Sparsh - 21 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 21

मानसी केवळ 4 दिवसासाठीच इथे आली होती आणि लगेच निघूनही गेली ..या चार दिवसात मला थोडे फार क्षण तिच्यासोबत जगता आले होते ..पण ती पुन्हा एकदा परतली आणि मी पुन्हा एकदा एकटा पडलो ..ती गेली पण माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन ..खरच तिला चुकीच्या स्पर्शाला तर सामोरे जावं लागलं नव्हतं ना ?? ..आणि असेल तर मग तिने हे सर्वाना का सांगितलं नाही ? आणि न सांगता ती इतके दिवस राहू तरी कशी शकली ?? तिला यातना झाल्या नसतील का ? असे कितीतरी प्रश्न मला सतावत होते आणि नकळत डोळ्यात पाणी येत होतं ..आज मी जाणूनच मानसीला फोन केला नव्हता नाही तर तिला माझ्या मनातील सर्व कळाल असत ..मी शांत पडून विचार करत होतो ..

प्रेम किती सुंदर गोष्ट ना ? ..प्रत्येक पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा कुठेतरी तीच बाह्य रूप त्याला आकर्षित करीत असत आणि खरी सुरुवात तिथूनच होते .एखादी सुंदर मुलगी दिसली की तीच संपूर्ण शरीर निहाळणारे पुरुष प्रेमात पडतात तेव्हा तिच्या चेहऱ्याकडे बघायलासुद्धा भिऊ लागतात मग शरीराकडे बघणं खूप दूरच राहील .वा !! काय जादू असते न प्रेमात ..काळ बदलत गेला आणि प्रेमाने अभद्र रूप धारण केल ..प्रेयसीच्या मनाची जागा वन नाईट स्टँडने घेतली आणि प्रेमाचा सुंदर अर्थ कुठेतरी हरवत गेला ..आई - वडील टीव्हीवर बेड सिन तर पाहू लागले पण एखाद्या आईने आपल्या मुलीला चुकीचा स्पर्श काय असतो हे सांगण्यात नेहमीच माघार घेतली ..काळ बदलत गेला आणि नात्यांचे अर्थ बदलत गेले ..आधी स्त्री सर्वात जास्त सुरक्षित ही आपल्या कुटुंबात राहत असे पण अलीकडे तिच्यावर अत्याचार हा घरूनच होतो .एवढंच काय जन्मदाताही तिच्यावर हात साफ करू लागला ..कधी एखाद्या मुलीने आपल्यावर घडणार्या अत्याचारांची माहिती घरच्यांना दिली आणि त्यांनी फक्त समाजात आपली इज्जत खराब होऊ नये म्हणून तिला शांत बसायला लावलं ..असे प्रसंग मी रोज वर्तमानपत्रात , टीव्हीवर पाहत होतो ..या काळात ती नेमकी तुटून जाते हेही बऱ्याचदा एकल होत तेव्हा अंगावर चटकन काटा उभा राहायचा आणि एक आक्रोश उफाळून यायचा ..पण इथे तर माझ्या जिवलग व्यक्तीचा प्रश्न होता ..तिच्यावर कुणितरी अत्याचार करीत असल्याचे चित्र प्रत्यक्ष समोर दिसायचं ..तिच्या तोंडावर कुणितरी हात ठेवलेला असायचा आणि तिचे डोळे सर्व काही सांगून जायचे असे स्वप्न मला अलीकडे पडू लागले होते ..मनात खूप जास्त भीती निर्माण झाली ..मला तिला विचारायचं होत की मानसी काही तरी बोल पण ती ते सांगताना तुटून गेली असती तर मी कदाचित नेहमीसाठी तिला गमावून बसलो असतो म्हणून शांत बसून तिच्या उत्तराची प्रतीक्षा करू लागलो..
जवळपास चार महिने याच विचारात मी घालवले .. तिच्याशी बॉंतानाही तिच्या आवाजामध्ये एक वेगळीच कशीष जाणवत होती ... तस तर ती कॉलेजमधल्या सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करत असे पण मला हवं असलेलं उत्तर तिने या काळात कधीच सांगितलं नव्हतं त्यामुळे कधीकधी चिडचिड व्हायची ...तरीही ती शांत असायची आणि नेमकं त्याच शांततेत मी हरवून जायचो ...मानसी काही चुकीच पाऊल उचलणार तर नाही ना ? माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना ? अशी भीती सतत लागून असायची पण ते तिला सांगता येत नव्हत ..तिला मला सांगायचं होत की प्रत्येक पुरुष सारखा नसतो काहींना तुमच्या शरीरापेक्षा तुमचं मन जास्त आकर्षित करीत असत त्यामुळे माझी मनाने हो ..पण ती अशा भोवऱ्यात अडकली होती जिथे तिला मनात दाबूनही ठेवता येत नव्हतं आणि व्यक्तही होता येत नव्हतं ..

