novel Jivalaga Part 34 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ..भाग -३४ वा

कादंबरी – जिवलगा

भाग – ३४ वा

------------------------------------------------------------

अनिता -सोनिया आणि नेहा रोजच्या प्रमाणेचऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या , आणि गेटच्या

बाहेर आल्यावर त्यांना हेमू पांडे उभा आहे असे दिसले .

अनिता म्हणाली ..सोनिया .. जरा बघ बरे आपल्याला समोर उभा दिसतो आहे

तो आपला हेमू पांडेच आहे ना ..ग !

सोनिया म्हणाली ..मी सांगितले असते ग..काय करू ..

मेरी दूर की नजर जरा काम होई गयी ही आजकाल .. !

असे करू या - जरा या नेहालाच सांगू या

नेहा बघ आणि सांग तरी नक्की कोण आहे तो ..

तो पलीकडे पलीकडे उभा असलेला इसम ..!

त्या दोघींची मस्करी नेहाला कळत होती ..

पण, ती एक शब्द न बोलता ऐकत राहिली ..

शेवटी अनिता म्हणाली ..

ए नेहा बेबी ..जा , तुझ्यासाठी थांबलाय वाटते तो ,

आम्ही येतो नंतर , तू जा ..त्याचे बरोबर .!

तरी ही नेहाने त्यांना काहीच उत्तर दिले नाही ..जणू तिचा काही संबंध नव्हता .

मग शेवटी तिघी जणी रस्ता क्रोस करून गेल्या आणि

त्याच्या समोर उभ्या राहिल्या .

सोनिया म्हणाली –

क्या रे बाबू ..नेमका कुणासाठी थांबला आहेस तू ?

नेहासाठी थांबला असशील तर आम्ही दोघी आधी कटतो इथून ..

मागून तुम्ही दोघं या मिळून.

आम्ही उगीच कबाब मी हड्डी नको ..!

हे सगळं ऐकून घेतल्यावर हेमू त्यांना म्हणाला ..

अनिता आणि सोनिया दीदी ..मी तुम्हा दोघींना

आणि माझ्या या कलीगला –नेहाला

आज डिनर-पार्टी साठी invite करायला आलोय .

समोरच्या फेमस हॉटेलकडे हेमू बोट दाखवत म्हणाला .

आज रात्री ९ वाजता आपण या शानदार हॉटेलमध्ये भेटू या ..

सोनियाने विचारले – कारे बाबा ..न मागता पार्टी ?

इतके स्पेशल कारण काय ? सांग तरी आम्हाला ..

नाही दीदी .. पार्टीला आल्यवर ..डिनर घेता घेता मी ते कारण शेअर करणार आहे !

तो पर्यंत सस्पेन्स ..!

चला भेटू या रात्री नऊ वाजता ..असे बोलून ..हेमू पुढे निघून गेला .

कशासाठी असेल बाबा ही पार्टी ?

असा आश्चर्य वाटल्याचा भाव नेहाच्याही चेहेर्यावर दिसतो आहे हे पाहून सोनिया –अनिता

म्हणाल्या ..

काय कारण असेल..पार्टीचे ..?

उगीच्या उगीच पार्ट्या देणारा वेडा नाहीये हा हेमू ..

ए नेहा ..तुझ्याजवळ काही बोललाय का ग तुझा हा हिरो ..!

नेहा पटकन म्हणाली -

काय अनिता –! तुला तर माहिती आहे चांगलं ..

हेमू आणि माझ्याशी बोलणार ?,शक्यच नाही ..

मला वाटते बहुदा -

मी त्याच्याशी अजिबात बोलत नाही !

अशी तक्रार करायची असणार दुसरे काय कारण असणार ?

सोनिया म्हणाली –

ए नेहा काही पण बोलू नको यार ..

नक्की काही तरी कारण असणार ..

किंवा ..आम्हाला मस्का लावायचा असेल ..तुझ्यासाठी ,

खरेच ..हे कारण असू शकते बरे का ..पार्टीचे ..अनिता म्हणाली ..

ए नेहा ..हो म्हण ना या गरीब पोराला ,त्याच्या प्रेमाला स्वीकार ,

फार छान आणि गुणी लेकरू आहे ग हा हेमू पांडे ..!

इतका असा अंत नको पाहू आता त्याचा ..

अनिता आणि सोनियाचे हे बोलणे ऐकून ..नेहा मनातल्यामनात हसत होती ,

मोठ्या प्रयत्नाने तिने तिच्या मनावर कंट्रोल ठेवला होता . आपला चेहेरा अधिकच

निर्विकार आणि कोरडा ठेवीत ..ती दोघींचे बोलणे ऐकत आहोत असे दाखवू लागली .

शेवटी..सोनिया म्हणाली ..

अशा हवेत गोळ्या काय झाडायच्या उगीच ..!,डिनरला गेल्यावर समजेलच की .

आणि तिघीजणी ऑफिसला पोचल्या .

नेहाचे आज कामामध्ये बिलकुल लक्ष लागत नव्हते , आणि एकमेकांच्या समोर

बसणे नको , निदान आज तरी ..असे ठरवून .

हेमू ऑफिस –सिस्टीम चेकिंग निमित्त काढून लगेच बाहेर पडला होता .

नेहाच्या मनात विचार येत होते ..

हेमू आज सोनिया आणि अनिताला सांगणार , मग हे तिघे मिळून मधुरिमादीदीला सांगणार ,

दिदिकडून ही बातमी लगेच मावशी आणि काकांना समजणार ..

आणि ..मावशीला ही बातमी ..

तिच्या बहिणीला म्हणजे ..आपल्या आईला कधी सांगेन असे होणार ..

आणि मग ..आपल्या घरी समजल्यावर ..?

सगळ्यांची प्रतिक्रिया कशी असेल ?

एक तर नेहा असे काही करेल ? हे कुणी गृहीतच धरलेले नाही , की कुणी अशी कल्पना

सुद्धा करणार नाही .

त्यांच्या दृष्टीने ..नेहा असे काही करूच शकत नाही..

आणि मावशी सांगेल त्यवर विश्वास ठेवतील का सगळे ?

आपल्या घरातील मोठ्या माणसांना ,आपल्या बहिण-भावंडांना ,वहिनींना काय वाटेल ? हे ऐकून ..

नोकरीच्या नावाखाली ..हे काय करते आहे नेहा ..कुणाच्या प्रेमात पडली आहे कुणास ठाऊक ?

त्यांना हे आवडणार नाही हे तर नक्कीच .म्हणून ..विरोध करतील सगळे ..

तेव्हा काय करणार आहोत आपण ?

नेहा क्षणभर ..मनातून थरारून गेली ..

हा विचार तर आपण केलाच नाहीये ..!

आणि हेमू पांडेच्या प्रेमाला होकार देऊन बसलोत ..

बाप रे ..!

तसे तर ..लग्नबद्दल आताच काही निर्णय घायचा नाहीये हे एक अर्थाने बरेच आहे

पण, आपण या सगळ्यांना सांगू या ..की सध्या ही गोष्ट आपल्यातच राहू द्या ,अगदी ..

मधुरिमादीदीला पण नाही सांगयचे ..म्हणजे ..ही बातमी पुढे कुठे सरकणार नाही.

असे प्रोमीस केले तरच आज आपण अनिता आणि सोनियाच्या समोर हेमुला “होकार “

द्यायचा ..!

या विचाराने तिला धीर आला खरा ..

त्याच वेळी जाणवले तिच्यावर हेमुचे जसे प्रेम आहे ..

तसे आता आपल्या मनातही त्याच्याविषयी प्रेमभावना नक्कीच आहे ..

आणि म्हणूनच .काल त्याला “हो “म्हणून बसलोत .

तसे पाहिले तर ..एक स्थळ “म्हणून हेमुचे नाव तिच्यासाठीच्या वर-संशोधन लिस्ट मध्ये नक्कीच येण्यासारखे आहे

हे खरे असले तरी ..प्रोब्लेम असा आहे की ..

तिच्या घरच्यांनी तिच्याबद्दल अजून असा विचारच केलेला नाहीये ..कारण ..तिच्या मोठ्या भावाचे

अजून लग्न व्हायचे होते ..तिच्यात आणि भावात चार-पाच वर्षांचे अंतर होते , भावासाठी मुली पाहणे

सुरु झालेले होते , मोठा भाऊ तिच्या वडिलांप्रमाणे वकील झाला होता .आणि वडिलांचे ऑफस यापुढे

त्याच्याकडे येणार होते . आणि वकिली प्रोफेशन .असलेला मुलगा ..मुलींना सहज सहजी पसंत पडणे सोपे नव्हते .

त्यामुळे नेहासाठी वर-संशोधन मोहीम सुरु करण्याची तशी घाई नव्हती .कारण नुकतीच तर ती इंजिनियर झाली होती

, जॉब पण करीत होती , अशा या सगळ्या गोष्टीमुळे .एक-दोन वर्षांचे मार्जिन सहज होते .

थोडक्यात “लगीनघाई “ म्हणवे असे काही नव्हते .

आणि असे असतांना ..आज आपल्या आणि हेमू बद्दलची बातमी ..व्हाया मधुरिमा ..व्हाया मावशी

आपल्या घर पर्यंत जाऊ न देणे ..हाच उपाय .करणे हिताचे आहे.

कारण..हेमू जरी प्रपोज करणार आहे, आपण त्याला होकार “ देणार आहोत ..

म्हणून लग्नाची घाई बिलकुल करायची नाहीये ..कारण पाच –सहा महिने वेळ घेऊन एकमेकांच्या

बद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

एकूण ..आजची गुड न्यूज ..इथल्या इथे राहील ..असे कबुल करून घेतल्यावरच .आपण हेमुला

होकार द्यायचा हे नक्की.

असे मनात जेव्हा पक्के ठरवले ..तेव्हा कुठे नेहाला जरा हायसे वाटले .

काही महिन्यापूर्वीची नेहा ..आणि आजची नेहा ..किती फरक पडलाय न आपल्यामध्ये !

नेहाला सुरुवातीचे दिवस आठवले ..

मधुरिमा दीदी .. सतत सुचना करायची , आपल्यातला ..काकूबाईपणा “ ,मनातला कमीपणाचा

न्यूनगंड , स्वभाव्त्ला बुजरेपणा , लोकांच्या समोर वावरतांना आवश्यक असणारा एक आत्मविश्वास “

या सगळ्या गोष्टी शिकवण्याची तिची धडपड , आणि मनात असलेली आपलेपणाची भावना “

किती मनापसून केलाय या मधुरिमादीदीने आपल्यासाठी .

वास्तविक ..दोघीत काहीच नाते नाही, ना परिचय ,न सहवास ..पण..निमित्त मात्र मावशीच्या

घरी दोघींचे एकत्र असणे ..मावशीची एक नातेवाईक , भाची ,या नजरेने तिने कधी आपल्याकडे

नाही पाहिले आणि मोठ्या बहिणीने काळजी घ्यावी , मैत्रिणीने मैत्री भावनेतून खूप काही करावे

अशाच रीतींने मधुरिमादीदी आपल्याशी वागत आलेली आहे.

ही नोकरी ..याच ऑफिसातला हेमू पांडे , सोनिया – अनिता ..आपली कंपनी ,आपले बिग बॉस

हे सगळे तिच्या परिवारातील आहेत . म्हणून तर तिची धडपड आहे की ..

हेमू पांडे बरोबरच आपले लग्न व्हावे ..!

बाप रे ..आजकालच्या बेगडी दुनियेत ..मधुरिमादीदी सारखी माणसे अजून ही आहेत ..!

आपण हेमू पांडेला होकार दिलाय ..हे समजल्यावर दीदीला खूप आनंद होईल हे खरेच आहे.

पण, सध्या तिला हे सांगायचे नाही हे पक्के .

अशा विचारचक्रात नेहाने दिवसभरात ऑफिसातले काम सवयीने संपवले . ती निघेपर्यंत

हेमू पांडे आलेला नव्हता ..म्हणजे आता थेट भेट ..” नऊ वाजता ..डिनरला होणार !

तसेच झाले ..

अनिता आणि सोनिया खूपच उत्सुक झालेल्या होत्या ..एक तर खूप दिवसांनी हॉटेल मधले

जेवण ..त्यात एकत्र गप्पा –टप्पा ..अगदी आवडीचा कार्यक्रम ..

हेमू पांडे ही पार्टी का बरे देतो आहे ? हा सस्पेन्स ..त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता .

हेमू पांडेच्या आवडीच्या रंगाची साडी नेसून जायची ..आयडिया ..सुचली होती ..पण..

तिला असे सजून धजून ..निघालेले पाहून ..संशय आला तर ? सब भेद खूल जायेगा ..!

मग, नेहा नेहमी प्रमाणे .साध्या ड्रेस मध्ये तयार झाली ..

नेहमी प्रमाणे ..अनिता-सोनिया दोघींनी तिला टोमणे मारले .

अग, वेडे मुली , आमच्यासाठी नको होऊ छान तयार ..

पण, तुझ्या हिरोचा ..हेमूचा तरी विचार करायचा , निव्वळ काकूबाई आहेस तू..!

नेहाने गुपचूप रहात सगळे ऐकून घेतले ..पण, मनातून मात्र तिला आनंदाच्या उकळ्या

फुटत आहेत “ असे वाटत होते.

हॉटेलमध्ये तिघी पोन्च्ल्या ..हेमू पांडे त्यांना रिजर्व्ह करून ठेवलेल्या टेबलाजवळ घेऊन

गेला ..आणि त्याने खुर्च्यात बसण्यास सांगितले ..

आणि म्हणाला .. अनिता आणि सोनिया दीदी ..तुमचा सस्पेन्स जास्त ताणून धरीत नाही मी ..

तुमच्या समोर ..तुमच्या साक्षीने मी ..आज..आत्ता ..या वेळी ..

या नेहाला ..प्रपोज करतो आहे की –

नेहा ..आय लव्ह यु ..

तू माझ्याशी लग्न करावेस अशी विनंती करतो आहे ..

Will you marry me ?

हेमू पांडेच्या या प्रपोजाल्वर अनिता आणि सोनियाने आनंदाने टाळ्या वाजवीत म्हटले ..

ए – नेहा ..कम ओन.. ..यस म्हण ..तुझ्या हीरोला ..

अजिबात आढेवेढे न घेता .. सोनिया आणि अनिता कडे पाहत म्हटले ..

तुम्ही तिघे ..माझी ही एकच अटआहे ती ऐका ..मान्य असेल तरच मी ..काही बोलेन..पुढे ..

नेहाच्या तोंडून अचानक ..एक कंडीशन आहे “ हे शब्द ऐकून हेमू पांडे क्षणभर परेशान झाला ..

अनिता म्हणाली ..

तू सांग नेहा ..तुझी अट काय आहे ती ..मी प्रोमीस करते ..ती आम्हा तिघांना पूर्णपणे मान्य असेल .

हो न हेमू, होणा सोनिया ..?

ते दोघे ही लगेच म्हणाले ..हो , हो , नेहा आम्हाला मान्य असेल तुझी अट !

नेहा सांगू लागली ..

आज इथे जे काही घडते आहे ..त्याबद्दलचे आपल्या चारजणाशिवाय इतर कुणालाही

काहीच कळू द्यायचे नाही , अगदी मधुरिमादीदीला सुद्धा नाही . आणि आमच्या

दोघांच्या घरच्यांना सुद्धा यातले काहीच सांगायचे नाही .

मी जेव्हा म्हणेल ..त्या नंतर ..आपण अगदी आनंदाने सांगू सगळ्यांना .

बोला ..आहे का कबुल माझी अट...! ?

नेहाची अट ऐकून .अनिता आणि सोनिया दोघी म्हणाल्या

हो ,एकदम मान्य ..तुला हवा तेव्हढा वेळ घे अजून ..पण,

आज आमच्या हेमुला तुझा होकार देऊन टाक बाई ..!

टेबलवर असलेल्या फ्लोवर –पॉट मधील एक गुलाब घेत ..

तो हेमूच्या हातात देत ती म्हणाली ..

यस..हेमू ..आय विल ..!

पण, आत्ता ठरल्या प्रमाणे मला जेव्हा योग वेळ वाटेल त्या नंतर

मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार असेल.

अनिता –सोनिया ..बघा ..मी याला आता तुमच्या समोर म्हणते ..

डियर ..हेमू ..आय लव्ह यु ...!

अनिता आणि सोनिया दोघीनी आनंदाने हेमू आणि नेहाला मिठी मारीत म्हटले ..

बेस्ट रे एकदम बेस्ट ..दो हंसो का जोडा ..

मन भरभरून प्रेम करा रे..

god bless you..

आणि मग याच आनंदात पार्टी चालू राहिली खूप वेळ..किती तरी वेळ....

--------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचा पुढील भागात

भाग- ३५ वा लवकरच येतो आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED