कादंबरी –जिवलग
भाग -३२ वा
-----------------------------------------------------
हेमू पांडे बाहेर पसेज मध्ये पाहत होता , स्वतःच्या विचारात गुंग असलेली नेहा येतांना पाहून
त्याच्या मनात विचार आले..
आपण नेहाबद्दल सतत विचार करीत असतो , पण, तिच्या मनातले काही एक आपल्याला ती
कळू देत नाहीये . ज्या अर्थी सोनिया आणि अनिता या दोघींनी अजून काही निगेटिव्ह सांगितलेले
नाहीये ..याचा अर्थ ..नेहाच्या मनात आपल्याबद्दल काही नाहीये असे मानले तरी ..
आपण आपल्याकडून प्रयत्न चालूच ठेवत राहिलो तर..तिच्या मनात आपल्या विषयी एक छान
भावना नक्कीच निर्माण होऊ शकेल.
हेमू पांडे स्वतःला धीर देत होता ,
फ्लोअर –पेसेज मधून येणार्या नेहाकडे तो पहात राहिला ..किती छान दिसते आहे आज .
तिचा आजचा ड्रेस -पिस्ता कलरचा कुर्ता आणि जीन ,किती खुलून दिसतोय तिला .
तिला शोभून दिसणारा डोळ्यावरचा नाजूक स्टायलिश उन्हाचा चष्मा ,
वार्या बरोबर उडणारे रेशमी झुल्फे , फ्रेश आणि स्मायलिंग फेस ... !
क्या बात है ...!
हेमू पांडेला कळून चुकले की ..आपले मन नेहासाठी मनापासून वेडे झाले आहे.
म्हणतात ना – की
मनापासून आवडणारी व्यक्ती ..कशीही दिसो,कशी ही असो..
आपल्यासाठी ती विश्व-सुंदरीच “असते आपल्या दुनियेतली .
हेमू पांडेच्या मनाला किती ही आणि काही ही वाटून उपयोग नव्हता ..जो पर्यंत –ही टाळी एका हातानेच वाजते आहे “
ही भावना मनातून जाणार नाही..तो पर्यंत खयालोमे “ असे किती दिवस ?
ही भावनिक कोंडी कशी फोडायची ?
नेहा तर आपणहून काही बोलणार नाहीये ..हे मधुरिमादीदीने सांगितले आहे
सोनिया –अनिता या दोघींचे पण हेच सांगणे आहे. काय करावे ?
हेमू पांडेला अजिबात सुचत नव्हते.
नेहा आत आली , तिच्या खुर्चीवर बसली .
एक नजर ऑफिस हॉल मध्ये फिरवली ..सगळे काही
रोजच्यासारखे चालू आहे ..हे पाहून तिला बरे वाटले.
मी आज उशिरा आले आहे “ हे आपल्या बॉसला सांगावे
म्हणून ती ..त्यंच्या केबिन मध्ये गेली ..
हेमू पांडे फोनवर बोलत आहेत असे पाहून..ती
पुन्हा येते !
असे बोलून बाहेर निघाली आहे
हे पाहून हेमू पांडे यांनी तिला न बोलता- नुसते हाताने खुणावत खुर्चीत
बसण्यास सांगितले .
नेहा बसून राहिली खरी ..पण ती स्वतःला खूपच अनईझी फील करू लागली.
काही सबंध नसतांना बॉसने असे थांबवून घेत .बसून राहण्यास का सांगितले ?
हे बरोबर नाही. ती आतल्या आत धुमसत राहिली .पण, हे बोलून कसे दाखवणार ?
चुपचाप बसून राहणे हाच उपाय होता ..आता या क्षणी तरी.
चालू असलेला कॉल संपेपर्यंत काही माहिती नसलेल्या आणि सबंध नसलेल्या विषयावरचे
बोलणे ऐकावे लागणार म्हणून ..नेहा जरा नाईलाजाने खुर्चीत बसली ..
बॉसनेच बसा म्हणून सांगितले ..त्यांना ..नाही कसे म्हणयचे
आणि त्यांचे फोनवर काय बोलणे सुरु आहे ..हे नेहाच्या कानावर पडू लागले ,
पण, ती तिचे लक्ष बाहेर पाहण्यात आहे असे दाखवते आहे
..हे हेमू पांडेला दिसत होते.
हे पाहून बोलणे न थांबवता ते पुढे सुरु ठेवीत म्हटले ..
मामा ,आता मी सांगतो ते ऐका ..आणि मग
तुम्ही म्हणाल तसे या पुढे करू या ..!
मी काही तुमच्या शब्दबाहेर नाहीये ..हे तुम्हाला माहिती आहेच..
नेहाला हे शब्द ऐकून आश्चर्य वाटले ..
हा तर यांचा पर्सनल कॉल चालू आहे आणि ..तरी ही आपल्याला यांनी इथे बसवून ठेवलय ..
नेहा गोंधळून गेली ..आणि तशीच बसून रहात .
त्यांचा कॉल कधी संपतो ? याची वाट पाहत राहिली .
हेमू पांडे त्यांच्या मामाला सांगू लागले ..
हो मामा , तुमचे म्हणणे पटले आहे मला ..
गावाकडे आई-बाबा आतुरतेने वाट पाहत आहेत ..त्यांचा मुलगा कधी एकदा मुलगी पसंद
करतो ते ..सुनमुख पाहण्यास दोघे ही खूप उत्सुक आहेत ..
मामा – माझी आई मला काय सांगते ते तुम्ही आज एकाच माझ्या तोंडून
आई मला नेहमी तिच्या मनातले सांगतांना म्हणते ..
बेटा हेमू .. तुला कोणती आणि कशी अप्सरा हवी आहे ? ते आम्हाला कळत नाही .
पण..आमच्या मनाची इच्छा सांगते तुला ..
ती लक्षात ठेव आणि तसे केलेस तर आम्हाला खरेच खूप आनंद होईल .
आम्हाला आनंद देणे ..सर्वोतोपरी तुझ्याच हातात आहे.
हेमू –आमच्या अपेक्षा जगावेगळ्या अजिबात नाहीत रे ..खूप साधारण इच्छा आहेत आमच्या .
आम्हाला सुनबाई किनई -
साधी –सरळ ,घर आणि घरातली माणसांना आपले मानणारी अशी हवी रे
तुमच्या नोकरीमुळे तुम्ही कायमच आमच्या जवळ राहणार नाहीत ,हे पण कळते आम्हाला .
इकडे याल तेव्हा तेव्हा तुम्हाला -
या घराची ,इथल्या माणसांची ओढ वाटायला हवी “ बस इतकीच इच्छा आहे रे हेमू तुझ्या
आई-बाबाची .
काय मामा ..ऐकलेत ना मी काय म्हणतो ते ..
बरोबर आहे ना आई-बाबांच्या अपेक्षा . ?
पण, मामाजी ..
तुम्हाला तर माहिती आहे ..आजकालच्या ultraa- modern “ कल्चर मध्ये आईच्या कल्पनेत
असणारी मुलगी मिळणे कठीणच दिसते आहे सध्या तरी..
बघू या ..माझ्या नशिबात कोण आणि कशी असणार आहे ..जी तुमची सुनबाई होऊ शकेल ,
आणि एक सांगू का मामा ..
अहो, माझ्या मनात खूप काही आहे..मी बोलून दाखवेल ..पण काय ना ,
तुमच्या काळातील माणसा मनातले मोकळेपणाने सांगायची .
आजची नवी पिढी ..मनातले काही कळू देत नाहीये.
ते जाऊ द्या . कुणी कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण ?
मामा ..आता आपण असे करू या -
तुम्ही काही स्थळं शोधून ठेवा ..आणि आणि ठरवा ..मग, मी रजा घेऊन येतो तिकडे .
मग.. तुम्ही पसंद करून ठेवलेल्या ..मुलीन पैकी एकीला करू पसंद .आणि जाऊ पुढे .
मी तरी ..किती वाट पहायची ना आता ?
आपले काम आहे म्हटल्यावर .आपणच हात –पाय हलवलेले बरे ..!
हो मामा ..नक्की ..तुम्ही अगोदर मला कळवा म्हणजे ..रजा कशी घायची हे ठरवता येईल
आणि तुम्ही घरी जाऊन सांगा तुमच्या बहिणीला ,माझ्या आईला –
म्हणावे ..हेमू तयार झाला आहे ..काळजी करणे सोडून द्या..
सुनबाई येणार ..स्वागताच्या तयारीला लागा म्हणावे.
बाय मामा ..!
हेमू पांडेने फोन बाजूला ठेवीत नेहाकडे पाहत म्हटले ..
सॉरी..मिस नेहा
तुम्हाला खूप वेळ विनाकारण बसवून घेतले ..
माझा पर्सनल कॉल..त्यातले बोलणे ऐकावे लागले
खूप बोअर झालात न तुम्ही . सो सॉरी -नेहा मैडम .
मी काही तुम्हा परका मानीत नाही.. आय मीन ..माझ्या कलीग आहात , रोज आपण सोबत
असतो ..मला काही फरक पडत नाही ..
अहो, कॉमन आणि पर्सनल या गोष्टी आपल्या मानण्यावर अवलंबून असते .
आपल्यात “एक बॉस आणि एक कलीग “ असे अन्तर नसावे “ असे मी मानतो ..म्हणून
माझ्या खाजगी – पर्सनल गोष्टी तुम्ही ऐकल्यात , त्या तुम्हाला समजल्या “ याचे मला काही वाटले
नाहीये . तुम्ही असे काही मनात अजिबात आणू नका प्लीज.
आणि मीच तर बसवून घेतले तुंम्हाला .
म्हणजे तर तुम्हाले यात काही गैर झाले असे वाटणे चूक असेल.
त्यामुळे तुम्ही माझे पर्सनल बोलणे ऐकले याचे मला काही वाटले नाहीये ..
आणि तुम्हाला काही वाटू देऊ नका ...
नेहा मैडम-अहो ..माझ्या काय आणि तुमच्या काय .या अशा घटना लाईफ मध्ये घडणार आहेच..
तुम्हीच कल्पना करा –
मी तरी किती दिवस घरच्यांना .नाही म्हणत राहायचे ..
एक न एक दिन तो ..लग्नाच्या बोहोल्यावर उभे रहावेच लागते सगळ्यांना .
माझ्या बोलण्यावरून तर तुम्हाला माझ्या अपेक्षांची कल्पना आलीच असेल ..
त्यामुळे ..तुम्ही सुद्धा माझ्यासाठी एखादी अनुरूप मुलगी सुचवू शकता बरे का .. !
मी तर एक मित्र मानतो तुम्हाला ..माझ्या सहवासात तुम्हाला मी कसा आहे ?
हे आता बर्या पैकी जाणवले असेल ,
त्यामुळे माझी जीवन-साथी कशी असावी “ याची तुम्हाला पूर्ण कल्पना आली असेल.
याकामी तुम्ही मला जरूर मदत करावी.
बरे हे जाऊ द्या .. तुम्हाला आज पहिल्यांदा उशीर झालाय , काही विशेष काम होते का ?
सहज विचारतोय ..तुम्ही सांगावे असा आग्रह नाही .आता तुम्ही आलात ,प्लीज कॅरी ओंन..युवर
वर्क.
नेहा सांगू लागली -
तसे काही महत्वाचे नव्हते सर हे काम .
माझ्या केअर टेकर मधुरिमादीदी आहेत ना ,
त्यांचे कार्यकर्ते आले होते . त्यांच्या सोबत एका संस्थेत जाऊन ..काही मदत करायची होती ..त्यासाठी
मी सोबत यावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून जाऊन आले.
हे ऐकून ..हेमू पांडे म्हणाले .. ग्रेट वर्क...मधुरिमादीदी सगळ्यांकडून असे लोकोपयोगी कार्य करवून
घेतात .
मिस ..नेहा ,तुम्हाला याची आवड आहे ,याचा मला खूप आनंद झालाय.
ठीक आहे, मी आता ऑफिस राउंड मारून येतो ..
बाय भेटू पुन्हा .
नेहा स्वताच्या खुर्चीत बसली ..पण.तिचे मन काही केल्या कामात लागत नव्हते.
हेमू पांडेच्या फोनवरील बोलण्याचा ती विचार करीत होती ..
खरेच का ..हेमू पांडे ..स्वतहासाठी वधू –संशोधन “ मोहीम सुरु करणार आहेत ..
त्यांच्या घरच्यामाणसांना घाई असणे चुकीचे कसे म्हणावे ?
नेहा मनालाच विचारू लागली ..
त्यांच्या लग्नाशी आपल्याला काय देणे-घेणे ? त्यांचा पर्सनल विषय ,आपण दूरच राहिलेले
बरे .
त्यांच्या तुलनेत ..आपण खूपच सामन्य आहोत ..ना रूप, ना गुण ..त्यांच्या नजरेत, मनात
आपल्याला स्थान असू शकेल ? असे वाटणे म्हणजे ..दिवा –स्वप्न “पाहण्या सारखे आहे.
हेमू पांडेंनी .त्यांच्या मामांना स्पष्ट सांगितले ..तुम्ही पसंद करून ठेवा ..मी येतोच ..
यातून काय समजून घायचे ते समजून घ्यावे आपण.
नेहा तशीच खुर्चीत बसून राहिली ..आपले मन खूप हिरमसून गेले आहे असे तिला वाटत होते.
एक वेगळीच उदासीनता मनावर दाटून आली आहे ..!
का बरे असे वाटत असावे ?
तिला ..सेमिनारला जातांना हेमू पांडे ..तिला काय म्हणाले होते ..पुन्हा आठवले..
..मिस नेहा ..यु आर चार्मिंग ब्युटीफुल...!
सोनिया आणि अनिता दोघींनी कशावरून म्हटले
नेहा ..हेमू पांडे तुझ्यात इंटरेस्ट आहे ..बघ विचार कर..,
आणि आज तर स्वतहा हेमू पांडे ..त्यांच्या मामांना सांगत होते ..
तुम्ही पसंद करून ठेवा मुलगी ...!
हे तर आपण स्वताच्या कानाने ऐकलय ..!
नेहाने घड्याळात पाहिले ..घरी जाण्याची वेळ झाली होती ..
निराश मनाने ती निघाली ..
आणि तिच्या मोबाईलची रिंग ..वाजली ..
स्क्रीनवर ..हेमू पांडेचा नंबर दिसला ..
तिने कॉल रीसेव्ह केला ..
हेमू पांडे तिला म्हणत होते..
मी ऑफिसच्या बाजूला कॅफे मध्ये आहे..
तुझी वाट पाहतो आहे ..
विथ कॉफी .तुझ्याशी बोलायचे आहे..
येतेस ना ..डियर नेहा ...!
या जादूच्या शब्द्वार नेहाचा विश्वासच बसत नव्हता ..
ती म्हणून गेली ...
हो -आलेच हं...!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात ..
भाग – ३३ –वा लवकरच येतो आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी ..जीवलगा ..
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------