आजारांचं फॅशन - 23 Prashant Kedare द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आजारांचं फॅशन - 23

अनिलने पेपर, ब्रश आणि रंग काढले आणि पुन्हा एकदा सराव करू लागला, आयुष्यातला प्रत्येक काळा पांढरा क्षण तो रंगाने भरून टाकायला लागला, एक एक रंग त्याला नवी स्पुर्ती, नवी ऊर्जा देत होता, आयुष्य इतकं रंगीत देखील असू शकत ह्याची त्याला जाणीव झाली होती, त्याला ह्या गोष्टीची हि जाणीव झाली होती कि आपल्या आयुष्याचे रंग हे आपल्याच हातात असतात, आपणच ते रंगीत किंवा काळसर करतो, किती मोठा बदल होता हा अनिल मध्ये आणि त्याच्या विचारानं मध्ये, तो त्या रंगांच्या नगरीत एवढा रमून गेला कि त्याला वेळेचे भानच राहिले नाही.

डॉक्टर माधवाचा फोन आला आणि अनिल भविष्यात परत आला,

“हॅलो”

अनिलने ब्रश खाली ठेवून फोन उचलला,

“अहो कुठे आहात, निघालात कि नाही अजून, कॉम्पेटिशन अर्ध्या तासात सुरु होणार आहे”

डॉक्टर फोनच्या दुसऱ्या बाजूने चिंतेत बोलत होत्या.

“हो हो निघालोच आहे, पोहचतो मी २० मिनिटात”

अनिल फोन वर बोलत बोलतच बाहेर पडला, बाईकला किक मारली आणि सुसाट वेगाने कॉम्पेटेशन च्या स्थळाच्या दिशेने निघाला.

रस्त्यात थोडीशी ट्राफिक लागल्या मुळे अनिलला उशीर होत होता, डॉक्टर माधव सारख्या गेट कडे चकरा मारत होत्या, घड्याळाचा काटा जणू आज जरा जास्तच वेगाने धावत होता.

सगळे स्पर्धक आपल्या आपल्या नियोजित जागेवर चित्रकलेच्या बोर्ड समोर उभे राहून स्पर्धा सुरु होण्याच्या घंटी वाजण्याची वाट बघत होते आणि ती वेळ आली घंटी वाजली आणि सगळे जण रंगाशी खेळायला लागले.

अनिलची जागा रिकामीच होती, तो अजून पोहचला नव्हता, डॉक्टर माधवने निराशेने आपली पाठ फिरवली आणि आत जायला निघाल्या तेवढ्यात मागून अनिलचा आवाज त्यांच्या कानावर पडला,

डॉक्टरने हसत मागे पहिले आणि बोलल्या

“आहो कुठे होता तुम्ही, चला लवकर, स्पर्धा सुरु झाली”

अनिल त्याच्या जागेवर जाऊन हातात ब्रश घेऊन शांत उभा राहिला,

“काय झालं अनिल? सुरु करा”

डॉक्टर माधव अनिलला हलवत बोलल्या.

“काही नाही डॉक्टर, एवढ्या दिवसां पासून खूप चित्र काढले, त्यातलं सगळ्यात चांगलं कुठलं होतं आणि आता कुठलं काढू हे कळेना”

अनिल संभ्रमात बोलला

“खूप विचार नका करू, आज, आत्ता, ह्या क्षणाला जी मनस्थिती आहे, ज्या भावना आहेत, डोक्यात जे विचार आहेत, ते सगळे उतरवा ह्या पेपर वर, ऑल द बेस्ट”

एवढं बोलून डॉक्टर तिकडून निघून गेल्या.

अनिलने ब्रश रंगात बुडवला आणि त्याचा हात वेगाने पेपर वर चालू लागला, एका हाताने रंग भरत होता, दुसऱ्या हाताने, नको तो पुसत होता किंवा रंग पुसट करत होता, दोन्ही हात रंगाने माखले होते, चेहरा घामळालेला, आणि बघता बघता वेळ समाप्तीची घंटी वाजली.

सगळयांनी आपले ब्रश खाली ठेवले आणि आपल्या आपल्या पेंटिंगच्या बाजूला उभे राहिले. स्पर्धेचं समीक्षण करण्यासाठी चार वरिष्ठ डॉक्टरांचं पॅनल होत, ते चारही डॉक्टर एक एक पेंटिंग जवळ जाऊन प्रत्येक पेंटिंग खूप बारकाईने निरखून पाहत होते, ती पेंटिंग कुठल्या पेशंट ने किंवा डॉक्टरने काढली आहे आणि तो स्पर्धक कुठल्या वैद्यकीय क्षेत्राचं प्रभुत्व करत होता ह्या बाबी देखील ते विचारात ठेवून समीक्षण करत होते.

एका मागून एक अश्या सगळ्या पेंटिंग पाहून झाल्या आणि आता वेळ आली निर्णयाची आणि विजेते घोषित करण्याची.

डॉक्टर माधव अनिलच्या बाजूलाच उभ्या होत्या आणि अनिल मान खाली घालून निर्णयाची वाट पाहत होता, जिंकणे किंवा हरणे हा विषय अजिबात नव्हता, विषय होता त्याच्या मनोबलाचा आणि आत्मविश्वासाचा, हा निर्णय कदाचित त्याला मुक्त उडण्यासाठी एक नवीन दिशा आणि आभाळ देणारा सिद्ध होणार होता.

समीक्षकांचे बोलणे सुरु झाले, त्यांनी कार्यक्रमाची आणि आयोजकांची भरभरून स्तुती केली आणि असे कार्यक्रम वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसाठी आणि रुग्णांना साठी किती उपयोगी आणि प्रेरणा जनक आहेत या वर भाष्य केले आणि शेवटी स्पर्धेचे परिणाम जाहीर करायला सुरवात केली.