Two points - 18 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग १८

भाग १८


सायली सकाळी सकाळी घरी आली.
" विशाखा..... विशाखा...... विशाखा..... " आत येतानाच ती ओरडत ओरडत आली, तीच्या आवाजाने काका बाहेर आला.

" काय गं ?? एवढ्या लवकर कसं काय ?? "

" विशाखा कुठे आहे ? "

" कुंभकर्ण अजुन झोपलाय. इतक्या लवकर उठते का ती ?? "

" अजुन झोपलीये 🙄 ?? काय पोरगी आहे ही ??"

" का गं ?? काय झालं ?? "

" अरे मी काल कॉल केला तेव्हा निघाली हॉस्पिटलमधून. मला म्हणाली घरी गेल्यावर करते आणि केलाच नाही. मी वाट बघत बसले होते की ती कॉल करेल म्हणून 😤 "

" अच्छा. तरी रात्री जरा उशीरच झाला तीला यायला. साडे अकराच्या दरम्यान आली ती. गाडी बंद पडली होती ना मध्येच तीची "

" पण कशी आली म्हणजे गाडी बंद पडली होती "

" त्या मुलाने सोडलं तीला. "

" कोणत्या मुलाने 😲 ?? आणि चक्क विशाखा कुणाच्या तरी गाडीवर आली 🙄 "

" अरे तो नाही का मुलगा..... ते तीला चिडवत होतो आपण. तो त्याच्याच गाडीवर आली I think. "

" काका खरंच काही नाहीये ना ..... "

" सांगु शकत नाही. कदाचित असेलही किंवा नसेलही. असलं तरी मी बंधन नाही घालणार आणि नसलं तर जबरदस्ती नाही करणार "

" ह्मममममम. कधी उठणार ही "

" थांब. पंधरा मिनिटांत उठेल बघ ती. "आधीच रात्री झोपायला उशीर झालेला आणि त्यात सकाळी सकाळी मोठमोठ्याने गाण्याचा आवाज ऐकायला यायला लागला. विशाखाने डोक्याखालची उशी कानावर घेतली आणि झोपायचा प्रयत्न केला पण त्या गाण्यांचा आवाज इतका मोठा होता की तीला झोपच लागली नाही. उठली आणि पाय आपटत बाहेर आली, बघितलं तर सगळ्या पोरी टिव्हीवर गाणे लावुन हॉलमध्ये नाचत होत्या.

" एएएएएए " विशाखा ओरडली त्यांच्यावर पण गाण्यांच्या आवाजात काही त्यांना ऐकायला आलं नाही.

" काका काय चाललंय हे " तीने काकाला विचारायचा प्रयत्न केला पण त्याला सुद्धा ऐकायला गेलं नाही.
शेवटी पुढे जाऊन तीने टिव्हीच बंद करून टाकला.

" का बंद केला टिव्ही ?? " परीने विचारलं.

" काय लावलय सकाळी सकाळी ?? लोक झोपतात आणि तुम्ही हे असं धिंगाणा घालताय ?? "

" ए लोक नाही तु झोपतेस या वेळेस. जरा मागे वळून बघ किती वाजलेत ?? " काकाने सांगितल तसं तीने मागे वळून बघितलं तर अकरा वाजले होते.

" आणि हो याला सकाळ नाही म्हणतं 😏 " सायली तीला म्हणाली.

सायलीला तीथे बघुन विशाखाला आठवलं की आपण हीला फोन न करता माती खाल्लेली आहे. बारीक तोंड करत तीने विचारलं,
" इतका वेळ झोपत होते मी 🥺 "

" हे असले तोंड केले की आपण वाचु, या भ्रमातुन बाहेर या जरा 😏 " सायली ने तीच तसं तोंड बघुन तीला उत्तर दिलं.

" अरे खरंच सॉरी. काल घरी आले आणि लगेच झोपले मग तुला फोन करून सांगायचं विसरले. "

" मेसेज करायचा ना मग. "

" सॉरी, विसरले मी. 😔 "

" आम्हीच मुर्ख काळजी करतो ना. "

" सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी "
विशाखा पटपट सॉरी म्हणतच होती, थांबतच नव्हती . ते बघुन सायली हसायला लागली.

" तु खुप फायदा घेतेस. माझा राग तुझ्यावर टीकत नाही ना म्हणून. "

" टिकत नाही नाही, मी टिकु देत नाही. शेवटी टँलेंट आहे " आपली असलेल्या ड्रेसची नसलेली कॉलर वर खेचत विशाखा म्हणाली.

" मग काय..... काल जीजु आले होते म्हणे सोडायला 😝. मज्जा आहे बाबा एका मुलीची. "

सायली परत त्या विषयाकडे वळतीये हे बघुन विशाखा ने पटकन‌ विषय चेंज केला. कारण आता ह्या तीन वर्षांत इतकं तर चांगलच ओळखत होती ती सायलीला.
" काका चहा दे ना. "

" हां. बरं झालं. चहा वरून आठवलं. काल मी फोन केला तेव्हा काय म्हणाली की माझ्यापेक्षा जास्ती प्रेम चहावर आहे 🤨🤨. हां..... " आणि सायली तीचा मुळ विषय तर विसरून गेली.

" हा मग आहेच की 🥰. चहा चहा आहे. "

" म्हणजे माझ्यापेक्षा जास्ती चहा imp आहे तर 🤨🤨 "

" हा मग. मी १५ वर्षांपासून चहा सोबत रिलेशनशिपमध्ये आहे, मग त्याच्या सोबत माझी attachment पण जास्ती आहे ना. 😝 "

" किती खडुस आहेस राव तु " असं म्हणून सायली तीच्या पाठीवर जोरजोरात बुक्क्या मारत होती.

" आयो आयो. दुखतंय ए आक्का...... बास करा की"

" मी आक्का काय ...... घे अजुन मार खा. "

" अरे मग आता काय तुला काका म्हणू का ?? "

" ए तुमच्या भांडणात मला का मध्ये घेताय 😒 "
विशाखाने काका म्हणलेल ऐकुन आपल्यावर काही येऊ नये म्हणून काका पटकन म्हणाला.
आणि शनिवार, रविवार पुर्ण त्यांचा असाच गोंधळ घालण्यात गेला.

इकडे आकाश शनिवारी हॉस्पिटलमध्ये जाणार होता पण तेवढ्यात त्याला आठवलं की तीने तर त्याला हॉस्पिटलचा पत्ता दिलाच नाहीये. बिचारा परत मुड ऑफ करून घरात बसला.

विशाखा सोमवारी घरी पटपट आवरून निघणार की काका म्हणाला,
" आज जावई येणार आहेत का घ्यायला 😝 ?? "

" काका 😒😒. असं काहिही नाहीये. आणि तो का येईल घ्यायला ?? म्हणजे एकदा त्याने मला आणुन काय सोडलं तर लगेच तो रोज येईल का ?? काही पण म्हणजे..... "

" हां मग एवढं स्पष्टीकरण द्यायची काय गरज आहे. नाही येणार असं सांग ना. 😝. स्पष्टीकरण तिथेच देत माणुस, जिथे काहीतरी असतं 🤣🤣😝 "

" 🤦🤦. अवघड आहे तुझं. "

" अरे ऐक तर, त्याला घरी घेऊन येते का जेवायला. ?? "

" का 😲 ??? कशाला ??? तुझ लग्न आहे का ??"

" आता भावी जावयांना आम्ही बघायला नको का 😝😝 "

" 😤. मी चालले बाय. "

" जा जा. जावई वाट बघत असतील ना 🤣. "

" चुप तु . तुझ्या तर, काका आता तुला ना मी तो टीव्ही फेकुन मारेन बघ "

" हा मार. मग तो टीव्ही मी तुझ्याच नव-याकडुन भरुन घेतो बघ. "

" चल निघ. आला मोठा माझ्या नव-याला त्रास देणारा 😏 "

" आत्तापासूनच त्याची बाजु. वा !!! प्रगती आहे. "

" तुझ्यामुळे मी पण बिघडेल बघ. "

" तोंड बघा आरशात. माझ्यामुळे बिघडलेत म्हणे 😏. आधीपासुनच बिघडेल बैल आहेस तु 🤭 "

" काका 😤😤😤😖😖. जा बाय. आधीच उशीर झालाय मला. "

" हां जा ना मग. अकरा वाजलेत येडी. पळ जा "

इकडे आकाशची वेगळीच गडबड चालली होती. विशाखा सोबत कॉफी डेट वर जे जायचं होतं त्याला. आज लवकर उठुन पटपट आवरून तयार झाला. आणि बाहेर आला, " आई भुक "

" आले " आई बाहेर आली आणि त्याला बघतच राहिली. स्काय ब्लू सॅटीनचा शर्ट, त्याखाली ब्लॅक पँट, मस्त ट्रीमड् दाढी आणि किलर वाली स्माईल.

" अरे दे ना " अस‌ म्हणून मोबाईलमधून डोकं काढुन त्याने वर बघितलं तर आई त्याच्याकडे बघत तिथेच थांबली होती.
" आई.... " त्याने हाक मारली पण त्याच्या आईला ऐकायलाच गेलं नाही. " आई..... " तो जोरात म्हणाला तेव्हा त्या जाग्या झाल्या.
" काय गं, असं का बघतीयेस ?? चांगलं वाटतं नाहीये का ?? " शर्टकडे बघत म्हणाला.

" अरे आज पहिल्यांदाच असं वाटतंय की तु एवढा चांगला दिसु शकतोस ते ... "

" ओह Thank you ☺️😘. " त्याला कळलंच नाही की आई त्याची थट्टा करतीये. आणि ती थट्टा त्याने as a compliment घेतली 🤣.


विशाखा धावतपळत हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळी बारा वाजायला आले होते ब-यापैकी. पटकन पंडितला बोलावल आणि नेहमीप्रमाणे आपलं शेड्युल बघत बसली . पंडित तीला तीच्या आजच्या अपॉईंटमेंट देऊन केबीनमधुन बाहेर येतच होता की समोरून एक हँडसम मुलगा मस्त शिट्टी वाजवत येत होता.
" आयला भारी आहे की हा दिसायला " पंडित तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
" कोण पाहिजे तुम्हाला ?? " तो इकडे तिकडे बघतोय हे बघुन पंडितने स्वत:च त्याला विचारल.

" अं....... डॉक्टर विशाखांना भेटायचं होतं. "

" अपाॅईंटमेंट घेतलीये का तुम्ही ?? "

" नाही. पण जरा अर्जंट काम आहे, नाही भेटता येणार का ?? "

" अपाॅईंटमेंट शिवाय कसं भेटता येणार ?? उद्या हवं तर मी तसं शेड्युल करतो मग भेटा. "

" नाही नाही. आजच भेटायचंय मला. थोडं अर्जंट आहे काम " अस‌ म्हणुन तो मुलगा तीच्या केबीनवरची पाटी बघुन तीकडे निघाला.

" आहो ओ...... थांबा की.... ओ..... " असं म्हणेपर्यंत तर तो केबीनमध्ये घुसला पण.

" हाय " केबीनचा दरवाजा उघडला तसं आत बघुन तो म्हणाला, पण आत काय चाललंय हे बघुन तो थक्कच झाला. तिथेच थांबला. मागुन येणाऱ्या पंडितने पण हा एवढा शॉक का झालाय हे बघायला आत वाकुन बघितलं तर......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED