Sparsh - 10 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 10



राहुल आताही गुडघ्यावर बसून होता ..माझं संपूर्ण लक्ष त्या दोघांकडेच होत ..मानसी आपली साडी सावरत बाजूच्या बेंचवरून उठली ..माझ्या हार्टबिट्स खूपच फास्ट झाल्या ..सर्वात आधी तिने त्याच्या हातातल गुलाब घेतलं आणि दुसऱ्या हाताने त्याचा हात धरून बेंचवर बसविल ..आता राहुलची पाठ माझ्याकडे होती तर मानसीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता ..मी आडोशाला लपून सर्व काही बघत होतो ..मला मानसी दिसत नसली तरी तिचा आवाज मात्र येत होता ..ती पुढे म्हणाली , " अगदी लहानपणीपासून ओळखतो तू मला ..तुझ्याविना कधी कुठे राहिले का ?? ..आणि राहिला प्रश्न उत्तराचा ते तुला आधीच माहिती आहे ..जे उत्तर माहिती आहे ते आणखी सांगून काय फायदा ..आणि साथ म्हणशील तर मी नेहमीच तुझ्यासोबत असेल " अस बोलतच तिने त्याला मिठी मारली ..आणि माझ्या डोळ्यातून अचानक अश्रू आले ..ते काही वेळ तसेच होते ..मला ते दृश्य पाहन असह्य झालं ..तेवढ्यात मोबाइलवर विकासचा कॉल केला , " कुठे आहेस तू मला बोलवून स्वताच गायब झालास , चल ये लवकर निघायचं आहे आपल्याला शिवाय मुलींनाही घरी सोडायच आहे " विकास ओरडत म्हणाला .बोलून झाल्यावर लगेच त्याने फोन ठेवला ..मी झालेलं कुणालाच कळू नये म्हणूज रुमालाने अश्रू पुसले आणि त्याच्याकडे निघालो ..समोरून सोनाली - विकास येत होते ..विकास थोडा गोंधळला होता तर सोनाली मात्र खूपच खुश होती ..मी जसा समोर गेलो तशी तिने घट्ट मिठी मारली ..मी फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्याही डोळ्यातून आनंदाश्रू आले ..काहीच वेळात शाश्वत - नेहा आले ..नेहाने मानसीला शाश्वतसोबत घरी जाणार असल्याच कळविल होत ..त्यामुळे तीही आमच्यासोबतच होती ..आज ते चौघेही खुश होते ..मला प्रत्येकच जण येऊन मिठी मारत होता आणि मी फक्त त्यांच्यासाठी स्वताला आनंदी दाखवू लागलो ..काहीच वेळात आम्ही निघालो ..कॉलेजच्या बाहेर आइस - क्रीम पार्लर होत ..सोनालीने हट्ट केल्यामुळे सर्वांनी आइस- क्रीम घेतली ..शाश्वत नेहाला सोडणार होता तेव्हा प्रश्न होता सोनालीला घरी सोडण्याचा ..तिने मला घरी सोडण्यासाठी विचारलं पण मी विकासला सांगून स्वताची सुटका करून घेतली ..सोनालीलाही शेवटी तेच हवं होतं ..ते दोघेही गाडी घेऊन निघाले आणि मी तिथेच होतो ..काहीच अंतरावरून मानसी राहुलच्या गाडीवरून घरी जाताना दिसली .ती फारच खुश दिसत होती ..एवढंच काय तीच माझ्याकडे लक्षसुद्धा नव्हतं ..माझ संपूर्ण शरीर थरथरायला लागलं होतं ...मी कशीतरी गाडी चालवून घरी गेलो ..
घरी जायला 8 वाजले होते ...घरी जाताच सरळ शॉवर घेतलं आणि थोडी फ्रेशनेस जाणवू लागली ..आईला आधीच जेवण करून आल्याचं सांगितलं असल्याने तिने जेवणासाठी हट्ट केला नाही ..रात्री 9 लाच मी लाईट ऑफ करुन बेडवर पडलो होतो ..आई रूमध्ये येऊन गेली ..तिलाही मी झोपलो असल्याचं वाटल पण प्रत्यक्षात आज मला काही झोप येणारच नव्हती ..माझ्या समोर फक्त मानसी - राहुल होते ..एकमेकांना घट्ट मिठीत घेतलेले ..डोकं बधीर होऊ लागलं ..हा काळोखही मला आता भीतीदायक वाटू लागला ..मी इकडे - तिकडे पाहत होतो ..पण सोबत कुणीच नव्हतं ..होतो तो मी फक्त एकटाच..

बडी खामोश है मोहब्बत तू
जब भी साथ होती हो
अजीब सी मुस्कान लाती हो
बिखेरकर सारी मस्तीया
मुझको हर पल बहलाती हो
बडी खामोश है मोहब्बत तू

बडी खामोश है मोहब्बत तू
चुपकेसे दिलं मे बस कर
दिलं को अपना बनाती हो
सारे शिकवे भुलाकर दुनिया के
मुझसे मिला जाती है
बडी खामोश है मोहब्बत तू ..

खुशीया बाटते - बाटते
कभी कबार थक भी जाती हो
फिर भी तुटे हुये दिलो को
प्यार से सहलाती हो
बडी खामोश है मोहब्बत तू ..

आज डोक्यात सतत मानसीचाच विचार येत होता आणि आता जाणवू लागल की प्रेम फक्त मीच केलं होतं ..तिने तर मला कधी त्या दृष्टीने पाहिलंच नव्हतं ..जुने क्षण आठवु लागलो तेव्हा जाणवलं की तिने मला कधी त्या दृष्टीने पाहिलंच नव्हतं आणि मी वेडा तिच्या होकारासाठी 4 वर्ष वाट पाहत होतो ..आज मी रडण्याऐवजी स्वतःवरच हसत होतो ..कारण प्रेम नावाची सर्वात मोठी चूक मी करून बसलो होतो ..भरपूर वेळ तसाच बसून होतो पन आता स्वताला सावरन गरजेचं होतं ..सोपं नव्हतं तरीही करावं लागणार होतं म्हणून जे झालं ते झालं विचार करून तिला विसरायच ठरवलं शिवाय मला कॅनडाला जॉब मिळविण्यासाठी अधिकच प्रयत्न करावे लागणार होते ..रात्रभर तर झोप लागली नाही पण पहाटे - पहाटे झोप लागली ..दरवाजा आतून लॉक करून झोपी गेलो होतो ..त्यामुळे आई उठवायला सुदधा आली नव्हती ..त्यामुळे बऱ्याच उशिरा जाग आली ..मी उठलो तेव्हा दुपारचे 12 वाजले असतील ..मोबाइलवर सर्वांचे 15 - 20 मिस कॉल येऊन गेले होते आणि समोरही येणार होतेच म्हणून सर्वात आधी मोबाइल स्विच ऑफ केला ..थोड्या वेळात फ्रेश झालो ..आईने तोपर्यंत चहा बनवून ठेवला होता ..हॉलमध्ये पोहोचलो तेव्हा आईने हातात चहा दिला..मला वाटलं की आई काहीतरी विचारेल पण तस काहीच झालं नाही ..पुस्तकात माझं मन लागणार नव्हतं त्यामुळे दिवसभर स्वताला टीव्ही मध्ये व्यस्त करून घेतलं ..जेवायची इच्छा नसल्याने दुपारचं जेवणदेखील केलं नव्हतं ..आज खर तर काहीच करण्याची इच्छा नव्हती पण काहीच केलं नसत तर मग मात्र तिचाच विचार आला असता त्यामुळे स्वताला टीव्ही पाहण्यात व्यस्त करून घेतल...दोन दिवस झाले तरी माझा सेल स्विच ऑफ होता ..आईला तब्येत बरी नसल्याचं कारण सांगून घरीच थांबलो होतो .दुसऱ्याची दिवशी काहीच केलं नव्हतं..तासंतास फक्त खिडकीकडे पाहत होतो तर रात्री टेरिसवर बसून आकाशात बघत असायचो ..
माझा सेल बंद असल्याने कुणाशीच बोलणं झालं नव्हत स्वाभाविकच सर्व जण कॉल करून थकले होते ..असाच विचारात बसलो असताना दारावर बेल वाजली तेव्हा मी बेडरूममध्ये होतो .." काकू अभि आहे का ? " , विकास विचारू लागला ..आईने त्याला बेडरूमकडे बोट दाखवलं आणि तो सरळ आत आला .." हे अभि फोन का बंद ठेवला आहेस " , तो मला मिठी मारत म्हणाला ..मी खर सांगण्याचा स्थितीत नसल्याने तब्येत बरी नसल्याचा बहाणा केला आणि त्याला तो पटलाही ..इकडच्या - तिकडच्या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि विकास म्हणाला , " अभि तुला काहीतरी सांगायचं होत ..त्यादिवशी सोनालीने मला प्रपोज केला ..दोन दिवस झाले विचार करतोय पण उत्तर काय देऊ काहीच कळत नाहीये ", ..मला त्याची स्थिती समजत होती ..मुळात मीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हतो पण पुन्हा एक नात तुटन मला मंजूर नव्हतं म्हणून म्हणालो , " हे बघ विकास ..सोनाली उत्तम मुलगी आहे तुझ्यासाठी शिवाय खूप प्रेम करते तुझ्यावर हे मी स्वतः पाहिलं आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे तिला आताच जॉब लागली आहे सो लग्न करण्याची गरज पडली तर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही ..माझं ऐकशील तर हो म्हण ..प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम करणार येतच अस नाही सो स्वीकार तिला "..मी बोलून तर गेलो होतो पण निर्णय त्यालाच घ्यायचा होता ..तो मला भेटून निघून गेला ..
तिसऱ्या दिवशी मला मात्र कॉलेजला जाण भाग होत ..पेपरला काहीच दिवस बाकी होते ..आणि अभ्यास करण देखील गरजेचं होतं ..त्यामुळे पुन्हा एकदा कॉलेज जॉइन केलं..फक्त फरक एवढाच की आता प्रायोरिटी बदलल्या..या काळात मी जवळपास सर्वच सोडलं होत ..फक्त क्लास , लायब्ररी , आणि घर या तीनच गोष्टी सुरू होत्या ..मानसी आणि राहुल कधीतरी दिसायचे पण मी त्यांना पाहून आपली वाट बदलून घेऊ लागलो ..गेले 3 वर्ष मानसी आणि मी डान्स स्पर्धेत जिंकत आलो होतो पन यावेळी मात्र तिने विचारूनसुद्धा मी नकार दिला होता ..आणि तिनेसुद्धा सहभाग घेतला नाही..या काळात मानसिसोबत बोलणं जवळपास नव्हतंच ..मित्रांशी कसतरी बोलायचो आणि एक तर्फी प्रेमाची कहाणी इथेच संपली..
आज डोकं खूप जड झालं असल्याने चहा घ्यायला कॅन्टीनला गेलो ..पाहतो तर नेहा एकटीच बसून होती ..तिच्या डोक्यावर हात ठेवत मी बाजूला जाऊन बसलो .." काय मॅडम काय झालं " ..मी अस विचारताच तिने सरळ मिठी मारली ..ती सर्वांसमोर रडत होती ..मी तिला आधी शांत केलं ..शांत झाल्यावर ती बोलू लागली , " अभि घरच्यांनी माझं लग्न जोडलं ..माझ्या मामाचा मुलगा आहे तो शिवाय सेटल आहे ..मला नाही करायचं लग्न त्याच्याशी ..पण घरचे ऐकणार नाहीत ..मला काय करू काहीच कळत नाही आहे " ..मलाही शॉक बसला होता आणि मी म्हणालो " तू शाश्वतसोबत बोलली आहेस का या विषयावर ? " .. ती त्याच्याशी बोलली नव्हती त्यामुळे आधी त्याच्याशी बोलायला सांगितलं .एक बॅड न्यूज होती तर तिकडे गुड न्यूज ..विकासने सोनालीला होकार कळविला होता ..त्यामुळे ते फार खुश होते ..त्यांच्या आनंदात आणखी विघ्न येऊ नये म्हणून मी त्यांना सांगायचं टाळल होत ..दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहा आणि मी एकत्र बसून होतो पण यावेळी मी शाश्वतला फोन करून बोलावून घेतलं ..तो आला आणि मी नेहाला सर्व काही सांगायला लावलं ..त्याचे हावभाव बदलू लागले होते ..तो काही बोलणार त्याआधीच म्हणालो , " हे बघा तुम्ही खूप खास आहात माझ्यासाठी तेव्हा काहीही निर्णय घ्या मी नेहमीच तुमच्यासोबत असेल ..मग पैशाच्या बाबतीत असो की कुठल्याही ..नेहाला शाश्वतविना राहणं अशक्य होतं त्यामुळे तिने पळून जाण्याचा विचार आमच्यासमोर मांडला ..मला आता फक्त शाश्वतच्या उत्तराची वाट होती ..शाश्वत इकडे - तिकडे चकरा मारत होता ..आणि काही वेळात आमच्यासंमोर येऊन थांबला ..तिचा हात हातात घेऊन म्हणाला , " मान्य आहे यार की आपण नाही राहू शकत एकमेकांविना ..पण आपल्या स्वार्थासाठी घरच्यांना दुखावण योग्य आहे का ? आणि समजा पळून लग्न केलंच तरी घरच्यांविना सुखी राहू शकणार नाही ..आज मला स्वतःवरच खूप राग येत आहे जॉब असती तर तुझा हात मागितला असता पण आता तेही शक्य नाही " ..त्याला थांबवतच नेहा रागात म्हणाली , " मुद्द्याच बोल ? ..तुझं काय ठरलं आहे ? "

आणि तो म्हणाला , " जा लग्न कर त्याच्याशी ..तो तुला खूप खुश ठेवेल .."

मी सिरीयस आहे शाश्वत , " पुन्हा एकदा विचार कर ..मी परत येणार नाही तुझ्याकडे "

तो अडखळत बोलून गेला , " हो जा ..तुला मुक्त केलं माझ्या बंधनातून .."

तिला शाश्वतचा फारच राग आला होता ..त्यामुळे ती त्याच्याशी न बोलताच निघून गेली ..आतापर्यंत त्याने थांबविलेले अश्रू अचानक समोर आले आणि त्याने मला सरळ येऊन मिठी मारली ..तो खूप वेळ रडत होता आणि यावेळी माझ्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागले ..आम्ही दोघाणीही या प्रकरणाबद्दल विकास - सोनालीला काहीच न सांगण्याच ठरवलं होतं ..आमच्या परीने आम्ही सर्व हाताळत होतो ..पण तिकडे नेहाने लग्नाला होकार कळविला आणि नेमकी हीच गोष्ट मानसीने त्यांना सांगितली ..ते आमच्यावर फारच रागावले होते ..जस त्यांना माहीत झालं तसेच ते आमच्याकडे धावत आले ..मी आणि शाश्वत तेव्हा सोबतच होतो ..विकास रागातच आला आणि त्याने मला सरळ कानाखाली मारली .." साल्या वा हीच का तुमची मैत्री यावेळी नाही तर केव्हा आठवण करणार आम्हाला ..मित्र अशा वेळी नाही तर केव्हा कामी येतात ..शाश्वतने सरळ जाऊन विकासला मिठी मारली आणि आम्ही सर्वच रडू लागलो ..सोनालीने त्याला कसतरी सांभाळून घेतलं होतं ...आज खूप दिवसांनी आम्ही सर्वच एकत्र होतो आणि सर्वांची खिचाई करणारे मित्र कधी एकत्र बसून रडतील अस वाटलं नव्हतं ..त्याक्षणी जाणवलं की मैत्री किती खास असते ..

ए खुदा वैसे तो मानता नही मै तुझे
पर दोस्तो को भेजकर तुने जिंदगी मे
तेरे होणे का एहसास दिला दिया

तो क्षण गेला आणि सर्व काही बदललं ..नेहा शाश्वतच म्हणणं समजूच शकली नव्हती ..मुळात त्रास तिलाच झाला अस तिला वाटत होतं पण एका मुलाची व्यथा समजायला तिने हरकत घेतली ..रडून - रडून त्याचे अश्रू देखील नाहीसे झाले ..मी नेहमीच ऐकत आलो होतो की प्रेम फक्त यातना देत पण याच प्रेमाने शाश्वत आणि विकासला पूर्णतः बद्दलविल ..शाश्वत नेहाला विसरता यावं म्हणून अभ्यास करू लागला होता ..नौकरी नसल्याने त्याला नेहाला गमवाव लागलं होत म्हणून 15 - 15 तास अभ्यास करत होता तर विकास आपल्या भविष्यासाठी मेहनत घेत होता ..एकीकडे विकासला पाहून आनंद होत होता तर दुसरीकडे शाश्वतला पाहून फार त्रास होत होता ..नेहाने कॉलेजला येन सोडलंच होत शिवाय लग्नाची पत्रिका द्यायला विसरली नव्हती ..नेहा गेल्याने मानसिदेखील आमच्यापासून तुटली होती ..मीही स्वताला आनंदी करून घेतलं होतं ..ही अशी वेळ होती जेव्हा आम्ही चौघेही आपल्या स्वप्नासाठी झटत होतो ..कॉलेजच्या सुरुवातीला सदैव फिरत असणारे लोफर असे सिरीयस होतील अस कधीच वाटलं नव्हतं ..जसेजसे दिवस जाऊ लागले हळूहळू सर्व काही ठीक होऊ लागलं ..शेवटच्या सत्राच्या पेपरला काहीच दिवस असल्याने आम्ही जोमाने अभ्यासाला लागलो होतो ..आता सर्व काही ठीक होताना दिसत होतं आणि शाश्वतची सुधारलेली स्थिती पाहून आम्हालाही आनंद झाला होता ..

आज नेहाचा विवाह समारंभ होता ..तिने मला खास निमंत्रन दिलं होतं .मी सोनाली आणि विकासला येण्यासाठी विचारलं पण ते दोघेही यायला तयार नव्हते ..शेवटी मी एकटाच गेलो ..तिची आताही नजर त्यालाच शोधत होती पण शाश्वत मुळात आलाच नव्हता ..मी तिला शुभेच्छा द्यायला गेलो तेव्हा तिने सर्वांची विचारपूस करायला सुरुवात केली ..मी कसतरी सर्व सांभाळून घेतलं ..सर्व नातेवाईक , मित्रमंडळी यांच्या सानिध्यात तो विवाह सोहळा रचला गेला ..नेहाचा नवरा श्रीमंत असल्याने लग्नाची तयारी फारच मस्त केली होती .. त्याने नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सात फेर्यासोबतच ते सात जन्मासाठी एका अनोख्या बंधनात बांधले गेले आणि ती नेहमीसाठी शाश्वतला सोडून गेली ..मला आता तिथे राहवत नव्हतं त्यामुळे जेवण न करताच मी तसाच निघून आलो ..आज सकाळपासून खूप थकलो होतो त्यामुळे झोपण्याची तयारी करू लागलो ..साधारणतः 9 .30 वाजले होते आणि शाश्वतचा कॉल आला , " अभि कामात आहेस का प्लिज आपल्या कट्ट्यावर ये ना लगेच "

त्याचा आवाज रडल्यासारखा येत होता त्यामुळे इच्छा नसतानाही जायचं ठरवलं ..बाबा झोपायला निघाले होते तर आईला सांगून मी निघालो ..कट्ट्यावर पोहोचलो तर तिथे शाश्वत एकटाच बसून होता ..त्याच्या हातात दारूची बाटली होती आणि त्याला चालण्याचा देखील होश नव्हता ..तो खाली पडणारच तेव्हा त्याला सावरत म्हणालो , " हे काय करतोय तू ..सर्व काही ठीक होत ना मग अस का करतोय तू ?" ..त्याने आपली मान वर केली आणि म्हणाला , " साल अभि विकास म्हणतो तेच खर आहे , आपल्या नशिबात न काहीच नाही ..किती प्रयत्नानंतर एक प्रेयसी मिळाली होती आणि आज तीही गेली कायमची सोडून..गेली तर गेली एक मॅसेज पण नाही केला ना राव तिने ..जिच्यावर एवढा जीव लावला तीदेखील रागावून निघून गेली .." तो बोलतच होता आणि मी विकासला कॉल लावू लागलो ..तेव्हाच त्याच माझ्याकडे लक्ष गेलं आणि म्हणाला , " भावा मान्य आहे त्याला आपली काळजी आहे पण आपण प्रत्येक वेळी त्याला त्रास देणं गरजेचं आहे का ..नको करू फोन त्याला ..बोलत असेल सोनालीसोबत त्याला जगू दे हे क्षण..नाही तर मित्राच्या चक्करमध्ये हे क्षण हरवून बसायचा .. " त्याच बोलणं ऐकून स्वतःचाच अभिमान वाटू लागला ..काय मित्र होते साले ..तसे तर लोफर पण साले मैत्री करण्यात माझ्याही समोर होते ..दारूच्या नशेत तो बरंच काही बोलत होता .नशा एवढी झाली होती की त्याला उभं राहणं देखील शक्य नव्हतं आणि अशा स्थितीत त्याला घरी पाठवण योग्य नव्हतं म्हणून काकुला कॉल करून शाश्वत आमच्याच घरी असल्याचं सांगितलं ..पण त्याला अशा स्थितीत घरी घेऊन जायचं तर बाबांना आवडलं नसत त्यामुळे विचारात पडलो ..काहीच वेळात आईला कॉल केला आणि तिला बाबांना न उठवता दार खोलायला सांगितलं ..त्याला गाडीवर बसवून घरी घेऊन गेलो एव्हना आई आमची वाट पाहत होती पण ती काहीच बोलली नाही ..मी त्याला नेऊन सरळ माझ्या बेडवर झोपवलं ..आताही झोपेत तो नेहाच नाव घेत होता ..त्याच्या अंगावर चादर ओढून मी बाहेर आईकडे आलो ..आईने मला हॉलमध्ये बोलवून घेतलं , " काय रे अभि शाश्वतला काय झालं ?? ..तो तर ड्रिंक करत नाही ना मग आज कशी काय घेतली ? " ..आईचे शब्द एकूण मला राहवलं नाही आणि मी सरळ तिच्या कुशीत शिरलो ..काही वेळात नेहाबद्दल तिला सर्व सांगितलं ..आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती ..माझं मन मोकळं झालं आणि आईने मला झोपायला जायला सांगितलं ..
दुसऱ्या दिवशी शाश्वत सकाळी उठला ...ड्रिंक जास्त केल्याने त्याच डोकं दुखत होत आणि आई तेव्हाच चहा घेऊन आली ..ती त्याला आधी काहीच बोलली नाही ..त्याचा चहा घेऊन झाला तेव्हाच ती त्याला म्हणाली .." बाळा मान्य आहे की तुझ्यासोबत छान नाही झालं पण स्वताला त्रास करून काय मिळणार आहे ..काही दुःख असेल तर मला सांग ..मी आहे न तुझी आई .." ..त्याच्या भावना त्याला सांभाळता आल्या नाही आणि तो आईला घट्ट चिपकला .मी बाजूला बसून सर्व पाहत होतो ..अशा क्षणीच आपल्या लोकांची किंमत आपल्याला पटते ..आईने त्याची समजूत काढल्यामुळे तो ठीक झाला होता आणि माझं टेंशन कमी झालं अस वाटलं ..

काही दिवसातच सर्वांचे पेपर संपले ..यावेळी आम्ही चौघेही डीस्टीनक्षणने पास झालो होतो त्यामुळे सर्वच खुश होते ..त्यादिवशी शाश्वतदेखील फार खुश होता पण अलीकडे त्याला ड्रिंकची सवय झाली होती ..मी भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला तरीही तिला विसरण्यासाठी तो ड्रिंकचा आसरा घेत होता ..माझे सर्व प्रयत्न असफल झाले होते ..आज सोनालीने मला बाहेर भेटायला बोलावलं होतं ..मी गेलो आणि ती माझ्यावर भडकली , " अभि तुला कॅनडाला जॉब लागली आणि तुला सांगणं पण गरजेचं नाही वाटलं " ...माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं म्हणून शांत होतो ..तिला माझा राग येत होता आणि म्हणाली , " मी काही विचारते आहे अभि , बोलणार आहेस का आता ? "

" काय बोलू , शाश्वतची स्थिती बघ त्याला सांगू हे सर्व ..आणि राहिला तुझा प्रश्न तर 5 वर्षानंतर तुझ्या आयुष्यात आनंद आला आहे तर मी जाण्याची बातमी देऊन संपवून टाकू का तो आनंद म्हणजे काय तर मैत्री तुम्हीच निभावायची ..माझा काहीच अधिकार नाही का तुमच्यावर " मी रागात म्हणालो ..

" हो रे अभि पण तू एवढ्या दूर जात आहेस हे सहन होत नाहीये त्याच काय ? " , ती नाराज होत म्हणाली ..

" मी खूप दिवसापासून या क्षणाची वाट पहात होतो ग त्यामुळे मला ही संधी सोडायची नाही ..मी येईल न भेटायला तुम्हाला .." मी म्हणालो ..

बऱ्याच प्रयत्नानंतर तिला समजाविण्यात यशस्वी झालो होतो पण सर्वात मोठा प्रश्न होता तो शाश्वतचा कारण तो विकासशी याबद्दल काहीच बोलणार नव्हता आणि मी गेल्यावर तो एकटाच पडला असता त्यामुळे फार वाईट वाटलं ..मला कॅनडाला जायला आणखी एक महिना बाकी होता त्याआधी मला सर्व काही छान करायचं होतं पण त्याला कस समजावू हाच सर्वात मोठा प्रश्न होता ..
मला काहीच सुचत नव्हतं आणि संधी स्वताच चालत माझ्याकडे आली ..अभ्यास करत असताना मोबाइल वर रिंग आली ..मोबाइल बघितला तर त्यावर नेहाचा कॉल होता , " हाय कशी आहेस नेहा ..खूप दिवसाने आठवण काढलीस ..लग्नानंतर विसरली सर्व .." , मी तिला म्हणालो .." नाही रे अस काही नाही फक्त सेटल व्हायला वेळ लागतो ना म्हणून ..मी मस्त आहे ..खूप आठवण येते यार तुमची ..आज राहवलं नाही म्हणून कॉल केला ..तू कसा आहेस ? ",

" मी ठीक आहे तूच सांग विशेष ? " , मी तिला विचारू लागलो आणि ती म्हणाली , " काही खास नाही ..थोड्या वेळ शांत राहत तिने नंतर विचारलं , कुठे गेला तो तुझा मित्र .बसला असेल न पुन्हा एखादीच्या शोधात त्याला कामच कोणते आहे ? "

" हे बघ नेहा तुझं हे बोलणं मला अजिबात आवडल नाही " , मी चिडूनच तिला म्हणालो ..

" मग त्याने काय केलं माझ्यासोबत तुलाही माहिती आहे ..तरीही तू अस बोलतो आहेस " , ती उलट मला उत्तर देत होती ..आता माझं डोकं अगदीच कामातून गेलं आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता तिला म्हणालो , " तुला काय वाटत तूच केलंस प्रेम तो फक्त तुझ्याशी गंमत करत होता का ?? ..तुझ्यापेक्षाही जास्त प्रेम केलं त्याने पण तू घरच्यांपासून दुखावू नये म्हणून त्याने तुला लग्न करण्यासाठी सांगितलं .त्याला माहित होतं तुला तो काहीच देऊ शकत नाही म्हणून तो अस वागला तुझ्याशी ..पण तू तर प्रेम करायची ना त्याच्यावर तरीही समजू शकली नाही ..तू गेलीस तेव्हापासून असा एक पण दिवस गेला नाही की तो रडला नाही ..तुला विसरता यावं म्हणून रोज ड्रिंक करतो आणि तुला वाटत तूच केलं प्रेम ..हो बरोबर आहे तूच केलं प्रेम " ..मी माझी संपूर्ण भडास तिच्यावर काढली आणि ती हे सर्व एकूण रडू लागली ..मी स्वतःला आवर घातला .." सॉरी मला तुला रडवायच नव्हतं पण खरंच खूप प्रेम करतो ग तो तुझ्यावर आणि ऐक ना एक मदत मागितली तर करशील का " , मी म्हणालो ..

" हमम बोल !! " , ती म्हणाली ..

" मी खूप समजावलं ग त्याला पण तो ड्रिंक करणं सोडत नाही आहे फक्त तू एकमेव आहेस जी समजावू शकते त्याला ..प्लिज माझ्यासाठी एकदा भेट न त्याला " , मी म्हणालो ..

आता मी तिच्या उत्तराची वाट पाहू लागलो आणि ती म्हणाली , " ठीक आहे उद्या येते तुझ्या घरी त्यालाही बोलावं तिथेच ." शेवटी बाय म्हणून फोन कट केला ..

आज 12 वाजता ती येणार होती त्यामुळे मी शाश्वतला फोन करून सांगितलं होतं फक्त नेहा येणार असल्याची कल्पना त्याला दिली नव्हती ...तो 11 लाच घरी आला होता ..मी आईला बाहेर पाठवलं होत त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काहीच अडथळा येणार नव्हता ..आम्ही बराच वेळ बोलत होतो आता फक्त वाट होती ती नेहाची ..जवळपास 12 वाजता दाराची बेल वाजली आणि मी आनंदाने दार खोलायला गेलो ...ती आता टिपिकल हाऊस वाईफसारखी दिसत होती आणि तिचा चष्मा आताही तिला खास बनवत होता .तिची प्रशंसा केल्याने तीही फार खुश झाली ...मी तिला आतमध्ये जाण्यास सांगितले आणि दारात उभं राहून पाहू लागलो ..ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि तो तिला पाहून जाऊ लागला ..तो जाणार तेवढयात तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली , " सॉरी जान ..एकदा बोल तरी मग कायमची निघून जाईल तुझ्या आयुष्यातून.." ..त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं आणि मी त्याला थाम्ब म्हटल्यावर तो तिथेच उभा राहिला ..आणि मी चहा बनविण्यासाठी आत गेलो ..

" सॉरी शाश्वत .मी नेहमी याच भ्रमात होते की फक्त मीच प्रेम केलं पण तुलाही माझ्याविना राहणं कठीण जाईल हा विचारच केला नाही ..खूप सेल्फीश आहे न मी " तीच वाक्य अर्धवट राहील आणि शाश्वतने तीच्या तोंडावर हात ठेवला ...तिने त्याचा हात काढून घेतला आणि पुढे बोलू लागली , " धन्यवाद एवढं प्रेम करण्यासाठी ...मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यावर देखील कुणी एवढं प्रेम करेल पण तू आला आणि ते शक्य झालं ..फक्त स्वतःवरच राग येतोय की तुला न भेटताच सोडून गेले ..सॉरी ..खूप खूप सॉरी ..प्लिज मला एकदा मिठीत घेशील .." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याला पाहवल नाही ..त्याने लगेच तिला मिठीत घेतले आणि दोघेही काही क्षणांसाठी हरवल्या गेले ..कितीतरी दिवसांनी प्रेम करणारे एकजीव झाले होते ..आणि मी हे सर्व दारात उभा राहून पाहत होतो ..काही वेळ मी त्यांना त्रास दिला नाही पण थोड्या वेळाने आता जात म्हणालो , " मी येऊ का आत की नको .." ..आणि दोघेही बाजूला झाले ..आता सर्व काही ठीक वाटत होत..मी नेहाला इशारा करून ड्रिंक बद्दल बोल म्हटलं आणि ती तयार झाली , " शाश्वत हे बर नाही केलं तू , तू नेहमी ड्रिंक करतो म्हणे ..किती त्रास देशील स्वताला ..मला आज प्रॉमिस हवं आहे की तू कधीच पिणार नाहीस ..देशील का मला एवढं छोट गिफ्ट ? " ,

त्याच उत्तर काय असेल आता यावर आमचं लक्ष होत आणि तो म्हणाला , " अभिच्या लग्नाला थोडी घेतली तरी चालणार नाही का ? " त्याच अस विनोदी बोलणं ऐकून आम्ही हसू लागलो ..आज पुन्हा एकदा तो मूळ स्वभावाचे आला होता..
" ठीक आहे दिलं प्रॉमिस पण अभिच्या लग्नाला नक्की पिणार आहे मी मग काही पण म्हण ? " ..तिने त्याची परवानगी दिली आणि माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम काही क्षणात तिने संपवला ..ते दोघेही मस्त बोलत होते आणि मी संधी शोधून त्यांना कॅनडाला जाण्याबद्दल सांगितलं ..ते दोघेही नाराज झाले होते पण माझ स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला अखेर परवानगी दिलीच आणि आमची एक अविस्मरणीय भेट तिथेच संपली ..
आज मी कॅनडाला जाणार होतो ..विकासला मी कॅनडाबद्दल सांगितलं नव्हतं त्यामुळे त्याला राग आला होता ..त्याला सोडून बाकी सर्वच मला ड्रॉप करायला एअरपोर्टवर आले होते ..आईबाबा , सोनाली , शाश्वत सर्वच खुशही होते आणि दुःखीही ..खुश यासाठी की मी माझं स्वप्न पूर्ण करायला निघालो होतो आणि दुःखी यासाठी की आता रोज भेटणं शक्य होणार नव्हतं ...मलाही फारच भरून आलं होतं ..तिकीट काढण्यापासून तर सर्व काम शाश्वतनेच केली होती आणि मला जेवढाही वेळ भेटला तो सर्वांशी बोलण्यात घालवू लागलो ..शेवटी फ्लाइट निघण्याची अनाउन्समेंट झाली आणि मी सर्वाना हग करून निघालो . ..काही वेळात मी फ्लाइटमध्ये बसलो आणि खालून सर्व मला बाय करत होते ..कितीतरी वेळा मी त्यांना पाहत होतो ..


3 वर्षानंतर ..


फ्लाइट लँड होण्याचा पुकारा झाला आणि माझे डोळे उघडले ..3 वर्षाचा संपूर्ण भूतकाळ माझ्यासमोर जसाच्या तसा उभा झाला होता ..आता काहीच वेळात मुंबई येणार होती ..आणि मला माझ्या जिवलग लोकांचं दर्शन जाणार होत ..
क्रमशः ..

इतर रसदार पर्याय