दोन टोकं. भाग २३. Kanchan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दोन टोकं. भाग २३.

भाग २३


सायली ओरडली तशी सगळे आजुबाजुचे तीच्याकडे बघायला लागले.

" Are you okay ? " शेजारच्या माणसाने काळजीने तीला विचारलं.

" तु तुझं खा ना. तुला काय करायचय 😒 " सायली त्या माणसाला म्हणाली आणि रागाने विशाखा कडे बघायला‌ लागली.

" Wow. insaneness 😉🤭 " आकाश हसत हसत म्हणाला.

" ओय हॅलो, असं काही नाहीये हां. " विशाखा आकाशकडे बघत तोंड वाकडं करत त्याला म्हणाली.

" अच्छा मग कसं आहे ?? आणि विषय बदलला बरं का तु 😬. खरं खरं सांग, माझा पाठलाग करत होतीस ना 😉. "

" नाही, मी का तुझा पाठलाग करू ?? 🤨 "

" अच्छा मग इथे काय करतीयेस 🤭 "

" मी इथे भेळ खायला आलीये दिसत नाहीये का ?? अकडु "

" एक भेळ खायला एवढ्या लांब 🤨. पटत नाहीये मनाला. It's okk. मला बघायला आली होतीस असं खरं खरं सांगितलंस तरी चालेल 😉🤭 "

" एक मिनिट मी तुला का बघायला येईन 🤨. माझा बॉयफ्रेंड आहेस का ?? "

" नाहीये पण व्हायला आवडेल मला 😉. आणि आता आहेच मी हँडसम त्यामुळे तु येऊच शकतेस ना मला बघायला 🤭 " आपल्या डोक्यावरून हात फिरवत आकाशने तीला बघत डोळा मारला.

" किती फ्लर्ट करतोस रे " बारीक डोळे करत हाताची घडी घालून त्याला बघत होती.

" हां, आता आहेच मी तसा त्याला तु तरी काय करणार "

" ते तर आहेच . सायली तुला काही हवंय अजुन. " विशाखा सायली कडे बघत म्हणाली.

" नाही नको मला. "

" हां तर ही सायली. आठवतंय जीचा नंबर मी लव्ह नावाने सेव्ह केला होता, हीच ती. भारी आहे ना दिसायला 😉 . आणि हे तर काहीच नाही. स्वभावाने पण..... "

" Euuuuuuu सुरु झाली ही 🥴 " असं म्हणत सायली ऊठुन निघुन गेली.

" तुझ्यासारखी नसेल ना, चिडकु टाईप 😂😂 " आकाश तीला हसत हसत म्हणाला.

" ओय हॅलो, मी चिडकु नाहीये हां 😡😡 "

" बघ हे सुद्धा तु चिडुन सांगतियेस 😂😂 "

" अजिबात नाही. कोण म्हणलं मी चिडले 😡. मी अजिबात चिडलेले नाहीये. ओके. "

" 😂😂😂😂😂 " आकाश हसतच होता.

" तुला ना काही सांगण्यात अर्थच नाहीये. "

" सॉरी सॉरी. सांग " आपलं हसु कसंबसं आवरत तो म्हणाला.

" हां तर मी सांगत होते की ती खरंच भारी आहे. ती माझ्यापेक्षा ४ वर्षांनी लहान आहे तरी तीला सगळा स्वयंपाक येतो. " .

" आणि तुला साधा चहा येत नसेल 😂😂 "

" तु ना...... जा, मला नाही सांगायचं काही 😡 "


" सॉरी सॉरी. सांग सांग "

" नाही, मला नाही सांगायचं आता. माझा मुड गेला 😡😡 "

" सॉरी सॉरी. कान पकडून सॉरी. आता नाही बोलणार मध्ये. सांग "

" नक्की 😒 "

" हो, नाही बोलणार मी 🤭 "

" तीला सगळंच येत म्हणजे घरी सगळं छान सांभाळते. माझ्यासारखं तीला लगेच लाग येत नाही rather than तीला रागच येतो नाही. ती चिडचिड करत नाही. स्वभावाने खुप शांत आहे ती. आणि तीला ना समोरच्याला असं पटकन समजुन घेता येत. म्हणजे समोरच्याला आता काय म्हणायचंय हे तीला लगेच कळत. " आणि विशाखा गुंग होऊन बोलतच होती.

आकाश ती बोलताना तीचे हावभाव निरखत होता. ती बोलतच होती. आकाशने तीला बघता बघता हातात फोन घेऊन मेसेज केला,
" अवघड आहे खुप. "

तसा समोरच्याला माणसाचा लगेच रिप्लाय आला,
" म्हणून तर तुला तीच्या मागावर लावलय ना मी. "

" पण मला वाटतं होतं त्यापेक्षा जास्त complicated आहे हे सगळं "

" हो ते तर आहे पण पर्याय काही आहे का ?? "

" यार, खरंच असं पण होऊ शकत का ?? "

" विश्वास तर बसत नाहीये पण जे आहे ते तर खरं आहे even ते डोळ्यासमोर घडतंय "

आकाशने एक नजर विशाखा कडे टाकली, ती अजुनही सायली बद्दल भरभरून बोलत होती. त्याने परत समोरच्या माणसाला मेसेज केला,
" आज लगेच जाऊया का तीला घेऊन ?? "

" ती येईल ?? "

" पण यापेक्षा जास्ती तीला असं नाही बघु शकत मी. त्रास होतोय रे. "

" प्रेमात पडलास ना तीच्या. "

" वाटतंय असं " त्या समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विशाखा कडे बघत लाजत आकाश म्हणाला.

" फक्त ५ भेटीत ?? " समोरचा हसत हसत म्हणाला.

" प्रेम व्हायला एक नजरही पुरेशी असते रे. इथे तर पाच भेटी झाल्या. पण तु मला का नाही सांगितल ही इकडे आलीये ते ?? "

" मलाच माहिती नव्हतं तर तुला कुठुन सांगु "

" ओके. बरं ठेवतो फोन. ही अजुनही बडबडतीच आहे . "

" तीला लवकर घेऊन ये, मी वाट बघतोय. " असं म्हणत समोरच्या माणसाने फोन ठेवुनही दिला. "
आणि विशाखाला घेऊन चहा प्यायला गेला. विशाखा अजुनही सायली बद्दलच बडबडत होती की तितक्यात त्याने तीला चहा आणुन दिला. विशाखाने बोलत बोलत चहा संपवला पण जसा चहा घेऊन झाला तसं तीला थोडं गरगरायला लागलं. तीने पटकन आकाशच्या हाताला धरलं.

" मला चक्कर येतीये " एक हात त्याच्या हाताला धरत, एक हात डोक्याला लावत ती म्हणाली.

" चल पटकन, आपण घरी जाऊ. "

" हो पण सायली...... "

" तीला पण नेऊ. पण तु चल आधी. "

" सा...य.......ली..... " असं म्हणत विशाखा तिथेच कोसळली. तसं पटकन आकाशने तीला स्वतःच्या मिठीत घेतलं. आजुबाजुचे सगळे त्या दोघांकडे बघत होते पण तरी लक्ष न देता तीला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतल आणि गाडीत ठेवून, गाडी लगेच पळवायला सुरुवात केली.