ते दोघे.... shabd_premi म श्री द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ते दोघे....

दिवस पहिला

काय झालं एक दिवस माझी बायको तिच्या नवऱ्या बद्दल सांगत होती म्हणे,
रागिणी :- आज काल त्याचं लक्षच लागत नाही घरात, नुसता बाहेरच पळतो..संध्याकाळी कामावरून आला की थोडा वेळ घरात बसतो आणि मन fresh करायचं आहे अस म्हणत निघून जातो... आणि हे रोजच अस होतं... का तर कुणास ठाऊक, मी त्याला खूपदा विचारलं पण तो काही बोलायचाच नाही..मला त्याची काळजी वाटते हो... काही झालं तर नाही ना त्याला... अश्या वातावरणात त्याने त्याच काही करून घेतलं तर? मी सांगू कुणाला तर ते ही कळत नव्हतं म्हणून तुम्हाला सांगितलं.. खूप दिवसांपासून सांगायचं होत पण तुमचा वेळ जुळून येत नव्हता... त्यांना कधी कधी अस एकदम विचारून टाकावस वाटत तेही भांडून भांडून...
काय होतंय तुम्हाला तब्बेत नाही का बरी, office मधला काहो त्रास, की कुणी काही बोललं...त्यांना तशी सवयच प्रत्येक गोष्ट serious घेऊन बसायची...मी काय म्हणते काय गरज बर त्यांना प्रत्येक गोष्टीला serious घेण्याची, काहि गोष्टी अश्याच सोडून दिल्या तरी त्या पूर्ण होतात ना, पण आता त्यांना ते कोण समजावून सांगणार, माझं तर ते एक सुद्धा ऐकत नाही, देव जाणे, त्यांना काय होतंय तर...

राघव :- बर ठिकेय मी बोलतो त्याच्याशी.. तू काळजी करू नकोस

दिवस दुसरा

एखाद्या coffee shop मध्ये एकमेकांसमोर बसलेले असतात

राघव :- रागिणी काय घेशील चहा की coffee
रागिणी:- coffee च

राघव :- आज तुला मी सांगेलाही त्याला काय झालंय म्हणून, पण त्यावर उपाय म्हणून काय करायचं आहे हे त्यालाच माहितीये, त्यामुळे तुला त्यावर काहीच करायचं नाहीये बर, आणि हो तू जास्त मनावर घेणार नसशील तर सांगतो...

रागिणी :- बर, पण तू सांग आधी.
राघव :- हो हे बघ प्रत्येकाच्या आयुष्यात नाही म्हणता म्हणता एक आवडता आणि नावडता असा भूतकाळ असतोच, तुलाही असेलच. पण आपण त्याला आपल्या आयुष्याशी किती लावून घेतोय, ह्यावर ते अवलंबून असत, बस्स असच काही त्याचा आयुष्यातही घडलं,
मी म्हणेल त्याने त्या भूतकाळाला जास्त लाऊन घेतलं नाही, म्हणून तो आज तुझ्याशी लग्न करून मजेत आयुष्य जगतोत.

रागिणी :- मुद्द्यावर येशील का?
राघव :- हो हो येतोय, काय बर इतकी घाई..तो घरी नाहीये तुझी वाट पाहत बसायला ग...
बघ ऎक कॉलेज सुरू असताना त्याचं एका मुलीवर प्रेम होत. पुर्ण गोष्ट ऐकून घे मग काय विचार करायचा तो करशील. ती व्यक्ती म्हणजे राजश्री, दोघांचंही एकमेकांवर सारखच, नितळ प्रेम, म्हणायला ह्यांचा प्रेमाची गोष्ट पूर्ण कॉलेजलाच माहिती, त्यामुळे तिला इतर कुण्या मुलाकडून कधी त्रास झाला नाही, पण त्याच कॉलेज मध्ये तिचे बाबाही होते, बस फक्त त्यांना तेवढीच काळजीही आणि भीतीही होती, की त्यांना आपल्याला बद्दल काहीच माहीती पडू नये म्हणून..
पण canteen मध्ये असताना तिच्या वडिलांना ते दोघे दिसतात आणि ते पाहून तिचे बाबा तिला ठणकावतातही, वडिलांचा राग पाहून राजश्री जरा घाबरते आणि मग ती राघव कडे लक्ष देणं कमी करत, कारण आता तिच्यावर तिच्या आई वडिलांचा धाक असतो, ते final yr असत, त्याच वर्षी राघव तिला proposeही करतो आणि ती त्याला नाकारते आणि इथेच खेळ थांबतो...
पण ते म्हणतात ना नियतीच्या मनात काय चाललंय ते कुणालाच कळत नाही...आज त्यांचं कॉलेज संपून ८ वर्ष होत आली.. तो ही तिला विसरला आणि तीही त्याला विसरली होती...पण परवा ची गोष्ट office मध्ये interviews चालू होतो, राघव आलेल्या लोकांचे interviews घेत होता, दुपारचे चार वाजलेले, राजश्री आत आली, त्यांची नजर एक झाली नी दोघांनाही आश्चर्याचे धक्केच बसले, राघव ने आपली जुनी ओळख आहे हे न सांगता तिची मुलाखत घेतली , त्यांना दहा झणांची 1 Batch Select करायची होती, आणि राजश्री कडे सर्व काही होत जे त्या post साठी हवं होत... पण तिला selelct करायचं की नाही ते राघवच्या हाती होत, तो खूप मोठ्या कोड्यात पडला होता, कारण तिला select केलं तर त्याला कामात problmes आलेच असते कारण त्यांचा भूतकाळाच तसा होता आणि तिला select न करून राघव कंपनीच नुकसान करू इच्छित नव्हता, हा पेच त्याच्या कडून 4 दिवस झालेत सुटता सुटेनाच.
आणि आणखी एक अस की राजश्रीची घरची परिस्थितीही बिकट झालीये..कारण काही आठवड्यांपूर्वीच तिचे mister वारलेत त्यामुळे तू विचार करताना बरोबर पाऊल उचलावस अस वाटत...
आता तू त्याला एकदा विचारून बघावस, त्याला विश्वासात घेऊन बोलून बघावस, त्याच्याशी भांडत न बसता त्याला ह्यावर तोडगा सांगावास अस वाटत..
करशील ना एवढं...

दिवस तिसरा

Dining Table वर दोघेही बसलेले असतात

रागिणी :- अहो ऐकाना काल तुमचा मित्र राघव Coffee Shop ला भेटला होता, त्यांनी तुम्हाला पडलेल्या पेचा बद्दल मला सांगितलं, त्यामुळे तुम्ही माझ्याशी त्या विषयावर निवांत बोलु शकता, अस मला वाटत.
राघव:- अम्म रागिणी विषय तो नाहीये ग मी तुझ्याशी बोललो ही असतो पण ते मी तुला सांगितलं असत तर तू माझ्यावर संशय घेतला असतास आणि भांडणं सुरू झाली असती म्हणून मी गप्पच राहिलो.
रागिणी:- हो आणि गप्प इतके झालात की सगळ्यांनाच विसरून गेलात..तुमचं कुठेच लक्ष लागत नव्हतं .. ना घरात ना बाहेर..म्हणून म्हणतीये की तुम्ही माझ्याशी सर्व बोलून टाकावं...
राघव :- आता तुला coffee shop मध्ये त्याने सांगितलंय ना सर्व..बस आणखी त्या व्यतिरिक्त काहीही नाहीये...
रागिणी:- मग कराल का मी जे सांगेल ते.
राघव:- बर सांग बघेन आवडलं तर करेलच
रागिणी :- तिला आपल्या घरी बोलवा
राघव काय घरी बोलवा..म्हणजे ती माझ्याबद्दल उलट सूलट सांगेल म्हणजे त्या ने आणखी भांडण तयार होतील अस वाटत नाही का तुला..
रागिणी- नाही वाटत कारण मी ही तुम्हाला ओळखते, तुम्ही कसे आहात हे मी जाणते..आणि माझा विश्वास आहे तुमच्यावर त्यामुळे ..आपल्यात भांडणं होणार नाहीत ह्याची शाश्वती मी देते मग तर झालं..
राघव:- बर ठिकेय मी बोलतो तिला पण एकदाच नंतर परत कधीच नाही..
रागिणी:- बर एकदा तर एकदाच..

दिवस चौथा

राघव, रागिणी आणि राजश्री सोफ्यावर बसलेले असतात..
रागिणी:- राजश्री घाबरू नकोस निवांत बस..काही लागल्यास सांग मला, आणि ह्यांच्या ऑफिस मध्ये लय झालंय ते माहितीये मला..आणि त्या वर एक उपाय म्हणून मी तुम्हाला सुचवु इच्छिते.. चालेल न

राजश्री राघव कडे पाहत होकारार्थी मान हलवते

हे बघा भूतकाळात ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या तिथेच राहू दिल्यात तर... तर पुढचा प्रवास हा आनंदात जाईल कुठल्याही त्रासा विना... त्यामुळे तुम्ही मागचं चांगलं वाईट डोक्यात न ठेवता पुढला प्रवास करावा अस मला वाटत..काय राघव

राघव:- amm तुला काही त्रास नाही ना पण?
रागिणी:- नाही मला काही प्रॉब्लम नाही. कारण हा निर्णय तुम्हाला तुमच्या ऑफिस मधल्या कामात चांगला ठरेल अस वाटतं म्हणून मी हे पाऊल उचलायला लावतीये. आणि राहिली गोष्ट राजश्रीची, मला राजश्रीचीही परिस्थिती माहितीये..त्यामुळे तिलाही मदत होईल.

राघव:- बर ठिकेय चालेल राजश्री उद्या ऑफिस ला येऊन जाशील
राजश्री:- हो..

राजश्री निघून जाते

राघव:- amm रागिणी एक मिनिट

रागिणी:- ह बोल
राघव:- अग मला कधीच वाटलं नव्हतं की हा प्रॉब्लम माझ्याने कधी solve होईल म्हणून..तू आज मदतीस होतीस म्हणून मी ह्या पेचातुन सुटलो..त्या करिता खरंच मला तुझे आभार मानावेसे वाटत.
रागिणी:- एवढं काहीही करायची गरज नाहीये..उठा तयारी करा आणि कुठेतरी फिरायला घेऊन जा म्हणजे झालं...

त्यांनी त्यांचा समस्या एकमेकांतच वाटून संपवल्या त्यांना तिसऱ्या व्यक्तीची गरज पडली नाहीच, नाहीतर
दोघात तिसरा आता सगळं विसरा अस म्हणायांची वेळ खूपदा येऊन जाते..आणि सर्व विस्कटून जातं.


समाप्त


(टीप:- सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...)

मयुर श्री बेलोकार

9503664664

Insta@shabd_premi