दे ..तस पण खूप दिवसांनी अस शांत झोपायला मिळत आहे सो मला झोपू दे जा तू . "

" बर बर ..पण ऐक ..आज बाबा आणि मी बाहेर जातोय सो स्वयंपाक बनवून ठेवते तुला ..तू खाऊन घे काहीतरी " , ममा काळजीने म्हणाली ..

" ए ममा ऐक ना आज आम्ही सर्व बाहेर खाणार आहोत तर तू नको बनवू काहीच ..तुम्ही जा तुम्हाला हवं तिथे " , मी चादरीत डोकं खुपसून बोलत होतो ..

बर ठीक आहे म्हणून ती निघून गेली ..बाबांनी बहुतेक तिला रात्रीच शुभेच्छा दिल्या होत्या पण मी शुभेच्छा दिल्या नाही म्हणून रुसली होती बहुतेक ..तरीही मी झोपण्याकडे लक्ष केंद्रित केलं ..

मी झोपून उठलो तेव्हा सकाळचे 10.30 वाजले होते ..लवकरात लवकर ब्रश केल..ममा आणि बाबा गेल्यावर तयारी करायची बसल्याने पटकन अंघोळ करून घेतली ..आताही त्यांना निघायला थोडासा वेळ होता कारण ती तयारी करत बसली होती ..म्हणून स्वताच चहा बनवून हॉलमध्ये चहा पीत बसलो ..11.30 वाजायला आले होते पण ते निघायला तयार नव्हते ..तेवढ्यात बाबा हॉलमध्ये आले आणि मी त्यांना डोळ्यांनीच इशारा केला ..त्यांना ते लगेच समजलं ..

" अग ए ऐकतेस का ..निघ लवकर ..उशीर होतोय आपल्याला " , बाबांनी खोटा - खोटा राग दाखवायला सुरुवात केली ..

" हो हो आले ..एक तर बाहेर चल म्हणावं आणि साधी तयारी पण करू देत नाही " , अस म्हणत ती बाहेर आली ..

मी तिच्याकडे पाहत म्हणालो , " ममा मी विचारायचं विसरलो तुम्ही नेमके कुठे जात आहात ? ",

ती संगणारच की मूवीला जातोय तेवढयात बाबाच म्हणाले , " काही नाही रे मित्रांकडे जातोय कार्यक्रम आहे ..तुला विचारलं असत पण तू कामात होतास म्हणून " , बाबा अभिनय करत म्हणाले ..

" हो मला आहेच काम कॉलेजला ..तुम्ही जाऊन या ..हॅपी जर्नि " , ..मी म्हणालो

ममा जायला निघणार तेवढ्यात ती मागे वळून पाहत म्हणाली , " अभि तू काही विसरत तर नाहीस ना ? "

" नाही ग काय विसरणार तसे पण मला खूप काम आहेत सो मी निघतोच आहे ..तू अस का विचारलं पण ..काही विसरलोय का मी ? " , मी म्हणालो ..

तिने काहीच उत्तर दिलं नाही ..ती आता फार उदास जाणवू लागली शिवाय बाबांव्यतिरिक्त तिला कुणीच वीश केलं नव्हतं त्यामुळे आज तिचा मूड खराब झाला होता तरीही ती बाबांसोबत गेली ..
ममा गेली आणि मी सर्वाना फोन करायला सुरुवात केली ..शाश्वत आणि विकास बहुतेक बाजूच्या टपरीवरच उभे होते त्यामुळे लगेच घरात दाखल झाले ..त्यांनी केक सोडून सर्वच साहित्य आणलं होतं ..आता वाट होती त्या तिघांची आणि पाठोपाठच त्या आल्या ..सोनाली म्हणा की नेहा म्हणावं अथवा मानसी अगदी तिघ्याही खूप मस्त सजून आल्या होत्या ..त्यांनी प्रवेश केला आणि आम्ही तिघेही त्यांच्याकडे पाहू लागलो ..काही वेळ आम्ही तसच पाहत बसलेलो असताना सोनाली म्हणाली , " काय बघत आहात कधी बघितलं नाही का आम्हाला ? "

आणि शाश्वतच उत्तर , " काही क्षण तर वाटलं इथे काकूंचा वाढदिवस नाही तर तुमचा विवाह सोहळा आहे "

हे ऐकून आम्ही तिघेही एकमेकांना टाळ्या देऊ लागलो ..त्याही हसू लागल्या , " बर बर तुमचे पांचट जोक नंतर मारा आधी काम करूया ", सोनाली म्हणाली ..आणि आम्ही आपापल्या कामी लागलो ..
खर तर कॉलेजला येत असताना मुलींना नेहमी कॉलेज ड्रेसवर पाहावं लागत आणि त्यात त्या अजिबात चांगल्या दिसत नाहीत ..एखादीच त्याला अपवाद असते त्यामुळे प्रत्येक मुलगा अशा प्रसंगाची वाट पाहत असतो जेव्हा त्यांची सुंदरता मुलांना अगदी भारावून सोडते ..आज मानसी आकाशी रंगाचा चुडीदार लावून आली होती ..त्यातही हातात मॅचिंग बँगल्स आणि कानात लांब लांब झुमके आणखीनच शोभा वाढवत होते आणि हलकासा मेकअप..केस अगदी व्यवस्थित कापलेले ..त्यात ती हसली की मग मात्र काही खर नसायचं ..आणि क्षणात मन पिक्चरमधली ती शायरी आठवायची ..

हुस्न को चांद जवानी को कमल कहते है
देख कर हम तुझको एक शोक गजल कहते है
उफफ ये संग - ए - मरमरसा तराशा हुआ शफाफ बदन
देखणे वाले तुझे ताजमहल कहते है ..

आणि ओठांवर वाह ! वाह शब्द यायचे ..तर अस हे मानसी पुराण..
सजावट करण्यासाठी त्यांना हवं असलेलं सर्व साहित्य दिलं ..सोनाली आणि मी लगेच किचनला पोहोचलो ..आज जेवणात बिर्याणी आणि मानसीसाठी पुलाव बनविण्याचा बेत होता कारण तिला नॉनव्हेज आवडत नव्हतं ..तस काम तर करतच होतो पण त्याहीपेक्षा आमच्या गप्पा अधिकच रंगायच्या ..इकडे मानसीने ओढणी बांधली आणि कामाला लागली होती ..मी इकडे सोनालीला मदत करत असलो तरी माझं अर्ध लक्ष तिच्याकडेच होत ..कुठल्यातरी कामाने ती किचनला यायची आणि मी बहाण्याने तीच्याकडे बघायचो आणि नाहीच आली तर मधातच तिला एकदा पाहून यायचो ..सजावट करताना इकडे त्यांची मस्ती सुरू होती तर आम्ही इथे स्वयंपाक बनवताना घामाने भिजत होतो ..ती पुन्हा एकदा आतमध्ये आली आणि तशीच निघून गेली ..मी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहत होतो ..सोनाली बहुदा संधीच्या शोधातच होती आणि लगेच म्हणाली , " इतकंही कुणाला पाहू नये की आपलीच नजर लागून जाईल . "

" माझी नजर नाही लागणार तिला ..कारण आता तर माझं मन देखील तिचच आहे " , नकळत माझ्या तोंडून हे शब्द निघून गेले आणि सोनालीने पुन्हा खिचाई करण्यास सुरुवात केली .. " अभि तुला माहिती आहे तुझी स्थिती एका गीतासारखी झाली आहे ? "

" कोणत्या ? " , मी म्हणालो ..

" हम जबसे मोहब्बत हो गयी है
ये दुनिया खूबसुरत हो गयी है "

अस म्हणून स्वताच हसू लागली ..

नशिबाने मलाही तिची खेचण्याची संधी दिली .. , " बघा बघा कोण म्हणतंय हे मला ..उलटा चोर कोतवाल को डाटे अस झालंय हे तर .."

" म्हणजे ? " , सोनाली विचारू लागली ..

" जी सतत विकासकडे पाहत असते , तिला त्यांच्याविना एक क्षणसुद्धा राहावंत नाही तीच मला म्हणतेय ..मस्त आहे " , मी तिच्याकडे पाहत म्हणालो ..

ती काही वेळ शांत होती आणि मग म्हणाली , " तुला माहिती होत याबद्दल ? "

" मग काय ? ..तुझा बेस्ट फ्रेंड आहे एवढं तर माहिती असणारच ..पण मला कळत नाहीये तू त्याला का सांगत नाही आहेस मनातलं " , मी म्हणालो ..

