Sparsh - 24 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - भाग 24

ज्या आई- वडिलांनी तिला जन्म दिला त्याच आई- वडिलांनी तीच अस्तीत्व नाकारल्यामुळे तिची जगण्याची इच्छाच संपली होती ..मानसीला वाटायचं की अभिला पुन्हा त्रास नको म्हणून ती त्याच्याशी बोलायला तयार नव्हती आणि तिला घरच्यांनीच समजून घेतलं नव्हतं तर समाजातील लोकांकडून कसलीच अपेक्षा नव्हती ..अस नाही की ती काहीच करू शकत नव्हती पण जगण्यासाठी तिच्याकडे कुठलाच पर्याय उरला नव्हता ..त्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस समजून ती आज जगत होती ..रात्र भरपूर झाली होती तर लॉजवर न जाता एका चौकात बसून होती ..तिच्यासोबत काही वृद्ध मंडळीही सोबत होती.आजूबाजूला सर्विकडे गर्दी असली तरीही ती त्या सर्वात एकटीच बसून होती ...डोळ्यात अश्रूही होते आणि ते अश्रू पुसायला कुणीच जवळ नाही ..

हर घडी बदल रही है रूप जिंदगी
छाव है कही कही है धूप जिंदगी
हर पल यहा जी भर जियो
जो है समा कल हो ना हो ..

हो पलको के ले के साये
पास कोई जो आये
लाख संभालो पागल दिलं को
दिलं धडके ही जाये
पर सोच लो इस पल जो है
वो दासता कल हो ना हो ..


इकडे मानसी एकटी बसून रडत होती तर माझीही स्थिती काहीच तशीच होती ..मानसी समोर होती तेव्हा तिला दुःख होऊ नये म्हणून तिच्यासमोर रडुदेखील शकत नव्हतो ..आज ओरडून - ओरडून रडावस वाटत होतं ..घराचे दार खिडक्या बंद करून घेतले आणि जेवढ्या जोराने होईल तेवढ्या जोराने ओरडू लागलो ..अश्रूही थांबत नव्हते आणि मानसीही सोबत नव्हती ..आज माझ हृदय देखील तिच्यासोबतच गेलं होतं ..मीही प्रेमाच्या त्या अथांग सागरात कुठेतरी हरवत गेलो ..त्या खोल डोहात मी फक्त एकटाच होतो ..श्वास रोखून ..

चाहे जो तुम्हे पुरे दिलंसे
मिलता है वो मुश्किल से
ऐसा जो कोई कही है
बस वही सबसे हसी है
ऊस हाथ को तुम थामलो
वो मेहरबा कल हो ना हो


हर घडी बदल रही है रूप जिंदगी
छाव है कही कही है धूप जिंदगी
हर पल यहा जी भर जियो
जो है समा कल हो ना हो ..


दुसरा दिवस उगवला ..मानसी तिकडे जीवनाचा शेवट करायला निघाली ..शेवटचच म्हणून तिने एकदा दुरुनच आपल्या आईबाबांना पाहून घेतलं ..ती शाळा , ते कॉलेज जिथे तिने काही दिवस घालवले होते ते सर्व डोळ्यात भरून घेतलं ..आज खूप दिवसाने ती मंदिरात जाऊन आली होती आणि या आयुष्यासाठी तिने देवांचे धन्यवाद मानले फक्त एक कामना करायला विसरली नाही ..देवा मला या जन्मात तर या जगात स्थान नाही पण पुढच्या जन्मी मला मुलगा बनून पाठव ..फक्त मुलगा बाकी काही नको ..आणि ती त्याचीच भेट घ्यायला निघाली ..रात्रीचे 10 वाजले होते आणि ती रेलवे स्टेशनकडे जाऊ लागली ..रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि आपलं जीवन संपविण्यासाठी गर्दी नसलेली जागा शोधू लागली ..ती समोर - समोर जात होती आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले ..आता फक्त काहीच क्षण बाकी होते आणि तिच्या खांद्यावर मागून एक हात आला.." बेटा मानसी तू इकडे कशी काय..मी तुला केव्हाची आवाज देते आहे पण तुझं लक्षच नाही माझ्याकडे " , मानसीच्या सासूबाई म्हणाल्या ..आणि तिने आईला घट्ट मिठी मारली ..आई पुन्हा एकदा विचारू लागली , " का ग माझ्या अभिने काही केलं का थांब त्याचे कानच खिचते घरी गेल्यावर ..आधी रडणं थांबवं बर ..आणि इथे कशी ते सांग ? " ..मानसीने डोळे पुसले आणि म्हणाली , " मैत्रिणीला सोडायला आले होते ..आणि काहीच नाही केलं अभिने ..मी मैत्रिणीला सोडून सरळ घरीच येणार होते ..पण तुम्ही इथे कशा ? " , आणि आई उत्तर देत म्हणाली , " अग अभिच्या बाबांना ऑफिसच्या कामाकरिता बाहेर जायचं होतं म्हणून त्यांना सोडायला आले ..चल ..आता निघुया .." देव पण काय आहे न त्याच अस्तित्त्व आहे की नाही हा प्रश्न नक्कीच आहे पण माणसाच्या रूपाने तो प्रत्येकदा सोबत असतोच..तिने एकदा देवाचे धन्यवाद मानले आणि आईसोबत घरी निघाली ..

मानसीने सकाळपासून जेवण केलं नव्हतं ..तिचा चेहरा पार गळुन गेला होता ..त्यामुळे आईने तिला प्रेमाने वाढायला घेतलं ..तीही आनंदाने ते सर्व खात होती ..आणि शेवटी मातोश्रीनी मला फोन केला ..त्यावेळी मी बेडवरच पडून होतो ..आईचा कॉल येताना दिसला आणि मी रिसिव्ह केला , " काय रे अभि मानसीला असच एकट सोडून दिलस ..तुला नव्हतं जमत तर आम्हाला सांगायचं मी गेले असते तिला आणायला ..तू असा कसा रे ..? " आणि मी हसू लागलो ..मानसी आईकडे होती हे ऐकून मला फार आनंद झाला होता आणि तिला उत्तर देत म्हणालो , " आईसाहेब तुझी सुन फार नाटकी आहे बर का !! थोडासा वाद काय झाला आमच्यात ती लगेच माहेरला पडून गेली आणि रुसून तर इतकी होती की माझा फोन पण उचलत नव्हती .." आणि आई पुन्हा एकदा माझ्यावर ओरडत म्हणाली , " तूच काही केलं असेल म्हणून ती आली ..मला विश्वास आहे तिच्यावर .." , आणि मी हसत म्हणालो , " हो मातोश्री आधी तिला फोन द्या ..सॉरी म्हणायचं आहे .." आईने तिला फोन दिला ..." मानसी मला आता तुझ्याशी काहीच बोलायच नाही ..आई झोपली की कॉल कर मला .." बोलून फोन कट करून दिला ..

पाऊण तास झाला होता ..तिच्या फोनची वाट पाहू लागलो पण फोन काही येईना ..इकडून तिकडे चकरा मारून झाल्या होत्या तरीही स्थिती सारखीच होती ..बऱ्याच प्रतीक्षेनंतर तिचा फोन आला आणि आज पहिल्यांदाच तिला रागावत म्हणालो , " मानसी वेडी आहेस का तू ? ..किती दिवस झाले कॉल करतो आहे तुला पण फोन बंदच होता..माझा जीव इथे टांगणीला लागलेला असताना तू एवढी बिनधास्त कशी असु शकतेस ...आता काही तर बोल ? " आणि ती रडू लागली ..मला माझीच चूक कळाली आणि म्हणालो , " सॉरी ..काळजी वाटते ग खूप म्हणून बोलतोय ..आधी रडू नको डोळे पूस बर आणि हो मी येतोय उद्या तुला भेटायला .." आणि ती पहिला शब्द म्हणाली , " माझ्यामुळे तुला आधीच खूप त्रास झाला आहे आणि सुट्ट्या पण झाल्या आहेत ..तेव्हा नको येऊ नाही तर तुझी जॉब पण जाईल आणि मग मला आवडणार नाही ते " , आणि तिच्या शब्दावर हसत म्हणालो , " मॅडम तुझ्यासाठी हजार जॉब कुर्बान तस पण तुझ्यापेक्ष्या मला जॉब खास नाही सो वाट पाहा माझी उद्या .."..
दुसऱ्या दिवशी जी सर्वात पहिली फ्लाइट होती त्या फ्लाइटने पोहोचलो ..घरी पोहोचायला जेमतेम अंधार झाला होता ..घरी पोहोचलो तसच आईने म्हटल्याप्रमाणे माझे कान धरले आणि मानसी ते सर्व बघून हसू लागली ..खूप मस्त क्षण होता तो ..मी मानसीला सॉरी म्हणालो तेव्हा कुठे तिने माझे कान सोडले ..दोघेही खूप दिवसाने एकत्र जेवण करीत होतो म्हणून तीही आम्हाला प्रेमाने वाढू लागली .तिच्याकडे पाहून मला नेहमीच अप्रुप वाटायचं ..किती सुंदर असते ना आई ..स्वताला कितीही त्रास होत असला तरीही मुलांना तेवढ्यात प्रेमाने जवळ घेणारी ..जेवण झालं आणि आई मी मानसी गप्पा मारत बसलो ..खूप दिवसानंतर आई आणि मी असे गप्पा मारत होतो आणि ती आपल्या काही आठवणी आम्हाला सांगत होती ..आई बोलताना नेहमीच विनोद करत असे त्यामुळे आज मानसी खळखळून हसत होती ..बोलताना बराच उशीर झाला आणि आईला झोपायला लावून आम्ही बाहेर निघालो..मानसी मला तुझ्याशी काहीतरी बोलायच आहे वर टेरिसवर ये " अस सांगून मी वर गेलो ..तीही माझ्या मागे आली ..न राहवता मी सरळच तिला म्हणालो , " मानसी का अशी वागते यार ..फोन पण बंद करून ठेवला होतास..मला किती काळजी वाटत होती तुझी ..बर ते सोड तू बोलणार होतीस ना बाबांशी ..मग बोलली .." आणि ती शांत होत म्हणाली , " हो बोलले .."

" मग काय म्हणाले ? " , मी म्हणालो आणि ती त्यावर म्हणाली , " जे गृहीत धरलं होत तेच म्हणाले .प्रथा , परंपरा , समाज यासमोर माझं काहीच चाललं नाही ..दोन पर्याय दिले त्यांनी एक तर आम्हाला स्वीकार किंवा तु तुझं जीवन जग .मी आले त्यांना सोडून ..काही दिवस असेच गेले ..मग जगण्यासाठी कारणच उरलं नव्हतं ..म्हणून मरायला निघाले तर आई भेटली आणि मी इथे आहे .."

आता माझं डोकं सुन्न झाल होत ..पण तिच्यावर चिडन हा पर्याय अजिबात नव्हता म्हणून शांत होत म्हणालो , " मानसी मी तुला मनमोकळं जगण्यासाठी पाठवलं होत ..स्वताच जीवन संपविण्यासाठी नाही ..जगत असताना असे कित्येक लोक तुला वाटेवर भेटतील मग त्या सर्वांचा विचार करत बसणार आहेस का आणि स्वताचा विचार केव्हा करणार आहेस ..तुला सोडणं माझ्यासाठी किती कठीण होत पण तुला हवं तसं जगता याव म्हणून काळजावर दगड ठेवून मी ते मान्य केलं आणि तू जीवन संपवायला निघालीस ..मृत्यू साठी फक्त दोन मिनिटे लागतात ..जीवन जगून बघ आणि तिथेही हरली तर हे दोन मिनिटं पुन्हा तुला परत मिळणारच आहे आहेत ..आणि तू मला एवढ्या लवकर परक केलंस का ? विसरू नको मी आताही तुझा नवराच आहे ..तुला माहिती नाही पण आपलं लग्न होताना मी तुला सात वचन दिले होते ..त्यातलं पहिलं वचन ..विवाह बंधन असलं तरीही त्या बंधनात तुला कधीच जगावं लागणार नाही म्हणून तू माझं सर्वस्व असतानाही मी तुला मोकळं केलं ..दुसरं वचन संपूर्ण जग तुझ्या विरोधात असलं तरीही मी तुझी कायम साथ निभावेन ..तिसर वचन ..आजपासून तुझी सारी स्वप्न माझी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर असेल ..चौथ वचन माझा संपूर्ण वेळ फक्त तुझ्या आनंदासाठी असेल ..वचन पाच तुला जे क्षण जगता आले नाहीत ते मी याच जन्मात तुला देईल ..वचन सहा आजपासून मी माझं आयुष्य , हृदय तुला बहाल करतो आहे आणि तिच्याजवळ जाऊन डोळ्यातले अश्रू पुसत म्हणालो की तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच येऊ देणार नाहीत ..मान्य आहे मानसी की आपल नात आता तस नसेल पण ही सातही वचन फक्त माझ्या श्वासासोबतच नाहीशी होतील आणि तोपर्यंत तू फक्त माझी जबाबदारी आहेस ..मला नाही फरक पडत तुला कुणी स्वीकारलं किंवा नाही ..मी तुझ्यासाठी संपूर्ण जगासाठी लढायला तयार आहे ..वेळ आली तर माझ्या घरच्यांच्या विचारांशीही ..पण तू आपलं अमूल्य जीवन वाया घालवू नको ..मी साथ देईल तुला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि जोपर्यंत तू कमावती होणार नाहीस तोपर्यंत आपण एकत्रच राहूया मित्र म्हणून ..ना कसलं बंधन ना काही फक्त मित्र आणि इथे मी तुझा एकही शब्द ऐकणार नाही ..हा तुझ्या नवऱ्याचा आदेश आहे आणि नवऱ्याचा आदेश म्हटलं की प्रत्येक पत्नीला मानावाच लागतो हो की नाही आणि कधीकधी ना एकट चालण्यापेक्षा कुणाची तरी साथ हवी ..रस्ता सुखकर होत जातो ..वाटाड्याच काम झालं की तो जाईल निघून .."

माझ्या बोलण्यावर ती हसली आणि मला तीच उत्तरही मिळालं..आम्ही पुढचा दिवस घरीच होतो ..आईसोबत काही क्षण घालवले आणि पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघालो ..

क्रमशः ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED