दोन टोकं. भाग १५ Kanchan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

दोन टोकं. भाग १५

भाग १५

विशाखा गाडी घेऊन सायली कडे लगेच निघाली. गाडीवर जाताना पण एकटीच बडबडत होती ती.
" आता जाते आणि चांगलीच झापते. मला ignore करते काय. हलवा आहे का ?? मी काय गुत्त घेतलंय तिला समजून घ्यायचं. हा काका काहिही बडबडेल पण म्हणून काय त्याच ऐकत बसु काय मी. हम हम है. आता जाते आणि डायरेक्ट कॉलर पकडते आणि सांगते. अरे पण ती तर कॉलर वाले ड्रेस नाही घालत. हां, कानाखालीच मारते तीच्या आणि मग सांगते तीला. की एएए हे बघ. जे कोणी नवीन येईल त्यांना आपल्यापासून दूर ठेवायचं. आणि दुस-यांमुळे मला दुर्लक्ष करायचं नाही. "

विशाखा स्वत:शीच बडबडत सायलीच्या घरी पोहोचली पण. तेवढ्या वेळात काकांचे तीला दोन फोन आणि चार मेसेज येऊन गेले. तीने मेसेज बघितले तर सगळे हेच होते,
कशाला गेलीस ?? परत ये. बावळट एवढ्या रात्री कोण जातं ?? तीचे वडिल आहेत ना घरी. तु आधी घरी ये मग उद्या बोलु तीला आपण. पण तु आधी पटकन घरी ये.

काकाचा मेसेज बघुन तसाच सोडुन दिला तीने. ह्याला बडबडायला काय जातंय 😏. ज्याच जळत त्यालाच कळत कसं होतं मनात धुकधुक. फोन खिशात ठेवत विशाखा बडबडत होती. केसांवरून हात फिरवुन एकदा ड्रेस ठीकठाक करून बेल वाजवली. पण दार उघडलं नाही. झोपले असतील म्हणून अजुन एकदा वाजवली तरीही दार उघडलं गेलं नाही. आता मात्र ती वैतागली, एवढ कोण झोपत राव 🤨. थोडसं मागे सरकली आणि दारावर थाड थाड थाड थाड हात आपटायला लागली. थांबतच नव्हती, कंटिन्यु थाड थाड चालुच होत तीच.

आतुन दार उघडलं गेलं तरी हिच लक्षच नव्हतं. दार वाजवण्याच्याच नादात हिने दार उघडणा-याच्या तोंडावर मारल. आणि मग हिच्या लक्षात आलं की आपला हात दाराला नाही तर कुणाच्या तरी नाकाला लागलाय. पटकन वर बघितलं तर ते सायलीचे पप्पा होते.

" ओह सॉरी सॉरी सॉरी काका. मला कळलंच नाही तुम्ही कधी दार उघडलं ते. सॉरी सॉरी "

" एवढ्या रात्री काय काम आहे ?? 😡 " आधीच झोपेचं खोबरं झालेलं त्यात विशाखाचा फटका त्यामुळे त्यांनी एकदम तुसड्या आवाजात विचारलं.

" अं.... सायली आहे का ?? जरा बोलायचं होतं तीच्याशी " त्यांचा चढलेला आवाज ऐकुन हिची बोबडीच वळाली. तरी कसंबसं अडखळत हीने सांगुन टाकलं.

" ही वेळ आहे का भेटायची ?? 😡 रात्रीचे १२ वाजायला आलेत. काही अक्कल नावाचा प्रकार असतो की नाही. लोकांच्या घरी कधी झालं कळत की नाही. "

ह्या सगळ्याच्या गोंधळात सायलीला जाग आली आणि पप्पांचा ओरडायचा आवाज येतोय पण आता बाहेर गेलं तर एवढ्या रात्री बाहेर का आली अस ओरडतील म्हणून तशीच पडुन राहिली.

" लोकांच्या कुठं ?? माझ्याच मैत्रीणीच्या घरी आलीये. " सायलीच्या पप्पांचा चढलेला आवाज आणि त्यांचा रागीट अवतार बघुन विशाखा आता चांगलीच घाबरली होती तरी शांतपणे उत्तर देत होती. कारण आजपर्यंत तीच्यावर काकाने कधी आवाजच चढवला नव्हता. ना तीने काकाला कधी रागाला आलेलं बघितलं होतं.

" विशाखा 😲😲. विशाखा इकडे आलीये. नाही नाही ती कशाला येईल. मी पण ना बावळट 🤦. झोपेत पण तीचाच विचार करतीये " विशाखाचा आवाज ऐकुन सायली घाबरलीच. पण परत स्वत:च स्वत:च्या मनाची समजुत घालुन गप्प बसली.

" लाजच वाटत नाही वरुन तोंड वर करून बोलायला. आपली मैत्रीण म्हणे. लाज कशी वाटली नाही एवढ्या रात्री एखाद्याच्या घरी जायला. 😡😡 "

" काका सॉरी. पण मी खरंच तीला भेटायला आले. " सायली चे पप्पा कडक होते पण ते इतकं जास्ती रिअॅक्ट करतील असं वाटलच नव्हतं.

आता मात्र सायली ची झोपच उडाली 🙄😲. आता खात्रीच पटली की बाहेर विशाखा आहे. पटकन उठून पळतच बाहेर आली.

" तेच तर म्हणतोय मी. एवढ्या रात्री भेटायला यायची काय गरज होती ??? काही संस्कार नावाचे पण प्रकार असतात. "

आता मात्र विशाखा चिडली. आपण ऐकुन घेतोय म्हणून समोरच्याने येऊन काहिही बोलावं हे बरोबर नाहीये. आधीच विशाखाला तिथं बघुन सायलीच्या फ्युज उडाला होता त्यात तीला चिडलेली बघुन सायलीला पुढच्या वादळाची चिन्ह चांगलीच दिसायला लागली. पटकन आतमध्ये गेली आणि मोबाईल घेऊन काकाला मेसेज केला की काहीही कर पण विशाखाला ईथुन हलव. नाहीतर तिसरं महायुद्ध छेडलच म्हणून समज.

" हे बघा काका. माझ्या मैत्रीणीला मला भेटावसं वाटलं तर मी आले त्यात संस्कार कशाला लागतात ??? काका नेहमी म्हणतो संस्कार फक्त सासरीच लागतात. "

सायलीला तर विशाखाच्या ह्या वाक्यावर हसावं की रडाव तेच कळत नव्हतं. इतकी कशी बालिश आहे ही.

" हा काका कोण ?? आणि आईने शिकवलं नाही का कसं बोलायचं मोठ्यांशी. वर तोंड करून बोलतीये निर्लज्ज 😡😡😡 "

" पप्पा, जाउद्या ना. घरात येऊन बोलताय का ?? सगळे बघतायत " सायली ने निष्फळ मध्येच बोलायचा प्रयत्न केला पण काका तीच्यावरच डाफरले.

विशाखाला आईबद्दल बोलल्यामुळे तीचा राग अजुनच वाढला पण तरी सायलीने तीच्यासाठी शिव्या खाल्लेलं बघुन तीने शांततेत आणि हळु आवाजात उत्तर दिलं,
" आई नाहीये मला 😞 . "

" तरीच अक्कल नाहीये की कधी जायचं असतं घरी लोकांच्या आणि मोठ्यांनी कसं बोलतात त्याची पण. देव जाणे. बरं आहे ना तुला आई नाहीये तर कसं पण वागायला मोकळीक असेल. "

" काका तुम्ही काही पण बोलताय. 😤 "

" विशाखा तु जा. पटकन घरी जा. बारा वाजलेत. " सायली पप्पा काही म्हणायच्या आत जोरात ओरडली. चमकुन विशाखा ने वर बघितलं तर मागुन सायली इशा-याने खरंच जायला सांगत होती. ते बघुन विशाखा लगेच निघाली.

गाडी काढली आणि सरळ निघाली. रडत रडत कुठे निघाली होती तीच तिलाच माहिती.
काका सायलीच्या मेसेज वाचुन विशाखाला किती फोन लावत होता पण विशाखाला कुणालाच बोलायचा मुड नव्हता. सायली पण मेसेज वर मेसेज करत होती पण विशाखा बघेल तर शप्पथ. मेसेज बघत नाहीये म्हणून सायलीने फोन करून बघितलं पण ती फोनही उचलत नव्हती.

रस्ता पुर्ण मोकळा होता. डोळो पाण्याने भरले होते. तशीच कडेला गाडी लावली आणि एका ठिकाणी जाऊन बसली. आजपर्यंत कुणीच आवाज चढवला नव्हता त्यात परत आईबद्दल तसं बोलल्यामुळे जास्तच दु:ख झालं. रडत होतीच की तेवढ्यात मागुन आवाज आला,

" अरे अकडु तु इथे काय करतीयेस ?? ते पण १२ वाजता . "

मागे वळून बघितलं तर तोच तो मुलगा. हा काय सतत माझ्या मागावर असतो का मुर्ख 😡. परत पुढे बघायला लागली. पण जसं तीने मागे बघितलं होतं तसं आकाशला कळालं की ती रडतीये. आकाश गुपचुप तीच्या शेजारी येऊन बसला. ती रडतच होती आणि हा मध्येच तीला बघायचा, मध्येच पूढे बघायचा.
त्याला कळत नव्हतं तीला शांत कसं करायचं कारण ती का रडतीये हे पण माहिती नव्हतं. आणि कारण विचारायचं तरी कसं ?? एखाद्याला आवडत नाही असं विचारलेल. त्याच तर यालाच कळत नव्हतं नेमकं तो काय विचार करतोय. हाताची बोट एकमेकांत गुंतवुन विचार करत बसला होता. थोडा वेळ गेला तसं काहीतरी बोलायचं म्हणून तीला म्हणाला,
" काही काही गोष्टी या अशाच सोडायच्या असतात. त्या मनावर घ्यायच्या नसतात "

तरीही विशाखा रडतच होती. रडत रडत म्हणाली,
" किती ओरडले तीचे पप्पा. मला संस्कार नाही म्हणाले. का ?? रात्री फिरल की संस्कार नसतात असं कुठे लिहिलंय का ?? किंवा आपल्या मैत्रीणीच्या घरी कधी जायचं याचे काही नियम आहेत का ?? कधीही नाही जाऊ शकत का आपण ?? "
विशाखाच्या बडबडण्यावरून आकाशला जरा जरा समजलं की काय झालं असेल पण आता हिला शांत कसं करायचं ......

" मैत्रीण एकटी असली तर कधी हि जाऊ शकतो. नाहीतर मग आपल्यामुळे तीच्या घरच्यांना त्रासच आहे ना. आणि रात्रीचं बाहेर फिरण सेफ नाहीये. आणि कशाला कुणाच्या बडबडण्याकडे लक्ष देत बसायचं. बोलणारे बोलायचं काय करतात. "
बोलुन झाल्यावर त्याने तिच्याकडे बघितलं पण ही तर अजुनही रडतच होती. आता हीच रडत थांबवायचा एकच उपाय आहे,

" जास्ती रडलं की डोळ्यातलं पाणी संपत आणि मग कळशीने डोळ्यात पाणी ओततात म्हणे. "

त्याच्या ह्या वाक्यावर तीने त्याच्याकडे बघितलं की काय बोलतोय हा बावळटासारखं. आणि परत पुढे बघायला लागली. तीने नुसतं लुक दिला, काही बोलली तर नाहीच ते बघुन आकाश परत म्हणाला,

" असं बघु नको. मी घाबरत नाही तुला. "

" डोक्यावर पडलायस का रे तु 😒 "

" हो. लहानपणी खुप वेळा पडलोय. एकदा तर डोक्यात कोच पडली होती. "

" 🙄🤨😒 "

" बास की. किती रडायचं "

" आता रडायला पण बंदी आहे का मला 🥺🥺 " हुंदके देत देत कसंबसं म्हणाली.

" हां. मग त्यामुळे पुण्यात पुर आला तर काय करायच ना आम्ही 😜 "

" किती फालतु बोलायचं 😒 "

" मोजलं नाही मी. "

" काय 🤨🙄 "

" तु विचारलं ना किती फालतु बोलायचं, मग तेच सांगतोय. मोजलं नाही मी 🤭🤭 "

" शी 🤢🤢🤢. खुप बेकार जोक मारतोस. "

" अरे....... भारी होता जोक, तुला कळालं नाही असं सांग ना 😏 "

" कळालं हां. म्हणून तर म्हणल की बेकार होता जोक "

" मला एक कळत नाही. तु इतक्या रात्री इथे येऊन का रडत बसलीयेस ?? "

" खरं तर, जपान लाच जायचं होतं रडायला पण वेळ लागेल म्हणून मग इथे येऊन बसले. "

" ओह. पोपट केला माझा 😪 "

" हो मला मस्त करता येतो तो 😂😂 " आणि असं म्हणून हसायला लागते ती. आकाश तीच्याकडेच बघत होता. भारी दिसते राव ही तर हसताना.

" आता तुला अकडु सोबत नवीन नाव.... "

" कोणत नाव ?? आणि माझं नाव छान आहे विशाखा. तेच म्हणायच. "

" रडकु 😂😂😂. हे नाव पण मस्त आहे. "

" बरं त्यावरून आठवलं. Thank you ☺️. "

" प्लीज. आभार प्रदर्शन नको करू. कॉफी देतेस का सांग त्या बदल्यात 😉 "

" कॉफी ??? कसं पिता रे. चहा, चहा म्हणजे प्रेम 🖤. 😍🥰🥰 "

" तेच मी पण म्हणू वाटतो. की कसं पिता रे चहा... 😜"

" चूप. चहाला काही म्हणायचं नाही. "

" मग कॉफी पक्का ना 😉.... "

" हो पक्का. "

" पण मला कसं कळणार कधी भेटायचं, कुठे भेटायचं. नंबर दे ना तुझा. म्हणजे फोन करुन विचारेल मी 😜 "

" जुनी झाली ही ट्रीक नंबर मागायची, काहीतरी नवीन करा आता. आणि हॉस्पिटलमध्ये ये कधीपण. तेव्हा देईन कॉफी "

" ओके. "

" बाय, गुड नाईट, टेक केअर. "

" एवढं पण लाडात बोलायची गरज नाहीये. बाय "