" अभि प्रेम व्यक्त करायला फक्त काही क्षण लागतील पण हे क्षण जे त्याला लपून पाहण्यात मजा आहे , त्याला ओळखून घेण्यात मजा आहे ..ते पुन्हा मिळणार नाहीत ..आणि तस पण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणण्यापेक्षा मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायच आहे असं म्हणायला आवडेल त्याला तोपर्यंत जगू दे हे क्षण "

तीच उत्तर एकूण काहीतरी स्पेशल फील झालं ..खर तर मी तिला मनातलं सांगण्यासाठी तडफडत होतो पण खरच नात्यात अडकल्यावर हे क्षण पुन्हा जगायला मिळतीलच हे पक्क सांगता येणार नाही ..तेव्हा जे काही आहे ते आजच आहे ..तिला कुठलंच उत्तर न देता आम्ही कामात व्यस्त झालो ..त्यांची सजावट करून झाली होती ..तर आमचही जवळपास आटोपलं होत ..बाबा-ममा थोड्या वेळात येणार म्हणून मी त्यांना फ्रेश व्हायला सांगितलं तर विकास केक घेऊन आला होता ..काहीच वेळात आमचंही काम पूर्ण झालं ..आम्ही थकून बाहेर आलो ..तोपर्यन्त ते सर्व फ्रेश होऊन हॉलला पोहोचले ..आम्हीही फ्रेश होऊन इकडे पोहोचलो ..खर तर सर्वाना चहाची गरज होती त्यामुळे चहा बनवायला किचनला जाणारच तेवढ्यात मानसी स्वतः चहा घेऊन आली ..आणि डोक्यात विचार येऊन गेला " उत्तम सून शोभते हा सरपोतदार साहेब ..खूप मस्त क्षण होता तो ..
जवळपास 3.30 वाजले होते आता फक्त त्यांची येण्याची वाट पाहू लागलो ..अचानक दारावर डोरबेल वाजली आणि मी दार खलोण्यासाठी गेलो ..सर्व आपल्या पोजीशन घेऊन उभे होते ..दरवाजा खोलताच ममा आत आली आणि सर्विकडे

हॅपी बर्थडे टू यु .
हॅपी बर्थडे टू यु

चा आवाज ऐकू येऊ लागला ..अचानक बंद असलेले लाइट्स सुरू झाले आणि समोर सर्वाना पाहून ममा खूप खुश झाली ..त्यातही सजावट पाहून तिला शॉकच बसला ..सकाळी उदास असलेला तिचा चेहरा अचानक खुलला आणि मला आता कुठे समाधान मिळालं ..संपूर्ण हॉल रंगीबेरंगी रिबीनने सजवला होता ..आजूबाजूला वेगवेगळ्या कलरच्या बलूनने रूमची शोभा आणखीनच वाढवली ..ममाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले ..ती स्वताला सावरुन घेत बसली तेवढ्यात सोनाली मानसीला म्हणाली , " मानसी प्लिज काकूंना तयार कर तोपर्यंत आम्ही इथलं काम करून घेतो ."

ती आता ममाला घेऊन रूममध्ये जाणार तेवढ्यात मी मानसीला थांबवत तिच्या हाती एक साडी दिली , " हे माझं गिफ्ट ममाला , छान तयार कर तिला .." तिने फार आनंदाने माझ गिफ्ट स्वीकारलं आणि आतमध्ये गेली ..

मानसी तिकडे तिला तयार करत होती तर इकडे आम्ही केक करण्याची तयारी करू लागलो ..सर्व तयारी झाली होती ..आता वाट होती ममा बाहेर येण्याची ..आणि ती बाहेर आली ..मी दिलेल्या नववारीमध्ये ती फारच खुलून दिसत होती ..लग्नात एखादी मुलगी जितकी सुंदर दिसते अगदी ती तशीच दिसत होती ..त्यामुळे तिला पाहताच सर्वांनी तिची आणि मानसीची प्रशंसा करायला सुरुवात केली..त्यावेळी मानसी माझ्याकडे पाहत होती त्यामुळे तिला हळूच थँक्स म्हणालो आणि तिने ते हसून कबूलदेखील केलं ..

काहीच क्षणात ममाने केक कट केला ..सर्वात आधी बाबांना भरविल्यानंतर तिने हळूहळू सर्वाना भरवला ..अगदी कस मस्त सुरू होत ..प्रत्येक व्यक्ती एकमेकांची मजा घेत होता आणि घर कस उजळून निघालं होत ..ममा आता सोफ्यावर बसणार तेवढ्यात सोनाली म्हणाली , " काकू अस नाही हा काकांसोबत एक डान्स झालाच पाहिजे ."

तेवढयात बाबा म्हणाले , " या वयात कस शक्य आहे बाळा ..मला नाही जमणार ."

संधी शोधून मीच म्हणालो , " ममा तू म्हातारी झाली आहेस का बघ झाली असेल तर मग ठीक आहे नको करू डान्स "

ममाला गोष्ट लागली आणि ती म्हणाली , " या हो हे मुलं आपली मजा घेत आहेत आता करूनच दाखवू याना "

गाणं प्ले झालं आणि त्यांचा डान्स सुरू झाला ..

न कोई है न कोई था
जिंदगी मे तुम्हारे बिना
तुम देना साथ मेरा
ओ हमनवा
तुम देना साथ मेरा हमनवा

दोघांचा डान्स सुरू होता आणि सर्व टाळ्या वाजवत होते आणि ते दोघेही अगदी नवीन जोळप्याप्रमाणे हातात हात घालून डान्स करीत होते ..बाबा थोड्याच वेळात थकले हे बघून मी तिला म्हणालो , " ममा मे आय डान्स विथ यु ? "

तिने होकार कळवला आणि आम्ही डान्स करू लागलो ..प्रेयसीसोबत कितीही डान्स करा पण स्वतःच्या आईसोबत डान्स करण्याची मजाच वेगळी असते ..ममा माझ्या खांद्यावर हात ठेवून कपल डान्स करत होती आणि तो आनंद तिचा चेहरा खुलवू लागला ..डान्स करण्याचा नादात कुठलंच भान नव्हतं ..ती फारच दमली आणि तशीच बसली ..मला त्याच फार वाईट वाटलं ..मी तिला पाणी घेऊन येणारच तेवढयात मानसिच पाणी घेऊन आली ..आता तिच्याबद्दल माझ्याकडे शब्द उरले नव्हते ..पाणी घेतल्यावर ममा शांत झाली पण अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं ..आम्हाला काय झालं काहीच कळेना ..

" काय झालं काकू ? " , सोनालीने काळजीने विचारू लागली ..

" काही नाही ग ..तुम्हाला माहिती आहे ..मी लग्न झाल्यावर फार खुश होते ..आमची मस्त एक स्वप्ननगरी होती ..आम्हाला या स्वप्ननगरीत एक राजकुमार / राजकुमारी हवी होते पण लग्नाचे 5 वर्ष पूर्ण होऊनही आम्हाला बाळ झालं नाही ..घरचे सर्वच सोबत होते पण बाहेरच्या लोकांचं बोलणं मनाला फार टोचायच ..आणि तेव्हा आम्हाला अभि झाला ..अभिने मला मातृत्व दिलं ..तो आल्यानन्तर आमचा संसार बदलला आणि यांनाही नौकरित अपेक्षित यश मिळालं ..त्यामुळे ह्या क्षणी मला अभिचे लहानपणीचे दिवस आठवले ..मी अशीच याला हातात उचलून डान्स करायचे ..मी खुप लकी आहे की मला अभिसारखा मुलगा आहे .फार समजदार आहेत आमचा अभि ." ती एकाच श्वासात सर्व काही बोलून गेली ..

आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ..मी स्वतःचे अश्रू लपवून स्वतःच्या रूममध्ये गेलो ..तिकडून परत येताना माझ्या हातात एक मोठा फोटो होता ..मी तो ममाला देत म्हणालो , " हे तुझं गिफ्ट " ..तिने वर चढवलेला पेपर काढला आणि सर्व पाहून शॉक झाले ..

" किती सुंदर स्केच आहे हे काकूंच..कुणी बनवलं " , नेहा म्हणाली

ममा हसून म्हणाली , "अभिने बनवलं आहे ..त्याला खूप आवड आहे स्केच काढण्याची .."

" ममा हा फोटो आठवतोय लग्नानंतर जेव्हा तू इथे पहिल्यांदा आली होती तेव्हा काढला होता न ..मला आजोबांनी दिला ..आणि मी ते पाहूनच स्केच केलं..आवडलं न तुला " , मी म्हणालो ..

" खूप मोठं गिफ्ट दिल तू मला अगदी तरुणपणी मी अशीच दिसायचे .म्हणजे आता पण तरुणच आहे पण त्या दिवसांची मजाच वेगळी होती ...धन्यवाद अभि ..बर असो जेवण बनवलं की नाही तुम्हाला भूक लागली असेल की बाहेर जायचं जेवायला " , ती म्हणाली ..

ममा किचनला गेली तेव्हा आमची तयारी पाहून खूप खुश झाली ..आता सर्वानाच खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही सरळ जेवायला बसलो ..एकमेकांना भरवण्यात जेवणाचा आनंद आणखीनच वाढत होता आणि आम्ही तो प्रत्येक क्षण हृदयात साठवून घेऊ लागलो ..शेवटी आइस- क्रीम खात आम्ही त्या अविस्मरणीय दिवसाचा शेवट केला ..आता भरपूर वेळ झाला होता शिवाय सर्वाना घरी जायचं असल्याने सर्वांनी जायची तयारी केली ..ममा आणि मी सर्वाना धन्यवाद केलं आणि ते निघून गेले ..आजचा दिवस आमच्या आयुष्यातला फार सुंदर दिवस होता ..ममाने माझ्याबद्दल बोलून माझी इज्जत आणखीच वाढवली होती ..मानसीच्या चेहर्यावर ते कुतूहल जाणवत होत पण ती फार कमी बोलत असल्याने ती त्याबद्दल काहीच बोलली नाही पण मला मात्र समाधान मिळालं ..

जवळपास रात्रीचे 9 वाजले असावेत ...आज खूप थकलो असल्याने मी लवकर झोपायला गेलो ..तेवढ्यात ममा आली , " अभि कामात आहेस का ? "

" नाही ये न ममा " , मी तिला बाजूला बसवत म्हणालो ..

" अभि धन्यवाद ..खूप सुंदर सरप्राइज दिलंस तू मला ..आजचा दिवस खूप सुंदर आहे माझ्यासाठी .."आणि एक गोष्ट सांगू तू रागावणार नसशील तर ?

" हो सांग ग .." , मी म्हणालो

" मला न मानसी खूप आवडली ..तिची काळजी असो की स्वभाव सर्व आवडत मला ..मला अशीच सून हवी आहे ..तुला आवडते का रे ती ? " , ममा म्हणाली ..

मला तिला सांगायचं होत की खूप आवडते पण ते सांगताच आलं नाही ..तिला कसतरी मनवल आणि ती जाऊ लागली ..

" ममा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सॉरी लेट विश करतोय म्हणून " , मी कान पकडत म्हणालो ..आणि ती धन्यवाद म्हणून निघून गेली ..
काही वेळ झाला असेल ..मला पाणी प्यायचं असल्यामुळे किचनला जाऊ लागलो ..तेवढ्यात मला आईच्या रूममधून आवाज आला आणि मी तिथेच थांबलो ..

" अहो एकाना , मला न मानसी फार आवडली ..आपल्या अभिला मस्त शोभेल ती " , ममा बाबांना म्हणाली ..

" अरे वा पण तुला आवडून काय फायदा आपल्या चिरंजीवाना तर आवडायला हवी " , बाबांचा टोला

त्यावर ती म्हणाली , " मी बोलले त्याच्याशी पण त्याने उत्तर नाही दिलं परंतु मला वाटत की त्यालाही ती आवडते फक्त सांगत नाहींये तो ..ती या घरात आली न तर घर फार सुंदर होऊन जाईल " ,

मी एवढंच एकल ..तिच्या शब्दाने मी फारच सुखावलो होतो ..प्रत्येक कथेत आईवडील खलनायक असतात पण हा त्रास मला होणार नव्हता हे पक्क झालं ..मी पाणी पिऊन घेतलं आणि रूममध्ये आलो ..आजचा दिवस फारच मस्त गेला होता ..इकडे आईच्या शब्दांनी मला फार सुखावल होत तर तिकडे सोनालीचे शब्द आठवले ..हेच क्षण आहेत मग पुन्हा केव्हा मिळतील ते माहिती नाही त्यामुळे याच क्षणात जगावं ..आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणण्यापेक्षा मला तुझी साथ साताजन्मासाठी हवी आहे हे म्हणणं जास्त आवडेल ..मलाही तीच बोलत पटलं ..आता फक्त नशीबच तो क्षण घडवून आणणार होता जे नात सात जन्मासाठी बांधल्या जाणार होत ..बघूया काय म्हणत नशीब ??

क्रमशः ...