तुझको छु के भी छुने को डरता है दिलं
तुझको पाके भी पाने को डरता है
कैसे कहू तुमसे कितनी मोहब्बत है
हा मोहब्बत है ....
अशीच एक संधी चालून आली ..28 जुलैला माझा वाढदिवस असतो ..मला सेलिब्रेट करायला आवडत नसल तरीही घरच्यांच्या सहवासात तो संपूर्ण दिवस मला घालवायला आवडत असे ..मानसीला सेलिब्रेशनची तयारी करायची होती पण आईने नकार दिल्यावर ती शांत बसली होती ..मला जरी सेलिब्रेशन आवडत नसल तरीही आई काहीतरी नक्कीच गोड बनवायची आणि माझ्या जिवलग लोकांबरोबर तो क्षण मी घालवत असे ..जुलै महिना सुरू झाला होता आणि पावसाने गती पकडायला सुरू केली ..मुंबईपासून औरंगाबादपर्यंत पावसातच कसातरी आलो होतो ..घरी पोहोचेपर्यंत पाण्याने चिंब भिजलो होतो त्यामुळे लगेच बेडरूमला पोहोचलो ..मानसी आताही पुस्तक वाचण्यात व्यस्त होती ..तिने मला तशा अवस्थेत बघितलं आणि लगेच जाऊन टॉवेल घेऊन आली ..मी तोपर्यंत कपडे चेंज करून बेडवर बसलो ..तिने मला डोकं पुसायला हातात टॉवेल दिला आणि मी तिच्याकडे बघून हसलो ..माझ्या बोलक्या डोळ्यांनी तिला काहीतरी सांगितलं आणि तिलाही ते समजलं ..आता ती स्वताच टॉवेल घेऊन माझं डोकं पुसू लागली ..मलाही तेच हवं होतं . तिने डोकं पुसून काढलं होत तरीही मला तिचा सहवास हवा असल्याने मी तिला बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही ..शेवटी आई जेवण करण्यासाठी बोलवायला आली आणि मानसी बाजूला जाऊन बसली ..आई तिच्याकडे पाहून हसत म्हणाली , " तुमचा रोमान्स झाला असेल तर चला जेवण करून घेऊ .. " आणि ती पान वाढण्यासाठी निघून गेली ..काही वेळात आम्हीही तिला जॉइन झालो ..मी दिवसभर प्रवास करून थकलो होतो त्यामुळे लगेच झोपी गेलो ..

रात्री फार थकून झोपलो होतो त्यामुळे रात्री कुणीच विश केलं नाही ..सकाळी उठलो तेव्हा पावसाची संततधार सुरू होती ..मराठवाड्यात तसा पाऊस नसतोच पण आज मात्र सकाळपासूनच तो पडत होता ..आई दर वाढदिवसाला मला ओवाळत असे त्यामुळे सकाळी - सकाळी उठून तयार झालो ..मानसीने सकाळी उठताच मला विश केलं आणि मीही ते मनापासून स्वीकारलं ..तीही आज सकाळी - सकाळीच तयार झाली होती ..हॉलला पोहोचलो तेव्हा आई ओवाळणीच ताट धरून उभी होती ..मी लगेच पाटावर बसलो आणि तिने ओवाळण्यास सुरुवात केली ..आईने मिठाईचा तुकडा भरवला ..लग्नानंतर माझा पहिलाच वाढदिवस होता त्यामुळे मानसी देखील ओवाळू लागली ..ओवाळणी संपली आणि लगेच आईला म्हणालो , " आई माझं गिफ्ट ? " , आणि ती हसत म्हणाली , " तुला तर आवडत नाही ना म्हणून आणलं नाही .." मी थोडा निराश होण्याचं नाटक करू लागलो आणि तिने मला नेहमीप्रमाणेच आवडत बुक दिलं ..समोर जाऊन बाबांना नमस्कार केला आणि त्यांनीही डब्यातून घड्याळ काढून माझ्या हातात घातली ..बाबा काहीच वेळात ऑफिसला निघाले आणि आई स्वयंपाक करण्यात व्यस्त झाली ..मानसीच कॉलेज होत पण तीही माझ्यासोबत घरीच थांबणार होती ..इकडे मित्रांनी सकाळीच विश केलं पण सर्वाना ऑफिस असल्यामुळे ते सकाळी येऊ शकणार नव्हते म्हणूनच आईने सर्वाना रात्री जेवण करायला बोलवून घेतलं होतं ..त्यामुळे मी आज दिवसभर घरीच होतो ..दुपारी मस्त टीव्ही पाहण्याचा मूड झालाच होता की बॉसचा फोन आला आणि त्यांनी एका क्लायंटशी बोलायला सांगितलं ..खूप महत्त्वाचे क्लायंट असल्याने त्यांना नकार देता येन शक्य नव्हतं ..त्यांच्या सिस्टिममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असल्याने त्यांनी मला फोन केला होता ..फोनवर बोलणं सुरू होत तरी प्रॉब्लेम काही सुटत नव्हता शेवटी मी तिथे आल्यावर सर्व बघेन म्हटलं आणि तेव्हा कुठे त्यांच्यापासून सुटका मिळाली ..या सर्वात तास - दोन तास असेच निघून गेले ..डोकंही भरपूर दुखू लागलं होतं ..मी आईला डोकं चेपून द्यायला सांगितलं आणि दुपारीच पुन्हा एकदा झोपी गेलो ..

" अजूनही झोपतच आहेस का ? " , विकास म्हणाला आणि माझे डोळे उघडले ..बाहेर बघितलं तर अंधार पडायला आला होता ..पावसाने आणखीनच वेग घेतला होता तर जिकडे - तिकडे पाण्याच्या टपोऱ्या थेंबाचा आवाज येऊ लागला होता ..त्यांनी मला हग करत विश केलं ..त्याला हॉलमध्ये बसायला सांगून मी फ्रेश व्हायला गेलो ..फ्रेश होऊन परत हॉलला पोहोचलो ..आतापार्यंत माझी वाट पाहत असणारे शाश्वत , सोनाली मला पाहताच उभे झाले आणि त्यांनीही हग करून विश केलं ..आईने आधीच चहा टाकला होता ..चहा घेतच आम्ही पुढील गप्पा मारू लागलो ..आकाशात वीजा फार कळाळत होत्या आणि आईने स्वयंपाक बनविण्यासाठी घाई केली ..मानसीदेखील आईला त्यात मदत करू लागली ..आमच्या बऱ्याच गप्पा सुरु होत्या ...मी विकास , सोनालीला केनिबद्दल सांगितलं आणि तेही फार खुश झाले होते ..आता शाश्वतच्याही लग्नाची चिंता मिटणार होती ..बाबाही ऑफिसवरून आले ..आईने लवकरच स्वयंपाक रेडी केला आणि आम्ही जेवायला बसलो ..आज जेवणात गुलाब जामुन , पुरी -भाजी , दह्याची कढी , भात , साधं वरण असा साधाच बेत होता ..पण त्या दोघीनीही स्वयंपाक इतका सुंदर बनवला होता की आम्ही शांतपणे सर्व संपवू लागलो ..आज सर्व काही वेगळं होत . पावसात लवकर निघता यावं म्हणून सर्व पटापट जेवण करीत होते आणि पहिल्यांदाच जेवण करताना कुठलाच गोंधळ नव्हता..काहीच वेळात सर्वांचं जेवण करून झालं आणि ते मला वाढदिवसाच गिफ्ट देऊन लगेच घरी निघाले ..

माझं जेवण आटोपलं आणि मी बेडरूमला जाऊन पोहोचलो ..मानसिही सर्व काही आवरून बेडरूमला येणार होती....बाहेर विजांसहित धो - धो पाऊस सुरू होता ..आणि मी खिडकीतून ते सर्व पाहत होतो....मानसी बेडरूममध्ये येत म्हणाली , " अभि काय पाहतो आहेस ? " आणि मी उत्तरलो , " काही नाही ग या पावसाला बघतोय ..आज बहुतेक खूप दुखावला आहे म्हणून खूप पडतोय नाही तर सहसा आपल्याकडे पाऊस पडत नाही .."

" बर एक ना !! आज सर्वांनी तुला काहीतरी गिफ्ट दिलं पण मी काहीच देऊ शकले नाही ...तू माग ना हवं ते तुला मी देईल .." , मानसी म्हणाली आणि मी तिच्याकडे पाहत म्हणालो , " तूच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट आहेस आणखी काहीच नको .." आणि ती चेहरा पाडत म्हणाली , " अस कस ? ..माग की काहीतरी तुला आज हवं ते देईल .."

मी थोड्या वेळ विचार करू लागलो ..सर्वच तर होत माझ्याकडे फक्त एक गोष्ट नव्हती तो स्पर्श ज्यासाठी मी सात वर्षे वाट पाहिली .." बघ हा हवं ते मागू ना ?? देशील ?? " , मी म्हणालो आणि ती हसत म्हणाली , " हो काहीही माग फक्त माझा जीव सोडून .."

मी पुन्हा कस बोलू म्हणून विचार करू लागलो ..आणि शेवटी हिम्मत करून म्हणालो , " खर सांगू तर आयुष्यात तुझ्या रूपाने सर्वच काही मिळालं फक्त आतुरता आहे ती एकाच गोष्टीची ..कॉलेजच्या पहिल्या दिवशी जेव्हा तुझा पहिला स्पर्श अनुभवला तेव्हपासून तुझाच झालो पण मला आतुरता आहे तुझा होण्याची ..तुला काही हरकत नसेल तर मला सामावून घेशील स्वतात आणि देशील त्या पहिल्या - वहिल्या स्पर्शाचा आनंद .." आणि ती माझ्याकडे पाहून हसत म्हणाली , " बस एवढच ..मी तुझीच तर आहे ..ये आणि तूच सामावून घे मला स्वतात .."

तिने दोन्ही हात समोर करून मला मिठीत घेतलं ..काही वेळ आम्ही तसेच होतो ..मी तिला आपल्या बाहूत उचलून बेडवर ठेवलं ..ती फक्त माझ्याकडे पाहत होती .. आणि मी त्या क्षणात हरवून गेलो ..कधी डोळ्यांच्या पापण्यांवर चुंबन घेऊन तिचे संपूर्ण अश्रू पिऊन घेत होतो तर कधी ओठातून तो गुलाब पाकळ्यांचा रस शोषून घेऊ लागलो ..तिने डोळे घट्ट बंद करून घेतले होते ..हळूहळू संपूर्ण शरीरावर चुंबनाचा वर्षाव होऊ लागला ..तिने अजूनही आपले अबोल डोळे खोलले नव्हते तर मला त्याक्षणी थांबायची इच्छा नव्हती ..हळूहळू ते लाजेचे पडदे आमच्यातून दूर होऊ लागले आणि आम्ही एकमेकात सामावू लागलो ..आयुष्यात आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो त्या व्यक्तीचा स्पर्श अनुभवण्यास नशीब लागत आणि तो क्षण माझ्यासाठी अधिकच खास होऊ लागला ..बाहेर पडणारा धो - धो पाऊस , कडाडणाऱ्या वीजा आम्हाला एकमकेंजवळ आणत होत्या आणि आज प्रत्यक्षात ती माझी होऊ लागली ...बाहेर गुलाबी थंडी पडत होती आणि वरून फक्त अंगावर चादर तर मी आताही तिच्या कुशीत झोपून ..स्पर्शाची जादू आजपर्यंत फक्त एकत आलो होतो पण आज तो अनुभवून स्वर्गात गेल्याची अनुभूती व्हायला लागली ..मी रात्रभर तिच्याच कुशीत झोपून होतो ..

सकाळी उठल्यावर तो रात्रीचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहू लागला आणि त्या प्रसंगाचा आनंद माझ्या चेहऱ्यावर जसाच्या तसा दिसत होता ..आईला माझ्या आनंदाच कारण कळून चुकलं होत ..आणि तीही आज सर्वात जास्त खुश होती ..शेवटी तिलाही नातवंड बघायची होती ...आज मी इतका खुश होतो की कुणी काहीही मागितलं असत तर देऊ केल असत ..सकाळपासून मानसी एकदाही माझ्यासमोर आली नव्हती ..मी तिच्यासमोर जायचो आणि ती कुठलही काम काढून माझ्यापासून दूर पळत होती ..मीही तिला त्रास न देता शहाण्या बाळासारखं वागत होतो ..दुपारचं जेवण झालं आणि मी बाहेरून फिरून आलो ..मानसी तेव्हा पुस्तक वाचत बसली होती ..सकाळपासून जो आनंद माझ्या चेहऱ्यावर होता तो मला कुठेच तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता ..मी तिच्या बाजूला बसत विचारू लागलो , " मानसी काही झालं आहे का ? ..मी काही चुकीच वागलो का ? की तुला काही त्रास आहे ? ...सकाळपासून बघतोय तुला पण तू खुश नाही आहेस ..काही असेल तर सांग " , आणि ती हसून म्हणाली , " ओ नवरोबा काय आहे न तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर की थोड्याश्या वेळ जरी चेहऱ्यावर हसू दिसलं नाही तरी तुम्हाला माझी काळजी वाटू लागते ..थोडी थकले होते कालच्या प्रसंगाने म्हणून थोडा थकवा आहे बाकी काही नाही ..बर ते सोड मी एक विचारू तू त्याच उत्तर देशील ..? "

मी मान हलवली आणि ती लगेच विचारू लागली , " अभि अस होऊ शकत का एखाद्या व्यक्तीचा सहवास आपल्याला खूप आवडतो पण स्पर्श नाही ..इज ईट पोसीबल ? " मी थोडा विचार करत म्हणालो , " कस शक्य आहे ? हो पण जेव्हा आपल्याला स्पर्शाबद्दल मनात भीती निर्माण होते तेव्हा हे होऊ शकत ..तू का बरं विचारलं हे सर्व ? " आणि ती त्या क्षणी गोंधळली ..माझं त्या क्षणी सर्व लक्ष तिच्यावर होत ..तिलाही ते जाणवलं आणि स्वताला सावरुन घेत म्हणाली , " अरे काही नाही अभि ह्या पुस्तकात तस लिहिलं आहे म्हणून विचारते आहे ..बाकी काही नाही ..अरे हो सॉरी तुला आराम करायचा होता ना तर पड मी उगाच तुला काहीही विचारत बसले .." ती पुन्हा पुस्तकात व्यस्त झाली ..मीही झोपू लागलो ..

मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं म्हणून मी त्या पुस्तकाच नाव डोक्यात फिट केलं ..आणि सायंकाळी जाऊन आधी ते पुस्तक खरेदी करून घेऊन आलो ..तिच्यासमोर ते पुस्तक वाचता येणार नव्हतं म्हणून आणून बॅग मध्ये लपवून ठेवलं ..रात्र सरली आणि पुन्हा एक दिवस उगवला ..बाहेर पाण्याचा मौसम असल्यामुळे मी कुणालाच सोबत येऊ दिलं नाही ..एअरपोर्टवर पोहोचलो ..तिकीट कलेक्ट केले आणि फ्लाइटमध्ये बसलो ..सर्वांनी मोबाइल स्वीच ऑफ केले आणि मी पुस्तक काढलं ..पुस्तक वाचायला सुरुवात केली ..हळूहळू एक - एक पान पलटवू लागलो .कथा फारच रंगात येत होती ..मीही कथेच्या प्रत्येक पात्रात हरवून गेलो ..फ्लाइट कॅनडाला पोहोचेपर्यंत माझं संपूर्ण पुस्तक वाचून झालं होतं आणि माझा चेहरा आता पूर्णतः उतरला होता ..कारण मानसीने विचारलेल्या प्रश्नाबद्दल इथे काहीच लिहून नव्हतं ..मुळात ते पुस्तक त्या विषयाशी संबंधित नव्हतं ..माझं डोकं सुन्न झाल होत ..मानसी इतकी का खोटी वागत होती माझ्याशी ? ..ही तुफान येण्यापूर्वीची शांतता तर नव्हती ? आणि खरच ही चाहूल होती येणाऱ्या वादळाची ज्याने माझ आणि मानसिच संपूर्ण आयुष्य बदलणार होत ..काय होत ते वादळ ..?


क्रमशः ...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED