नवा योद्धा shabd_premi म श्री द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवा योद्धा

नवा योद्धा
मोठा वऱ्हांडा असलेली ती जागा. उजव्या बाजूने एकुण तीन खोल्या एकामागे एक. उजव्या बाजूची भींत पूढची, मागची आणि वरची ही सोन्याने मढवलेली. त्यावर कोरीव काम. त्या बाजूला भिंतीवर आकाशातून पडणार प्रकाशाची किरणं सुद्धा सोनेरी व्हावी. डाव्या बाजूने काही ठराविक अंतरावर असलेलें तीन खांब. तीनही खोल्यांना विभागणारे. सध्या आभाळातून पडणारा सरळ पोहचू शकत नसल्याने मला तेवढं सोनेरी वाटत नव्हतं. पण दुपारच्या वेळी ती भिंत किती उजाडेल याचा अंदाज येऊन गेला होता. तो वऱ्हांडा सुरू होईल त्याच्या दोन पावलं मागे उभा होतो. अंगावर पांढरं कापड गुडघ्यापर्यंत येईल असं. खुंब्यापर्यंत येणाऱ्या बाह्या, कंबरेला बाहेरून खाकी कलरचा पट्टा , हाती एक तलवार घेऊन पुढे चालू लागतो. मी ती पायरी ओलांडली. उजव्या बाजूने पहिला दरवाजा आला, आत अंधार होता. तो दरवाजा कमी आणि मोठी उभी खिडकी जास्त वाटत होती. बाहेरचा प्रखर प्रकाश काही करून आत जाऊ शकत नव्हता, याचं नवल वाटलं.
इथे येण्याआधी मला कुणी तरी भेटायला बोलावले आहे असे म्हणून पाठवले होते. ते कसे आहेत याची चांगली कल्पना‌ मला मिळाली होती. त्यामुळे सावकाश आणि विचार करत करत मी पुढचं पाऊल टाकत होतो. डाव्या बाजूला काही अंतरावर खांब होता. एक पायरी खाली उतरून काही अंतरावर पुढे भींती आणि भींतीवर राक्षसरूपी वेली लोमकळत होत्या. मी त्यांच्याकडे पाहणंच बंद केलं. मी पुढे सरकत पुढच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलो होतो.

ह्याही दरवाजातून काळोखच बाहेर पडत होता. आता पुढे उरला होता तो फक्त तिसरा दरवाजा. मनात धाकधुक वाढत होती. आणि वारंवार त्या भिंतीवर सोन्यात मढवलेले ते नक्षीकाम पाहून मनात त्याला स्पर्श करून मनातले कुतूहल शमविण्याची इच्छा वाढतच होती. तरीही मी धीर धरला आणि पुढे सरकलो. मी तिसऱ्या दरवाजापाशी उभा राहिलो. पुढे दरवाजा नव्हता म्हणून मी आवाज ‌द्यायचा ठरवलं. मी हाक मारली.
काही सेकंदांनी जुनाट चाकांचा चालतानाचा आवाज येऊ लागला‌. पण तो खुप‌ सौम्य होता. आणि मध्येच थांबला. तरी दरवाज्यारून काही दिसत नव्हतं. मी पुढे गेलो. पायरी खाली उतरलो. डाव्या बाजूने पुढे एक दरवाजा होता. त्या दरवाज्याकडे जाण्याआधीच मागे वळालो. मी दरवाजात वळून पाहिले तर तिथे कुणीतरी येऊन बसलेलं होतं. दरवाज्याच्या थोडं आत एका व्हीलचेअरवर तो विराजमान होता. खोलीतलं इतर कुठलंच सामान त्याच्या शिवाय प्रकाशमय नव्हतं. मी त्याला पाहताच त्याला तिथपर्यंत सोडणारी व्यक्ती तिथून नाहीशी झाली. तो माझ्याशी बोलू लागला.
तो : आजवर मी‌ असंख्य लोकांना‌ पायाखाली‌ तुडवले. हजारो लोकांना कंठस्थानी घातले. शेकडो लोकांना जिवंत जाळून मारले. आणि बघ आज माझे असे हाल झाले आहेत.
त्याने अचानक बोलायला सुरुवात केली, आणि तेही माझ्याबद्दल काहीही न विचारता. मला त्याच्या बोलण्यातून त्याचा क्रुरपणा जाणवतच नव्हता. उलट मला त्या मेलेल्या लोकांपेक्षा त्यावर उद्भवलेल्या परिस्थितीची किव येत होती. त्याला पाहता पाहताच माझ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. त्याचा देह ३/४ फुटी होता. त्यामुळे खुर्चीवर तो बसलेला कमी झोपलेला जास्त वाटत होता. चेहरा फणसासारखा काटेरी लाल होता. त्याचं शरीर गळ्यापासून पायापर्यंत झाकून‌ होते. घातलेल्या सोनेरी कापडावर सुर्यप्रकाश थेट पडत असल्याने ते चकमकत होते. आणि त्यामुळे मला माझी नजर स्थिर ठेवता येत नव्हती.
मला काय बोलावे हे कळत नव्हते, त्याला काय बोलायचे हे तो बोलून गेला होता. मी माझ्या आजूबाजूला नजर फिरवू लागलो. तेवढयात मागच्या दरवाज्यातून मला तलवारी चालवण्याचा आवाज आला, मी मागे वळून परत दरवाज्यात पाहिलं तर क्षणार्धात तो तिथून गायब झाला होता. मी तलवारीच्या आवाजाकडे वळलो. डावीकडे वळून खाली उतरलो, पुढे तीन चार पावलं चाललो आणि डाव्याबाजूला असलेल्या मोठ्या काचेच्या दरवाज्यातून दोन लढाऊ बाहेर पडत होते. मी माझ्या तलवारीच्या मुखावर हात ठेवला आणि म्यानीतून तलवार काढणार तेवढयात माझ्या स्वप्न तुटलं. आपला पणजोबा आपल्या नातवाला धडे देत होता हे मला उठल्यावर कळले..

(टीप:- सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...)

मयुर श्री बेलोकार

9503664664

Insta@shabd_premi